ओलांडला मी माझा उंबरा (भाग-3)

A Story Of Shy Girl
    (मागल्या भागात आपण पाहिले की अर्णव शारिवाला एक प्रकारे तिच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत होता. पण आपल्या कथेची नायिका शारिवा पण मन घट्ट करून अबोलच होती आणि तिच्याच विश्वात रममाण होऊन जगत होती, तरीही कुठेतरी काहीतरी सलत आहे असे अर्णवला वाटत होते.) आता पुढे.....

   शारिवा आपली डायरी लिहिण्यात गुंग होती. इकडे अर्णवने कंटाळून मोबाईल वापरत होता. पण नेटवर्क प्राॅब्लेम असल्याने धड एक विडीओ पण बघता येत नव्हता. त्याने टाईमपास म्हणून फोनची गॅलरी उघडून बघायला सुरूवात केली. त्यात एक फोटो अर्णवच्या डोळ्यासमोर आला. अर्णवच्या मिठीत शारिवा आणि तिच्या हातात तेच मोरपीस आणि गुलाबाचे फूल होते जे अजुनही तिने जपून ठेवले होते. हे पाहून त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळातील सगळे क्षण तरळून आले.


**********भूतकाळात**********

  
       "अरे आरण्या...! चल भाई लवकर. आज तेरी इज्जत का सवाल है.. कोणीतरी भेटायला हवीच आज!" करण अर्णवला उद्देशून बोलतो.

  "करण्या काय बडबडतो आहेस? भान तरी आहे का तुला..? आपण तुझी वहिनी नाही काॅलेज गॅदरींग साठी एक अशी  अँकर शोधत आहोत जी चांगली लेखिका आहे. जी खूप चांगली कवयित्री आहे. आज तेरे भाई की इज्जत का सवाल है.. आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे.. आजचे गेस्ट म्हणून जे येणार आहेत ते सर incredible आहेत.. तू समजून घे ना.." खूप desperate होऊन अर्णव करणला समजावून सांगत होता.

"अरे अर्णव मी तयार आहे ना अँकरिंग करायला..? मी सोडून दुसरी मुलगी का शोधत आहेस तू..? गाण्याची स्पर्धा होती तेव्हा बघ मी किती छान अँकरिंग केली...? आणि आता..? असा खडूसपणा बरा नव्हे..." जरा उदासीन स्वरात केतकी अर्णवला बोलली, जी कितीतरी वेळ करण आणि अर्णवचे बोलणे ऐकत होती.

"किट्टू...!  तुला माहीत आहे का..? आपल्या कार्यक्रमात गेस्ट म्हणून कोण येणार आहे..? लेखक पार्थ धवन... the great पार्थ धवन सर... ऑनलाईन लेखकांचे सरताज बादशाह.... त्यांना अध्यात्म ते कायद्यातील अध्याय सगळ्यातलं सगळं येतं... त्यांच्यासमोर उभे राहणे म्हणजे ... ते जाऊदे आता दोघेही मला मदत करा.. तुमच्या ओळखीचे कोणी आहे का....? अर्णव एका श्वासात बोलला.

"एक मिनिट शारू आहे ना... बेस्ट राहील जर आपण शारूला हे काम दिले तर..." केतकी काहीतरी आठवून बोलली.

"कोण शारू.. शारिवा ? म्हणजे ती SYBsc Physics वाली...? ती तर जेव्हा पहावे तेव्हा लायब्ररीत असते. स्वतःला मोठी अलख सर समजते. आजवर तिला बोलताना बघितले नाही मी... आणि आपण IT वाले..ती का ऐकेल माझे..?" अर्णव बोलला.

"अरे बोलून तर बघ एकवार... तिने ऐकले तर ठीक आहे ना ... ती पण खूप चांगली कवयित्री आहे. Google वर एकदा बघ ती किती छान लिहीते..." केतकी कौतुकाने सगळ्यांना सांगते.

"आयला खरंच भारी आहे ही.. ब्लॉगिंग वर top 50 मध्ये येतेय ती.. आणि खुद्द पार्थ धवन सर तिला फाॅलो करत आहेत." मोबाईलवर बघत अर्णव बोलतो.

"तेच तर.. आणि ती इतकी काही हे नाहीये... ती तुझ्याशी तर नेहमीच बोलते ना... स्वतःच्या physics च्या नोट्स पण तुलाच दिल्या.. बघ आली ती. शारिवा अगं ये ना अर्णव तुला बोलवत आहे." असे बोलून अर्णवला एकटे सोडून निघून जातात.

"Hey अर्णव.. बोल ना काय काम आहे..? मला जरा काम आहे लवकर सांग."  शारिवा बोलली.

"अ.. ते ... परवा अँकरिंग करशील..? सायंकाळी कार्यक्रम आहे त्यात..? तुला खूप सोपे जाईल... म्हणून...प्लीज.."अर्णव तिला विनवणीच्या सुरात बोलतो.

"अरे सायंकाळी...! मामा नाही पाठवणार.. मामी असती तर काही टेन्शन नव्हते.. ती  पाठवते मला..." असे बोलून शारिवाने काढता पाय घेतला.

"गेस्ट म्हणून कोण येणार आहेत ते तरी ऐकून घे.. पार्थ धवन सर... ब्लॉगिंग चे सरताज.. तरी नाही करणार...?मी खोटं बोलत नाहीये. ते मास्क लावून येणार आहेत." अर्णवने विचारले.

हे ऐकून ती जागेवर खिळून राहीली. शारिवा अँकरिंग करायला होकार देते की नकार बघू पुढील भागात.....
क्रमशः


🎭 Series Post

View all