ओढ तुझी लागली भाग 58
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
आरती, वीर ऑफिसला आले. आरती ट्रेनिंग हॉल मधे गेली. आज त्या मुलांनी नाश्त्याला मागवला होत.
"मला ही द्या ना." आरती त्यांच्या जवळ बसली.
"तीस रुपये दे."
"हे एवढ म्हणजे अति होतय."
"अरे मी काय करोडपती नाही. " मोहन बोलला.
तिने पैसे दिले. नीता आली नेहमी प्रमाणे ती खूप बडबड करत होती. तिने तीच सामान नीट ठेवल. "मला ही द्या ना खायला."
तिला मोहनने खायला दिल. सगळे बघत होते.
"मोहन नक्की काय सुरू आहे? माझ्या कडून तीस रुपये घेतले याने . " आरती बाकीच्यांना सांगत होती.
" आमच्या कडून पन्नास घेतले . " बाकीचे मुल बोलले.
"नीताला फ्री."
" बघ ना."
नीता भोळसट पणे तीच तीच खात होती. तिचं लक्ष नव्हत. काय चाललय त्याच्याशी काही घेण नसल्या सारख आरामात ती बसुन होती. बाकीचे हसत होते. काही खर नाही हीच.
ऑफिस मधे त्यांना रोज वेगवेगळ काम शिकवत होते. नीता आरती जवळ येवून बसली.
"मी दोन दिवस नाहिये नीता ."
का?
"माझ्या भावाच लग्न आहे."
" अरे वाह आम्हाला नाही बोलवणार का?"
"ये ना. तुला आमंत्रण आहे."
"ऑफिस असेल ना त्या दिवशी. "
हो.
एन्जॉय.
आज दुसर्या फॅक्टरीत वीजीट होती. तिथे वरुण राकेश काम करत होते. ऑफिसच्या मिनि बस मध्ये सगळे ट्रेनि बसले होते. सगळे आनंदात होते. खूप गप्पा सुरू होत्या. मोहन आरतीला इशारा करत होता." मी बसू का तिकडे नीता जवळ. "
"अरे काय तुझ. ठीक आहे. ये."
तो खुष होता.
" मोहन मला तुझी खिडकी जवळची जागा दे ना." आरती मुद्दाम बोलली.
"हो ये इकडे आरती." मोहन उठला.
"आरती काय झाल? का जाते तिकडे? मी पण येते." आरती सोबत नीता पण उठली. बाकीच्यांनी डोक्याला हात लावून घेतला. बिचारा मोहन.
" काय गोंधळ चालला आहे. आपण काही पिकनिकला निघालो का? नीट लक्ष द्या त्या फॅक्टरी मधे. इकडे आल्यावर मी प्रश्न विचारेल. माहिती वाचा." सुरेश सर ओरडत होते.
"किती बोर. सारख काय वाचा वाचा. " नीता वैतागली होती. आरती हसत होती.
सगळे तिकडे पोहचले. त्या फॅक्टरीत काय काम चालत हे सगळे दाखवत होते. राकेश भेटला आरती त्याच्याशी बोलत होती.
" वरूण दादा कुठे आहे? "
" तो काय आत आहे. त्याच ही ट्रेनिंग सुरू आहे." वरुण येवून भेटला.
" कोण आहेत हे? "
"दोघं माझे भाऊ आहेत. "
" तुम्ही सगळे एकाच कंपनीत कसे काय कामाला? " नीता आश्चर्याने विचारत होती.
"मिळाली आता नोकरी काय करणार."
ते ऑफिस मध्ये वापस आले. लंच ब्रेक नंतर बरच काम झाल.
संध्याकाळी ऑफिस संपल्यानंतर आरती वीरच्या केबिनमध्ये आली. " मी आता आई कडे जाते आहे. "
" घरी जाऊन जाणार का? "
" नाही बॅग घेतली आहे सोबत. "
"थांब ना थोड. मला आता करमणार नाही. " दोघांनी सोबत चहा घेतला. आरती निघाली.
वीर मेसेज बघत होता. अनुश्रीने काहीच रिप्लाय दिला नाही. त्यांने परत तिला मेसेज केला. "तुझं काम झालं आहे का? मी काही मदत करू? जमल तर रीप्लाय कर. "
कार मध्ये आरतीने वीरचा मेसेज आलेला बघितला. तिला खूप कसंतरी वाटलं. राहुल दादाच लग्न झालं की याला सांगूनच देऊ की मीच आहे अनु. आता सांगितलं असतं पण तो काय रिऍक्ट होईल हे सांगता येत नाही. उगाच लग्नाच्या गडबडीत रुसवे फुगवे नको. तिने मेसेज केला. "झाल आहे काम. थँक्यु सागर. "
वीरने तो मेसेज वाचला. त्याला बर वाटल.
आरती घरी आली. सरला ताई, आजी खूप खुश होत्या. त्यांनी औक्षण करून तीच स्वागत केल. एकदमच उत्साहाचा वातावरण तयार झालं होत.
"आता खरं लग्न घर आहे असं वाटतं आहे." बाबा बोलले.
"हो पण मला उद्या ऑफिसला जावं लागेल. एवढ्या सुट्ट्या घेता येणार नाही." आरती आत येवून बसली.
वरूणही ऑफिस हून वापस आला. "हो नवीनच जॉब आहे सुट्ट्या घेता येणार नाही." वरूण सिरीयस झाल्यामुळे घरातले सगळे खुश होते.
आरती बघत होती काय काय काम बाकी आहे. तीने लिस्ट केली. राहुल दादा आला.
" चला सगळ्यांनी त्यांची बॅग भरली का ते दाखवा. चल दादा तुझे लग्नाचे कपडे आपण नीट ठेवू."
नंतर तिने वरुण कोणते कपडे घालणार आहे ते बघितल.
"आई, आजी तुमचे ब्लाऊज आले का शिवून? बाबांचे कपडे रेडी आहेत ना? "
"हो त्या बॅग मधे आहेत बघ."
तिने मीनलला फोन केला. तिकडे किती काम झाले आहेत ते बघितलं.
"तू सुट्टी घेतली का आरती? "
" नाही उद्या जाणार आहे ऑफिसला. "
" मेहंदीच्या प्रोग्राम साठी नाही येणार का इकडे?" मीनल रागावली होती.
" संध्याकाळी येईल. अस कस मी माझ्या लाडक्या वहिनीचा प्रोग्रॅम मिस करेल."
आरतीने घरी फोन करून नंदिनी मॅडमशी बोलून घेतल.
आहेराच्या साड्यांच पॅकिंग बाकी होत. रात्रीच्या वेळी सरला ताई आणि आरती त्या पॅक करत बसल्या होत्या. राहुल त्यांच्याजवळ बसला होता. काय काय काम बाकी आहे ते बघत होता.
" आरती एक विचारू का? "
"विचार ना दादा."
"तू आणि विरने मीनलच्या आईला मदत केली का?"
" बहुतेक वीरने केली असेल. कारण त्या शाळेचे लोक त्यांच्या ओळखीचे आहेत." आरतीला माहिती होत सगळ ती मुद्दाम काही बोलली नाही.
आई बाबा आश्चर्याने बघत होते.
"हे असं चालणार नाही तुम्ही पैसे परत घ्या." बाबा बोलले.
" नको बाबा. वीरला वाईट वाटेल. करू दे ना थोडी मदत. "
" ठीक आहे." सरला ताई सगळं ऐकत होत्या.
दुसऱ्या दिवशी आरती आवरून ऑफिसमध्ये गेली. आज तिला फार महत्त्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे सुट्टीच विचारायचं होतं. कारण ती उद्यापासून ऑफिसला येणार नव्हती.
सुरेश सरांनी पहिल लेक्चर घेतलं. सुरुवातीला ते माहिती देत होते त्यानंतर प्रॅक्टिकल अस शेड्यूल होतं. ते सगळ्यां मुलांना शिकवत होते.
सुरेश सर, अर्जुन सर समोर केबिनमध्ये बसले होते. आरती आत मध्ये गेली. दारावर टकटक केलं .
"कम इन ." ते दोघे बघत होते. "बोला आरती मॅडम काय काम आहे?"
"सर मी शुक्रवार आणि शनिवार नाही येऊ शकत ऑफिसला. मला सुट्टी मिळेल का?"
हिला आपल्याला विचारायची काय गरज आहे. तिच्या स्वतःची कंपनी आहे. घरच्यांना सांगून दिलं की झालं काम.
"नवीनच ट्रेनिंग सुरू झाल आहे. त्या दोन दिवसाच्या सुट्ट्या म्हणजे. " तरी सर म्हटले.
" सर माझ्या भावाचं लग्न आहे शनिवारी. शुक्रवारपासून कार्यक्रम सुरू होतील. "
"ठीक आहे. नीता कडून समजून घ्या तुम्ही काय काय शिकवलं ते. सोमवारी न चुकता ऑफिसला यायचं."
तिला खूप आनंद झाला. "थँक्यू सर. "
लंच ब्रेक मध्ये वीरचा मेसेज आला होता. "इकडे जेवायला ये. "
" नाही जमणार. "
" तू घरी नाही आणि इकडे पण माझ्याशी बोलत नाही. अस चालणार नाही. मी तुला घ्यायला येतो आहे. "
" नको वीर. "
" घरी जाण्या आधी पाच मिनिट तरी ये. "
" हो. वीर मला सुट्टी मिळाली आहे."
" बरं झालं लक्षात आलं. जर तु मला भेटायला आली नाही तर मी तुझी सुट्टी कॅन्सल करेल."
"काहीही काय. "आरती हसत होती.
"काय झालं कोणाला एवढ हसुन मेसेज करते आहेस." नीता जवळ बसली.
"माझे मिस्टर ग."
"बघु फोन दाखव."
नाही.
"अग फोटो दाखव ना त्यांच्या. "
आरती फोटो दाखवत होती. "हा मुलगा. ओह हे इथले सर आहेत. "
" हो ओरडू नकोस कोणाला बोलू नकोस. "
का?
" मला दिखावा आवडत नाही. "
" ही कंपनी तुमची आहे. " नीता विचारत होती.
हो.
" तू का करतेस मग हे ट्रेनिंग? "
" कॉलेजच काम आहे. इथे जॉईन होण्या आधी सगळं शिकलेल बर. "
" वाह एवढा हॅन्डसम नवरा. म्हणजे सॉरी ग त्या दिवशी पण मी अस बोलले होते ." नीता आता गप्प बसली.
आरती आता हसत होती. "ठीक आहे वीर आहेच तसा छान. "
" तुमची स्टोरी सांग ना?"
" अग नाहिये अशी काही स्टोरी. "
" अस सोडणार नाही मी तुला. " नीता हट्टी पणा करत होती.
" नंतर बोलू सर आले बघ. "
ती पाच वाजता ट्रेनिंग संपल्यानंतर वीरच्या केबिनमध्ये गेली. दोघे बोलत होते. राहुल सर आत मध्ये आले." सॉरी मला माहिती नव्हतं आरती तू इथे आहेस. "
" बाबा या ना. " आरती उठून त्यांना भेटली.
राहुल सर वीरशी कामाचं बोलत होते. ते गेले.
" मी निघते वीर तू कामात आहेस .उद्या वेळेवर ये तिकडे हळदीसाठी."
"किती वाजता आहे हळद?"
" संध्याकाळी पाच वाजता हळद आहे. तू लवकर ये. मला लगेच निघावं लागेल आज मेहंदीचा कार्यक्रम आहे."
" तू ऑफिसमध्ये काय करते आहेस. जा पटकन ."
"अरे दोन दिवसाची सुट्टीच मोठ्या मुश्किलीने मिळाली आहे आणि मला काय काम आहे मीनल कडे मेहंदीचा कार्यक्रम आहे. मला तिकडे थोड्यावेळ जायचं आहे. नंतर जर राहुल दादा मेहंदी लावत असेल तर त्याच्या हाताला थोडी मेहंदी काढावी लागेल. पण तो अजिबात ऐकत नाही. वीर तु मेहेंदी लावली होती का आपल्या लग्नात? "
" नाही. माझ्या कडे सगळे दुर्लक्ष करतात. माझ्या बद्दल साधी एवढ ही माहिती नाही तुला. " तो रुसला होता.
" अरे तस नाही. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. " ती खूप हसत होती.
हर्षल आला. आरती वीर कडे बघून बाहेर निघून गेला.
" चल मी जातो मीटिंग आहे. "
आरतीने तिची बॅग घेतली. ती घरी निघाली . लगेच तयारीला लागली. तिने सुंदर अनारकली घातला होता. हातात बांगड्या थोडासा मेक अप छान होऊन ती मीनल कडे गेली.
" या या उशिरा येणार्या मेंबर ला शिक्षा द्या." राही बोलली.
"हो. आरती डान्स कर." प्रिया राही अजून बर्याच मैत्रिणी हजर होत्या.
" अरे मी ऑफिसला गेली होती."
" सांग ना वीरला सोडून यावास वाटत नव्हत."
काहीही. खूप गडबड गोंधळ सुरू होता.
काकू येवून भेटल्या." आरती इकडे ये मावशीला भेट. ही मीनल ची नणंद."
"बर्याच वर्षांनी बघितल हिला. " मावशी बोलल्या.
" बस आरती." त्यांनी सरबत दिल.
"काकू मी घेईन. आधी मला खायला द्या आधी खूप भूक लागली आहे." त्या समोसे चिप्स घेवून आल्या.
मीनलच्या दोघी हातावर मेहंदी काढून झाली होती. पाय सुरू होते. बाकीच्या मैत्रिणी आजूबाजूला बसलेल्या होत्या. कोणी अंताक्षरी खेळत होत. बाकी गप्पा मारत होत्या. आरतीला रागवत होत्या इतक्या उशिरा येतात का मेहंदी साठी. आम्ही केव्हाच वाट बघत आहोत.
"सॉरी उशीर झाला. राहुल दादाच पण खूप काम आहे मला. मीनल ये बाई लवकर घरी. तुझी तुझी जबाबदारी घे." आरती अस बोलल्यावर मीनल लाजली होती.
" उद्या तरी सुट्टी घेतली आहे ना ऑफिसला . बर स्वतः च ऑफिस आहे आमच्या सारख नाही." प्रिया अजूनही ओरडत होती.
"हो. उद्या आधी हळदीला तिकडे या. मग आपण येवू मीनल कडे. "
चालेल.
"चला सगळ्यांनी मेहंदी काढा पटापट." काकू आग्रह करत होत्या.
" माझ्या एकाच हातावर काढा मला घरी गेल्यावर काम आहे." आरती बोलली.
" काय काम आहे तुला आरती? "
" राहुल दादाच्या हातावर पण मेहंदी काढावी लागेल. "
" अग दोघी हातावर मेहंदी काढ. वाळल्यानंतर झटकून टाक." मावशींनी सुचवल.
आरतीने पण दोघी हातावर मेहंदी काढली. तिथे चहा झाल्यानंतर ती घरी आली.
घरातही खूप गडबड सुरू होती. आई आजी आरतीला मेहंदी लावायला सांगत होत्या.
" हे बघा मी मीनल कडून मेहंदी लावून आली. तुमच्या साठी कोन आणले आहेत. चला पटापट एक एक या. "
" आधी नवरदेव. "
" हो. चल दादा तू थोडीशी मेहंदी लावतो का?"
"अजिबात जमणार नाही मला. "
सगळे राहुलच्या मागे होते. त्याने ऐकलं नाही.
वरूण, राकेश, प्रकाश आणि आरती एका जागी बसून गप्पा मारत होते. प्रकाशने खायला चिप्स आणले होते. आरामात सुरू होतो त्यांचं.
" तुम्ही सगळ्यांनी बसून राहू नका. घरात खूप काम पडले आहेत. " सरला ताई ओरडल्या.
" आई कधी शांत बसू देत नाही. सारखं आपलं काम काम." वरुण बोलला.
"हो ना. किती त्रास आहे तुला वरुण." आरती हसत होती.
"आरती उठून इकडे जरा किचनमध्ये लक्ष दे स्वयंपाक घरात जावून बस. "
सरलाताई सतीश रावांसोबत दुसरं काम करत होत्या. स्वयंपाकाला बाई लावली होती पण तिच्याकडे लक्ष द्याव लागत होत. तिला सामान हव होत.
आरती किचनमध्ये गेली तिथे बोलत बसली.
रात्री वीरचा फोन आला. आरतीने आधीच त्याला मेहंदीचे फोटो पाठवले होते.
"आरती माझं नाव काढलं का मेहंदी मध्ये?" वीर छान विचारत होता.
" नाही सारखं कशाला तुझं नाव काढणार. एकदाच काढल लग्नात. आता साधी मेहेंदी आहे माझी."
" चांगलं आहे आम्हाला कोणीच भाव देत नाही. मला वाटलं होतं छान तुझ्या हातातल्या मेहेंदीत मी माझं नाव शोधेल. तुला जवळ घेईल."
" काहीही सुरू असतं तुझं विर. तुला या शिवाय काही सुचत नाही का . आपल काय आता लग्न झालं का? "
" अजून आपण हनीमूनला ही गेलो नाही. इतक नवीन आहे आपल लग्न. "
पुरे वीर. आरती लाजली होती.
" नुसत लाजून काय होणार आहे मी सांगतो ते नीट ऐक. उद्या मी तिकडे आलो की जरा वेळ माझ्यासोबत यायचं रूममध्ये."
" नाही माझ्या अजिबात नाही तिथे सगळ्यांमध्ये मला त्रास द्यायचा नाही. " आरती घाबरली.
" असं कसं चालेल थोडं तर माझ्याजवळ यावच लागेल. नाहीतर मी लग्नात रुसून बसेल. जावई आहे मी. "
"वीर तुला हे जमणार नाही. तू चांगला आहेस. "
" नाही या वेळी मी स्ट्रीक्ट वागणार आहे. "
" बर बघु. "
