ओलांडला मी माझा उंबरा (भाग-4)

A Story Of Shy Girl
(मागल्या भागात आपण पाहिले की अर्णव शारिवाला अँकरिंग करशील का म्हणून विचारले. तिने पुढचा मागचा विचार न करता सपशेल नकार दिला. पण जेव्हा अर्णवने गेस्ट कोण आहे हे ऐकताच ती जागेवरच थांबली. ती आता अँकरिंगला होकार देईल की नकारावर ठाम राहील...?) आता पुढे....

"अरे सायंकाळी...! मामा नाही पाठवणार.. मामी असती तर काही टेन्शन नव्हते.. ती  पाठवते मला..." असे बोलून शारिवाने काढता पाय घेतला.

"गेस्ट म्हणून कोण येणार आहेत ते तरी ऐकून घे.. पार्थ धवन सर... ब्लॉगिंग चे सरताज.. तरी नाही करणार...?मी खोटं बोलत नाहीये. ते मास्क लावून येणार आहेत." अर्णवने विचारले.

हे ऐकून ती जागेवर खिळून राहीली.

"काय बोललास पार्थ धवन सर येणार  आहेत ? मग मी येईन."  ती एका क्षणात अँकरिंग करण्यासाठी तयार झाली.

"नक्की करशील ना ....? जमणार नसेल तर दुसरे कोणी शोधून काढतो..." अर्णवने खातरजमा करण्यासाठी विचारले.

"नाही रे... मी करेन नक्की...तू बाकी टेन्शन नको घेऊस.  मला फक्त कार्यक्रमाची रूपरेषा कळव. बाकी माझं मी बघून घेईल. " असे बोलून ती जाऊ लागली.

"अगं तुझा WhatsApp नंबर देऊन तरी जा." अर्णवने हाक मारून सांगितले.

"अरे अर्णव, ते मी नाही वापरत smart phone. माझा मेल आयडी आहे ना तुझ्याकडे...मला मेल कर ना सगळं... मी बघेन कसे करायचे. चल बाय ... मला नोट्स काढायच्या आहेत.

  नेटयुग आले असुनही एखादी मुलगी smart phone वापरत नाही हे विशेष वाटले. त्याने लगेच तिला सगळे मेल केले.  असेच काही दिवस उलटत होते. तिनेही जोमात तयारी सुरू केली. मामीच्या मदतीने मामाकडून परवानगी घेतली आणि कार्यक्रमाची रंगत तयारी सुरू केली.

अखेर कार्यक्रमाचा दिवस उजाडला. पार्थ धवन सर चेहरा दाखवणार नसले तरी आपण त्यांना दिसूच म्हणून presentable राहणे तिच्यासाठी गरजेचे होते. तिने नाजूक काठ असलेली जांभळी काठपदर असलेली पैठणी नेसली होती. गळ्यात ठुशी, नाकात नथ एकुणच मराठी पेहराव केला होता. इकडे सगळ्या कार्यक्रमाचा organizer अर्णव पण निळा झब्बा आणि चुडीदार पायजमा घालून खूपच स्मार्ट आणि राजबिंडा दिसत होता. काॅलेजमध्ये ट्रॅडिशनल घालून खूपच जण आलेले पण सगळ्यांची नजर मात्र अर्णव आणि शारिवा वरच होती. पण हे काही जास्त वेळ टिकून राहीले नाही. कारण तेव्हाच हिरोची एंट्री झाली. ते म्हणजे पार्थ धवन सर.... पण मास्क लावून... कोरोनाची नुकतीच सुरूवात झाली म्हणून सर घाबरतात की काय म्हणून कोणी त्यांना मास्क काढायला सांगितलेच नाही.

  कार्यक्रम खूप सुंदर रित्या पार पडत होता. त्यात पार्थ सरांची कविता म्हणजे सगळ्या युवकांसाठी पर्वणीच होती. शारिवाने तर अँकरिंग मध्ये स्वतः लिहीलेल्या चारोळ्या पेरत खूपच छान प्रकारे कार्यक्रम एका दुहेरी गोफेसारखा बांधून ठेवला. शारिवा आता  कार्यक्रमाची सांगता करणार तितक्यात अर्णवने तिला इशारा करत थांबवले आणि तिच्यापाशी स्टेजवर येऊन थांबला.

"माफ करा... कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी मी काही सांगू इच्छितो.  आत्ताच मी आणि पार्थ सर बोलत होतो तर असे कळले की त्यांना कृष्णावर केलेल्या  कविता खूप आवडतात. आणि आपल्यासमोर एक व्यक्ती आहे जिचे नाव आहे शारिवा ती एक उत्तम कवयित्री आहे. आता ती आपल्यासमोर एक कविता सादर करेल..

असे अचानक announcement केल्याने शारिवा भांबावली. काही क्षण तिला काय करावे सुचतच नव्हते. अर्णव पण announcement  करून स्टेजवरून खाली गेला. सगळ्यांनी आणि खासकरून अर्णवने cheer up केल्याने तिने कविता सादर केली.


पुन्हा खेळू ना आता रासलीला
एक राधा सवे एकटाच कान्हा...
तिन्हीसांजेला रंगेल नव्याने
रासलीलेचा रंग पुन्हा...

ओलसर वारा छेडत बसतो
पायी जाणवते कृष्णवाटा....
गहिरी हिरवळ, फुले पाखरे
गाती सुमधूर प्रितीच्या गाथा..

नको आज सूर बासरीचे
वारा गाईल पावा गोड...
आज करेल तो त्याची हौस पूर्ण
जरी तुझ्या बासरीला नाही तोड...

मोरपिसाने मारून फुंकर
दूर कर माझ्या वेदना....
आज मला बघायचा आहे
माझा कृष्ण बासरीविना....(मुळ कवयित्री - ऋचा निलिमा)

आणि कार्यक्रमाची सांगता झाली. शारिवाला आज खूप हलके वाटत होते.

क्रमशः

🎭 Series Post

View all