अनुभवाची पोटली -कथा 4-  मैत्रीच असंही एक रूप

friends are always close to heart

अनुभवाची पोटली -कथा 4-  मैत्रीच असंही एक रूप

त्या दोघी स्वामी समर्थांच्या मठात होत्या. दर्शन घेतले आणि तिची मैत्रीण तिला म्हणत होती,की आपण दोघीही शपथ घेऊ की , दोघीही उद्याचा पेपर देणार नाही आणि तिने म्हटल्याप्रमाणे दोघींनीही शपथ घेतली. कोण होत्या त्या दोघी प्रश्न पडला असेल ना?

त्या दोघी इंजीनियरिंगच्या विद्यार्थिनी होत्या, एकीच नाव स्नेहा आणि दुसरीच नाव वैशाली ,दोघींनी डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इअरला ऐडमिशन घेतले होते .  ऐडमिशन घ्यायला एकाच दिवशी कॉलेजला आल्या होत्या तेव्हा त्यांची एकमेकिंशी ओळख झाली होती. दोघीही नंतर होस्टेल मध्ये राहाणार होत्या आणि योगायोगाने दोघींना एकच रूम देण्यात आली. एकाच क्लास मध्ये असल्यामुळे नेहमी कॉलेजला येण जाण बरोबर व्हायचं,अशा त्या दोघी एकमेकींच्या छान मैत्रीणी झाल्या होत्या,दिवस छान चालले होते . होस्टेल लाईफ दोघी छान एन्ज्यॉय करत होत्या . या सगळ्यात परिक्षा कधी जवळ आली ते समजलेच नाही. 

इंजीनियरिंगच्या दोन पेपरमध्ये  तीन चार दिवसांचा ब्रेक असायचा,मग त्यातही अभ्यास करता यायचा. परिक्षेचे वेळापत्रक आले तसे आम्हीही आमचे अभ्यासाचे वेळापत्रक बनवले आणि दोघी मिळून अभ्यासाला लागल्या. वैशाली एकपाठी होती ,परंतु स्नेहाला तिच्या तुलनेत जास्त अभ्यास करावा लागायचा. वैशाली रात्रीची 11.00वाजता झोपायची, तिला जास्त जागण जमत नसायच्ं ,पण ती सकाळी लवकर उठून रिव्हिजन करायची. प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते. होस्टेल मध्ये तर परिक्षा जवळ आली की,रात्रही दिवस वाटायचा ,सगळीकडे फुलटू अभ्यासाचे वातवरण असायचे.इकडे वैशाली मात्र आरामात झोपलेली असायची.

दोघी मिळून दिवसाला दोन चैप्टर करायचे आणि रात्री बसून स्नेहा त्याच गोष्टी परत करायची, एक एक तासाने वैशाली ब्रेक घ्यायची आणि त्या वेळेत स्नेहा परत एकदा रिव्हिजन करायची

असं करत दोघी थर्ड इअरला गेल्या . थर्ड इअरला त्यांना एक अवघड विषय होता,त्यात खूप सारे इक्वेशन होते आणि मध्ये दोन दिवसांची सुट्टी होती ,एवढ्या वेळात त्यांचा अभ्यास होणे शक्य नव्हते कारण इंजीनियरिंगची मूलं नेहमी ह्याच काळात अभ्यास करतात . वैशालीला स्नेहा म्हणाली ,आपण हा पेपर देऊ नये.

वैशाली- आपण अभ्यास करु आणि पेपर देऊ ,प्रयत्न तर करु जे होईल ते होईल.

स्नेहा- मला माहित आहे की, किती काही केलं तरी पास नाही होऊ शकत नाही,त्यापेक्षा पेपर नाही दिलेलाच बरं 

वैशाली- मला तुझं म्हणणं नाही पटत ,प्रयत्न न करताच असं कसं,चल आपण अभ्यास करु.

नाईलाजाने स्नेहा वैशालीबरोबर अभ्यासाला बसली,पण तिचे वैशालीने ऐकले नाही म्हणून तिला वाईट वाटतं होते आणि रागही आला होता.

वैशाली मात्र नेहमी सारखी झोपून गेली.

सकाळी उठल्यानंतर स्नेहा वैशालीला म्हणाली - की माझं अभ्यासात मन लागत नाही,बेचैन होतय. आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊन येऊ.

वैशाली- ठिक आहे,पण आपला अभ्यासाचा बराच वेळ जाईल.

स्नेहा- पण तुच तर म्हणते ना की थोडा अभ्यास केला तरी तो मनापासून करावा आणि मनच लागत नाही तर काय अभ्यास होणार ,ठिक आहे मी एकटीच जावून येते.

वैशाली- ठिक आहे, चल मी पण येते असही आता एकत्र अभ्यास करायची सवय झाली आहे.

स्नेहाला वैशालीची कमजोरी माहित होती,दोघीही मठात जातात, बसमध्ये बसल्यावर स्नेहा वैशालीला बोलते.

स्नेहा- मला नाही जमणार पेपर द्यायला , मला नाही वाटत की मी पास होईल.

वैशाली - मी तुला बोलले ना जेवढा अभ्यास होईल तेवढा होईल आपण पेपर देऊ ,जे होईल ते होईल.

स्नेहा- मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,मला माहित आहे की तू जर उद्याचा पेपर दिला तर तू पास होशील मी नाही होणार.

वैशाली- अगं असं का विचार करतेस ,तू पण पास होशील.

स्नेहा - म्हणजे तुला माहित आहे की,तू पास होशील पण मला हे चांगलं माहित आहे की मी नाही पास होणार.

तू जर माझी खरी मैत्रीण असशील तर मला वचन दे की,तू उद्याचा पेपर देणार नाही असं म्हणून तिने हात पुढे केला,

वैशालीला हे सगळं अनपेक्षित होतं,पण ती सच्ची मैत्रीण होती तिने तिचा हात पुढे करून तिच्या हातात दिला.

ही होती सगळी ती शपथ घेण्यामागची पार्श्वभूमी, मठातून निघाल्यावर दोघींनी बाहेर खाल्लं आणि आरामात होस्टेल वर आल्या आणि पुढच्या पेपरच्या तयारीला लागल्या.

वैशालीच मन वळवण्याचा प्रयत्न तिच्या तिस-या रूम पार्टनरने आणि इतर मैत्रिनींणी केला ,कारण त्यांना माहित होतं की तिने थोडासा अभ्यास केला तरी ती पास होऊ शकते . सगळ्या तिला असं करते म्हणून वेड्यात काढत होत्या ,पण ती म्हणाली, मी वचन दिलं आहे ,मी विश्वासघात नाही करु शकत.

पुढच्या सेमिस्टर मध्ये त्यांनी दोघींनी आधीपासून अभ्यास केला आणि दोघींचाही पेपर निघाला.

मैत्रीचं असं रूप कधी पाहिलय्ं का तुम्ही .

तुमच्या प्रतिक्रिया वाचयला नककीच आवडेल.

रुपाली थोरात.

🎭 Series Post

View all