ओढ तुझी लागली भाग 20

मीनल बाहेर आली. राहुल बाहेर उभा होता. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "राहुल धीर धर. होईल नीट. इतक इमोशनल होवुन चालेल का. आरतीला त्रास होईल ना


ओढ तुझी लागली भाग 20

©️®️शिल्पा सुतार
.......

"मला वीर सोबत रहायच नाही." आरती मैत्रिणीं सोबत खूप बोलत होती.

"जावू द्या तो विषय आरती, मीनल, राही . एक सणसणीत बातमी आहे. " प्रिया एकदम सिक्रेट सांगितल्या सारखी हळू हळू बोलत होती.

काय?

"आपल्या कॉलेज मधली आशा आहे ना ती त्या विजय सोबत पळून गेली. " प्रिया.

"काय? कधी?" सगळ्या तेच बोलत होत्या, हसत होत्या.

" बापरे हिम्मत कशी होते? " राही.

"घरचे नाही म्हणत असतिल तर काय करेल ती. " मीनल.

" मीनल तू डेअरिंग बाज आहेस. तू पळू शकते." प्रिया.

"कोणा बरोबर पळू? कोणी हव ना माझ्या मागे येणार. मला प्रपोज करणार. एकटी पळून जावू का? " मीनल चिडली होती.

प्रिया हसत होती.

मीनल तिला मारत होती.

आरती खूप हसत होती. मैत्रिणी सोबत ती थोडी तरी ठीक होती.

आज संध्याकाळी आरतीला सोडणार होते. राहुल ऑफिस मधून आलेला होता. तो डॉक्टरांना जावून भेटला.

"ठीक वाटते आरती. तरी कोणी तरी नेहमी तिच्या सोबत रहा. ती खुश राहील अस बघा. " डॉक्टर खूप गोष्टी सांगत होते. त्यांनी गोळ्या आणि टॉनिक लिहून दिले.

"हो डॉक्टर मी तिची काळजी घेईन. " राहुल.

मीनल पूर्ण वेळ आरतीच्या सोबत होती. खूप मदत करत होती. प्रिया राही थोड्या वेळाने घरी गेल्या. आरती झोपली होती.

"मीनल चहा घेते का? " राहुल आत आला.

" हो.. सिस्टर लक्ष द्या आरती कडे. आम्ही येतो दहा मिनिटात. " दोघ कॅन्टीन कडे गेले.

" काय झालं राहुल? वीर भेटला का? "

" हो वरुण गेला होता त्याच्या ऑफिस मध्ये. भेटला पण अजून काही ठरलं नाही. ते तपास करत आहेत. मीनल तू आरती कडे लक्ष दे थोडे दिवस. मी रिक्वेस्ट करतो." राहुल.

"राहुल मला पण आरतीची काळजी आहे. मी राहीन तिच्या सोबत."

"मीनल मला खूप वाईट वाटत आहे. अस वाटत काय होईल आरतीच? "राहुल इमोशनल झाला होता.

" ती वीर सोबत लग्न करायला नाही म्हणते आहे." मीनल.

" हो ना तिने धसका घेतला आहे या सगळ्या गोष्टीचा. होईल ठीक. पण तुला माहिती आहे ना तिला वीर आवडतो. " राहुल.

" हो ती पसंत करत होती त्याला. आता माहिती नाही." मीनल.

" आता आरतीला वाटेल ते होईल. मी साथ देईल तिची. आधी मिलिंदच्या वेळी पण तिची इच्छा नव्हती. तेव्हा तीच लग्न आम्ही बळजबरीने ठरवल. मिलिंदने साथ दिली नाही. तिच्यावर विश्वास ठेवला नाही. आरतीच नुकसान झाल."

"हो. पण जावू दे. वीर चांगला आहे तसा. "मीनल.

" आरतीला त्रास नको व्हायला या सगळ्यात. "राहुल.

" बरीच सावरली आहे ती राहुल. तू काळजी करू नकोस."

राहुल हॉस्पिटलच बील भरायला गेला.

" तुमच बिल इनामदार साहेबानी भरल आहे ."

"म्हणजे कोण ?"

"वीर इनामदार."

राहुलने वरुणला त्या लोकांनी बिल भरल ते सांगितल.

मीनल आरतीला मदत करत होती. तिचा चांगला स्वभाव समजून येत होता. मधेच ती खाली जावून औषध घेवून आली. राहुलची खूप धावपळ होत होती.

मीनलने आरतीला मधे थोड खायला दिल. आरती खात नव्हती. तिने राहुल कडे बघितल. तो पटकन पुढे आला. "चल आरती खावून घे थोड." तो स्वतः तिला खावु घालत होता.

"दादा तुझ्या सारखे चांगले लोक का नसतात जगात? सांग ना माझ काय होईल पुढे?" आरती.

"चूप शांत हो खावून घे."

ती रडत होती. मधून मधून तिला त्रास होत होता. "दादा मी चांगली नाही का?"

राहुलला रडू आल. तो उठून बाहेर गेला.

"आरती बघितल का तू अस रडते तर राहुल त्रास करून घेतो." मीनल तिला समजावत होती.

" मीनल बघ ना प्लीज. जा ना दादाच्या मागे." आरती काळजीत होती.

मीनल बाहेर आली. राहुल बाहेर उभा होता. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "राहुल धीर धर. होईल नीट. इतक इमोशनल होवुन चालेल का. आरतीला त्रास होईल ना."

"मीनल मला खूप कसतरी होत आहे. आरतीला किती त्रास होतो आहे. काय करू मी म्हणजे तिचा त्रास कमी होईल. सांग ना मीनल. "राहुल.

" करू आपण तिला नॉर्मल. मी आहे ना. आपण तिच्या सोबत राहू. होईल ठीक. काळजी करायची नाही."

"थॅन्क्स मीनल तू खूप सांभाळून घेते आहेस. " तो मीनल कडे बघत होता.

"चल आत आरती जवळ बस आणि स्ट्रॉग हो. " राहुल मीनल जे बोलेल ते ऐकत होता.

तयारी झाली. रिक्षाने ते घरी आले. सगळ्यांनी आजींना समजवले अजिबात आरतीला काही बोलायच नाही. तिचा काही दोष नाही यात. झाल ते अगदीच वाईट झाल. आपण आता आरतीला सांभाळल पाहिजे.

"हो माझा पण जीव आहे तिच्यावर. मी काही एवढी वाईट नाही." आजी.

मीनल आरती सोबत होती. आरती आराम कर तुला काय हव ते मला सांग. तिने आतून आरती साठी चहा आणला. खूप काम करत होती ती.
.......

राहुल सर ऑफिसमध्ये वीरला काहीच बोलले नाही . ते खूप चिडलेले होते. त्यांच्या ऑफिसचं काम सुरू होतं. साडेपाच वाजता ते वीरच्या केबिनमध्ये मध्ये आले. तो ही आज बैचेन होता. काही सुचत नव्हत. तो उठून उभा राहिला. बाबा...

"चल आपण घरी जावु मला बोलायच आहे तुझ्याशी थोड." रस्त्याने ते काही बोलले नाही.

नंदिनी मॅडम आश्चर्यचकित होत्या की आज हे दोघेही इतक्या लवकर सहा वाजताच कसे काय घरी आले. वीरचा चेहरा उतरलेला दिसत होता. दिवसभर तो आरतीचा विचार करत होता. मला वाटलं नव्हतं असं होईल. आता काय करायचं?

" काय झालं वीर?" नंदिनी मॅडमनी विचारल.

तो काहीच म्हटला नाही.

"काय झालं आहे राहुल ? तुम्ही दोघं एवढ्या लवकर घरी कसे आलात ?"

शनाया सुद्धा बाहेर येऊन बसली.

"पटकन सांगा काय झालं आहे?" नंदिनी मॅडम टेंशन मधे होत्या.

राहुल सर नंदिनी मॅडमला काय का आज दिवसभर काय काय झालं ते सांगत होते.

नंदिनी मॅडम शनाया दोघं शॉक मध्ये होत्या.

" काय आहे हे वीर? तू असं वागतोस? मी तुला असं शिकवलं आहे का लहानपणापासून. मी तुला मागे सुद्धा म्हंटल होती की मला बदला घ्यायचा असं वागू नको. आरतीचा काय दोष होता याच्यात. तुझी दुश्मनी वरूण सोबत होती ना. तू त्याच्या पर्यंतच मर्यादित रहायला पाहिजे होत. जर तुझ्यामुळे कोणी शनायाला त्रास दिला असता तर तुला चाललं असतं का? त्यात अजून आरतीचं लग्न ठरलं होतं. तुला समजायला हवं होतं. "

"आई तिच नुकसान होईल अस मला वाटल नव्हत. मी लाइटली घेत होतो."

" तू तिला सारख भेटत होता. तिला त्रास देत होता. ही गोष्ट पसरणारच ना मग सगळीकडे. असं कसं म्हणतोस तू की याने काही त्रास होणार नाही. आता हे किती जास्त होऊन बसल आहे. काय करायचं? आरती कशी आहे आता?"

"ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. "

" हे खूप चुकीचं झालं आहे वीर. मला हे अजिबात आवडलेलं नाही. एखाद्या मुलीशी कस वागतात ते तुला समजत नाही? तु चांगल फक्त माझ्याशी आणि शनायाशी वागतो . याला काय अर्थ आहे. तू माफी मागितली का आरतीची? " नंदिनी मॅडम चिडल्या होत्या. शनाया त्याच्याकडे बघत होती. वीरलाही काही सुचत नव्हतं काय करावं. आता नेमकी आरती कशी आहे ? त्याला पण कसंतरी होत होत. कोणाला विचाराव. कोणाचाच फोन नंबर नाही. तिकडे वरूण काही सांगणार नाही.

" बाबा प्लीज विचारांना आरती कशी आहे?" वीर रिक्वेस्ट करत होता.

सगळे आश्चर्याने बघत होते. राहुल सरांनी वरूणला फोन लावला. "आरती कशी आहे?"

"आता व्यवस्थित आहे. घरी सोडलं आहे आणि तुम्ही आमचे हॉस्पिटलचे पैसे भरले का?"

हो.

"काय गरज होती? तुम्हाला असं वाटतं का की आम्ही पैसे भरू शकत नाही?"

" नाही असं काही नाही. मला वाटल म्हणुन पैसे भरले. तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर माफ करा." राहुल सर.

" हे बघा यापुढे तुम्ही आमच्या कुठल्याच गोष्टींत मध्ये मध्ये करू नका. आरतीची खूप काळजी आहे असं दाखवू नका. मी म्हटलं होत वीरला द्या इकडे तुम्ही ऐकत नाही. तुम्ही अस वागले तर घरच्यांना अजून त्रास होईल. " वरूणने फोन ठेवून दिला.

" काय झालं बाबा?"

" आरतीला घरी सोडलं आहे आणि ते लोक खूप चिडले आहेत."

"आई बाबा मला खूप वाईट वाटत आहे. मी आरतीला अस बघु शकत नाही. खूप साधी छान मुलगी आहे ती. माझ्या मुळे तीच नुकसान झाल. मी तिच्याशी लग्न करतो." वीर.

"का पण ते लोक म्हणतात म्हणून का? विचार कर. तुला पस्तावा नको व्हायला. नीट वागाव लागेल तिच्याशी " नंदिनी मॅडम.

" आई मला आरती आवडते."

" तू मुद्दाम तर केल नाही ना हे. " नंदिनी मॅडम.

" नाही.. कोणाची ही शप्पथ घ्यायला सांग मी तिला अस नाही करू शकत. मी तिच्या मागे होतो. पण तीच वाईट व्हाव अस माझ म्हणण नाही. मी तस वागलो नाही. "वीर.

" तुमच दोघंच काय म्हणण आहे? "नंदिनी मॅडम राहुल सर शनायाला विचारत होत्या.

" त्या लोकांशी बोलाव लागेल. आता हा निर्णय त्यांच्या असेल. ते हो म्हणतील तर होईल हे लग्न. बळजबरी नको. "

ठीक आहे.

राहुल सर नंदिनी मॅडम रूम मध्ये आले. "वीर अस करु शकतो विश्वास बसत नाही. काय गोंधळ झाला आहे. "

" वीर एवढा ही वाईट नाही. हे वरुण त्याच्या दुष्मनी मूळे झाल. त्याला समजल नाही. "राहुल सर.

" कशी आहे मुलगी? "

" साधी आहे. एकदम नाजूक छान आहे. हुशार वाटते. "

" ते लोक काय म्हणतात त्या वर आहे. वीरला ती आवडते. "

" हो मी उद्या बोलतो त्यांच्याशी. "

" वीर लहान आहे पण लग्नासाठी. "

" काय करणार चुकी झाली त्याची. ते लोक तयार असतिल तर कराव लागेल लग्न. "

वीर अजून हॉल मध्ये बसलेला होता. शनाया त्याच्या कडे बघत होती. "काय झालं नक्की दादा?"

"माझ्या कडून चूक झाली शनु .मी आरतीला त्रास नव्हता द्यायला पाहिजे." वीर.

" आता काय? "

" आरती हो म्हटली तर मी लग्न करणार आहे तिच्या सोबत. "

" ती नाही म्हटली तर? "

" रागात नाही म्हणेल पण तिला मी आवडतो."

काय?

"हो म्हणजे आधी आवडत होता. आता माहिती नाही. आता बहूतेक ती चिडली असेल. "

" तिने हो म्हटलं तर दादा तुझ लग्न लगेच असेल. "

वीर काही म्हटला नाही. मला नाही वाटत ती हो म्हणेल. तिला जेव्हा लग्न करायच असेल तेव्हा मी तयार आहे.
स्वतः च्या वागण्याच्या त्याला त्रास होत होता. आज तो विशेष जेवला नाही. तसा रूम मधे आला.

साहिल फोन करत होता. "तुला समजल का आरतीच? "

"हो समजल."

" आता काय? "

" माहिती नाही. मला वेळ दे थोडा नंतर बोलतो. " वीरने फोन ठेवून दिला.

" काय म्हटला वीर? "अखिल.

"बोलत नाही फोन ठेवून दिला." साहिल.
.......

मीनल निघत होती. "आरती आराम कर मी उद्या येते."

राहुल तिला सोडायला आला. तो सोबत असल्याने मीनल खुश होती. किती चांगला स्वभाव आहे याचा. अजून आयुष्यात काय हव. मला राहुल आवडतो. तो सध्या आरती मुळे खूप इमोशनल झाला आहे. म्हणून तो माझ्याशी चांगला वागतो आहे. नाहीतर इतर वेळी तो माझ्याशी बोलत ही नाही. तीच घर आल. "आत येतोस का राहुल? "

"नाही मी आता निघतो. उद्या येशील ना?"

हो .

तो गडबडला. "म्हणजे आरती वाट बघेल म्हणून म्हटलो मी."

" हो येईल." मीनल हसत होती.

राहुल ही थोडा हसला. बाय.

" हो बाय नीट जा." ती खुश होवुन आत आली.

"कशी आहे आरती?" तिची आई विचारात होती.

"सावरते आहे. आई मी थोडे दिवस रोज जाईल तिकडे आरतीला सोबत होईल." मीनल.

"हो जा काळजी वाटते आरतीची. अगदी साधी भोळी मुलगी आहे ती."

हो ना.
....

आरतीने औषध घेतले. आजी तिथे रूम मध्ये होती. "आजी तू चिडली का माझ्या वर?"

"नाही मी का चिडेन."

"तू मला काही ओरडत नाही ."

"काय करू ओरडून तुझा त्रास दिसतो आहे मला."

"आजी काय करू मी तू सांग ."आरती.

"विसरून जा जे झाल ते. नाहीतरी मिलिंद सोबत तुला आधी लग्न करायच नव्हत ना ."

हो .

"काय कारण होत? "

आरती गप्प झाली. वीर.. माझ्या मनातला हीरो सगळ्यात मोठा व्हिलन निघाला. जावू दे. काय घेण आहे त्याच्याशी.

" मला शिकायचं होत आजी. "

" आता शिक मग. आराम कर. बोलत बसू नकोस. मी बसू का तुझ्या जवळ. "

" नाही आजी मी झोपते. "

आरती विचार करत होती. जेव्हा मिलिंदच स्थळ सांगून आलं होतं तेव्हा मी किती राग राग केला होता. मला लग्नच करायचं नव्हतं. कारण काय होतं तर मला वीर आवडत होता. नंतर मी मिलिंद सोबत कंफर्टेबल झाली होती. पण काय झालं ते लग्न मोडल. म्हणजे मला काय वाटत या बद्दल कोणाला काही घेण नाही. ज्याला जस वाटत तस ते माझ्या सोबत वागतात. वीरने वरुण दादाचा राग माझ्या वर काढला. मिलिंदही चिडले मला काहीही विचारल नाही. सरळ लग्न मोडल. माझा विचार आहे की नाही कोणाला? या वेळी मला खूप राग आला आहे. कोणी नको मला. शांत आयुष्य हव.
........

🎭 Series Post

View all