Nov 23, 2020
रहस्य

आँर्डर आँर्डर ...प्लिज

Read Later
आँर्डर आँर्डर ...प्लिज

आँर्डर आँर्डर...प्लिज
                       भाग १ ला

             डिसेंबर म्हणजे थंडीचे दिवस.या दिवसांत ऊगवतही ऊशीराच.काळोख असतो नाही म्हंटलं तरी पावणे सात पर्यंत.त्याच कालावधीत त्याला रनींग ला जायला आवडयाचं.
      पहिले पहिले तो आपल्या बंगल्यापासून थेट मेन रोडवर तीन किमी.जायचा ...वाँक - रन करत.मधेच धावायचा मधेच वाँक घ्यायचा.फिटनेस ठेवायचा या वयातही म्हणजे जरा त्रास तर हवाच.तीन किमी जायचा तेवढेच परत यायचा.सहा कीमी मधे तरी जवऴ जवऴ ४५० कँलरी बर्न करायचा.त्याचं कँल्क्युलेशन रोजचं ठरलेलं असायचं.त्याचं खाण पीणंही नेमक..व सुटसुटित..डायेट नुसार..हर्बल लाईफ फाँलो करायचा तो.अतिशय गुणकारी व असरदार डायेट.
             नंतर नंतर तो बीचवरच जायला लागला रनींगला.मस्त फ्रेश हवा.फ्रेश आँक्सिजन वायू मिळायचा ..शरीरासाठी पोशक.समुद्राची फ्रेश हवा..म्हणजे अेक पर्वणी असायची.अल्टरनेट असायचं...त्याचं...अेक दिवस जीम वर्क आऊट तर अेक दिवस रनींग...सकाळी सहा ते सात अगदी ठरलेलं असायचं.
        आजही तो घरांतून पावणे सहानंतर निघाला.मोबाईलमधे अेक अँप असायचा..तो चालू केला की याच रनींग चालू व्हायचं.आजही काही वेगळं नव्हतं.तो आपल्या रिदम मधे वाँक घेत होता.दिड किमी झाल्याचे मोबाईल मधल्या अँपने बोंबलून सांगीतले.त्या प्रमाणे तो नेहमीच्या ठिकाणीही पोहचला होता.मोबाईल ने बोंबलायला "१० मीनीट झाली "व तो या ठिकाणी पोहचायला नेहमी ईतका वेळ लागायचाच.     त्याच्या ऊजव्या हाताला तेंव्हा स्मशान लागलेलं असायचं.आपल्या शेवटच्या ठिकाणाला नेहमी प्रमाणे नमस्कार करून तो धावतच पुढे झाला..नी क्षणात आता तो बीचवर पोहचला होता.ईथे रनींग ला मजा यायची.अेकतर काळोख असायचा सगळीकडे.
         सव्वा सहा वाजायला आले होते.पण अजून काळोख ,मी ..म्हणत होता.सराईतासारखा हा रनींग करत होता.फ्रेश हवा ,वाळू..अंधार..कानात हेडफोन्स..आणी हा..मस्त काँबीनेशन चालू होत.
      बीचवरचं रनिंग आता जेमतेम अर्ध्या किमीच झालं असेलं..तोच त्याच्या नजरेनं काही हेरलं.त्याच्या डाव्या हाताला..पुर्वेला अनेक बंगले होते.काही फार्म हाऊस ..काही काँटेजेस होते.सिआर झेड क्षेत्र होत परंतु जून नविन ...या आधाराखाली अनेक जूनी घर आता बंगल्यात रूपांतर झाली होती.अेका लाईनीत वाळूच्या अलिकडे टूमदार बंगले तसेच काँटेजेस होती.त्याच लाईन मधे अेका विशिष्ट अंतरावर स्ट्रिट लाईटचे खांबे आपलं काम मात्र चोख बजावत होते.
                  आपल्या रनींग च्या रिदम मधे तो ..त्या हालचालीने जरा डिस्टर्ब झाला होता.डाव्या बाजूच्या अेका छोटेखानी प्रायव्हेट बंगल्याच्या गेट वर त्याने काही हालचाल हेरली.अंधार अजून मी म्हणत होता.हिवाऴ्यात दिवस लेटच ऊजाडतो.
      त्याच्या तिक्ष्ण नजेरेन ती हालचाल टिपली होती.त्या अंधारात अेक व्यक्ती समोरच्या बंगल्याच्या गेट वरून खाली ऊतरत होती...हालाचाल फास्ट नव्हती..पण मंदही नव्हती.ती व्यक्ती अलगंद खाली ऊतरली.गेट तितकाही मोठा नव्हता.जेमतेम पाच फूटीचा तो गेट ..त्या व्यक्तीला प्रवेश करण्यास तसा रोखत मात्र नव्हता.
             त्या अंधारातल्या व्यक्तीने आरामात गेट ऊतरून अुत्तरेकडे म्हणजे हा जिथून रनिंग करत आला त्या बाजूकडे चाल धरली होती.तसा हा लांब होता..हाकही पोहचली नसती.परंतु नजर पोहचत होती..ती व्यक्ती .हा काही करणार तितक्यात अंधारात गुडूपही झाली.
     नाही म्हंटले तरी कूतूहल निर्माण झालेच होते.पुढचा त्याचा वाँक वजा रन..याच विचारात चालू होती.
   कोण असेल..?का आला असेल..?हातात काहीच नव्हते..ना बँग ना कोणती वस्तू..मग का आला असेल..?चोरी की अन्य काही...?
       हा परत वळला तेंव्हा निर्धारीत वेळेहून आज पाच मिनीटे जास्त लागली होती आज.त्या व्यक्तीचा विचार न रहावून भेडसावत होता...मनाला...काय असेल...?
     परतीच्या रनींग मधे त्याचे हेच विचार चालू होते.
       त्याच्या बाबांनी त्याला मागे अेक कथा घडलेली सांगीतली होती..
         साधारण ९ वर्षांपूर्वीची.त्यावेळी याच वय ३१ होत...तो तेंव्हा अमेरिकेत प्रँक्टिस करायचा...यस्..ही वाँज अँडव्होकेट...
     अँड.वैभव चांदोरकर...आज त्याचं वय ४० होत...सात वर्षांपूर्वीच तो भारतात परतला होता.आपल्या बाबांप्रमाणेच तो अेक अत्यंत हुशार व चाणाक्ष असा वकिल होता.परदेशात शिकला..तिथेच प्रँक्टिस चालू केली.तिथलीच समक्षेत्रातील अेका मूलीशी त्याचं प्रेम झाल अन् पर्यायाने लग्नही...सर्व छान व रेग्युलर आयुष्य चालू होतं.त्यालाही मायदेशी यायचच होत.बाबांचही आता वय होऊ लागलेलं..दोघेही आले ,सात वर्षांपूर्वीच मायदेशात.
                   तो आला आणी त्याचे बाबा..बँ.समर चांदोरकर...यस्..द बेस्ट बँरिस्टर ..व्हू हँज साँल्व्हड सो मेनी केसेस...पैकी अेक गणेश विरूध्द महाराष्ट्र सरकार...अशा अनेक...
     असे बँ.समर चांदोरकर वयाच्या ६८ व्या वर्षी दोनच वर्षांपूर्वी या जगातून गेले होते.वैभवने त्यांचाच वारसा चालू ठेवला.तो यशही तसच संपादन करत होता...
       अस सर्व रेग्युलर चाललेल्या आयुष्यात..आज वैभवला काही विचीत्र दिसले होते.काहीतरी घडलयं अस मनास वाटत होत.
    त्याला बाबांनी सांगीतलेली कथा आठवली.९ वर्षांपूर्वी अशीच अेक मर्डर झालेली.त्यात आरोपी वजा खुन्याने रात्रीच्या वेळी अेक मोठा गेट पार करून आत जाऊन स्लो पाँयजन प्लँट केला होता.त्यावेळी ती घटना ,"दूहेरी हत्याकांड "म्हणून फेमस झाली होती.त्याला अचानक त्या गोष्टिची आठवण झाली.
     ती व्यक्ती तर गायब झालेली ..पण गायब होता होता वैभवने त्या व्यक्तीची अेक अलग शैली..तीची.. चालण्याची मार्क केली होती.तो जरा लंगडत चालत होता.कदाचीत तो नेहमीच तसा चालत नसावा ..काही लागल असावं आज..म्हणूनही तो तसा चालत असेल.पण शैली मात्र वैभवच्या लक्षात राहीली अेकदम फिट...
      याच विचारात घर आलं होत त्याचं.बंगल्यात शिरला तेंव्हा नेहमी प्रमाणे बरोबर सात वाजले होते.मग त्याला या गोष्टिचा विसर पडू लागला.दैनंदिन रूटिन मधे तो गर्क झाला होता.
     अंघोळ...नास्टा...मग मुलाला स्कूल मधे सोडणे...हे सर्व चालू झाले होते.अकराला त्याला कोर्टात निघायचे होते...
       सर्व आवरलं...अन् नेहमीप्रमाणे नितूला..बाय करून तो अकरा ला काही वेळ असताना आपल्या ज्युनियरस् सोबत ,आपल्या ब्रेझा मधून कोर्टाकडे रवाना झाला....
      ईकडे शहराच्या मध्यावर्धी भागात ,अेका प्रायव्हेट लँब मधे..मोहीब आपल्या वातानुकूलीत आँफिस मधे मागील दोन महिन्यातील अेका घटनेचा विचार करत बसला होता.
      अेक नविन नेमणूक त्याने तेंव्हा केली होती.वयाने ती व्यक्ती तशी ४५ च्या आसपासची...शिक्षणही तसे नव्हते..परंतु अनुभव होता काहीसा...
       मोहीब सय्यद ..हा अेक हुशार केमीकल ईंजिनीयर...आपल्या प्रायव्हेट लँबमधे त्याने दोन महिन्यांपूर्वी अेक रिक्रूट मेंट केली होती.येणारी व्यक्ती याच्या पूर्वी तशी संपर्कातली.लँब मधे गरजही होती.माणूस परिचयाचा होता...पण अेक विचित्र बाब ...त्याच्या बाबतीत घडलेली होती...काही वर्षांपूर्वी....
      रिक्रूट होणार्या व्यक्तीचं नाव होत...मंगेश सारंग....
      यस्...नऊ वर्षांपूर्वी.. जे दुहेरी हत्याकांड झालेलं...स्लो पाँयजनिंग केस...त्यातील आरोप सिध्द होऊन...जन्मठेप मिळालेला...परंतु आपल्या चांगल्या वागणूकीमुळे...काही वर्ष अगोदर...मोकळा झालेला...
     ''मंगेश सारंग..दुहेरी मर्डरर...''
आणी अशा मंगेशला मोहीब सरांनी कामावर ठेवला होता...
           खुप विरोध झाला होता.त्याची पत्नी,मित्रांनीही विरोध केला होता त्यावेळी...
      "त्याला नका घेऊ कामाला."
          पण मोहिबच म्हणणं हेच होत्..की तो टँलेंटेड आहे..अनुभवी आहे.ज्या काँलेजच्या लँब मधे तो सफाई करायचा तिथेच तो बघून बघून शिकला होता.ईतका..की त्याचं प्रत्येक केमीकल वर प्रभूत्व होतं.
             आणी तसही त्याने खून का केले...?..हे तर जगाला माहीतच होत.   
          "मी त्याला पूर्वी पासूनच ओळखायचो...तो तसा नाही..पण परिस्थितीने त्याला खूनी बनवलाय...पण तो आज ४ वर्षांची सजा कमी करवून..ते ही शासना कडून ..तो मोकळा झाला होता.त्या त्यावेळी अपिल करायचीही संधी होती.तरिही त्याने खून कबूल करून शिक्षा भोगली होती.."असे त्याने त्यावेळी सर्वांना पटवून सांगीतले होते.
     मोहीबच्या मते तो प्रामाणीक व अनुभवी ,कष्टाळू होता.पर्यायाने तो त्याच्या फर्मला ऊपयुक्तच साबीत झाला असता.
    मंगेश नेही विनंती केली होती."मोहीब भाय अेक चांस दो..खाने के लाने पडे है..अब कोई काम नही देता..स्कूल ने तो कबका काम से निकाला...भरोसा रखो..कोई तक्लिफ नही होगी.."
       अशा तर्हेने मंगेश साऱंग पुन्हा कामाला लागला होता...ती तारीख होती...काहीतरी...आँक्टोंबर २५ वगैरे...२०१९....
      ईकडे संध्याकाळी वैभव,कोर्टातून जेंव्हा "श्रम साफल्य "मधे आला; तेंव्हा पाच वाजत आले होते.ज्युनीयर्स ,प्रायव्हेट असिस्टंट असा ताफा सोबत असायचा नेहमी.
          आज ही बंगल्यात आल्यावर ,फ्रेश होऊन ..आँफिस मधे तो आला.काही केसेस नजरे खालून घातल्या होत्या..पण मनात त्याच्या आता सकाळची घटना पुन्हा फेर धरू लागली होती....
    " कविता...मंगेश सारंग व्हर्सेस महाराष्ट्र सरकार...या ९ वर्षांपूर्वीच्या केसची पूर्ण माहीती वजा फाईल त्यावेळचे सरकारी वकिल अँड. सौ.राखी देवकर...यांच्या कडून मागवायची व्यवस्था कर..मला जरा पहायचीय ती..केस.."
       मान डोलावून ,वैभवच्या ज्युनीयर अँड कविता..हिने...सरांना गँरंटि दिली होती..
      "दोन दिवसांत. ..सर्व फाईल सर आपल्या हातात असेल..."
                       आता ते सर्व गेले होते.आपल्या अलिशान आँफिस मधे वैभव...चेअर वर मान टेकवून..वातानुकूलीत वातावरणाचा आनंद घेत सकाळची घटना आठवत होता.....
         त्याच्या मते ही अेक कशाची तरी नांदि होती...काही भयानक घडतयं अस त्याला राहून राहून वाटत होत...पण काय व कसं...ह्या बद्दल तो अनभिद्न्य होता....
      अेक विचारांचा काहूर वजा गदारोळ त्याच्या मनात दाटू लागला होता....
       कदाचीत पुढचा काळ त्याला व्यस्त व दगदगीचा करून जाणार होता...काहीतरी लवकरच घडणार होत्...
    पण काय असेल..??.की काहीच नसेंल...??की वैभवचा भ्रम असेल..??
     कदाचित वादळापूर्वीची शांतता असेल ही..
      पण काही घडू लागलं होत...
वैभवच्या मनातील प्रश्नांची ऊत्तरं वाचायला विसरू नका...
              पुढचा भाग...
               "आँर्डर आँर्डर....प्लिज.."
                      भाग...२ रा...

क्रमश:

 मनोज नागांवकर
@ नागांव बीच..

Circle Image

Manoj Nandkumar Nagaonkar

Engineer

Nothing special Abt me