ओढ तुझी लागली भाग 10

हे बघ आरती तू जरी मला नाही सांगितलं तरी माहिती आहे की काल विर तिकडे आला होता आणि त्याने धमकी दिली



ओढ तुझी लागली भाग 10

©️®️शिल्पा सुतार
.......

आरती घरात आली, प्रकाश हॉस्पिटल मध्ये वापस गेला, आई बाबा समोर बसले होते, ते खूप काळजीत होते, दवाखान्यात काय काय झालं ते आरती त्यांना सांगत होती, वीरने धमकी दिली ते नाही सांगितलं.

"नक्की ठीक आहे ना वरुण? काय अस करतात हे मूल समजत नाही, " सरला ताई.

"हो ठीक आहे तो, इंजेक्शन दिल झोपलेला आहे, डॉक्टर सकाळी सोडणार आहेत, आई काळजी करू नकोस, " आरती.

ठीक आहे.

"मला तर हे वरुणच वागण अजिबात पटत नाही, काय गरज आहे मारामारी करायची, मी उद्या बोलणार आहे त्याच्याशी, " सतीश राव.

" मी झोपते आता उद्या कॉलेज आहे, नाहीतर डोकं दुखेल परत, आई बाबा तुम्ही पण झोपा उगीच काळजी करत बसु नका, " ती आत निघून गेली,

आता तिला कसतरी होत होतं, उशीत तोंड खुपसून ती रडत होती, तिला एकदम धक्का बसला होता, वीर या पुढे मी तुझा कधीच विचार करणार नाही, वेगळाच निघाला हा गुंड एकदम, किती काहीही बोलतो, शिव्या देतो, वरुण दादाला मारायला बघतो, दादाला काही व्हायला नको, विचार करत ती झोपली,

सकाळी आजी वरुण बद्दल विचारत होती, खूप काळजी करत होती.

मीनल प्रिया राही आली, त्या कॉलेजला निघाल्या, आरती नाराज होती,

" काय झालं ग आरती?" मीनल.

"काही नाही," आरती.

"मूड का नाही तुझा आज? "

"काही नाही, "

"मिलिंद सोबत भांडली का?"

"नाही ते खूप चांगले आहेत बाकीच्या मुलांसारखे नाही,"

"अरे वाह चांगल वाटल ऐकुन, कस काय हा बदल झाला तुझ्यात? " मीनल.

" मीनल नको ना बोलू इतक, स्कूटर चालव, " आरती.

लेक्चर झाले लंच ब्रेक मध्ये तिने राहुलला फोन केला, वरुणला घरी सोडल होत, नक्की बाबा चिडले असतिल, खूप बोलले असतिल त्याला, त्या मुली कॅन्टीन मधे गेल्या होत्या, येतांना वीर आणि त्याचा ग्रुप दिसला, तिने त्याच्या कडे बघितल नाही, मीनल तिला इशारा करत होती, बाकीच्या मुली हसत होत्या, आरती फोन वर बोलतांना थोडी मागे राहिली. राहुल तिला सांगत होता वरुणच आणि बाबांच परत भांडण झाल, ती काळजीत होती. तिने फोन ठेवला.

" वीर समोर बघ वरुणची बहीण आरती." साहिल.

"ओह येस त्या मुली हसत आहेत का आपल्याला?" वीर.

हो,

"कोण आहेत ह्या? किती बोर आहेत," त्यांच्या सोबतच्या मुली नाक मुरडत होत्या,

"आलोच मी," वीर.

"हाय आरती," ती दचकली, तिने उत्तर दिल नाही,

"तु मला हसली का आता?" वीर.

" नाही वीर, मला जावु दे," आरती.

"थांब आरती, अस कोणा कडे बघुन हसू नये, हे माहिती नाही का? तुला आणि तुझ्या भावाला काही मॅनर्स आहेत की नाही," तो आरती कडे बघत होता, तिने दुसरीकडे बघितल, मला माहिती आहे हा वरुणचा राग माझ्या वर काढतो, याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही,

"अस बोलाल तर राग आला का?" वीर.

"तू जा ना वीर, लीव मी अलोन, " ती बघत होती, आता वीरच्या डोक्यावर पट्टी नव्हती, कपाळ थोड लाल होत.

" तू हसली का मला ते सांग? "वीर,

" वीर मी नाही हसली,"आरती.

" तुझ्या मैत्रीणी काय म्हणत होत्या माझ्या कडे बघून,"

"मला नाही माहिती, मी फोन वर बोलत होते, "

" कोणाचा फोन होता? "

" तुला काय करायच,"

"ओह मिलिंद पगार मालदार पार्टी निवडलीस, प्रेम आहे का तुझ त्याच्यावर? की त्याचा पैसा हवा ? " वीर.

" शट अप.. मी माझ्या भावाशी बोलत होती, मला माहिती आहे वरुण दादा इथे नाही तर तू त्याच्या ऐवजी माझ्याशी भांडतो आहेस, पण वीर एक सांगते या पुढे माझ्याशी बोलू नकोस, "आरती.

" मी काहीही करेन, तू मला नको सांगू , सोडल का त्याला घरी, आता एक हात मोडला अजून शहाणपणा केला तर दुसरा ही जाईल, " वीर.

आरती रागाने पुढे निघून आली,

" आरती एक मिनिट, आज तू खूप छान दिसते आहेस, " वीर.

तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता, वीर म्हणाला हे खर आहे का? नाही तो मुद्दाम मला त्रास देतो, खर नाही हे.

वीर वापस जागेवर येवून बसला, हसत होता तो, मला त्रास देतात का, मी सोडणार नाही या भाऊ बहिणीला, या सगळ्यांना त्रास देईल मी, एक एक आयडिया वापरेल.

" काय म्हणतो तो वीर तुला?" मीनल आरतीला विचारत होती

" काही नाही चल मीनल, काही काही लोक त्रास दायक असतात, कश्याला बोलतात काय माहिती, "आरती.

" काय झालं आरती वीर स्वतःहून तुझ्याशी बोलत होता," मीनल.

" बोलू दे मला इंट्रेस्ट नाही, तो काल वरुण दादा सोबत भांडला, खूप खराब मुलगा आहे तो, मला मुद्दामून त्रास देतो तो," आरती.

"वरुण ही किती मारामारी करतो, तो चांगला आहे का? "मीनल.

" मला माहिती नाही,"

" तुझ छान आहे आरती तुझा भाऊ बरोबर,बाकीचे चुकीचे,"

" अस नाही मीनल, तुला काही माहिती नाही यातल, उगीच बोलू नकोस, मला बोलायच नाही वीरशी मला मिलिंद सोबत रहायच आहे, "

" अस दोन दिवसात प्रेम बदलत का?काल पर्यंत वीर तुला आवडत होता, आता अचानक मिलिंद आवडतो का? "

त्या दोघी बोलत होत्या दोन मुलीनी ऐकल, एकीने दुसरीला सांगितल अस करता करता बरच पसरल.

कॉलेज संपलं वीर आणि ग्रुप कॅन्टीन मध्ये बसलेला होता सोनिया त्याच्यासोबत होती, ते दोघे हळूहळू बोलत होते, " आज येणार ना मग वीर डिनरला तुला नेहमी इलेक्शनचे काम असतात ते मला अजिबात आवडत नाही, आज आपण डिनर साठी जायच याबाबतीत कुठलच कॉम्प्रमाईज होणार नाही."

" सोनिया आज लवकर घरी जाव लागेल आई वाट बघते, आपण संध्याकाळी कॉफीला जावू," वीर.

चालेल.. सोनिया खुश होती, "वीर मला वेळ देत नाही, कॉफी तर कॉफी मी खूप नीट वागेल त्याच्याशी, "

तीन-चार मुल आले, सोनियाला बघून गप्प बसले,

" काय झाला आहे सांगा? " वीर.

" एक महत्त्वाची बातमी होती,"

"सोनिया समोर सांगायला काय अडचण आहे?" वीर.

तस नाही पण...

"पण नाही पटकन बोला," वीर.

"ती वरूणची बहिण आहे ना ती तुला लाईक करते विर,"

" कोणी सांगितलं?" वीर शॉक मधे होता. ती आरती ना?

" हो तीच, आता तिच्या मैत्रिणी बोलत होत्या, आपल्या ग्रुप मधल्या दोघींनी ऐकलं, "

"कोणी? बोलाव त्यांना,"

त्या मुली वीरला काय ऐकल ते सांगत होत्या,

" ठीक आहे जा तुम्ही लक्ष द्या आरती कडे, "वीर खुश होता.

" हे फार भारी काम झालं आता बघ मी काय करतो," वीर.

"वीर तुला समजत आहे का तू काय बोलतो ते? " सोनिया चिडली होती.

"रिलॅक्स सोनिया मला काय तिच्याबरोबर खरोखर प्रेम करून लग्न करायचं नाही, ती वरूणची बहिण आहे, तिला मी माझ्या प्रेमात पाडणार," वीर.

"ते शक्य नाही तिचं लग्न जमलं आहे, " एकाने माहिती दिली.

" माहिती आहे, तो मिलिंद तिचा होणारा नवरा आहे, आता बघ त्या आरतीच लग्न मी कस मोडतो, मला मारतो का तो वरुण, माझ्या ग्रुपला पोलीस स्टेशनमध्ये देतो का, आता मी बदला घेईल, किती नाही म्हणेल ती मला, तिला मी आवडतो, मजबूर करून टाकेल तिला, फसेल ती माझ्या जाळ्यात," वीर.

" नाही वीर तू असं काही करणार नाही, तू वरुणशी भांड त्याच्या बहिणीला नको मधे घेवू, साधी आहे ती, "अखिल.

" चूप रे तू तिचा आशीक आहेस , मला माहिती तुला ती आवडते, "वीर.

" अखिल बरोबर बोलतो आहे वीर, नको ना आरती मधे, " सोनिया.

" तू एवढी का घाबरते सोनिया? मी माझ स्टेटस स्टँडर्ड विसरणार नाही, टाइम पास आहे हा, एकदम बोर चुडीदार घालणारी मुलगी आहे ती, तुला माहिती आहे मला कशा मुली आवडतात, आपल्याला जरा सुद्धा सूट होत नाही ती, साधी आहे, "वीर.

तरीसुद्धा सोनीयाला ही आयडिया आवडली नव्हती, "एवढी जर साधी आहे तर जावू दे ना तिला, कशाला नाव घेतो तिचं, "

" तिचा एकच दोष आहे कि ती वरूणची बहीण आहे, बाकी मला काही घेण नाही, "वीर.

वीर उठून त्याच्या मित्रांजवळ गेला, मला वरूण आणि त्याच्या घरच्यांची सगळ्यांची माहिती हवी, स्पेशली आरतीची, तीच लग्न कधी आहे? ती केव्हा कुठे जाते,

" कशाला सांगितलं तू याला आरती बद्दल, ती साधी मुलगी आहे आणि तिचं लग्न जमलं आहे, " अखिल त्या मुलांना रागवत होता.

" हो ना आता मला तेच वाटत आहे काय करायचं? आपण आरतीला सांगायचं का?"

" नको आपण तिकडे बोलायला गेलं तर वीरला राग येईल, करू काही तरी, बघु आधी वीरचा काय प्लॅन आहे ते, " अखिल.
.......

आरती क्लास मधे बसलेली होती, राही प्रिया मीनल बाजूला होत्या, ती मीनल बद्दल प्रियाला सांगत होती, "तू हिला काहीतरी सांग, नुसत आपल वीर बघ बोल त्याच्याशी अस करत असते ही, मला वैताग आला आहे मीनलचा, हिला काही समजत नाही, "

" मीनल समजत नाही का कस वागता ते? त्या वीरचा आरतीशी काय संबध, तिला नाही बोलायच त्याच्याशी, तीच लग्न जमल आहे, समजून घे, " प्रिया.

"अग तो वीर आज स्वतःहून बोलत होता आरती सोबत, " मीनल.

" मग काय झाल तिला नाही ना बोलायच, "प्रिया.

" का अस? आधी आवडत होता ना तो? " मीनल.

" हे अस आहे हीच, काहीही बोलते ही, चूप बस मीनल, " आरती आधीच चिडली होतो त्यात तो वीर काहीही बोलतो. काय अस, मिलिंदला समजल तर काही खरं नाही. काय होणार आहे माझ्या आयुष्यात पुढे काय माहिती?

" मीनल तुला एक गोष्ट समजते का, आरतीला ठरवू दे तिला काय करायच ते, तू शांत रहा, तीच लग्न जमल आहे, गोंधळ नको, या पुढे तू काही बोलू नको तिला, समजल का मीनल, " प्रिया समजावत होती.

"हो ठीक आहे, आरती सॉरी मी आता अस करणार नाही," तिने आरतीला मिठी मारली,

संध्याकाळी आरती घरी आली ती वरूणच्या रूममध्ये गेली, तो लोळून टीव्ही बघत होता आजी त्याच्या जवळ बसलेली होती, आरतीने त्याच्या कपाळाला हात लावून बघितलं," ताप नाही ना वरूण दादा?"

" नाही आता बरं वाटतं आहे, "

" आई बाबा ओरडले का? "

" हो खूप ओरडले बाबा, आई काळजीत होती,"

"हात दुखतो आहे का?"

" हो खूप, "

"औषध घेतले का आज?"

हो

" चहा घेणार का मी करते छान चहा,"

हो

आरती चहा बिस्किट घेऊन आली, ती त्याला बिस्कीट खाऊ घालत होती, आजी प्रेमाने बघत होत्या, जरा वेळाने आरती तिच्या रूममध्ये गेली, कपडे बदलून अभ्यासाच साहित्य घेऊन परत वरूणच्या रूम मध्ये येऊन बसली. "दादा तुला काही हवं असलं तर मला सांग मी आहे इथे, "

जरा वेळाने आजी खाली गेली.

"आरती काल रात्री काही झालं? तू माझ्याजवळ होती तेव्हा वीर आला होता का?" वरुण.

आरती काही म्हटली नाही, याला राहुल दादाने काही सांगितलं की नाही माहिती नाही, परत मी काही सांगितलं तर मारामाऱ्या होतील, किती डेंजर आहे तो वीर आणि त्याचे मित्र, आजही माझी वाट अडवून काहीही बोलत होता तो, माझ्याकडे वेगळाच बघतो का? मला छान दिसते बोलत होता, नक्की काय सुरू आहे? बदला घेत असेल तो,

आधी त्यांने असं बघितलं असतं तर मला किती आनंद झाला असता, आता माहिती आहे तो चांगला मुलगा नाही, काय करू सांगू का हे वरुणला, नको किती लागल आहे वरुण दादाला, वीर बोलला तो दादाचा दुसरा हात ही मोडणार आहे, नको थोड सहन करू आपण, वीर बद्दल कोणाला काही बोलायच नाही.

"हे बघ आरती तू जरी मला नाही सांगितलं तरी माहिती आहे की काल विर तिकडे आला होता आणि त्याने धमकी दिली की त्याच्या मुलांना जर पोलीस स्टेशन मधनं बाहेर काढलं नाही तर तो मला काहीतरी करेल," वरुण.

"तुम्ही मुलं कशाला भांडतात? काल एवढं काय झालं होतं दादा?" आरती.

" काही नाही ग जुनीच काहीतरी गोष्ट तो वीर उकरून काढतो आणि त्याने आमच्यातल्या एक दोन मुलांना ही मारलं, मग आम्हाला समजलं की तो एका हॉटेलवर जेवायला आलेला आहे, आम्ही त्याला रस्त्यातच अडवल आणि धुतलं, त्याच्या काही लोकांना छान पोलिसात दिलं होतं, तो मला शोधत हॉस्पिटलमध्ये आला, राहुल दादा पण नुसता घाबरून जातो, काही केलं नसतं त्याने मला, सोडायला नव्हत पाहिजे त्याच्या मुलांना, " वरुण जोरजोरात बोलत होता.

" कशाला काही केलं नसतं? तुला माहिती आहे का किती डेंजर ओरडत होता तो, बरोबर केलं राहुल दादाने भांडायलाच नाही पाहिजे, आता हे इलेक्शन झाल्यानंतर याच्या नादी लागू नको तू दादा, मी आधी सांगते आहे तुला जर काही कमी जास्त लागलं असतं तर आम्ही काय केलं असतं," आरती रागवत होती.

"काही झालं नाही मला, घाबरू नका एवढ, हात फ्रॅक्चर आहे, "वरुण.

"बरोबर आहे काही झालं नाही त्याला, जातो का आता परत मारामाऱ्या करायला," राहुल आत मध्ये येत बोलला, तो खूपच चिडला होता, "तुला स्वतःची काळजी आहे की नाही? मला यापुढे असं मारामाऱ्या झालेल्या ऐकायला नाही यायला पाहिजे,"

" आरती मिलिंद साहेब आले का? "वरुण.

" उद्या येतील ते, "आरती.

" ठीक आहे, "

रात्री मिलिंदचा फोन आला, आरती त्याला हॉस्पिटल मध्ये काय झालं ते सांगत होती, आज कॉलेज मधे काय झालं वीर मूर्खासारखा बोलत होता ते सांगितल नाही, काय कराव ते समजल नाही तिला,

" मी उद्या आलो की येतो तिकडे काळजी घे, "मिलिंद.

" तुम्ही वरुण दादाला सांगा काही," आरती.

हो.


🎭 Series Post

View all