आपली महत्वाकांषा हीच आपली खरी ओळख ठरत असते

आयुष्यात कितीही संकटे अणि अडचणी आल्या तरी आपल्या महत्वाकांषेचा कधीच बळी देऊ नका त्याग करू नका

आपली महत्वाकांक्षा हीच आपली खरी ओळख ठरत असते.

    तसे पाहायला गेले तर मी मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड या महाविदयालयात एम ए मराठीच्या 
दितीय वर्षात शिकत आहे. तसेच मी मालेगाव येथीलच रहिवासी आहे.अणि मी अजुन कमावत नाही कारण मी अजुन शिकतो आहे.अणि मला खुप शिकायचे आहे.मला वाचणाची अणि लेखणाची फार आवड आहे.अणि लेखणाची तर फारच आवड.एकवेळ मी दिवसभरात वाचन करणार नाही पण लेखन मी रोज करतो.मनात जे आले ते सगळे लिहुन टाकतो.मी रोज कधी लेख लिहितो कधी निबंध लिहितो तर कधी एखादया बघितलेल्या चित्रपटावर परिक्षण लिहितो,कधी सामाजिक समस्यांवर वैचारिक लेखनही करतो म्हणजेच मी माझ्या मनात येईल ते लिहितो पण लिहितो हे नक्कीच.
   पण ते म्हणतात आयुष्यात सर्वच गोष्टी हया आपल्या मनासारख्या होत नसतात.तेच माझ्यासोबतही घडले.अणि एकेदिवशी आई मला म्हणाली खुप झाले शिक्षण.दिवसभर वेडयासारखा मोबाईलवर काहीतरी लिहित राहतो.आता तु शिस्तीत काम बघ.अणि तुला शिकायचेच आहे तर काम करुन शिक आमची त्याला काहीच हरकत नाही पण आता तु काम बघ.असे माझी आई मला एकेदिवशी म्हणाली.अणि तिचेही कुठेच चुकले नाही.कारण प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपल्या मुलाने स्वताच्या पायावर उभे राहावे.त्याने कोणावर अवलंबुन राहु नये त्याने सक्षम बनावे.त्याने मोबाईलवर चँटिंग करण्यात आपला वेळ व्यर्थ वाया घालवु नये.पण मी ही माझ्याजागी कुठेच चुकीचा नव्हतो कारण मी मोबाईलवर चँटिंग करत नसुन लेख लिहायचो.पण आई माझे काही ऐकुण घ्यायलाच तयार नव्हती.आईला वाटायचे मी उगाच मोबाईलमध्ये काडया करत बसतो.अणि अजिबात अभ्यास करत नाही.म्हणुन आई मला म्हणाली आता तु काम बघ.
   मग आईने सांगितल्याप्रमाणे मी माझ्यासाठी काम बघायला सुरुवात केली.माझ्या भाऊने मग एकेदिवशी माझ्यासाठी घरबसल्या एक आँनलाईन फाँर्म भरायचे काम आणले पण मी ते करावयास स्पष्ट नकार दिला.कारण खरे सांगायचे म्हटले तर मला लिहायची खुपच मनापासुन आवड आहे.माझ्या मनात जे आले ते मी जोपर्यत लिहुन टाकत नाही.तोपर्यत मला चैनच पटत नाही.अणि एखादया मुददयावर,विषयावर मला लिहायला सुचले अणि मी त्यावर लेखन केले नाही तर मला एकदम अस्वस्थ वाटायला लागते.अणि माझे कशातच मनही लागत नाही.माझ्या आतुन बाहेर येण्यासाठी काहीतरी तडफडु राहिले असे वाटते.
  म्हणुन माझी मनापासुन ईच्छा होती की मला कामही असे मिळावे की ज्यात मला दोन पैसे कमावुन आईला घरात हातभार लावता येईल अणि माझा लिहिण्याचा छंदही मला जोपासता येईल अणि माझे लिहिणे तसेच शिक्षणही बंद होणार नाही.म्हणुन मी माझ्या व्हाँटस अँपवर काही साहित्यिकांच्या गटावर जोडलेलो असल्यामुळे मी त्या गटावरील सगळयांना अशी विनंती केली की माझ्यासाठी असे काही काम बघा की ज्यात मला मनसोक्त लेखनही करायला मिळेल अणि त्याच मोबदल्यात मला दोन पैसेही मिळतील.याच्यामागे माझा हा एकच हेतु होता की मला भरपुर लिहायला मिळावे माझ्या लिहिण्यात काही खंड पडु नये अणि मला घरात माझ्या दोघे भाऊंना अणि आईवडिलांना घरात घरखर्चासाठी थोडासा हातभारही लावता यावा.
   अणि मग मी ज्या साहित्यप्रेमी नावाच्या व्हाँटस अँपच्या गटावर समाविष्ट होतो त्या गटावर समाविष्ट एक ताई मला म्हणाल्या की तुम्ही ईरा ब्लांगिंगवर लिहित जा.तेथे तुम्हाला मनसोक्त लिहायला पण मिळेल अणि त्यामोबदल्यात तेथे तुम्हाला योग्य ते मानधनही मिळेल.मग मी त्या ताईंचे ऐकुण लगेच दोन दिवसापुर्वीच ईरा ब्लाँगिंगवर जोडलो गेलो.अणि आज मला मनसोक्त लिहायलाही मिळते आहे अणि त्यामोबदल्यात मला माझ्या लिहिण्याच्या बदल्यात योग्य ते मानधनही मिळणार आहे.
   म्हणजेच मी आता मनसोक्त लिहु पण शकतो अणि त्याचबरोबर मला महाविदयालयीन शिक्षण सोडुन इतर कुठे कामाला लागायची गरजही नाही पडणार.
   खरच ईरा ब्लाँगिंगचे मानावे तेवढे आभार कमी आहे.कारण आज त्यांच्यामुळेच मला माझा लिहिण्याचा छंदही जोपासता येणार आहे,मला मनसोक्त लिहिता येणार आहे.अणि दोन पैसे कमावताही येणार आहे.
   अणि असे म्हणतात की आपली महत्वाकांक्षा हीच आपली खरी ओळख ठरत असते.याचाच प्रत्यय मला हया प्रसंगातुन आला की आपली महत्वाकांक्षा म्हणजे आपल्याला जे काही बनायचे असते.जे करण्याची आपल्याला मनापासुन आवड असते.तीच आपली खरी ओळख ठरत असते.
   अणि आज माझी लिहिण्याची आवड हीच माझी खरी ओळख ठरते आहे.आज तुम्हा सर्व वडीलधार्या लोकांसमोर मला माझे विचार,माझ्या भावना मांडायला भेटते आहे.एवढे मोठे व्यासपीठ आज मला स्वताला व्यक्त करण्यासाठी मिळाले आहे.एवढया लोकांसमोर आज मी एक लेखक म्हणुन लिहितो आहे.याचा मला खुप मनापासुन आनंद आहे.
  म्हणजेच आज माझी महत्वाकांक्षा हीच माझी खरी ओळख ठरते आहे.मला असलेल्या लिहिण्याच्या आवडीमुळेच आज मी हया व्यासपीठावर एक लेखक म्हणुन तुम्हा सर्व लोकांसमोर प्रकाशित होतो आहे.
   अणि हया सगळयातुन आज मला एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळाली ती म्हणजे अशी की जर आपल्या मनात  एखादी गोष्ट करण्याची मनापासुन ईच्छा असेल तर ती गोष्ट करण्यासाठी मार्गही आपल्याला आपोआपच मिळत जातात.फक्त आपण जिदद अणि चिकाटी सोडायची नाही.जर आज मी लिहिण्याचेच काम मला मिळावे असा अटटहास माझ्या मनाशी धरला नसता तर आज मी ही माझे मन मारुन एखादे असे काम करत बसलो असतो ज्यात मला अजिबातच आवड नाही,अजिबात रूचीच नाही.अणि त्यातच मनाविरुदधचे काम करण्याचे दुख मला आयुष्यभर सहन करत बसावे लागले असते ते अलगच.ते ही मी घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे,मी निवडलेल्या एका चुकीच्या मार्गामुळे.
  पण मी माझ्या निर्णयाशी आज ठाम होतो की मी काम करणार तर लेखक म्हणुनच करणार.म्हणुन आज मी तुमच्या सगळयांसमोर आज एक लेखक म्हणुन लिहितो आहे.माझ्या मनाशी मी जी खुणगाठ बांधली होती की काम करणार तर लेखकाचेच काम करणार त्यामुळे आज हे सर्व शक्य झाले आहे.
   म्हणजेच मी माझ्या मनाशी केलेल्या दृढ निश्चयामुळेच आज माझी महत्वाकांक्षा हीच माझी खरी ओळख ठरते आहे.
 अणि हया सगळयातुन मला तुम्हाला एकच सांगायचे आहे की जीवणात कधीच आपल्या महत्वाकांक्षाचा बळी देऊ नका.मग परिस्थिती कशीही असो.आपल्या घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायला शिका.आपली महत्वाकांक्षा जोपासण्याची मनात असलेली आपली ईच्छा सोडु नका.मग बघा मला जसा आज मार्ग मिळाला आहे.तसा तुम्हालाही तुमचा मार्ग नक्कीच मिळेल.
    अणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा आपण आयुष्यात कितीही,काहीही अणि कोणतेही काम केले तरी शेवटी आपली महत्वाकांक्षा हीच आपली खरी ओळख ठरत असते.