ऑरेंज टाॅफी

पंजे आबा" बघा ना माझी राखी किती मस्तय नं", असे म्हणत छोटी ईशा हातात राखी घेऊन धावत आली. अरे वा छानच की,पंजा आबा," घे तुला पण राखी" म्हणत एक राखी त्यांच्या हातावर बांधायचा तीप्रयत्न करू लागली.एवढ्यात हर्षिता आली व तिने त्यांच्या हातावर राखी बांधली.
ऑरेंज टाॅफी(राखी स्पेशल कथा)

दादाजीss ",ओ दादाजी उठे नही क्या आज, उठिये", कुठून तरी दुरून जगन चा आवाज कानांवर येतो आहे, असे सदा भाऊंना वाटत असतानाच जगन ने हात लावून त्यांना उठवले .

गुड मॉर्निंग दादाजी, असे हसत म्हटले.
अरे जगन कितने बजे ,मै आज खूब सोया क्या?

"नही नही दादा आज मैं ही जल्दी आया हुं। त्योहार है ना," जगन चे हातां बरोबर तोंड ही चालू होते .

चार महिने झाले जगन येतो आहे. त्याआधी ते मुलाचा म्हणजेच मनीष चा हात धरून टॉयलेटला जात असत पण आता त्यांचे पाय अगदीच चालत नाही म्हणून मग सर्वच बिछान्यात , काय करणार 90 च वय झालं.

जगन ने त्यांचे तोंड धुवुन दिले. सुनबाई नीशा ने चहा दिला तो त्यांना जगन ने पाजला मग त्यांचे स्पंजिंग डायपर बदलणे सर्व उरकले.

जगन खूपच साधा, सरळ, मन लावून काम करणारा. पैशासाठी माणूस काहीही करतो पण जगन सारखे माणसं विरळी च जी पैशांचा मोबदला प्रेमाने देतात.

"बाय दादू ,कल फिर मिलते है "म्हणत जगन गेला ही.
सदा भाऊंना एवढ्या श्रमाने ही थकायला झाले व ते परत झोपून गेले...

बाहेर हॉलमध्ये गप्पांचे आवाज येतात असे वाटून डोळे उघडले तोच चिमणी समोर.
"पंजोबा अजून झोपलास" उठ ना!! बघ माझा फ्रॉक, कित्ति गोल-- गोल फिरतोय.
असे म्हणत ईशा, त्यांची पाच वर्षाची पणती म्हणजेच नात हर्शिता ची लेक, तिने गोल फिरून दाखवले.
अरे वा s जशी काही अम्ब्रेला च ग म्हणत ,त्यांनी तिला जवळ घेत तिची पप्पी घेतली व विचारले, "आज सकाळीच कशी काय आमची आठवण"?
अहो पंजोआबा आज राखी ये ना, म्हणून आले.
तेवढ्यात "काय आजोबा कसे आहात "म्हणत हर्षिता ही
जवळ येऊन बसली.
मी ठीक आहे ग,-- पण" आज तुम्ही सकाळीं सकाळी"??
हो हर्षु दोन दिवसांनी अमेरिकेला जातोय ना म्हणून आई न
इथेच राखीला ये म्हटले.
आजोबा नाश्ता घ्या म्हणत तिने खायला घातले व परत बाहेर गेली.
सदाभाऊ विचार करू लागले आज राखी आहे आणि मग-- त्यांना आठवली त्यांची लहानपणची राखी.

ताई,अक्का या दोघी बहिणी त्यांच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या, पण शरयू ती अशी अवचित झाल्यासारखी त्यांच्यापेक्षा पाच सहा वर्ष लहान. तीन बहिणींचा भाऊ म्हणुन सदानंदांचे चांगलेच कौतुक घरात होते. प्रत्येक राखीला ताई ,अक्का
मोठ्या म्हणून ,आई बाबा जे काही बांगड्या ,कानातले आणत, राखीला तेच त्यांच्या ओवाळणी ते देत.
पण शरयू सदा भाऊंची जास्तच लाडकी,
छोटी बहिण म्हणून तिला आवडतात म्हणून ओवाळणी सोबत ऑरेंज गोळ्यांचे, एक पाकीट ते तिला हळूच देत. त्या संत्र्याच्या आकाराच्या गोळ्या पाहून छोटी शरयू खूप खुश असायची.
पुढे ताई,अक्का चे मॅट्रिकझाल्या झाल्या लग्न झाले .
त्यांना फारसे शिक्षण पण नाही घेता आले.
शरयू चा वेळेस मात्र त्यांनी तिचे बी. ए .झाल्याशिवाय लग्न नाही होऊ दिले .
सदानंदला मात्र तो मुलगा म्हणून इंजिनिअर केले .त्यांच्या शिक्षणात बाबांनी बराच पैसा खर्च केला. ते त्यांनी लक्षात ठेवले मग दर राखी, भाऊबीज बहिणींना ते साडी घेत.

सुमती त्यांची बायको म्हणे," अहो ताई, नी अक्कांच ठीक आहे त्यांची परिस्थिती बेताची पण शरयू वन्सं येवढ्या श्रीमंत",
पण-- याबाबतीत मात्र सदाभाऊंनी सुमतीच कधीच ऐकले नाही.
शरयू त्यांची छोटी, लाडकी बहीण किती भारी साडी घ्या पण एक पॅकेट अजूनही ऑरेंज टाफी शिवाय ओवाळणी पूर्ण होत नसे. पुढे पुढे त्या गोळ्यांच्या जागी पॉपिंन्स येऊ लागल्या त्याही चालायच्या.

आता ताई ,अक्का नाही . सुमती ही अनपेक्षित पणे सोडून वर गेली. भांडायला व वाद घालायला कोणीच उरले नाही.
सुमतीच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यातला उत्साहात संपला मन रमवायला ते फिरायला नियमित जात, नित्यनेम सर्वच करत पण शरीर थकत चालले.

पंजे आबा" बघा ना माझी राखी किती मस्तय नं", असे म्हणत छोटी ईशा हातात राखी घेऊन धावत आली.
अरे वा छानच की,
पंजा आबा," घे तुला पण राखी" म्हणत एक राखी त्यांच्या हातावर बांधायचा तीप्रयत्न करू लागली.
एवढ्यात हर्षिता आली व तिने त्यांच्या हातावर राखी बांधली.
"श-- श-शरयू ने पाठवली ना ही राखी"?
ईशाला त्यांचे तोंडातल्या तोंडात बोललेले कळले नाही, पण हर्षिता समजली.
बाहेर येऊन हळूच आईला विचारले आई शरयू आजी गेल्याचे सांगितले नाही का आजोबांना?
नाही ग," शरयू आत्यांवर यांचा फार जीव म्हणून मग नाहीच सांगितले खूप वाईट वाटले असते गं."
आता जितके दिवस आहे आनंदात जावे त्यांचे.
हो नां
"आजी अचानक गेली त्याचा फार मोठा धक्का बसला मग आता परत कशाला.
ईशा सदाभाऊ जवळ बसून बडबडत होती.
मग--- काय म्हणते आमची चिमणी काय मिळाले गिफ्ट राखीचे?
हे बघ "एवढे सारे चॉकलेट ईशाने पूर्ण बॉक्स उघडून एक एक चॉकलेट दाखवले.
"तुला देऊ असे विचारू लागली डब्यातल्या पोपिन्स, कडे बोट दाखवत सदा भाऊंनी हे दे म्हणताच एक ऑरेंज स्वतः व एक त्यांना देत ती बाहेर पळाली.
आरेंज च्या त्या आंबट गोड चवि बरोबर शरयू बरोबरच्या जुन्या आठवणी चघळतानां सदानंद यांचा चेहरा समाधानाने फुलून गेला
--------------------------------------------------------

.