May 15, 2021
नारीवादी

ओवाळणी

Read Later
ओवाळणी

हक्कसोड पत्रावर सही करत असताना तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आले.. तिने लगेच डोळ्यातील पाणी पुसले आणि सही करून ती लगेच घरी आली.. घरी आल्यावर ती खूप रडली.. आईला जाऊन फक्त चार महिने झाले होते.. वडील तर आधीच गेले होते..

सुमनचा भाऊ आई गेल्यावर चार महिन्यांनी लगेच बहिणीचे हक्कसोड पत्र करून घेतले.. तशी त्याला गरज होती.. कारण प्रत्येक वेळी सहीसाठी बहिणीला इकडे बोलावून घेणे त्याला जमत नव्हते.. पण तरिही तिला याचे खूप वाईट वाटले.. तशी तिला भावाकडून भावाच्या इस्टेटीमधले काहीच घेण्याची अपेक्षा नव्हती.. तिच्या सासरमध्ये भरपूर श्रीमंती होती.. पण तरीही तिला खूप वाईट वाटत होते.. इतक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला..

"हॅलो, सुमन काय करतेस तू?" मैत्रीण

"काही नाही ग.. बसले.." सुमन

"अगं तुझा आवाज असा का येत आहे? तू रडतेस का?" मैत्रीण

"हं.." सुमन

"पण का? काय झालंय?" मैत्रीण

"अगं भावाने हक्कसोडपत्र करून घेतले.." सुमन

"मग येऊ दे ना तुला काही कमी आहे का?" मैत्रीण

"मला काहीच नको होते ग.. पण तरीही थोडं वाईट वाटते त्याने इतक्या लवकर हे सगळं करायला नको होतं.." सुमन

"अगं त्याची पण काहीतरी अडचण असेलच ना.." मैत्रीण

" हो पण तरीही मला थोडं वाईट वाटतंय.." सुमन

" तुझ्या मनात नक्की काय आहे मला सांगशील का?" मैत्रीण

"अगं म्हणजे आईचे दागिणे.." सुमन

"हा मग त्याचे काय? ते तर तुलाच मिळायला हवेत ना.. कारण आईचे दागिने मुलीलाच मिळतात.." मैत्रीण

"नाही ग.. ते मला मिळावे अशी माझी इच्छा नाहीये.. पण वहिणीने ते दागिने मोडून नवीन दागिने करू नयेत एवढीच इच्छा आहे.." सुमन

"मग तसे सांग ना तू.." मैत्रीण

"कसे सांगणार ग? मला तर बोलायला पण भीती वाटत आहे.. अर्थाचा अनर्थ झाला तर.." सुमन

" हो ग मंग आता तू शांत रहा आणि थोड्या दिवसांनी एकदा दादाला बोलून बघ.." मैत्रीण

"हो.." सुमन

काही महिन्यांनी दिवाळीचा सण येतो.. अखेर भाऊबीजेचा दिवस उजाडतो.. भाऊबीजेला नेहमीप्रमाणे सुमनचा भाऊ येतो.. तिनेही भावासाठी पंचपक्वान्न बनवलेले असते.. समन्वय भावाला ओवाळते आणि भाऊ तिला एक बॉक्स देतो..

सुमन तो बॉक्स उघडून बघते तर त्यात तिच्या आईचे दागिने आणि काही पैसे असतात.. ते पाहून तिचे डोळे भरून येतात.. तिचा दादा म्हणतो, "तू काहीही न मागता हक्कसोड पत्रावर सही केलीस.. त्यामुळे तुला ही ओवाळणी मी स्वखुशीने देत आहे.. याचा स्वीकार कर.." हे ऐकून तिला रडू आले आणि ती भावाला म्हणाली, "दादा मला याची काहीच अपेक्षा नाही.. फक्त माझी माहेर शेवटपर्यंत टिकावे एवढीच अपेक्षा आहे आणि आईचे हे दागिने तसेच राहावेत इतकीच इच्छा आहे.."

हे ऐकून तिच्या दादाचे डोळे पाणावले तो म्हणाला जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे माहेर अखंड राहील..

Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..