ओढ तुझी

Wife waiting Eagerly For His Love


चेहऱ्यावर हसू आहे पण
त्यामागचं रडणं मलाच माहिती आहे
बाहेरून तर मी खुश आहे पण
भावना मनातच दाटून जगत आहे

दारात उभी राहून मी
आठवण आजही पाहते मी
अश्रूंना उंबरठ्यावर वाहून मी
तुझ्या आशेवरच जगत आहे

शप्पथ तू दिली मला लग्नावेळी
मलाच कधीच सोडून जाणार नाहीस
मग का दिला दगा असा तू
मला एकटे सोडून दूर का गेलास तू


लोक त्यांच्या खुशीत ते सामावून जातात
पण मी दुःखाच्या सागरात बुडून जाते
सुख दुःखात साथ देणारा तू मला
का सोडून गेलास तू  दूर मला

माझी तुला कसलीच तक्रार नाही
पण माझी चूक नेमकी काय झाली
का जीवनभराचा भार एकटीवर टाकला
तुझ्याविना जगता येईना पण सांग कशी जगू आता

तू तुझ्या कर्तव्यावर गेला
पण घर ही कर्तव्य आहे ना
पराक्रम गाजवून तू शाहिद झाला
देशसेवे साठी तू बलीदान दिले

तुझ्या आठवणीत जगेल मी
आपल्या अंशाला जगवेल मी
त्याला सांगेल त्याचा बाप किती महान होता
त्याला ही तुझ्या पावलांवर वाढवणार

पण जेव्हा त्याला बाप हवे असणार
तेव्हा मात्र मी आई म्हणून हरणार
या स्वार्थी दुनियेत आम्हाला
आता आधार कुणी देणार