आँनलाईन जाँब फ्राँड रँकेट

आँनलाईन जाँबच्या नावाखाली होणारी फसवणुक

                ऑनलाईन जाँब फ्रॉड रँकेट 

  माझा एक मित्र 4-11-2020 रोजी आँनलाईन जाँब शोधत होता.अणि जाँब शोधता शोधता तो क्विकर डाँट काँम वर गेला तिथे एक कंपनीची अँड होती आँनलाईन कँप्च्या इंट्रीची.त्यात दिले होते घरबसल्या कँप्च्या इंट्री करुन पैसे कमवा मग त्याने तिथे जाँबसाठी क्वीकर डाँट काँम वरुन अँप्लाय केले मग थोडया काही कालावधीत त्याला एका मँडमांचा फोन आला की सर तुम्ही कँप्च्या इंट्री जाँबसाठी अँप्लाय केला होता का?त्यावर तो बोलला हो.मग त्या त्याला  म्हणाल्या तुम्हाला दहा दिवसात दहा हजार कँप्च्या इंट्री करावी लागेल अणि तुम्ही दहा दिवसाच्या आत अजिबात काम सोडु शकत नाही तसे केले तर तुम्हाला कंपनीला सहा हजार नऊशे पेन्लटी द्यावी लागेल.
    अणि दहा दिवसानंतर तुम्ही काम सोडु शकता पण त्याअगोदर नाही.मग तो त्या मँडमांना बोलला मला तुमच्या अटी अजिबात मान्य नाहीत तर त्या मँडम त्याला बोलल्या सर आम्ही तसा नियम ठेवला आहे तुम्ही फक्त तुम्हाला एका मँडमांचा फोन येईल ते जे काही म्हणतील त्याला काहीही विचारपुस न करता फक्त हो म्हणा तो फक्त आमच्या कंपनीचा नियम आहे त्याचे पालन करावेच लागते.म्हणुन तुम्हाला एका मँडमांचा फोन येईल त्या जे विचारतील त्याला फक्त हो म्हणा.जास्त विचारपुस करू नका.
  मग त्याला त्या मँडमांच्या सांगण्या प्रमाणे अजुन एका मँडमांचा एक फोन आला त्यांनी त्याच्याकडुन त्यांच्या सर्व अटी मान्य करुन घेतल्या अणि त्याचा आवाज त्यांनी रेकाँर्ड करुन लिगल अँग्रीमेंटला जोडला आहे असा ईमेल त्याला थोडया वेळाने पाठवला त्यानंतर त्यांनी त्याला गुजरात कोर्टाचा एक अँग्रीमेंट बाँन्ड पाठवला ज्यात त्यांनी त्याच्याकडुन त्यांच्या सर्व अटी मान्य करुन घेतल्या आहेत अणि त्या अटी त्याला मान्य आहेत अणि जर त्याने त्या अटींचे पालन केले नाही तर त्याला त्या कंपनीला तब्बल अकरा महिने दरमहा सहा हजार नऊशे अशी पेन्लटी द्यावी लागेल असे नमुद केले होते.मग त्यांनी त्याला त्यानंतर एक युसर आयडी अणि पासवर्ड पाठवला मग त्याने तिथुन कँपच्या इंट्री करायला सुरुवात केली पण एक दोन कँप्च्या फील केल्यानंतर तिथे नाव आले की आजचे तुमचे कँप्च्या इंट्रीचे लिमिट संपले आहे उदया प्रयत्न करा.अणि त्यांनी त्याला दहा दिवसात दहा हजार कँपच्या पुर्ण करायला सांगितले होते.अणि त्याने तसे नाही केले तर त्याला त्यांनी अकरा महिने सांगितलेली पेनल्टी रक्कम भरावी लागेल असा बाँन्ड बनवुन पाठवला आहे .
     अशाप्रकारे माझ्या मित्रासोबत ऑनलाईन केपच्या इंट्री जॉबच्या नावाखाली गोड बोलून घात करण्यात आला.त्याची फसवणुक करण्यात आली आहे आणि आता पुढे दहा दिवसांच्या कालावधीनंतर ते त्याला अजून किती ञास देता काय माहीत.पण याच्यातून मला एक गोष्ट नक्की लक्षात आली की आज पैसा कमावण्यासाठी माणूस किती खालच्या थराला चालला आहे की आज तो गोरगरिबांना जॉबच्या नावाखाली फसवायला,लुटायलाही मागे पुढे पाहत नाही आहे.अणि ही आपल्या देशासाठी आज फार लाजीरवाणी गोष्ट आहे.की आपलेच देशातील बंधु भगिनी आपल्याच देशातील आपल्या बांधवांना आज घरबसल्या पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली राजरोसपणे आज फसविता आहे.ते ही कोरोनासारख्या महामारीच्या काळात. 
   अशा खुप फ्राँड कंपन्या आहेत ज्या कोरोनाच्या महामारीत गोरगरिबांना घरबसल्या डेटा इन्ट्री,कँपच्या इंट्रीच्या नावाखाली फसवता आहेत.अणि खर पाहायला गेले तर यांची स्वताची कोणती कंपनी पण नसते.हे लोक फक्त एक फेक वेबसाइट बनवतात कंपनीचे नाव पण बनावट असते. अणि त्यात होम बेस जाँबच्या नावाखाली लोकांना फसवितात.त्यांना महिन्याला वीस पंचवीस हजार वेतन देण्याचे आमिष दाखवतात.स्वताच्या फेक बेबसाईटची जाहीरात ते विविध माध्यमांदवारे ते तुमच्या पर्यत पोहचवतात.अणि मग त्यांनी दिलेले काम वेळेत पुर्ण होऊ नये यासाठी वेबसाइटवर अडथळे निर्माण करतात.जेणेकरुन तुम्ही दिलेले काम वेळेत पुर्ण करु नाही शकणार.अणि मग दिलेल्या वेळेत काम पुर्ण न केल्याच्या नावाखाली तुमच्याकडून लाखो रूपयांची मागणी करतात.अणि तुम्ही त्यांना हवी ती रक्कम न दिल्यास त्यांनी तुमच्याकडून जाँबला जाँईन झाल्यावर जो खोटा कोर्टाचा बाँन्ड करुन घेतलेला असतो.त्याच्या नावाखाली तुम्हाला ते धमकावतात.कोर्टात खेचायची धमकी देतात.
   वकिल बनुन फोनवर तुम्हाला ते तुमच्यावर कोर्टात गुन्हा दाखल करायची धमकी देतात.अणि मग ते तुम्हाला कोर्टाची एक फेक नोटीस सुदधा पाठवतात.ज्यात असे दिलेले राहते की तुमच्याविरूदध कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.तुमच्याविरुदध कोर्टात सुनवाई होणार आहे तुम्ही लवकरात लवकर दिलेली रक्कम भरा नाहीतर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल अशी धमकी देतात.अणि तसे करुनही तुम्ही त्यांना पैसे नाही दिले तर ते तुमच्या घरी कोर्टाची एक फेक नोटीससुदधा पाठवतात.
   अशाप्रकारे कोरोनाच्या काळात आँनलाईन जाँबच्या नावाखाली गोरगरिबांना खोटा गुन्हा दाखल करायची धमकी देऊन लुबाडले जाते आहे.त्यांना लाखोला गंडवले जाते आहे.अणि लोकही कोर्टाची पायरी चढायची वेळ येऊ नये.समाजात बदनामी होंऊ नये पोलीस केस होऊ नये या भीतीने विनाकारण हया हरामखोरांना पैसे देऊन मोकळे होता आहे.अणि खास करुन शिक्षण करुन दोन पैसे कमवावे अशी महत्वाकांक्षा मनात बाळगणारया तरूण होतकरु मुला मुलींसोबत ही फसवणुक केली जाते आहे.
   अणि घरच्यांना काही कळु नये यासाठी मुले मुली त्यांनी मागितलेली हवी ती रक्कम त्यांना देऊन टाकतात.अणि याचाच फायदा घेऊन हे हरामखोर अजुन जास्त पैशांची मागणी करतात.अशाप्रकारे आँनलाईन जाँबच्या नावाखाली लोकांना ब्लँकमेल करुन पैसे उकळण्याचे खुप मोठे रँकेट आज संपुर्ण भारतात चालु आहे.म्हणुन कोणताही आँनलाईन जाँब करण्याअगोदर ती कंपनी रिअल आहे का फेक आहेे याची संपुर्ण खात्री करा मगच आँनलाईन जाँबसाठी अँप्लाय करा.अन्यथा तुम्हाला पण खुप मोठया मानसिक त्रासाला सामोरे जावे लागु शकते.
   अणि हे दुसरे काहीही नसुन दिन गरीब लोकांना धमकावुन गंडवुन शाँर्ट कर्ट पदधतीने पैसे कमविण्याचे हे तयार केलेले चोरमार्ग आहेत.म्हणुन तुम्हीही जर भविष्यात अशा रँकेटचे शिकार झाले तर अजिबात घाबरु नका.अणि अशा हरामखोरांना अददल घडविण्यासाठी त्यांच्यावर सरळ सायबर क्राईमचा गुन्हा दाखल करा.वेळ पडली तर एखादया वकिलाचाही सल्ला घ्या.पण कोणत्याही परिस्थितीत पैसे भरू नका.कारण आपण सर्वसामान्य व्यक्ती अशा गोष्टींना लगेच घाबरुन जातो अणि बदनामीच्या कोर्ट केसच्या भीतीने यांना पैसे देऊन मोकळे होतो.अणि याचाच फायदा हे हरामखोर उचलतात.अणि जास्तीत जास्त लोकांना हे फसवता आहे.खासकरुन गरिबांना.