एक आई... पण.

तृतीयपंथीची आगळी वेगळी कहाणी

उषा दिसायला सावळी, उंच धीप्पाड, अंग काठी ही जाडसर, उंची सहा फूट, गोल शिफोनची साडी, हातात हिरव्या गच्च बांगड्या भरलेल्या, हातात पर्डी, कपाळावर लाल कुंकू लावलेलं तेही मोठ असं ठसठसशीत, केसाचा अंबाडा तोही असा मोठा, आणि त्यावर चमेलीची वेणी घातलेली. गळ्यात छोटंसं डोरल..


उषा नेहमी प्रमाणे जोगवा मागायला बाहेर पडायची तशी आज ही बाहेर पडली. जोगवा मागून दिवस उजडायचा आणि जोगवा मागून दिवस मावळायचा.


तसं आज ही, सगळ्याचं ठिकाणी ती जोगवा नाही मागायची पण नेमकी घर त्यातच ती जोगवा मागवून पोट भरायची.


आज तिने जोगवा मागितला आणि पुन्हा पर्डी घेऊन आठच्या सुमारास जोगवा मागायला बाहेर पडली. जोगवा मागे पर्यन्त तिला नऊ वाजले. रस्ता अगदी सामसूम पण तिचा तोह नेहमीचा रस्ता असल्यामुळे तिला भीती ही कधी वाटलीच नाही. उषा रस्त्याने जात होती एक कुत्र ही रस्त्याला नव्हतं, पण तिला घाबरण हे माहीतच नव्हतं.


तेवढ्यात तिला लहान बाळ रडण्याचा आवाज ऐकू येतो, ती इथे तिथे पाहते. जसं जसं ती चालत पुढे जाते, आवाज तिच्या जवळ जवळ येतो. ती इथे तिथे पुन्हा पाहते तर, तिला एक गाठोडे दिसतं.


ती गाठोड्याच्या जवळ जाते, आणि त्याला हळूच हात लावते. त्यातून हलण्याचा भास होतो, ती पुन्हा इथे तिथे पाहते. आणि ते गाठोडे उघडते, ते पाहून तिला धक्काचं बसतो. त्यात लहानस नुकतच जन्माला आलेलं बाळ असतं, ती योनी पाहते. त्यात मुलगी असते, कदाचित कोणाला नको असेल म्हणून हरामखोरानी असंच ते बांधून टाकलं असेल..


उषा ला फार वाईट वाटतं, तुच्या डोळ्यांतून पाणी येत. ती पाणी अलगद पुसते, आणि त्या बाळा ला हृदयाशी धरते. तिला अजून रडू कोसळत, किती नालायक, नीच, हरामी, हरामजादे लोक असतील ज्यांना ही मुलगी आहे म्हणून नकोशी झाली आहे.


देव देतं तर साल्यांना माज, देऊन सुद्धा भिकारी. ज्यांना नाय हाय ना त्यांच्याकडे पाहावं म्हणावं तरसत आहे मुलासाठी. झोळी फाटकी म्हणावं तर हे असं. कुत्रे साले, आधी गू खायचा कशाला एखाद्या जिवा बद्दल खेळ.


उषा खुप शिव्या घालत होती, हाय देत होती मनापासून.

त्या बाळाला घेऊन ती तडक तिथून निघते, आजू बाजूला पाहते आशेने. पण कोणीच नसतं ! ती त्या बाळाला घेऊन पोलिसमध्ये जाऊ का विचार करते. पण नाही नको ते तिच्यावरच आळ घेणार, मुल चोरी केल्याचं. म्हणून ती तिला डॉक्टर कडे घेऊन जायचं विचार करते, आणि ती तिला डॉक्टर कडे आणते.


" डॉक्टर साहेब प्लीज बघा, ह्या बाळाला काय झालं आहे ते ? सारखं रडत आहे ? "उषा डॉक्टरांना बोलते.


डॉक्टर बाळाला तपासतात," तुम्ही कोण ? " हा त्यांचा पाहिला प्रश्न.. कारण बाळ हे तिचं वाटतंच नव्हतं.

म्हणून ते सौंशयाने विचारतात.


" मि ते... मि तुम्ही सांगा ना बाळ नक्की बरं आहे ना..? ताप तर नाही ना..?" उषा पुन्हा डॉक्टरांना प्रश्न करते.


" तुम्ही आधी एक कामं मि सिस्टरना सांगुन फॉर्म मागवतो, तुम्ही तो भरून दया...! तुम्हाला बाळ सापडलं की चोरून वगरे...? " डॉक्टर तिला सरळ प्रश्न करतात. उषा डॉक्टरांच्या प्रश्नाने घाबरते.


" अहो चोरून का आणेन मि दत्तक घेतलं आहे असं समजा !" ती काहीतरी कारण द्यावं म्हणून दत्तक च कारण देते.


" कुठून दत्तक घेतलं नाव काय बाळाचं...? कारण तुमच्याकडे पाहून वाटतं नाही ? तुम्ही तर ??? " डॉक्टर तिला खालून वर वरून खाली न्याहळतात.


ती बाळ तडक घेऊन तिथून निघते आणि सरळ घरी पोहचते.


क्रमश 


🎭 Series Post

View all