'स्व'तःचा शोध ( भाग 24)

As A Female
                               साक्षीचे एक-दोन दिवस अशाच अवस्थेत गेले. ती आतून खचून चालली होती. पुढचे चित्र तिला स्पष्ट दिसत होते. आई-बाबांनी ही तिला खूप समजावले. त्यांनी तिला सांगितले की तुला एम .बी. बी .एस व बी. एच .एम .एस ह्या कोर्सला ऍडमिशन जरी भेटले असते तरी आम्ही तेवढी फी कधीच भरू शकणार नव्हतो. त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण साक्षी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला मैत्रिणीकडून कळत होते की कमी मार्क असलेल्या मुलांनाही या कोर्सला ऍडमिशन भेटले आहे. आरक्षणा मार्फत त्यांना ऍडमिशन मिळाले आहे. ती बाबांना विचारत होती आपल्याला का आरक्षण नाही. आरक्षणा मागे एवढा मोठा इतिहास बाबा तिला काय सांगणार. बाबांनी फक्त तिला एवढेच सांगितले की मी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुला पुढच्या ध्येयाबद्दल परावृत्त करत होतो. कारण डॉक्टर होण्यासाठी आपली जमेची बाजू नाही हे मी ओळखून होतो. आरक्षण नसल्यामुळे फी भरमसाठ भरावी लागणार होती हे मला माहीत होते.डॉक्टरचा कोर्स पूर्ण करण्यासाठी बरीच वर्ष ही लागतात. तोपर्यंत तुझे लग्नाचे वय निघून जाईल याचीही मला भीती वाटत होती. त्यामुळे मी स्पष्ट नकार दिला आहे. साक्षीने सगळे ऐकून घेतले पण तिने चकार शब्दही तोंडातून काढला नाही. शांत राहण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.
                          साक्षी विचार करत होती . ज्यांचा स्कोर खूप मोठा आहे त्यांना तर ऍडमिशन भेटणार होती पण माझ्यासारखेच मार्क पडलेल्यांना पण अडमिशन भेटले. मग मला का नाही? त्यांना का आरक्षण मिळते .मला का नाही ? मग मी ह्या जातीत जन्म घेऊन चूक केली का ? पण कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यायचा हे माझ्या हातात तर नक्कीच नाही. असे एक ना अनेक प्रश्नांचे विचार चक्र तिच्या डोक्यामध्ये फिरायला सुरू झाले. आरक्षण हे नाव ऐकूनच तिला आता त्याची चीड येत होती.सगळ्यांच्या आर्थिक व बुद्धिमत्ता तपासूनच ऍडमिशन मिळायला हवे होते. ज्या कुटुंबातील आर्थिक स्थिती बेताचीच आहे अशा मुलांना फीमध्ये सवलत देऊन त्यांना ऍडमिशन द्यायला हवी. अर्थात मार्क्स ही पाहिले जावेत. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यासोबत अन्याय होणार नाही.
                         ज्या मुलांना आरक्षण मिळाले फक्त त्या जातीच्या आधारावरच ना. त्यांची आर्थिक स्थिती तर बघितली च गेली नव्हती. त्यामुळे काही कुटुंबातील मुलांची आर्थिक स्थिती नसताना ते हुशार असून पण चांगल्या क्षेत्रांमध्ये ॲडमिशन न मिळाल्याने ते शिक्षणापासून वंचित राहतात.जर आपल्या भारत देशाची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर खरंच ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. जातीवर आरक्षण न देता प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून फी मध्ये सवलत द्यावी. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेवर प्रश्न उभारणार नाहीत. ॲडमिशन तर मार्कांच्या आधारेच मिळायला हवीत. फक्त फी मध्ये सवलत ही आर्थिक स्थिती पाहून करावी. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलेच गुणवत्ता असलेले तरुण पिढी आपले योगदान देऊ शकेल.
                          साक्षीला आता सीईटीच्या निकालाची प्रतीक्षा होती पण तिला इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे वळायचे नव्हते. कारण त्या कोर्सची पण फी जास्त होती व बाबांनी त्याचे स्पष्टीकरण अगोदरच दिले आहे. साक्षीने विचार केला की मेडिकल क्षेत्रामध्ये ह्या मार्कांवर अजून कोणते कोर्स करता येतील याची माहिती काढायला हवी. तिला मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करायचे असल्यामुळे ती त्या संधी शोधत होती. पण तिला स्वतः त्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. कोणीही तिच्यापुढे पुढ्यात येऊन माहिती देणारे नव्हते.
                          नीट च्या रिझल्ट मधून साक्षी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती तोच सीईटी चा रिझल्ट येऊन धडकला. साक्षी मैत्रिणीसोबत कम्प्युटर सेंटरमध्ये रिझल्ट पाहून आली. तिला परीक्षेच्या वेळीचअंदाज येऊन गेला असल्याने जास्त काही आनंद झाला नव्हता. मार्क्स चांगले पडले होते पण तिला त्या क्षेत्राकडे वळायचे नव्हते. डीएडच्या ऍडमिशन घेण्याची प्रोसेस पण संपत आली होती दोनच दिवस शिल्लक राहिले होते. आईने तिला अजून एकदा आठवण करून दिली पण साक्षी तयार नव्हती.आई शेवटी म्हणाली ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं मग आईने ही तो नाद सोडून दिला.
                            बाबांनी तर तिला रिझल्ट ही विचारला नाही. साक्षीला हे अपेक्षितच होते. आजी-आजोबांचे मनाने तर असे होते की उगाच या मुलीच्या नादी लागलेत आईबाप. चांगलं स्थळ बघून जमून द्यायचं तर मुली पुढे जाऊन डोक्यावर बसतात. शिक्षणाने मुली फारच शहाण्या होतात. त्या परत कोणाचं काहीही ऐकत नाहीत. आजूबाजूला जगात काय सुरू आहे हे ह्या दोघांना कळत नाही का. साक्षीला या बोलण्याचा खूप संताप येत होता पण त्यांना कोण समजावणार असं म्हणून ती गप्प राहिली. सर्वच मुली काही तशा नसतात. घरचे संस्कार कसे झाले त्याप्रमाणे मुलींचे वागणे बदलत राहते. आई-वडिलांचा स्वतःवर विश्वास नाही का आपल्या संस्कारावर. मग जगाची भीती कशाला ठेवावी. आपली मुले ही जे चांगले आहे तेच निवडणार ना. जगाच्या भीतीला घाबरून स्वतःच्या मुलांचे नुकसान का करून घ्यावे.
                               साक्षी व तिची आई वर्गशिक्षक केला जाऊन भेटल्या. वर्गशिक्षक यांचीही बदली झाली होती. ती एक महिन्यात दुसऱ्या शहरांमध्ये नोकरीनिमित्त जाणार होती. साक्षी चा होता तेवढा आधार पण आता तुटणार होता. साक्षीला खूप वाईट वाटले. पण वर्ग शिक्षिकेने तिला आश्वासन दिले की मी जगाच्या कोणतेही भागात असले तरी तू मला संपर्क करत राहा. मी तुला नक्कीच मदत करेन. साक्षीने मार्कांची सर्व परिस्थिती सांगितली. वर्ग शिक्षिकेने थोडा वेळ मागितला तिने सांगितले की माझी मैत्रीण एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. नर्सिंग केलं होतं तिने. मी तिला विचारून  तुला सांगते. साक्षी व तिची आई वर्ग शिक्षिकेचा घरून निघाल्या. घरी आल्या तेव्हा आजीने घर डोक्यावर घेतला होता. घरात ढीगभर कामे असताना ह्या दोघींना फिरायला कसा वेळ मिळतो म्हणून फोनवर आत्याला तणतण करत सांगत होती. आजी नेहमीच भाऊचा फोन घेऊन इकडे -तिकडे फोन करत बसलेली असायची. कामात म्हणलं की हिला त्रास व्हायचा पण फोनवर बोलताना मात्र तिला कोणताच त्रास कसा होत नसायचा. असं साक्षी तिच्या आईला विचारत होती. तिच्या आईने तिला गप्प केलं.आई बोलली साक्षी तुझ्या असा प्रश्नां मुळेच बहुतेक पुढे शिकण्यासाठी मुलींवर बंधने आली असतील. तू जरा कमी प्रश्न विचारत जा बरं. घरातील मोठी मंडळी असे बोलतच राहतात आपण त्याकडे दुर्लक्ष करावं.
                         आईने तिला नर्सिंग म्हणजे काय विचारलं. साक्षीला त्या शब्दाचा अर्थ माहित होता पण त्यासाठी शिक्षण काय घ्यावे लागते हे माहीत नव्हते. तिला माहित होते की मी सांगितलं तर आईला ते आवडणार नाही. कारण गावांमध्ये दवाखान्यात असलेल्या नर्स कडे कोणत्या दृष्टीने पाहिल्यं जातं हे तिला माहीत होते. तिने सांगून टाकले दवाखान्यांमध्ये नर्स मावशी आहेत ना ते शिक्षण. साक्षी ची आई तिच्याकडे बघतच राहिली. अगं बाई गावाची घाण काढत बसण्यापेक्षा शिक्षक झालेलं कधीही चांगला नाही का? कशाला नसत्या फंदात तू पडतेस. बाबांना हे आवडणार नाही. साक्षी ची आई तिला समजावत होती. पण साक्षीने आईला उलट समजावत राहिली की शहरांमध्ये खूप नाव आहे नर्सिंग क्षेत्रामध्ये. मी पण ऐकून होते. त्यामुळे तिकडे वळायला काय हरकत आहे. तसंही तेही सरकारी नोकरी असते ना. प्रायव्हेट दवाखान्यामध्ये पण नोकरी मिळू शकते. आजकाल जागोजागी हॉस्पिटल्स उभी राहीली आहेत. माझी पण तीच इच्छा होती पण दुर्देवाने मला ते मिळणार नाही. पण त्या क्षेत्रामध्ये असल्याचा थोडा तरी समाधान लागेल. म्हणून तू बाबांना नीट समजावून सांग. तू जर असं नकारात्मक बोलली तर बाबा पूर्णपणे स्पष्ट नकार देतील. मग मला काहीच करता येणार नाही. आई नाराजच दिसली. पण साक्षी मनाची तयारी करत होती. काहीही झालं तरी मी ह्या क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवणार.

क्रमशः

🎭 Series Post

View all