Jan 19, 2022
Poem

तुझंमाझं नातं

Read Later
तुझंमाझं नातं

तुझंमाझं नातं
आभासी जगातलं
वास्तवा पलिकडलं
वाळवंटातील म्रुगजळासारखं

तुझंमाझं नातं
ऑनलाइन बहरणारं
परस्परांच्या वेदना
क्षणभर विसरायला लावणारं

तुझंमाझं नातं
त्याला नाही कोणतीच नावं
कल्पना न् वास्तवाच्या
सीमारेषेवर अलगद तरंगणारं

तुझंमाझं नातं
लाईक्सकमेंटीच्या पलिकडलं
न बोलताच मनाचा ठाव घेणारं
वाऱ्याच्या थंडगार झुळुकेसारखं..
पाण्यावर उमटणाऱ्या तरंगांसारखं
आभासी तितकच अलवार हळवं

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now