वन नाईट...

एक राजकीय लघुकथा
वन नाईट...

नमस्कार मोरे साहेब!..... हो!.... नमस्कार !..नमस्कार!!.... मालिनीजी!.....या!... या!! ...बसा!


मग!... यावेळेस तालुकाप्रमुख वरून सरळ आमदारकी?.....काय करणार मोरे साहेब!.... आमच्या कार्यकर्त्याचा आग्रह आहे..... म्हणुन बाकी काही नाही!....मालिनीने खुलासा केला..


मालिनीजी! तसं तालुका प्रमुख म्हणून तुम्हांला आपल्या पक्षाचे धोरण माहीतच आहे..... आमदारकीसाठी पक्षाला एक कोटी .... व स्वतः कडे खर्चासाठी निधान दीड दोन कोटी तरी!.......आणि....आणि...
आणि काय मोरे साहेब?.मालिनीने अधीरतेने विचारले...



काही नाही.... फक्त वन नाईट.. माझ्या सोबत... बस्स!...... कस आहे!... तुम्ही महिला उमेदवार... आमदार म्हणून तुम्ही किती काम करु शकता? ....म्हणजे तुमची काम करण्याची किती क्षमता आहे ते चेक कराव लागेल ना?.......प्रदेशाध्यक्ष मोरे यांचे हे बोलण मालिनीचे काळीज चिरत होत.... मात्र ती देखिल अस्सल राजकारणी असल्याने संयम दाखवला....


साहेब !....ते पैशांचे ठीक आहे!....पण ते वन नाईटच मला शक्य नाही!...... अहो! मालिनी मैडम... तुम्हांला राजकारणात पुढे जायचे असेल तर हे सगळं कॉमन आहे!.......



कॉमन आहे?.... म्हणजे ... स्त्रीचा आत्मसन्मान ...कर्तुत्व.....याला काहीच महत्व नाही ...माझ्या जागेवर तुमची आई किंव्हा.... बहीण असती तर?.....तेंव्हा देखिल वन नाईट ची मागणी केली असती का?..मोरे साहेब?.........



मालिनीजी !...हे फिल्मी डायलॉग सोडा! माझा वन नाईट प्रस्ताव मंजूर नसेल तर आमदारकीच तिकीट मिळेल.... नाहीतर विसरा समजल?......


हॅलो !...जोशी सर!!..... मी मालिनी गायकवाड बोलतेय.... मला हायकमांडशी बोलायच आहे!.......ठीक आहे होल्ड करा!.....



बोला! बोला!! मालिनीजी!......साहेब! तुम्ही मला ओळखता?.......तुम्हांला कोण नाही ओळखत मालिनीजी!.....आपल्या पक्षात तुमच्या कर्तुत्वाची ...आणि... खासकरून तुमच्या सौंदर्याची.... नेहमीच चर्चा होते..... मालिनीजी!.....


साहेब!..... एक विनंती होती!.... विनंती काय मालिनीजी?....तुम्ही तर आदेश करा!......हायकमांड हसत हसत म्हणाले...... साहेब!..मला या वेळेस विधानसभेचे तिकीट हव आहे!.......


अस!..... ठीक आहे मालिनीजी!......मी जरा दोन दिवस फार बीजी आहे .... तुम्ही परवा रात्री मला फार्महाऊस वर भेटा मग आपण सावकाश बोलू...... पत्ता तुम्हांला या नंबरवर पाठवला जाईल..... आणि या मीटिंग विषयी कोणाला सांगु नका बस!...... चला ठेवतो फोन मालिनीजी!....



चवथ्या दिवशी.....हायकमांडने पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष मोरे यांच्या जागी मालिनी गायकवाड यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.......


साहेब!..... काय केलेत हे?.... मला काही कल्पना न देताच... माझी प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली?....... आणि त्या मालिनी गायकवाडला तालुका प्रमुख वरून सरळ प्रदेशाध्यक्ष ?........मोरे!.... कोणाशी बोलताय याची जाणीव आहे ना?..... तुम्हांला प्रदेशाध्यक्ष मीच बनवले होते...... कारण तुमची बायको फार सुंदर होती म्हणून !....... ..पण काय करु मोरे?.......... तुमच्या बायको पेक्षा.... मालिनी गायकवाड किती तरी सुंदर आहे!............माझा नाईलाज आहे.... मोरे!.... समजले?.....

(कथा काल्पनिक असुन नावा मधे काही साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)

(कथा मोबाईल वर टाईप केल्याने बऱ्याच चुका आहेत.... त्या बद्दल माफी असावी.)


लेखन: चंद्रकांत घाटाळ