एक वर्षाचा प्रवास

One year journey with ira

इरा सोबतचा प्रवास सुरु होऊन आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्यानिमित्ताने मनात साठलेल्या भावनांना आज मी मोकळी वाट करुन देत आहे. मला लेखक म्हणून ओळख मिळाली ती फक्त आणि फक्त इरामुळेच. इरा मुळेच माझ्यातील लेखिका जागृत झाली अस म्हणायला काही हरकत नाही.

अगदी लहानपणापासूनच मला वाचनाची प्रचंड आवड होती. माझी वाचनाची सुरुवात वर्तमान पत्रातील बोधकथे पासून सुरुवात झाली. मी अनेक पुस्तके वाचलेली आहेत, मला वाचनाची खूप आवड होती. पण ही वाचनाची आवड जपताना मला कधीच वाटलं नव्हतं की मी लेखक होऊ शकेल. 

इराच्या कथा मी फेसबुकवर वाचायचे त्यातून माझी इरा सोबत ओळख झाली. मागील वर्षी मोकळा वेळ होता म्हणून मी एक छोटीशी बोधकथा लिहून ठेवलेली होती. एके दिवशी इराच्या फेसबुक पेजवर प्रेरणादायी कथा स्पर्धेची पोस्ट बघितली त्यातील अटी बघून मी ठरवले की चला आपण अशी एखादी कथा लिहून पोस्ट करुयात, तोपर्यंत मला इराच्या वेबसाईटला कस लॉगिन करायचं? तिथे ब्लॉग कसा पोस्ट करायचा याची पुसटशी कल्पनाही नव्हती. इरावर मी अकाउंट ओपन केले आणि प्रेरणादायी कथा पोस्ट करण्याआधी पहिले लिहिलेली बोधकथा पोस्ट करुन बघितली, त्या कथेला थोडे फार likes आलेत आणि काही comments आल्या होत्या. माझा confidence अजून वाढला होता. मग दुसऱ्याच दिवशी एक प्रेरणादायी कथा लिहिली व ती पोस्ट केली, यावेळी likes व comments अजून वाढल्या होत्या. सुरवातीला मनात जी भीती होती ती कुठल्या कुठे पळून गेली.

आता वेळ होती कथामालिका लिहून बघायची. माझी पहिली कथामालिका सुंदर नातं ही ९ भागांची होती, पहिला भाग जरा घाबरतच पोस्ट केला कारण कथा मालिका लिहिण्याची पहिलीच वेळ होती. पहिल्या भागाला ५०० च्या पुढे likes आलेत आणि ६० च्या वर comments आल्यात मग काय full confidence आला आणि माझा इरावरचा नॉनस्टॉप प्रवास सुरु झाला.

इरा वरचा प्रवास सोपा झाला तो संजना मॅम मुळे, संजना मॅम छोट्यात छोट्या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक रित्या देतात. संजना मॅम मुळेच माझ्या सारखे नवोदित लेखक इराचा भाग होऊ शकले आहेत. Thank you so much संजना मॅम.

माझ्या वाचक मित्र मैत्रिणींनी माझ्या कथेंना दिलेल्या प्रतिसादासाठी त्यांचे मनापासून आभार, तुम्ही दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळेच मी अधिकाधिक कथा लिहू शकत आहे. आपण ज्या उद्देशाने कथा लिहीत आहोत तो वाचकांपर्यंत पोहचत आहे हे आम्हा लेखकांना वाचकांच्या प्रतिक्रियेतून समजते. आजवर जेवढं प्रेम, प्रतिसाद माझ्या कथांना देत आलात तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम, प्रतिसाद इथून पुढच्याही कथांना तुम्ही द्याल अशी मी आशा व्यक्त करते.

इराच्या माध्यमातून अनेक लेखक लेखिकांसोबत ओळख झाली, एकमेकांना वैयक्तिक रित्या ओळखत नसताना सुद्धा सर्वजण मदतीसाठी नेहमी तयार राहतात, त्यांच्या सहकार्या शिवाय माझा लेखनाचा प्रवास इतका सहज सोपा झाला नसता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमुळे लिखाणाचा वेगळा अनुभव मिळाला, इरा वरील विविध स्पर्धांमुळे नवनवीन कथा सुचतात आणि आपण याही प्रकारच्या कथा लिहू शकतो हा कॉन्फिडन्स येतो.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळेस मी 'एका मुलीच्या मनाची व्यथा' ही कथा लिहिली होती, या कथेला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता, १००० च्या वर likes मिळणारी ही माझी पहिली पोस्ट आहे, comments सुद्धा भरपूर आल्या होत्या. त्या comments व likes नेच मला नवीन कथा लिहिण्यास प्रोत्साहित केले होते, त्या कथेला मिळालेला प्रतिसाद मी कधीच विसरु शकणार नाही.

मला जर कोणी विचारले की तु गेल्या एका वर्षात काय मिळवले? तर माझे उत्तर असे असेल की मला इरा भेटली आहे, इराच्या माध्यमातून बरेचसे वाचक भेटले आहेत, माझी लेखक म्हणून ओळख झाली आहे. इरामुळे ही डॉ सुप्रिया दिघे लेखिका झाली आहे. इरावर लिखाण सुरु करताना कधीच असे वाटले नव्हते की आपल्याला इतका चांगला प्रतिसाद मिळेल आणि आपण एवढं चांगलं लिखाण लिहू शकू.

गेल्या वर्षभरात इरावर मी 212 पोस्ट्स टाकल्या आहेत तर त्यांना 14,22,000 च्या पेक्षा जास्त views मिळाले आहेत आणि76 followers मला लाभले आहेत. इरावर 6 कथामालिका यशस्वी रित्या पूर्ण करण्यात मला यश आले आहे तर 2 कथामालिका चालू आहेत. इरामुळे माझ्या शोकेसमध्ये 2 ट्रॉफीची भर पडली आहे.

या एका वर्षात आपण एवढा मोठा पल्ला पार करु शकू असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्या मनोगताचा शेवट करताना एवढंच सांगेन की मी काही प्रोफेशनल लेखक नाहीये, माझ्या मनात जे विचार येतात, जी कथा सुचते ते कागदावर मांडण्याचा प्रयत्न करते. जर कधी कळत नकळतपणे माझ्या लिखाणात काही चुका झाल्याच तर माझा वाचक वर्ग मला समजून घेईल अशी आशा मी व्यक्त करते. आजवर जसा प्रतिसाद माझ्या लिखाणाला देत आलात तसा किंवा त्यापेक्षा जास्त प्रतिसाद इथून पुढेही द्यावा ही माझी नम्र विनंती. 

Thank you so much ira and sanjana mam for this wonderful year, because of ira more happiness added in my life.

©®Dr Supriya Dighe