एक आई... पण भाग -2

तृतीयापंथी स्त्रीची आगळी वेगळी कहाणी

भाग -2


घर तिचं फारच लहान असतं, घर नाही म्हणू शकत झोपडच ते. विटा आणि बांबू च, तुटक फुटकं.


धड उजेड नाही, अंधार असलेली झोपडी. झोपडीत तुटका पलंग, एक लहानसा आरसा. तुटका लाकडी कपाट, लागणाऱ्या चार वस्तू आणि भांडीकुंडी तेही कुणी कुणी दिलेली काही जोगवा मागताना दान म्हणून दिलेली.


ती घरी येते तेव्हा रात्रीचे बारा वाजलेले असतात. ती आत येते, हवा नसल्यामुळे ती दार उघडच ठेवते. ती तिला आणते, पलंगावर झोपवते. आणि आधी घरात काही आहे की नाही ते पहाते. घरात पाणी असतं आणि जोगवा मध्ये मिळालेले अन्न असतं.


ती बाजू च्या झोपडीतून वाटीभर दुध आणते, आणि तिला हळूहळू कापसाच्या बोळ्याने भरवते.


बाळ बऱ्याच वेळ उघड्यावर असल्यामुळे त्याला ताप असतो. अंग तापत असतं, ती त्याला गरम पाण्याने फुसून काढते. 

बोचक्यात काहींशे कपडे असतात, आणि काहीसे पैसे. कदाचित समोरच्याने आधीच ठरवलं असेल.


ती बाळाला छान फुसून काढून, बराच वेळ रात्रीची जागी असते. त्याने सुसु केली का ती ते पाहत असते. रात्रीचे दोन वाजतात, उषा ने काहीच खाललेल नसते.


पहाट होते, बाळाच्या रडण्याने तिला जाग येते, " आई गं... तिचं ही डोकं दुखत असतं.. " ती उठते, पहाते तर काय बाळाने सु केलेली असते.


" अरे देवा,,, किती वेळ हे रडत असेल...? मला मेलीला जागच नाही...!!!" ती स्वतःशीच पुटपुटते.


" ओ ओ ओ ओ बाळा रडू नकोस ?. " ती बाळाला शांत करते. पण बाळ काही शांत होईना, ती उठते दुध कोमट करुन त्याला कापसाच्या बोळ्याने पाजते. त्याचे कपडे बदलते, नवीन कपडे घालते.


तिला फारच वाईट वाटतं आपण सखी आई नाही, त्यामुळे आपल्याला दुध नाही. आणी बाळाला भूक लागली आहे, मि काय करु. ती हतबल होते, हताश होते.


ती बाजारात जाते, तुथून ती बाळासाठी नवीन लंगोट, कानटोपरी, अंगातली घेते. तिच्या साठी नवीन दुधाची बाटली सुद्धा घेते. सारं काही नवीन पाहून तिला आनंद वाटतो. आणि कोणतंही कामं भेटल की ती त्याचं जोमाने करते, जे काही पैसे भेटतील ते माझ्या बाळासाठी मला उपयोगी येतील.


तिला ह्या सर्वांची सवय नसते, पण त्या दिवसापासून ती एक आई बणुन जगत असते. 


त्या दिवसापासून तिने जोगवा मागायचं कामं कमी केलं, आणि बाकी कसल कामं भेटत का ते ती पाहते.

ती बाळाला घेऊन चार घरात फिरते, धुनी भांडी ची कामं भेटतात का ते पाहते. पण देव आहेच ना... आणि तिला आलेल्या लक्ष्मीमुळे तिला चार घरची कामं भेटतात तेही चांगल्या पैशांची.


आता नाव नक्की काय ठेवायचं म्ह्णून ती उमा हे नाव ठेवते, उषाची उमा.


उमा ही हळू हळू मोठी होतं होती, आणि तसं तशी उषा ही वयाने मोठी होतं होती. उमा च्या शाळेचा खर्च ही वाढला होता, पण देवाने एकदा काय झोळी भरली तर मग देवचं सारं काही पाहत असतो.


उमा शाळेत जाऊ लागली होती, आणि उषा चे प्रश्न ही तितकेच वाढत जाणार होते. उद्या उमा मोठी होणार तुझे बाबा कोण ? तुझी आई ही अशी कशी ? तु आई सारखी का नाही दिसतं ? मग तुझे बाबा कधी येणार ? कुठे गेले ? तुला सांगितलं का नाही ? असे अनेक प्रश्न तिच्या समोर येणार होते..


उमा दहावीत गेली होती, हळू हळू ती मोठी झाली होती. तिला आता सत्य सांगाव लागणार होतं, तु कोण, मि कोण तुझी ? तुझे खरे आई बाबा कोण ? तुला मि कुठे भेटली ? किंवा तु मला कुठे भेटली ? आपली दोघींची भेट कशी झाली ? सारच....!


तेवढ्यात उमा येते, " आई गं.... " उमा जरा वैतागलेली दिसतं होती.


" काय गं काय झालं ? अशी चिडली का आहेस ? " उषा तिला प्रेमाने विचारते.


" काही नाही गं.. बघ ना, माझ्या मैत्रिणी सारख्या मला विचारत असतात..? " उमा बोलते. हातातली बॅग ती रागाने पलंगावर टाकते. 


" अगं काय बोलत असतात, इतकं चिडायचं कशाला? " उषा ला माहित असतं की बाहेर तिला समाज काय विचारत असेल ह्याचं.


" हेच की तुझे बाबा कोण ? ही तुझी नक्की आईच आहे ना ? " उमा रागात बोलून टाकते.


" मला माहित होतं, मला माफ कर पाहू तु ! मि तुझ्याशी बोलणारच होती ह्या विषयावर!" उषा बोलते. तिला फार वाईट वाटतं आपल्यामुळे तिला इतकं ऐकावं लागतंय.



... क्रमश...



🎭 Series Post

View all