Feb 22, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफी 2023

ओलांडला मी माझा उंबरा (शेवट)

Read Later
ओलांडला मी माझा उंबरा (शेवट)
(मागल्या भागात आपण पाहिले की  शारिवाने अर्णवच्या सांगण्यावरून अँकरिंग केले) आता पुढे....


अर्णवने शारिवाकडे कौतुकाने पाहिले आणि तिला थांबवले.
"शारिवा हे घे तुझ्यासाठी. मोरपीस कृष्णाची ठेव आणि हे पिवळे गुलाब आपल्या मैत्रीसाठी...!" असे बोलून त्याने हात पुढे केला.

तिनेही त्याच्या हातातून त्या दोन्ही वस्तू घेतल्या आणि मंद स्मितहास्य केले. त्याने त्याच्या फोनमध्ये तिच्यासोबत selfie घेतला आणि

दिवसेंदिवस त्यांची मैत्री घट्ट होत होती. एक दिवस काॅलेजला येताना शारिवाने अर्णवला अडवले.

"अर्णव अरे आज तुझा वाढदिवस आहे ना..? Happy birthday... हे छोटेसे गिफ्ट माझ्याकडून तुझ्यासाठी..." जरा बिचकतच शारिवा अर्णवला गिफ्ट दिले.

त्याने तिच्या हातातले छोटेसे बाॅक्स उघडून पाहिले तर त्यात एक सुंदर broach होते. आणि सोबत एक ग्रिटींग कार्ड पण होते. त्यावर एक छान कविता पण लिहीली होती.

तू माझा सावळा कृष्ण
होईन मी तुझी रुक्मिणी
कारण राधा होऊन जगणे
मज वाटे अनुरागिणी

यमुनाजळी, निळसर काठी
बावरी झाले मी जराशी
तुझ्या माझ्या प्रीतीची
मज खूण आठवते ती नाजूकशी

सुरात तुझ्या तल्लीन झाले
मंत्रमुग्ध होऊन शहारले
विरहात अथांग सागराच्या
आकंठ मी बुडाले

रचलेस तू महान प्रेमकाव्य
मऊ मखमली, मोरपीशी स्पर्शाने
मनभवना जाणून घे आता
मम प्रियकर मधुर हर्षाने

झाली तिन्ही सांजा, माझ्या कान्हा
ऐक माझी आळवणी
कारण राधा होऊन जगणे
मज वाटे अनुरागिणी
(मूळ लेखिका -ऋचा निलिमा)

सबंध कविता वाचून अर्णव संभ्रमात पडला. तो एकवार कवितेकडे तर एकवार तिच्याकडे बघत होता.

"शारिवा हे काय आहे? " अर्णवने तिला विचारले.

"मला खरं तर कधीपासून सांगायचे होते. I LOVE YOU ARNAV" शारिवाने अर्णवला सांगितले.

नेमके हेच संभाषण केतकी आणि करणने ऐकून घेतले आणि एकच हशा पिकला. शारिवाला एक क्षण काय झाले कळतच नव्हते.

"शारिवा लायकी तरी आहे का तुझी अर्णव समोर उभी राहण्याची. तो एका तालेवार घराण्यातील मुलगा आहे आणि तू ? तुझे आई बाबा घटस्फोटित.  शिंकताना पण मामाची परवानगी घेतेस तू ? एवढेच काय ?तू साधा डबा फोन वापरतेस आणि अर्णव स्वतःच्या कारने काॅलेज येतो." केतकी तिला चिडवत बोलत होती.

"Hold on Kitu असे बोलू नकोस. ती रडेल." करण कुत्सितपणे बोलला.

या सगळ्या संभाषणात अर्णव मात्र मूकपणे सारे ऐकत होता पण गालातल्या गालात . शारिवाने एकवार अर्णवला पाहून बोलली,"अर्णव happy birthday मला माफ कर जर मी तुला hurt केले तर.. "

आणि त्याच्या हातातले ग्रिटींग कार्ड फाडून dustbin मध्ये टाकून निघून गेली ते पुन्हा वळून बघितलेच नाही..

********वर्तमानकाळात********

भूतकाळाचा विचार करता करता अर्णवचा डोळा कधी लागला त्याला समजलेच नाही. कोणीतरी काठी वाजवल्यावर आवाज आला.

"हजरत निजामुदीन स्टेशन लास्ट स्टॉप." रेल्वे पोलिस जोरात ओरडत होते.

"सर यहाँ पर एक पॅसेंजर..." अर्णवने विचारले.

अर्णव काही बोलण्याआधी पोलिस बोलले,"अरे तुम्हे छोडकर सब उतर गए... जल्दी उतरो"

अर्णव घाईतच उतरला आणि  बुक केलेल्या हाॅटेलवर जाऊन फ्रेश झाला. दुसरीकडे केतकी आणि करण त्याची वाट बघतच होते. अर्णवला बघून दोघांनी त्याला अलगद मिठी मारली.

"अर्णव लवकर चल Gold tank ची नवी HOD जरा सनकी आहे. वेळेत काम पूर्ण हवं असतं तिला.. आज पहिल्यांदाच भेटतोय तिला. काय नाव पण कळले नाही तिचे. काय म्हणे. S.J. जरा presentable राहूया. हे contract, हातातून जाता कामा नये ." केतकी अर्णवला बोलली.

"किट्टू जरा आरामात... ती पण आपल्यासारखीच माणूस आहे. तू तुझं काम चोखपणे केलंस ना मग काय टेन्शन आहे..?  Presentation चं मी बघेन. असे बोलून तिघेही केतकीच्या Honda city कार मध्ये बसून ऑफीसकडे निघाले.

Gold tank enterprises चा बोर्ड वाचून ते आत शिरले. Appointment mail दाखवताच शिपाई त्यांना HOD डिपार्टमेंटच्या Meeting room मध्ये घेऊन गेला.

तिघेही परवानगी घेऊन आत शिरताच समोरचे दृश्य पाहून तिघेही थबकले. समोर शारिवा पण बसली होती.

"अरे अर्णव टेन्शन नको घेऊस. Contract आपल्यालाच मिळेल. ह्या शारिवाला काय येते..? HOD आल्यावर बघ तिची कशी फे फे उडते ते.." केतकी बोलते आणि तसे तिघेही खुर्चीवर बसतात.

मिटींगला सुरूवात करण्यासाठी company चे ceo रमण सर तिथे येतात.

"Hello all... आज की मिटींग का अजेंडा सब को पहा है.. आज की सारे फैसलों का जिम्मा gold tank की ओर से HOD S. J. मतलब Miss. Shariva Jogdankar करेगी... All the best all of you and all the best SJ . Today ball is in your court.." असे बोलून ceo निघून गेले.

इकडे अर्णव, करण आणि केतकी shocked होते. कारण Gold tank चे HOD पद मिळणे सोपी गोष्ट नव्हती. सगळ्यांनी एक एक करून presentation दिले. तब्बल तीन तास मिटींग सुरू होती. निर्णय चार दिवसांनी कळणार म्हणून सगळे निघत होते.

केतकीने तिची गाडी काढली तोवर शारिवा खाली आली होती. ती पण कदाचित कोणाची वाट बघत होती. केतकीने तिची गाडी तिच्यापाशी वळवली.

"तुला हरकत नसेल तर आम्ही तुला सोडू शकतो. ये गाडीत.." काहीश्या नम्र पण किंचित कुत्सित सुरात केतकी शारिवाला बोलली.

यावर शारिवा खळखळून हसली.

"नको केतकी..! तू जा तुझ्या गाडीने.. माझी मी  स्वतः घेतलेली गाडी ड्रायव्हर काढतोय.. आणि तसंही माझी लायकी कुठे आहे तुमच्यासोबत बसण्याची.."असे बोलून शारिवा एकवार मान खाली घालून बसलेल्या अर्णवकडे बघत होती.

इतक्यात तिला हॉर्नचा आवाज आला आणि ती त्या दिशेने गेली. बाहेर पाहता तिघेही चकीत झाले कारण जी शारिवा Honda city ला लायकीबाहेरची गाडी बोलली ती स्वतःच्या Mercedes Benz मध्ये बसून निघून गेली.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//