ऑनलाईन मैत्रीण

one of my best friend . but in online mode ...

         कधीही नवीन गोष्ट सुरु करत असताना मनात थोडी उत्सुकता आणि थोडी भीती असते . अशीच काही स्तिथी माझीही होती . ग्रॅजुएशन संपल्यावर पुढच्या शिक्षणासाठी सांगलीला आलो होतो . ना कोणी ओळखीचे नव्हते आणि ना कोणी नातेवाईक इथले होते . सुरुवातीच्या काही दिवस कसे तरी गेले . थोडी ओळख झाली , नंतर मग मजेत दिवस जाऊ लागले . थोडा अभ्यास आणि खूप सारी मज्जा चालू होती .

         शिक्षक दिनाच्या संदर्भात आम्ही शिक्षकांसाठी कार्यक्रम आयोजित केलो होतो . त्यात मला या ऑनलाईन मैत्रिणीशी झाली . नेहमी हसत असणारी , डेकोरेशन मध्ये अवल असणारी , दररोज बसने कॉलेजला येणारी .... तुम्ही म्हणत असाल कि जर प्रत्येक्षात भेटलं आहे , तर ऑनलाईन मैत्रीण कशी काय असू शकते ? तुम्हाला पुढे कळेल . त्या कार्यक्रमात ती डेकोरेशन या विभागात होती आणि रांगोळी काढण्याचं काम  तिच्याकडे होत . मला लहानपणापासून एक सवय आहे . कोणीतरी रांगोळी काढताना दिसली , तर तिला पिढल्याशिवाय मी राहत नव्हतो . त्याचीच सवय म्हणून मी तिलाही पिढू लागलो . का कुणास ठाऊक ? मला यात मज्जा मात्र येते . हा , पण मी रांगोळीला पुसण्याचा नाटक करत होतो , पुसत नव्हतो . तेंव्हापासून माझी आणि तिची ओळख झाली . तेंव्हा पासून आमच्या कडून कोणताही कार्यक्रम होत असेल , तर तेंव्हा ती रांगोळी काढायची आणि मी पिढायचो . 

         असेच दिवस जाऊ लागले . असेच तिच्याशी बोलणं होत होती . शेवटच्या सेमिस्टर मध्ये आमची सहलीचे प्लॅन होऊ लागले होते . कॉलेजकडून आम्हाला सहलीला जाण्याची हि शेवटची चान्स मिळत होती  . सगळीकडे तयारी तर चालू होतीच  . पण जे सहलीला जाणार होते , ते न जाणार्यांना सहलीला येण्यासाठी समजावत होते . त्यात तीही होती . तिला तिच्या जवळचे बसणारे खूप समजावत होते कि सहलीला ये . ती काय मात्र यायला तयार होत नव्हती . अचानक काय झालं कुणास ठाऊक सहलीच्या काही दिवसाअगोदरच ती येण्यास मान्य केली . 

       सहलीला मात्र माझं आणि तिच्यात गाण्यावरून थोडी वादविवाद असायचाच . ती जेंव्हा कधी एकटी फोटो काढण्याचा प्रयत्न करी तेंव्हा मी मधेच यायचो . 

       यानंतर सेमिस्टर संपत आली .जेंव्हा लास्ट सेमिस्टर होणार होती , तेंव्हा मग कोरोना मुळे  लॉकडाउन झालं आणि परीक्षा ऑनलाईन झाल्या . आधी फक्त असेच ओळखी होती , पण यानंतर आम्ही ऑनलाईन बोलू लागलो 

       सकाळी गुड मॉर्निंग चा मेसेज त्यानंतर विचारपूस होत होती . त्यानंतर मात्र इतकी ओळख झाली कि  मी तिला चुडेल म्हणून संबोधू लागलो आणि ती मला भूता म्हणून संबोधू लागली . मग मला कधी वाईट वाटलं तर मी तिला सांगत होतो . काहीही असो ती ऑनलाईन मैत्रीण होती आणि आहे . 

       ज्याला किंवा जिला आपण मनातलं शेअर करत असुत ,त्याला किंवा  तिला बेस्ट फ्रेंडच म्हणतात ना ?... असं असेल तर ती माझी ऑनलाईन बेस्ट फ्रेंड आहे ... तिचा मी आहे का नाही , माहिती नाही ... पण थॅन्क यू फॉर being my friend 

****************************

ऋषिकेश मठपती