ओढ तुझी लागली भाग 15

वीर आरतीच्या मागे मागे करत होता, तिने बॅग उचलली की तो तिच्या हातातून घेत होता


ओढ तुझी लागली भाग 15

©️®️शिल्पा सुतार
.......

आता मला काही तरी कराव लागेल या वीरच, मी लक्ष देणार नाही त्याच्या कडे, उद्या मिलिंद सोबत बोलते, मीनल प्रिया आल्या , सगळ्या झोपायची तयारी करत होत्या ,

"वीर दोन मिनिट सरक आपण सामान नीट ठेवू," मीनल.

तो आरती जवळ बसला, आरती उठून उभी राहिली, मीनलला ती सामान देत होती, बरच आवरून झाल, वीर आरतीच्या मागे मागे करत होता, तिने बॅग उचलली की तो तिच्या हातातून घेत होता, "तू राहू दे आरती सामान जड आहे, हळू पडशील, नीट उभ रहा. "

" वीर मला येत काम, तू माझी खूप काळजी करू नकोस" आरती वैतागली

"हो आरती." तरी वीर तिच्या आजूबाजूला होता, तिच्या कडे बघत, तिला ही छान वाटत होत, काय वाटत आहे मला अस ? बापरे, तिला तिच्या विचाराची भिती वाटली,

" मीनल याला दुसरीकडे जायला सांग, माझ्या सीट वरून उठ वीर," आरती.

"काय झालं?"

"उठ इथून, तू जास्तीच बोलतोस, मला काहीही विचारतो," आरती.

" काय झालं आरती? चिडली का तू? अर्धा तासात मी उतरतो आरती, राहू दे ना तुझ्या सोबत ," वीर.

" मला झोपायच आहे, मला काही घेण नाही तुझ्याशी," आरती जोरात बोलली.

वीर तिच्या जागेवरून उठला, उभा राहिला,

"माझ्या जागेवर बसायच, मला त्रास द्यायचा, माझ्या कडे बघायच, माझा डबा खायचा, अस कस चालेल वीर, "

तो समोर खांबाला टेकून उभा होता, तो तिथून ही आरती कडे बघत होता,

" याच्या समोर कसा झोपणार, काय करू? बस..." ती बोलली,

वीरने बघितल, "काय?"

बस.

"नको... काही गरज नाही, "वीर.

" मग इकडे माझ्या कडे बघू नकोस, "आरती.

" मी काहीही करेन," त्याला ही राग आला होता.

दहा मिनिट राहिले, तो बॅग घ्यायला पुढे आला, आरती पटकन मागे सरकली, तो हसत होता, त्याने सीट खालून बॅग घेतली, "याला म्हणतात दहशत, गुड नाइट आरती," तो येवून दार जवळ उभा राहिला, स्टेशन आल तो उतरून, तिच्या खिडकी जवळ आला, थँक्स आरती. मीनल, बाय गर्ल्स.

तो त्याच्या डब्यात गेला, सगळे मूल वाट बघत होते, "कुठे होता तू? काय केल?" सगळे जमा झाले.

"लेडिज डब्यात होतो," त्याने तो आरती सोबत होता हे सांगितल नाही, त्याला वाटत नव्हत आरती बद्दल आता कोणाला काही सांगाव, चांगली आहे ती.

"काय करत होत्या मुली? कोण कोण होत? " सगळे उत्साही होते.

" काही नाही खूप डेंजर आहेत त्या मुली, त्रास देतात, " वीर.

" कस वाटत होत?"

" खूप छान, सगळीकडे मुली, कलर फूल ड्रेसेस, खूप सौंदर्य, पण खूप बोलतात त्या, " वीर.

"मग कोणी फिदा झाली नाही का तुझ्या वर?"

"झाली ना मनीषा, पण मी घाबरलो नाही, त्यामुळे कोणाच काही चालल नाही, "वीर.

" काय काय झालं? "बरेच मुल इंट्रेस्टेड होते,

" त्यांनी मला नाव विचारल, डान्स करायला सांगितला, "वीर.

मुल जेलस होते, या वीरला नेहमी कश्या काय मुली भाव देतात?

मुल गेले, वीर झोपायची तयारी करत होता,

" आता खर सांग वीर कुठे होता तू? "अखिल साहिल विचारत होते,

" मी आरती सोबत होतो, इकडे यावस वाटत नव्हत, "वीर.

"व्हॉट रीयली?"

" हो मी चुकून मुलींच्या डब्यात गेलो होतो, तिथे आरती होती, मी तिच्या सोबत होतो ," वीर.

"तिने मुलीपासून संरक्षण केल का तुझ?" अखिल.

"नाही मीच बळजबरी तिच्या सोबत होतो, मी आरती सोबत डान्स केला, "वीर.

" ती तयार झाली? "साहिल.

" हो, मी तिला त्या शिवाय सोडल नाही. माझ्या जवळ ठेवल होत, "वीर.

मग?

" काही नाही खूप छान आहे ती , "वीर खुश होता.

" वॉव लकी तू, "साहिल.

अखिलला राग आला होता, आरतीला नक्की याने त्रास दिला असेल,

वीर खूप सांगत होता आरती बद्दल, मी तिच्या सोबत जेवलो एका सीट वर बसलो होतो, किती छान भाजी होती, आरती चांगली आहे.

" वरुणला समजल तर? " अखिल.

" समजू दे, नेहमी दुश्मनांच्या बाजूने छान सुंदर मुली असतात त्याला मी काय करणार," वीर.

"तीच लग्न जमल ना?"

"हो आता थोडी होता तो मिलिंद सोबत," तो बराच वेळ बोलत बसला होता,
.......

मुली झोपल्या, सकाळी स्टेशनहून बस होती, त्या हिल स्टेशन वर जाणार होत्या, आरतीला झोप येत नव्हती,

मीनल.. मीनल..

" काय आहे आरती? झोप, "

"मी वीर सोबत डान्स केला ते मिलिंदला समजल तर? मीनल उठ..."

"झोपू दे ना आरती, समजल तर समजल एवढ काय केल, डान्स तर केला, ते पण तू नाही म्हणत होती, तोच तुला सोडत नव्हता, तू टेंशन घेवू नको," मीनल.

आरती टेंशन मधे होती, वीर मुद्दामून करतो सदोदित माझ्या मागे असतो तो,

" आरती.. कस वाटल वीर जवळ? तो प्रेम करतो तुझ्या वर, त्याच्या डोळ्यात दिसत. "

" मीनल.. झोप काहीही बोलू नकोस, "आरती विचार करत होती, काय होणार माझ? मी जिथे दिसेल तिथे वीर मला त्रास द्यायची एक ही संधी सोडत नाही, आमचा डान्स सगळ्यांनी बघितल, सगळीकडे पसरेल हे, मला आधीच सांगायला हव होत हे मिलिंदला, काय करू? एवढ टेंशन घेवून अॅटॅक येईल मला एखाद्या दिवशी, तिच्या ड्रेसचा परफ्युमचा वास येत होता, हा वीरचा परफ्यूम आहे, त्या दिवशी वीर जवळ असा वास येत होता, मी काय वीरचा विचार करते, ती झोपली,

वीर आणि ग्रुप स्टेशन वर उतरल्यावर गाडी करून चालले गेले, ते दहा मुल होते,

मुली बस मधे बसल्या , गाणी म्हणत त्या हिल स्टेशन वर पोहोचल्या, अतिशय गार वातावरण होत, सुंदर हॉटेल होत, दोन मुलींची एक रूम होती, छान वाटत होत.

फ्रेश होवुन या मुलींनो, आपण लगेच आज दोन ठिकाणी जावू, गाईड सांगत होता, तो खुश होता आजुबाजुला एवढ्या सुंदर मुली,

नाश्ता झाला, मुली फिरायला निघाल्या, फ्लॉवर गार्डनला पहिली भेट दिली, खूप सुंदर गार्डन होत, मस्त फोटो येत होते, आरती प्रियाने खूप फोटो काढले, दुपारी जेवण झालं, लोकल पदार्थ खूप छान होते, तिथून ते वॉटर फॉलला गेले, मागे बॅक वॉटर होत, तिथे खूप खेळले, खूप मजा येत होती,

संध्याकाळी सगळ्या हॉटेल वर आल्या, आरतीने घरी फोन केला, सरला ताईं सोबत मीनल प्रिया राही बोलत होत्या नंतर फोन आरतीने घेतला, ती सगळं सांगत होती, "आई राहुल दादा आहे का?"

हो.

"दादा इकडे ट्रेन मधे वीर होता,"

"काय, तो कसा काय तिकडे आला? "राहुल.

माहिती नाही, तिने राहुलला सगळं सांगितल, "दादा मला भीती वाटते आहे, वीरने ते फोटो शेअर केले तर? मी मिलिंदला सांगते आहे सगळं,"

"ठीक आहे सांगून दे. आता जे होईल ते बघून घेवू आपण, काळजी घे, एन्जॉय कर, " राहुल.

हो दादा.

तिने नंतर मिलिंदला फोन केला,

" बोला मॅडम काय सुरू आहे, माझी आठवण येते की नाही?"

"मिलिंद मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे," आरतीने हिम्मत केली,

"काय झालं?"

"आहे तस महत्वाच,"

" टेंशन घेवु नकोस, तू ट्रीप एन्जॉय कर, घरी आली की बोलू, तिकडे काय काय बघितल, हेच बोलायच आहे ना? " मिलिंद.

"नाही, महत्वाच आहे, पाच मिनिट लागतील, "आरती.

" इथे मीटिंग सुरू आहे मी करतो तुला फोन," मिलिंद विचार करत होता, नाहीतरी काय असेल हिच्या आयुष्यात एवढ, साधी मुलगी आहे, उगीच टेंशन घेते ही आरती,

प्रॉमीस..

" हो प्रॉमीस, "

बोलण झाल असत तर बर झाल असत, मिलिंद बिझी असतात, ऐकुन घेत नाहीत. आरती काळजीत होती.

रात्री फायर कॅम्प होत, जेवण करून सगळ्या झोपल्या.
......

वीर आणि फ्रेंड्स कॅम्प साठी गेले होते, रात्री आराम करून सकाळी त्यांनी ट्रेकिंग सुरू केल, दुपार पर्यंत वरती चढून गेले, नंतर दोन तासाने ते खाली उतरणार होते, आज खर तर ते दुसर्‍या ठिकाणी जाणार होते पण तिकडे दरड कोसळली म्हणून तिकडे कॅन्सल झाल होत जाण, हे जवळच ठिकाण त्यांनी घेतल होत,

मनीषा चौकशी करत होती ट्रेन मधे कोणी कोणी घेतले वीर आरतीचे फोटो मला द्या, दोन तीन मुलीं कडे मिळाले फोटो, छान काम झाल हे, वीर तुला फक्त आरती आवडते ना, आता बघ मी काय करते,

दुसर्‍या दिवशी आरती आणि ग्रुप पॉईंट्स बघायला निघाल्या, खूप मजा येत होती, एक एक पॉईंट्स बघत होते, जंगल सफारी पण होती त्यात, विशेष प्राणी नव्हते, बर्ड सेंचुरी होती, जीप मधून फिरतांना खूप मजा आली, त्या रात्री तिकडे थांबणार होत्या, फायर कॅम्प होता, एक वेगळा अनुभव होता तो, सकाळी सूर्योदय बघून त्या वापस हॉटेल वर येणार होत्या,

एक पॉईंट बघून मुली वापस जात होत्या.

"वीर आरती बघ," साहिल खुणवत होता,

त्या मुली बस मध्ये बसत होत्या, आरती मैत्रिणीं सोबत खूप खुश होती, गप्पा मारत ती बस मधे बसली, वीर खुश होता तिला बघून. "जावू दे गेली ती,"

"काय झालं? आज जावून बोलायच नाही का तूला तिच्याशी? " साहील.

"नको जावू दे, "

" हार मानली का तू वीर? "साहिल.

" नाही, बस गेली, "वीर.

" चॅलेंज आहे भेटून दाखव तिला, "साहिल.

" त्यात काय भेटेल मी तिला, राहील ही तिच्या सोबत,माझ्या साठी काहीही अशक्य नाही, " वीर.

" लागली पैज,"साहिल.

" नको, चांगली आहे आरती , घाबरते, रडते उगीच करू दे एन्जॉय तिला, "वीर.

"तू कधी पासून तिचा एवढा विचार करतोस, सोडुन दिल वाटत वरुण आणि आरतीला, "साहिल.

"नाही, वरुणला सोडल नाही, "वीर.

" लागली पैज, "

" हो, भेटून दाखवतो तिला , "वीर.

" मानल तुला तू काहीही करू शकतो," साहिलला बर वाटल, वीर चांगल वागत होता ते त्याला आवडल नव्हत.

" ठीक आहे येतो मी, भेटू रात्री, "वीर निघत होता.

" प्रूफ काय, तू नुसत फिरून येशील, "साहिल.

" फोटो आणतो तिचा, नाहीतर तिला घेवून येतो, "वीर.

" येईल का ती? "साहिल.

" माझ्या समोर काही करू शकत नाही ती, मी म्हणेल तस होत, "वीर.

"साहिल तुला काही काम नाही का? कश्याला त्याला उकसवतो, वीर नको करू अस, विचार कर तिला त्रास होत असेल तुझ्या अश्या वागण्याचा, मुलींशी अस वागू नये, " अखिल.

" अखिल गप्प बस, वीर तू जा, तो काय करतो आहे आरतीला भेटायला जातो ना," साहिल.

" वीर नको करू अस, आरतीला त्रास नको देवू, "अखिल.

" चूप रे आरतीचा दिवाना, ते लोक वीरला त्रास देतात तेव्हा चालत का? "साहिल.

" काहीही करा, पण एवढ लक्ष्यात ठेवा आरती अतिशय साधी चांगली मुलगी आहे," अखिल.

"माहिती आहे आम्हाला, जा तू वीर. एन्जॉय," साहिल.

वीर निघाला.

🎭 Series Post

View all