एक राखी सैनिकांसाठी

एक राखी सैनिकांसाठी

                  " एक राखी सैनिकासाठी "



      ऋतुजा सहावीत शिकत असतांना तिला शाळेत " एक सैनिक की आत्मकथा " विषयावर निबंध लिहायला सांगितलेला होता.
   

     तुजाला राखी पौर्णिमा आणि १५ आँगस्ट ,दुसरा शनिवार अशा चार दिवस रजा होत्या . ऋतुजा आणि तिची आई अमरावतीहून रेल्वेने मुंबई जवळ असलेल्या आसनगावला आजोळी जात होत्या . ऋतुजाच्या आई ला भाऊ तर नव्हता , पण सुट्या असल्याने ऋतुजाची मावशी आणि तीची मुल येणार होते. ऋतुजा आणि आई रेल्वेत त्यांच्या रिझर्वेशन असलेल्या सिटवर बसल्या. त्यांच्या समोरील सिटवर एक सैनिक अमोल होते.


        रेल्वेत बसल्यावर जशी रेल्वे सुरू झाली तशा गोष्टी सुरु झाल्या . गोष्टी सुरु असतांना अमोलला विचारले कुठे जात आहे ?


अमोल : " राजस्थान बॉर्डर "


सगळेजन अमोलला बॉर्डरवर कस असत ? काय असत ? अस विचारत होते .

         अमोल छान त्यांचे बॉर्डरवरचे अनुभव त्यांच जीवन कस असत सांगत होते . ऋतुजा सगळ मन लावून ऐकत होती.

        बाहेर राख्या विकायला आल्यावर सहजच विषय सणांवर आला .

       ऋतुजा अमोलला म्हणाली "तुमची राखी पौर्णिमा कशी असते ? \"

अमोल : मला बहिण नाही . कधी कधी बॉर्डर पर्यंत राख्या येतात . ( सामाजिक उपक्रमांनी , महिला मंडळ संघ , इतर ) कधी कधी काहीच नाही .

      आता मात्र ऋतुजाने आईला विचारल " आई मी राखी बांधू का ? "

आई : " हो " म्हणाली

ऋतुजाला खूप आनंद झाला .

ऋतुजाने लगेच अमोलला राखी बांधली .

     ऋतुजा आईला म्हणाली " आई तु पण राखी बांधना ." तु राखी बांधली की मामा म्हणेल .( ऋतुजाच्या आईला भाऊ नव्हता.)

   ऋतुजाने आईला खूप आग्रह केला .

     ऋतुजाच्या आईने अमोलला राखी बांधली
ऋतुजा : "मामा मामा "
म्हणून बोलली .


       अमोललाही खूप आनंद झाला . त्यांना आज एक बहिण आणि गोड भाची मिळाली होती.

        ऋतुजा आणि तीच्या आईची राखी पौर्णिमा रेल्वेत सैनिक अमोल बरोबर खूप छान झाली .

        ऋतुजाच्या आईनेही ठरवले दरवर्षी आपल्या महिला मंडळाकडून सैनिकांसाठी राख्या पाठवायच्या .

         " एक राखी सैनिकांसाठी "

      ज्यांच्यामुळे आपल्याला छान जगता येत , आरामात झोपता येत .