ओळख तू खरे चेहरे लपले आहेत अवतीभोवती

SOmetime Reality change our life and mind

रमा:अग कशी होतीस तू आणि काय झाली???प्रेमाने जग जिंकणारी तू ,आज अलिप्त का राहू लागली.....दुर्लक्ष करणारी तू आता गोष्टी मनावर घेऊ लागलीस?? तुला नाही वाटत का तू चुकीचे आहेस??

मधुरा:हो चुकीचे वागत होती, एवढ्या दिवस फक्त दुर्लक्ष करत होते, नातं जपण्याच्या नादाता नको त्या गोष्टींना आणि लोकांना फक्त महत्व देत होते, खूप मोठी चूक करत होते ,पश्चाताप होत आहे मला त्या वागण्याचा .....पण आता नाही पुरे झाले आता चांगलं बनण्यासाठी,प्रत्येक नातं निभावण्यासाठी  मनाविरुद्ध वागणे आता बंद केले.. अश्या नात्यात काय गरज राहायची जेथे फक्त आणि फक्त विश्वासघात भेटतो.लोकं आपलाच पुरपूर वापर करतात आणि नंतर समोर साळसूदपणाचा आव आणतात......

रमा:अगं पण झालं तरी काय??सांगशील का??कसा हा  बदल झाला तुझ्या विचारामध्ये????का नकारात्मकपणे बोलते आहेस?


मधुरा: रमा, मी नकारात्मक नाही बोलत ,मी सत्य बोलते आहे...मी लग्न झाल्यापासून ह्या घराला नेहमी आपलं मानलं.. सगळेच माझे माझे म्हणून सर्वांना जपत आली...ह्याच एकत्र कुटुंब  ,काका, काकी,त्यांची मुलं, मुली सर्व.....कधी श्वास घ्यायला वेळ मिळत नसे....पण तरीही सर्व आपलीच माणसं म्हणुन कामाचा कधी बाऊ केला नाही मी....नंदा येऊ देत, कोणी पाहुणे येऊ देत पण नेहमी मी आल्या गेल्याचा पाहुणचार करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही...गेल्यावर्षी सासरा वारला तर,माझ्या चुलत सासर्याने  सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केली...जराही विचार  केला नाही...माझ्या सासूबाई भोळ्या ,त्यांना फार विश्वास होता..आम्ही नसताना त्यांनी अंगठा घेतला आणि सर्वच लुबाडले..आता सांग हा विश्वासघात नाही का????


जराही मनाला काही वाटत नाही का ग,असल्या लोकांना खालच्या पातळीवर जाताना ..गैरफायदा घेतला आहे....खूप मोठा.... आता डोळे उघडले ,कोणावरही  चुकूनही भरोसा ठेवू नये...आपण आयुष्यभर नातं जपतो ,पण विश्वासघात करणारे आपल्या जवळचेच असतात ,केसाने गळा कापणारे... माझा भ्रम दूर झाला आहे आता......


रमा:मग आता??प्रॉपर्टी ???


मधुरा:सहजासहजी नाही सोडणार... केस चालू आहे....शेवटी सत्यमेव जयते.. हे सर्व करताना आमचा वेळ,पैसा वाया जाईल पण तरीही आम्ही लढू...पण एक मात्र आहे आता त्यांनी विश्वास गमावला..... तो कधीच जिंकता नाही येणार......


एक मात्र शिकले.. ह्यापुढे डोळे झाकून विश्वास नकोच मुळी....परिस्थितीमुळे माझ्यात अचानक बदल झाला...आता तर ताकही फुकुन प्यावे अशी गत झाली.."जिभेवरची जखम बरी होते ,पण मनाला झालेली जखम कधीच  बरी होत नाही".....मनाला जखमा देणारे खूप जवळचेच असतात,ज्यांना आपण आपलं मानतो.. अगदी जवळचंच असत कोणीतरी... पण आता नको कोणी जवळ, एकटाजीव सदाशिव ......

खऱ्या अर्थाने आज डोळे उघडले....


रमा:हो ,ग खूप कटू अनुभव आहे तुझा....वाईट वाटलं अगदी इतक्या जवळची माणसं अशी वागू शकतात.. ते ही तुझ्यासोबत... किती जीव लावायची.. माहेरापेक्षा ,सासारच कौतुक करत असायची..... मलाही हेवा वाटायचा....पण असे काही होईल वाटलं न्हवतं.....

मधुरा: हो ना,आपण जे विचार नाही करत तेच घडतं..... खरं तर खूप वेळ  झाला माझे डोळे उघडायला..पण आता नाही ..आता ह्या  विश्वासघाताच्या चटक्याने माझं मन खंबीर केले आहे..मी बदलली आहे आणि मी तयार आहे आता ह्या जगाला सामोरे जाण्यासाठी.... बोलतात "जशी दृष्टी, तशी सृष्टी"..आता असे वाटते माणसाने जग कसं आहे हे ओळखायला शिकावे... नाही तर आयुष्यभर खोट्या नात्यामध्ये अटकून राहतो आपण..आयुष्य नको व्यर्थ घालावयास असल्या विश्वासघातकी लोकांमध्ये..... खरं जग ओळखता आलेच पाहिजे...तरच निभाव लागेल आपला..आणि मनस्ताप होण्यापासून वाचवू शकतो आपण स्वतःला.....

आपणच आपल्याला धीर द्यावा..
आपणच शिक्षक व्हावे आपल्या आयुष्याचे...... आणि करावे सुंदर बदल स्वतःसाठी मनमुरादपणे जगण्यासाठी..... मनमुरादपणे जगण्यासाठी..

©®अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास लाईक, शेअर, कंमेंट करा...लेख अवडल्यास नक्की फॉलो करा..