Feb 24, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

दोन ध्रुवांवर

Read Later
दोन ध्रुवांवर
इरा राज्यस्तरीय स्पर्धा
फेरी :- कविता
विषय :- दोन ध्रुवांवर दोघे आपण
कवितेचे नाव :- दोन ध्रुवांवर...
संघ :- संभाजी नगर


दोन ध्रुवावर...

मी नाही तुझ्यात , नाही तू माझ्यात
पण तरीही आपण दोघे एकमेकात

तुझे विचार त्यात माझे शब्द
माझ्या भावना त्यात तूच सर्वत्र
जवळ असूनही आपण दुरावलेले
दोन ध्रुवावर दोघे आपण विसावलेले

ना जाण मला नैतिकतेची
ना जाण मज सामाजिकतेची
तुझ्या हृदयी नाव असावे...
हीच आशा वेड्या प्रीतीची

भावनांच्या सप्तपादित आधीच सामावलेले
दोन ध्रुवावर दोघे आपण विसावलेले

तू तुझ्याच जीवनात असे सदैव व्यस्त...
माझी नसूनही तू तुझ्यातच माझा अस्त
मी शांत सागर तू फेसाळलेल्या लाटा
दाखवल्या तू माझ्या लेखणीला वाटा

तुज उसंत अश्या त्या सादेला
माझा अबोल हळुवार प्रतिसाद
पाहुनी तुझ्या राजस मुखचंद्रमेला
लेखणी करे काव्यातुनी निनाद

तरीही क्षणिक विरहाने दुरावलेले
दोन ध्रुवावर दोघे आपण विसावलेले...

©®रश्मी बंगाळे
  संभाजीनगर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Rashmi Shashank Bangale

Teacher

Love to read and write

//