ओलांडला मी माझा उंबरा (भाग-1)

A Story Of Shy Girl
         "सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. Why fear when I am here.. Ok..? मी सांगितले होते ना तुम्हाला कि ही डील final झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा प्रोजेक्ट माझ्या आयुष्यातला खूप मोठे स्वप्न आहे. काही दिवसांनी मी परत येईल त्यानंतर आपल्या प्रोजेक्टला सुरुवात करू. ह्या दिल्ली व्हिसिट मध्ये पण काहीतरी चांगले घडू दे असेच मला वाटतेय.. मी निघालोय आता दिल्लीला.. नाहीं नाहीं.. तसें काही नाहीं. केतकी माझी काॅलेज फ्रेंड आहे. ती आपले काम  नेहमी चोखपणे पार पाडते.मला विमान प्रवास न परवडायला काय झालं.. ट्रेन मध्ये प्रवास करण्यामागे माझ्या खूप आठवणी आहेत..ट्रेन निघतेय आपण नंतर बोलूया बाय.." असे बोलून त्याने फोन ठेवला.

     आपला फोन सायलेंट मोडवर ठेवून उशाशी असलेल्या बॅगमध्ये ठेवला आणि पालथे झोपून विरंगुळा म्हणून आपल्या आवडीचे पुस्तक घेऊन त्याने वाचायला सुरुवात केली. लोकांची झुंबड, फेरीवाल्यांचा आवाज कानावर पडत असताना त्याला कुठून वाचता आले असते त्यालाच ठाऊक.. सगळ्यात वरच्या ac स्लीपर बर्थ वर तो झोपून पुस्तक वाचत होता. आणि वाचनात अडथळा नको म्हणून कानात ब्ल्यू टूथ चे हेडफोन्स घातले होते, ज्यात भीम आण्णांचे (म्हणचे भीमसेन जोशी) यांचं गाणं लावलं हो तं. गाणं ऐकता ऐकता तो पुस्तकात डोकं खुपसून बसला होता. त्याच्या खालच्या बर्थ वर काही चार मित्रांमैत्रिणीचा गृप मस्तपैकी पत्त्याचा डाव मांडून खेळत होते. त्यातील काही जण मनसोक्त खेळत होते
दोन जण खाण्यात मग्न होते. एक जण त्याच्यासारखा अबोल पण खेळात अतिचाणाक्ष वाटत होता
हे बघून काही क्षण त्याला हसूच आले.. गाडी कधीच सुटली होती. ट्रेन सुरू होऊन जवळपास पंधरा मिनिटे  झाली नसतील .. एक मुलगी तिच्या हातातील लावाजमा म्हणजे सरळ भाषेत सांगायचे तर luggage घेऊन इथे तिथे फ़िरत होती. Finally तिला तिचा बर्थ सापडला. शिडशिडीत अंगाकाठी असलेली ती सरसर चढून त्याच्या समोरच्या बर्थ वर येऊन बसली. हा पठ्ठया आरामात तिच्या बर्थ वर एक पाय ठेवून झोपला होता.

ती :- मिस्टर.. तुम्ही तुमचा पाय जरा बाजूला ठेवता का? म्हणजे तुमच्या बर्थ वर. माझ्या बर्थ चे पैसे मी already दिले आहेत.

त्याला तिची ही बोलण्याची पद्धत अजिबात आवडली नाहीं. नीट सरळ भाषेत ती सांगू शकली असती ना. पण नाही तिने तिचा आडमुठेपणा बाजूला ठेवून बोलायला हवे ह्या अविर्भावाने वैतागून त्याने वळून बघितले तर तोच चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला.

"शारिवा.. तू इथे अशी...?",  अचंबित होऊन त्याने विचारले.
तिला इतक्या वर्षांनंतर बघून त्याला जरा वेगळेच वाटले. ती पण त्याला असे बघून भांबावली. 

"अगं बोल ना कधीचा विचारतोय...?" आततायीपणे त्याने तिला विचारले.
"अर्णव तू आणि train? म्हणजे तू इथे कसा?" त्याचे बोलणे टाळत तिने त्यालाच प्रतिप्रश्न केला.

ती काही बोलत नाही हे समजताच तो वैतागून बोलला, "just forget it शारिवा.... तू पण दिल्लीला  ला जाणार आहेस कि वाटेत कुठे उतरणार आहेस..? ते सांग. तू त्यादिवशी शेवटचे भेटली. नंतर किती शोधले तुला मी... कारण ....."


ती त्याला सावरत बोलली, " अरे आवर स्वतःला. ते मी पण दिल्लीतच  उतरणार आहे. ठीक आहे मग.. आपण उद्या बोलूया. मला झोप आलीये खूप. नंतर प्लीज उठव मला."

तिचे असे तुटक वागणे त्याला असह्य करत होते. पण ती आता आपल्या समोरच आहे इतकीच गोष्ट त्याला खूप दिलासा देत होती. त्याने एकवार तिच्याकडे बघितले तर ती शांत झोपली होती. त्याने किंचित स्मितहास्य करून मोबाईलवर गाणे लावले.

हे सुरांनो, चंद्र व्हा

चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥

सकाळी सकाळी झोपणे त्याला आवडत नसे, पण ती झोपली म्हणून त्यानेही झोपणेच पसंत केले. गाणे संपल्यावर त्यानेही अलगद डोळे मिटून घेतले.
क्रमशः


🎭 Series Post

View all