Jan 19, 2022
नारीवादी

ओळख भाग अंतिम

Read Later
ओळख भाग अंतिम

मंदारला सियाची धावपळ आणि तिचे कष्ट दोन्ही दिसत होते... तसंच त्याला तिची काळजीही वाटत होती कदाचित कामाच्या अति ताणामुळे ही तिच्याकडून काही चुका घडत असतील... त्याने ठरवले आता सीयावरचा ताण कमी करायचा ... आणि याबद्दल तो सुद्धा आईशी नक्की बोलणार होता .. 

 

थोड्या वेळातच आईचे बोलावणे आले , हॉल मधल्या dining टेबल वर सगळे बसले

 

मिता ही अक्षरशः उड्या मारत आली आणि आजी शेजारी बसली

 

" डॅडा आजी तुमची parents मीटिंग घेणार आहे.. "

 मिता ने अस म्हटल्यावर मंदार ने तिला खूण करून गप्प बसवले.. तर तिची आजी तिच्याकडे नेहमीच प्रेमाचं बघून हसली... सिया तर गोधळूनच गेली होती...

 

घरातल्या संगळ्यांचं लक्ष आता फक्त निर्मला ताईवर होत

आता मीटिंग ची सगळी सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतलीं... 

 

" मंदार गेल्या महिनाभरात सिया कडुन इतक्या चुका झाल्या आहेत  हे काही मी तुला वेगळे सांगायला नको... "  ...गेल्या महिन्यापासून ही इतकी वेंधळी सारखी वागत होती तेव्हा तिला ही काम जड जातंयात हे स्पष्टच आहे ,तेव्हा आता मी ठरवले आहे मी काही काम तिच्याकडून काढून घेणार आहे...

 

आणि हे ऐकून सियाचा चेहरा मात्र पडला ती गपगुमान ऐकत उभी राहिली... तिला काही कळेचना आई इतक्या चिडतील अस वाटलच नव्हतं तीला... तिचा चेहरा रडवेला झाला 

 

"पण आई त्यामागे काही कारण ही असतील ना ... नाहीतर उगीच हलगर्जीपणा करण्यातली नाही ती.."

 

 आणि ती कारण तुला माहीत आहेत का ?  कारण तुला काही माहिती नसली तरी मला यामागचं गौडबंगाल काय आहे ते माहीत आहे .. जे सिया आपल्यापासून लपवत आहे... निर्मला ताईच्या बोलण्यात नाराजी डोकवत होती

..  सियाला ही आईच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले...आणि ती त्याच्यापासुन काय लपवले याचा विचार करू लागली... 

 

आई हे काय बोलते आहेस तु??? ती कशाला काही लपवेल"... मंदार ही आता पुरता वैतागला होता

आई अशी का वागत आहे हे त्याला कळतच नव्हतं  नक्कीच तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल

 

"लपवले आहे ... आणि आज तेच शोधुन काढण्यासाठी मी तुमच्या खोलीत आज आलें होते"  निर्मला ताई बाणेदार पणे म्हणाल्या आणि त्यांनी कागदाची गुंडाळी  टेबलावर ठेवली... तस सियाच लक्ष त्या कागदाच्या गुंडाळीकडे गेले तेव्हा तिच्या लक्षात आलं... की ही तिची चित्र होती जी गेल्या महिन्यात तिनी माहेर हुन आणली होती... त्या चित्रांना ती अधूनमधून चोरून बघायची ... आणि तेव्हापासूनच तिच्या चुका होऊ लागल्या होत्या... 

 

निर्मला ताईच पूर्ण लक्ष फक्त आता फ़क्त सिया वर होते ... आता तर  तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता

"काय सिया मी खर बोलतेय ना, तु या चित्रात गुंतून पडल्यामुळे दुर्लक्ष होत आहे ना तुझं घराकडे"

 

मंदार ला कशाचा कशाशी संदर्भ लागत नव्हता त्याने सरळ गुंडाळी खोलून त्यातील चित्र बाहेर काढली... आणि वेगळ्याच विश्वात गेला.. अप्रतिम चित्र होती आणि इतकी जीवंत की तो भारावून गेला ती त्यातला रंग आणि नकळतपणे त्याच्या तोंडुन उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले अप्रतिम..पण त्याचवेळी त्याच लक्ष त्या चित्र काढणाऱ्या कलाकारांच्या नावावर गेले आणि तो स्तब्ध झाला कारण ते सियाच माहेरचं नाव होतं सिया शिंदे. सियाने चित्र काढली...इतकी सुंदर .. हे मला आतापर्यंत कसं कळलं नाही ... आजपर्यंतच्या संसारात मला माझी बायको कळलीच नाही... शेवटी तो सियाला बोलला ते खर निघाले चुक त्याची निघाली होती... चूक कसली घोडचूक ... आता त्याला या मीटिंग चा खरा अर्थ कळून चुकला ... आई काय करते आहे याचा थोडा अंदाजही आला ... 

 

मिताही खूप खुश झाली ,... मॉम किती छान पैंटींग आहेत ... आणि सगळ्या तू काढल्या आहेस...

 

 

सियासुद्धा काही क्षणासाठी मंदारच्या आणि मुलीच्या तोंडून प्रशंसा ऐकून सुखावली... पण तिला आईनाही दुखवायच नव्हतं तिला वाटले आपण हे लपवेल म्हणुन आई चिडल्या  तिला कळतच नव्हतं काय प्रतिक्रिया द्यावी पण तिने खर सांगायचं ठरवले

 

मंदार ही सियाच्या उत्तराची वाट पाहत होता

 

हो आई या चित्रामुळे माझं दुर्लक्ष झाले खर.... लग्नाआधी मी चित्र काढायचे आणि ते मला खूप आवडायचं ... माझं विश्वच होता ते पण लग्न झालं आणि मी माझी ओळख विसरले ... त्याची हुरहूर मनात असल्यामुळे आजकाल चुका होत होत्या याचा अर्थ असा नाही की मी सुखी नाही आहे ... पण गेल्या महिन्यात घरी गेली ही चित्रे पहिली आणि  माझं मनाला परत ती ओढ लागली आहे ...  आणि त्यात मी तुम्हालाही दुखावलं.. तुम्हाला आवडत नसेल तर मी अस पुन्हा कधी वागणार नाही...

 

आणि मला नेमकं तू तस वागावस अस वाटत आहे...

 

निर्मलताईंनी अस म्हणताच आश्चर्यचकित होण्याची पाळी आता सियाची होती... मंदार शांतपणे स्मित करत होता...

 

आजपासून सर्वानुमते असा ठराव झाला आहे की सिया उद्यापासून आपली ओळख परत मिळवणार आहे म्हणजे आपली चित्र कला सुरू करेल...

 

सर्वानुमते मंदार मध्येच म्हणाला ... तू आम्हाला विचारलं नाहीस आई....

 

त्यात विचारण्याचा प्रश्न कुठे येतो... अरे गाढवा ज्याला आपल्या बायकोची आवड कशात आहे हे ही माहीत नाही मी त्याला का विचारू.?.. खरतर तूझी  कानउघाडणी करण्यासाठी आजची मीटिंग होती ... चुक सियाची कधी नव्हती तुझी होती... मग उद्यापासून मिताची शाळेची तयारी तू करायचीस ... स्वतःचा डबा स्वतः भरायचास ती फक्त स्वयंपाक करेल... म्हणजे तिला स्वतःसाठी वेळ मिळेल आणि सिया  मनातली इच्छा बोलून दाखवावीमी ग .. नाहीतर आम्हाला कसं कळेल .. मला ती चित्रं मिळाली नसती तर काही कळलच नसत ... शेवटी तुम्ही दोघांनी एकमेकांचं मन जाणून घेतले पाहिजे... 

 

हो मला माझी चूक कळली आहे... काही गोष्टी मी गृहीत धरल्या.. आई  ... सिया मनापासून बोलत होती...

 

" नाही बाळा तू काही गोष्टी गृहीत धरल्या कारण नोकरी करणारी मुलगी नको घर सांभाळणारी हवी ही माझी अट... "  ती अट घालण्याचे कारण म्हणजे परिस्थितीमुळे मला एकटीला संसाराचा गाडा ओदवा लागला... त्यामुळे मी माझ्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते.. त्याची खंत मला होती म्हणुन तुझा पुरेसा वेळ त्याला मिळावा म्हणुन ती आत होती.. बाकी तो काटेकोर स्वभाव सवयीने झाला आहे... पण त्यात तुझी स्वप्न असतील हे लक्षात नाही आलं माझ्या आणि याच्याही ... तर आता तू तुझी ओळख जपयचीस कारण तू आमच्या घराची खरी ओळख आहेस... आणि हो

 

नाश्ता बनवण्यासाठी आणि कपडे भांडी लादी साठी उद्यापासून बाई येणार आहे ..

 

मंदार ने त्यावर धक्का बसल्यासारखे विचारले पण तुला कामवालीच्या हातचे कपडे चालत नाहीत ना...

 

कपडे कोणीही धुतले तरी ते कधीच चालत नाहीत समजलं .. तसही तुला तसही काय माहीत आहे घरातले आता कळले सियाबद्दल पण माहीत नाही आहे...

 

बघितले सिया  तुला म्हटले होत ना मी... चूक माझी नसली म्हणजे मिळवले ... आता टोमणे मारून मारून छळेल मला... सासुरवास माझ्या नशिबी आहे ग

 

मंदारच्या नौटंकीने सर्व हसु लागले...

 

आणि हो मला आणि मिताला पण चित्र काढायला शिकावं हो ... आम्ही तुझे विद्यार्थी 

मंदार पटकन म्हणाला ... त्याचीच री ओढत मिता सुद्धा तत्परतेने म्हणाली...

 

ममा मला पण drawing शिकायचं आहे अगदी तुझ्यासारख... हे सगळं बघून सिया कृथार्थ झाली 

 मात्र तिचे डोळे आनंदाने पाणावले होते... 

आणि आईंच्या डोळ्यात समाधान होत... 

 

मंदार ने दुसऱ्यादिवशी सियासाठी सर्व साहित्य मागवले.. इतकच नाही तर सियाच्या सासू कम आईनी त्यांच्या मैत्रिणीच्या मदतीने सियाच्या चित्राचे प्रदर्शन सुद्धा भरवले..आणि सियाला तिची ओळख मिळाली..( प्रत्येक मुलीला सियाच्या सासुसारखी आई आणि मंदार सारखा नवरा मिळेल असा नाही.. पण आपली ओळख प्रत्येकाने जपायला हवी...अजून का थांबलात कथेला like कोण देणार आणि भरपूर कंमेंट करा)  

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now