Feb 26, 2024
नारीवादी

पुर्नजन्म भाग - तीन

Read Later
पुर्नजन्म भाग - तीन


             आरोहीने तिच बीएडच शिक्षण पूर्ण केल होत. लग्नाला दोन वर्ष झाली होती. तिचा नवरा काही सुधारत नव्हता. उलट तिच्या सासुबाई तिलाच म्हणायच्या, " तु त्याच्या बाहेरच्या गोष्टींकडे का लक्ष देते, तुला सगळ मिळतय ना इथे मग तरी "  सासुबाईंनी अस म्हटल्यावर आरोही काय बोलणार होती. त्याच्या घरच्यांना विक्रांतच्या सगळ्याच गोष्टी माहीती होत्या पण त्यांनी आरोहीपासुन लपवल्या होत्या. विक्रांत आरोहिला तर बायकोसारख कधीही वागवत नव्हता. फक्त त्याची गरज म्हणून आणि घरात राबणारी बिनपगारी नोकरी याच नजरेने तो बघायचा. बाकी तिला कधी आजारी असली तरी विचारत नव्हता. एक दिवस आरोहिला कळल की त्याच बाहेर अफेयर आहे. इतर मैत्रीणींशीही तो फोनवर बोलत बसायचा. तो जास्त पैसेवाला असल्यामुळे पैशाच्या जोरावर आरोहिला काही बोलायचा. त्याला तिची काहिच गरज नव्हती हे त्याने तिला एक दिवस बोलुन दाखवल. तेव्हा मात्र आरोहीला खुप वाईट वाटल.नंतरून तर त्याचा बाहेरख्यालीपणा, दारू पिउन रात्री बेरात्री येऊन आरोहिला त्रास देण सुरूच होत. तिला वाटायच तो सुधारेल पण तो सुधारणा नव्हताच. उलट ति चांगला सांगायला समजायवयाला गेली की तो तीलाच मारायचा. या सगळ्या गोष्टीचा आरोहीवर मानसिक परिणाम होऊ लागला. तीला अलीकडेच विक्रांतच्या सगळ्याच गोष्टी समोर आल्या पण तेव्हा ती काहीच करू शकत नव्हती. तीन वर्ष ती त्याचा त्रास सहन करत आपला संसार करत होती. सासरी तिच आपल जवळच म्हणाव अस कुणीही नव्हत. माहेरीही विक्रांत आरोहीला जास्त दिवस ठेवत नव्हता.तिच्याशी लपवलेल्या सगळ्याच गोष्टी तिच्या समोर आल्या जाब विचारायला गेल्यावर उलट त्याने तिच्यावरच संशय घ्यायला आणि आरोप करायला सुरूवात केली. या रोजच्या त्रासाला आरोही खुप कंटाळली होती कारण नवरा ऐकही दिवस तिला त्रास दीला नाही अस झाल नाही तिच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावरु परिणाम होत होता.


      एक दिवस आरोहीने सासर, आणि विक्रांतच्या छळाला कंटाळुन यातुन एकदाच बाहेर पडायच ठरवल, तिने कुठलाही विचार न करता सुसाईड करायचा प्रयत्न केला पण तिच नशीब तिला काही झाल नाही ती वाचली. देवाने तीला पुन्हा जगण्याची संधी दिली म्हणुन घरच्यांनी आरूला आणि तिच्या नवर्‍याला सर्वांना समजावून पुन्हा त्यांना छान राहायला सांगितल.


आरोही माहेरी आली. ति खुप रडत होती. तिला सासरी खुप त्रास व्हायचा. घरचेही आणि विक्रांतही धड वागत नव्हता. लग्न करुने ती पस्तावली होती. त्या श्रीमंतीचा थाट तिला नकोसा झाला होता. ती हारली होती. खचली होती. एवढी पाॅझिटीव्ह असणारी ती आता मात्र दिवसेंदिवस विचार करत राहायची. सहजच आईने तिला विचारल काय झालय ? तेव्हा तिने थोडफार आईच्या कानांवर घातल. कुणाला वाटेल आपल्या लेकीचा संसार मोडावा आणि वाईट व्हाव... आईने मग तिला बाळाच विचार सांगितला. आता शिक्षणही झाल होत म्हणून
आरोहीने ठरवल की आपण हे खरच अस झाल तर कदाचित विक्रांत सुधारेल " तिने यावर विचार करायचा ठरवला.

      आईजवळ त्यादीवशी थोड का होईना मनमोकळेपणाने बोलल्यामुळे आरोहीला मन हलक झाल्यासारख वाटत होत. आई तिला म्हणाली,

" आरू, काही झाल तरी खचुन जाऊ नको ग, अस संसार म्हटल की होत असत. त्यामुळे तुम्ही दोघांनीही एकमेकांना समजुन घेतल पाहीजे बाकी सगळ ठिक होईल "

" हो ग आई , बरोबर आहे तुझ " , आरोही.

      आरोही पुन्हा सासरी आली. वीक्रांत अजुनही तसाच वागत होता. उलट नवनवीन त्याच्याविषयी ऐकायला यायच. पण आरोहीने तिकडे दुर्लक्ष करुन ती जगत होती. काही महीन्यांनी ती थोडी आजारी पडली. तिला बर वाटत नाही म्हणून डाॅक्टरकडे गेली असता, तिला डाॅक्टरांनी गुड न्युज असल्याच सांगितल. आरोहीला ही बातमी ऐकुन खुप आनंद झाला. तिला डाॅक्टरांनी खुप काळजी घ्यायला लावली. आज तिला घरी आल्यावर पहीली ही बातमी तिच्या नवर्‍याला विक्रांतला सांगायची होती. संध्याकाळी ती नेहमी प्रमाणे त्याची वाट बघत बसली होती. तो खोलित आला. थोड्या वेळाने आरोहीच त्याला म्हणाली," अहो, मला तुमच्याशी थोड बोलायच होत "

" हा बोल " , विक्रांत मोबाईल मध्ये डोक घालत म्हटला.

     आरोहीने त्याला गोड बातमी सांगितली, पण त्याला आनंद झाला नाही. उलट त्याला एवढ्या लवकर बाळ नकोच होत. त्याने तिला सांगितल की तुला पाहीजे असेल तर ठेव तुझा निर्णय आहे मला तरी वाटत आपण नको ठेवायला. आरोहीला खुप वाईट वाटल, लोक बाळासाठी किती प्रयत्न करतात, नवस करतात काहींच्या नशीबात तर हे सुख नसतही आणि हा विक्रांत असा कसा बोलू शकतो तिला तर विश्वासच बसत नव्हता. त्याला जबाबदारी नको होती फक्त लाईफ एन्जाॅय करायला हव होत. या गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद झाले.       आरोहीने ठरवल होत. काही झाल तरी मला हे बाळ हवय, मलाही आई व्हायचय. हवतर मी करेल या बाळाच सगळ तिने ठाम निर्णय घेतला होता. आरोहीने हा निर्णय घेतला म्हणून एक दिवस विक्रांत खुप ड्रींक करून रात्री उशीराने घरी आला त्याची वाट बघुन आरोही झोपून गेली होती. विक्रांत घरी आला. ती प्रेग्नंट असतानाही त्याने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली.तो तिला
काही बोलू लागला. तो असा काही बोलेल यावर तिचा विश्वासही बसत नव्हता.


          आरोहीची तो व्यवस्थित काळजी घेत नव्हता. तिचे आईबाबा तिला हेल्प करायचे. पैसे द्यायचे. ती प्रेग्नंट आहे म्हणून काळजी घ्यायला लावायचे पण विक्रांतवर काही परिणाम होत नव्हता. त्याला गरजेच्या गोष्टी बाहेरूनही मिळत होत्या. त्यामुळे तो आरोहीशी कसही वागत होता,आता हरायच नाही लढायच असा विचार केवळ पोटातल्या बाळामुळे तिने जगायच ठरवल आणि निर्णय घेतला की काही होवो या विकृत
माणसापासुन आपण वेगळ व्हायच.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//