
" प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक ओळख असते, एक अस्तिव असत जे तो जपायचा प्रयन्त करतो... पण बरेचदा काय होतं की जबाबदाऱ्या पुर्ण करताना , नेमकी तीच मागेच पडते ..."
"तुला काही अक्कल, एवढं मीठ कोणी टाकत का उपम्यात ... अग लक्ष कुठे असतं म्हणते मी...आता काय उपाशी पोटी जाईल का मंदार ? वेंधळी कुठची
जा आता लवकर बनवुन आण..."
निर्मलाताई सियाच्या सासूबाई खूप रागावल्या होत्या सियावर...
सिया ने हळुच हो बोलुन , डोळ्यातील पाणी लपवुन किचन चा रस्ता धरला... आणि किचन मध्ये येऊन अश्रू ला वाट करुन दिली, निर्मला ताई ना चूक अजिबात खपत नसे त्यावर त्या किती चिडतात हे तिला माहीत होते... म्हणुन ती स्वतःवर चिडली होती...
इथे निर्मलाताई चा त्रागा सुरूच होता, त्या स्वतःशीच बडबडत होत्या... "आजकाल काय झालंय काय माहीत लक्षच नसत हीच.."
मंदार त्यांना काही बोलणार तर त्यांनी रागाने डोळेच वटारलें ...
तर हा मंदार म्हणजे निर्मला काळे चा मुलगा मंदार काळे, चांगला पदवीधर सरकारी नोकरीत... अल्पशा आजाराचं निमित्त होऊन त्याचे वडील वारले... तेव्हा तो सात वर्षांचा होता, सगळे काही त्याच्या आईनेच केले नोकरी करून त्याला वाढवले म्हणुन तो कधीही तिच्या शब्दाबाहेर नव्हता ... यथावकाश त्याच लग्नही लाऊन दिले त्यांनी सियाशी...
इथे सियाही विचार करत होती, आजकाल तिच्या चुका होत होत्या ... त्याच कारणही तिला माहीत होतं पण ते ती कोणाला सांगु शकत नव्हती ... त्याच कारणांचा विचार करता ती भूतकाळात हरवली...
सिया आणि मंदारच arrange marriage , सिया शिंदे कला शाखेतून पदवीधर झाली आणि घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरवात झाली , चांगला सरकारी नोकरीवर असलेला मंदार त्यांना खूप आवडला मग काय बघण्याचा कार्यक्रम झाला आणि दोन्हीकडची पसंती झाली आणि दोघांचा लग्नसोहळा पार पडला
सियाला चित्रकलेची आवड होती, खर तर ती एक उत्तम चित्रकार होती, कॉलेजमध्ये विविध स्पर्धांतुन तिला अनेक बक्षिसे मिळाली होती , व एक चित्रकार म्हणुन ओळख निर्माण करायचे तिचे स्वप्न होते.. पण अचानक ठरलेल्या लग्नामुळे तिची स्वप्ने धुळीस मिळाली..लग्नानंतर तिने आपले संपुर्ण लक्ष घरात केंद्रित केले आणि ती आणि तिची स्वप्ने कुठे मागे पडली, तिने कामवाली सुद्धा ठेवली नव्हती कारण सासूबाईंना कामवालीच्या हातच काही चालत नव्हते, कपडेही हातानेच धुवायचे ... यासगळ्यातून वेळ काढणार तरी कसा हा विचार तिला नेहमी पडायचा ... शिवाय सासूबाईचा स्वभाव कडक होता , त्यांना काय आवडेल के नाही हे ही सांगता येत नव्हते ...अस नव्हत की तिला मंदार आवडला नव्हता उंच पुरा सावळा मंदार तिला अगदी साजेशाच होता... लग्न झाल्यानंतर ती मंदार च्या घरात दुधात साखर मिसळावी अशी मिसळुन गेली, त्याचा स्वभाव छान होता व तो तिची योग्य ती काळजी तो घायचा... दोघांचं एकमेकांवर प्रेम ही होत....आणि संसाराबरोबर ते फुलत ही गेले...
बघता बघता लग्नाला ३ वर्ष झरझर निघुन गेली, संसाराच्या व्यापात चित्रकला मागे पडली....त्याकाळात मंदार आणि सियाच्या संसारवेळीवर मिता नावाचे एक गोंडस फुल ही उमलले ... मंदार आणि सिया मिता च्या बाळ लीलात अगदी रमुन गेले तरी कधीतरी फिरून तिच्या काळजात कळ यायची...
हातात कुंचला घेऊन चित्र रेखाटवी आणि मुलीलाही शिकवावी अस वाटु लागे ....त्यातच अजुन काही वर्षे निघुन आली आणि मीता शाळेत जायला लागली... तिच्या डोळ्यात समोरून तिचा जीवनपट तरळुन गेला
इतक्यात कुकरची शिट्टी झाली तशी सिया भानावर आली.... आणि मग सुरू झाली तिची सकाळची धावपळ ...नवऱ्याचा डबा, सासूची औषधे आणि पथ्य सगळं बघायचं होत . ...
अग मला नाश्ता नको बनऊस आता, मिताचा आणि माझा बाहेरच नाश्ता करतो ,तिला कोपर्यावरच्या इडलीवाल्या कडची इडली खायची होती ती देतो तिला, खुप हट्ट करत होती ती .. अस म्हणुन त्याने हळुच मिताला डोळा मारला ....
मितानेही आजीने बघताच तत्परतेने मान हलवली
लाडकं माझं बाळ ते, इतके मागते आहे तर दे मग तिला नक्की ... सिया नको करुस नाश्ता आता , आमची छोटी परी बाहेर खाणार आहे...निर्मलताईच फर्मान निघाले तास मंदार मिता आई सिया ने एकमेकांकडे बघुन डोळे मिचकावले
सियानेही हसुन मान डोलावली .. मिता आईंचा विकपॉइंट .. बापलेक डब्बा घेऊन ऑफीस ला आणि शाळेला निघाले...
तिला माहीत होतं हे सर्व मंदारने वातावरण निवळावे म्हणुन केले होते .. त्याचा तिला नेहमीच आधार वाटायचा ... एवढं सगळं चांगले आहे हे ही नसे थोडके असा विचार केला तिने सगळा स्वयंपाक उरकून तिनी आईना जेवण आणि नंतर औषध नेऊन दिली...
पण आज काही आईंच्या रागाची धार काही केल्या कमी होत नव्हती... त्या धुसपुस करत होत्या पण तिच्याशी काही बोलतच नव्हत्या
अचानक दुपारी तिच्या खोलीत आल्या आणि काहीतरी शोधत होत्या .... तिने न राहवून विचारलेच त्यांना
" आई काही हवय का तुम्हाला"
पण त्यानी काहीच उत्तर दिले नाही.... ती शेवटी शांतपणे तिथुन निघुन गेली
काहीवेळाने त्याही त्यांच्या खोलीत निघुन गेल्या ...
तिला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते ...
"अस काय शोधत होत्या तेपण आमच्या खोलीत "
कारण त्याआधी त्या कधीही अश्या पद्धतीने तिच्या खोलीत आल्या नव्हत्या...
संध्याकाळी जेव्हा घरी आल्यावर जेव्हा मंदारने तिला सांगितले की "आईने घरात आज मीटिंग ठेवली आहे आपल्या तिघांनाही बसायचे आहे"
"मितालाही" सियाने न राहवुन विचारले
"हो तिलाही, काय चाललंय डोक्यात काही कळतच नाही आहे, बहुतेक सकाळचा विषयाबद्दल बोलायचे असेल" मंदार विचार करत बोलला पण सियाचा गंभीर चेहरा बघुन तिला म्हणाला " काही काळजी करू नको मी बोलतो तिच्याशी किंवा काहीतरी वेगळे महत्त्वाचे बोलायचे ही असेल तिला...
"पण आजकाल माझ्याही काही चुका होत आहेत, राहुन जात काहीतरी , त्यामुळे त्यांनाही त्रास होतो "....
"तु काही मुद्दामहून करत नाही, आणि चुका कोणाकडून होत नाही, आणि तुझ्या बद्दल असेल असं काही नाही ..चूका मी ही करतो , माझ काही नसल म्हणजे मिळवलं
तसाही मी घरात पुरेसा वेळ देत नाही अशी तक्रार असतेच तीची"
"आज त्या आपल्या खोलित काहीतरी शोधत होत्या "
मी विचारले तर काही उत्तर दिले नाही, शिवाय आज जास्त बोलल्याही नाही त्या माझ्याशी"
सियाने न राहवुन सांगितले....
"काय" हे ऐकुन मंदार तर उडालाच
आता तर तोही काळजीत पडला, कारण याआधी आई अस कधिच वागली नव्हती ... लग्नानंतर सियाने जबाबदारी घेतल्यानंतर जे काही हवं असेल तर तिलाच विचारायची, म्हणजे प्रकरण गंभीर आहे आणि हेच त्याच्याही काळजीचे कारण झाले होते...
आता दोघेही आईच्या बोलावण्याची वाट बघु लागले...
(खर काय असेल जे निर्मला ताईंना सांगायचे असेल , बघूया पुढच्या भागात)....
प्रतिक्षा नागवेकर