ओढ तुझी लागली भाग 8

ज्याच्यावर प्रेम असत तो मिळतोच



ओढ तुझी लागली भाग 8

©️®️शिल्पा सुतार
.......

तो दिवस असाच गेला, वरूण बाहेर गेलेला होता, मिलिंदचा रात्री फोन आला, आरतीला समजत नव्हतं काय करू? तिने फोन उचलला नाही बाजूला ठेवला, काय करू मला बोलावस वाटत नाही मिलिंदशी.

मिलिंदने बाबांना फोन केला.

"आरती तुझा फोन कुठे आहे? मिलिंद राव फोन करत आहेत," त्यांनी खालून आवाज दिला.

"हो बाबा उचलते," काही करू शकत नाही मी, यांच्याकडे खूप आयडिया आहेत माझ्याशी बोलायच्या.

"हॅलो मिलिंद,"

"बोलायच नाही का आमच्याशी?" मिलिंद.

"तस नाही,"

"मग ऑनलाईन होतीस तरी फोन उचलला नाही, "

" नाही मी आता फोन बाजूला ठेवला, तेवढ्यात आला असेल तुमचा फोन," तिने डोक्याला हात लावून घेतला, या मुला समोर माझ काही चालत नाही,

ते खूप बोलत होते, आरतीला प्रश्न विचारत होते तिला काही सुचत नव्हत,

"उद्या भेटणार का?"

" नाही माझ कॉलेज आहे,"

" कॉलेज नंतर, उद्या सोमवार आहे ना, म्हणजे तुझ लेक्चर पावणे तीन पर्यंत असत, " मिलिंद सहज म्हणाले.

आरती आश्चर्य चकित झाली, बरीच माहिती काढली यांनी माझी, खरच प्रेम आहे की काय माझ्यावर, तिला काय बोलाव ते समजत नव्हत, "हो भेटू उद्या,"

" आरती मोकळी बोलत जा माझ्याशी, तुला माहिती आज मी खूप खुश आहे, तू सकाळी साडीत खूप सुंदर दिसत होतीस, टिकली छान दिसते तुला, तू रोज कॉलेजला जातांना लावत नाही ना टिकली, माझ गिफ्ट आवडल का? बांगड्या मी पसंत केल्या आहेत त्या तुझ्या साठी, घालून बघितल्या का? " मिलिंद.

" नाही अजून,"

"आज तू तुझे फोटो घेतले असतील तर पाठव ना,"

" हो पाठवते, " आरतीने फोटो पाठवले.

"हे काय सगळे ग्रुप सोबत फोटो? तुझा एकटीचा नाही का? या बाकीच्या मुलींशी मला काय घेण आहे, तुझा एकटीचा फोटो दे, " मिलिंद.

" एकटीचा फोटो नाही घेतला ,"

"ठीक आहे आपण प्रि वेंडींग शुट करून घेवू तुझे छान छान फोटो काढू, आरती ऐकते ना." मिलिंद खुश होता.

हो, अर्धा तास ते बोलत होते, आरती अंदाज लावत होती नक्की कसे आहेत मिलिंद? खूप चांगले आहेत, ती पण थोडी खुश होती,

आज "लक्षवेधी लेखणी" ग्रुप वर सगळे जमले होते, आरती नव्हती ऑनलाईन, तिला काही करावस वाटत नव्हत, सागर ऑनलाईन होता, तो बघत होता अनु केव्हा येते, कालही तिने मला रिप्लाय दिला नाही,

कुठे आहे ही? आज अनु ऑनलाईन आली तर मी चिडणार आहे तिच्यावर, अस मला न सांगता गायब होते, इथे माझ काय होतय मला माहिती. पण मला काय फरक पडतो एवढा, तिच्याशी ओळख ही नाही एवढी, कोण आहे ही, फक्त अनु नाव हा फोन नंबर या व्यतिरिक्त काही माहिती नाही आपल्याला तिच्या बद्दल, काहीही करे ना ती, तरी तो बघत होता अनु आली का.

एक एक पोस्ट येत होत्या, बरेच लेखक अनुश्रीची वाट बघत होते,

"अनुश्री मॅडम नाही का आज? "

"काय झाल कुठे गेल्या अनु मॅडम?

अनु.... अनु

" कोणी तरी पर्सनल मेसेज करा, "

" ऑनलाईन नाही ती, "

सागरचा पारा चढला होता, त्याने पर्सनल वर मेसेज केला, "काय प्रॉब्लेम आहे अनु? कुठे आहेस तू? उत्तर दे," सागर खूप चिडला होता, त्याने त्याची कविता पण अपलोड केली नाही, तस मोबाईल बंद करून टाकला.

प्रोग्राम संपला, अनुश्री जॉईन झाली नाही, तिला लक्ष्यात होत, पण काही लिहिल नव्हत तिने, दुसर्यांना चांगल्या गोष्टी सांगत होती ती, पण स्वतः साठी काही करू शकत नव्हती, आज मूड नव्हता काही लिहायचा, तिला तीच काय कराव अस झाल होत, त्यात मिलिंद सोबत बराच वेळ ती बोलत होती. चांगला वाटत होता मिलिंद तरी मन तयार होत नव्हत.

मिलिंद आणि वीरची ती कंपॅरीजन करत होती, जावू दे वीरशी ओळख नाही, मिलिंद चांगले आहेत, आई बाबा म्हणतील ते करू.

अखिल साहिल सोनिया तो बाकीचे मित्र सगळे काम करत होते, त्याच मन लागत नव्हत, खूप चिडला होता तो सगळ्यांवर,

"काय झाल वीर तू सारख मोबाईल मधे काय करतोस? चिडतो काय इतका उगीच, कोणाचा कॉल येणार आहे का?" सोनिया.

" काही नाही, "

" चला डिनर साठी जावु," साहिल.

" नको मी घरी जातो," वीर उठून घरी निघून गेला.

" काय झाल याला?" साहिल.

"काय माहिती सारख फोन मध्ये बघतो चीड चीड करतो आहे, " सोनिया.

ही अनु ऑनलाईन का येत नाही? कोण आहे ती ते ही माहिती नाही मला, काय झालं असेल पण? कुठे शोधू तिला, तो घरी आला,

वॉचमन नेहमी प्रमाणे जेवत होता, वीर काही म्हंटला नाही, स्वतःच्या हाताने गेट उघडून आत आला, वॉचमन घाबरला होता, एकदम पळत आला, "सॉरी साहेब,"

शनाया दिसली नाही, बहुतेक ती रूम मधे असेल , राहुल सर नंदिनी मॅडम बाहेर गेलेले होते, त्याने त्याच त्याच जेवून घेतल, रूम मध्ये आला,

"दादा तू घरी आला का?" शनायाचा मेसेज होता.

हो.

"मग माझ्याशी बोलायला का नाही आला," शनाया.

"डोक दुखत आहे, मी झोपतो," वीर.

"ठीक आहे," तिने नंदिनी मॅडमला मेसेज केला, वीर दादा घरी आला, जेवला तो,

ओके.
.......

आरती मीनल राही प्रिया दुसर्‍या दिवशी कॉलेज मध्ये गेल्या , वीरची बाइक उभी होती, जावू दे काय करणार आता, ती कॉलेज मध्ये आली, त्याच्या ग्रुप बसलेला होता, तिने तिकडे बघून न बघितल्या सारख केल, मीनल तिच्या कडे बघत होती.. काय ग?

"तुझा हीरो," ती वीर कडे बघत होती,

"आता काय उपयोग आहे, तुला माहिती होत?" आरती.

" हो मग तू ज्या पद्धतीने त्याच्या कडे डोळे फाडून बघत होती त्या वरुन समजत होत मला," मीनल हसत होती.

"डोळे फाडून म्हणजे काय? खरच का? त्याला ही समजल असेल का?" आरती थोडी घाबरली होती.

" माहिती नाही, "

आता तिला टेंशन आला.

"नाही त्याला कशाला समजेल, त्याच्या मागे अश्या खूप मुली असतिल, बर्‍या पैकी हॅन्डसम आहे तो," मीनल.

आता आरतीला खूप राग आला होता, नंतर तिच्या लक्ष्यात आल माझा राग यायचा काहीही संबंध नाही, त्या वीरच्या मागे कोणी का फिरेना मला काय,

त्या क्लास मध्ये आल्या, लेक्चर सुरू झाल, ती तिचा अभ्यास करत होती. "आज आपण शॉपिंग साठी जायच का गर्ल्स? "

" तुम्ही जा, आज मिलिंद येणार आहे भेटायला,"

" बर झाल आज बघु त्यांच्याकडे," मीनल.

"नको मीनल घरचे ओरडतील," आरती.

" गप ग,"

"प्रिया काही सांग हिला," आरती.

" मीनल नको त्रास देवू आरतीला," प्रिया.

"ज्यांनी ट्रीपचे पैसे आणले असतिल त्यांनी भरा," सीमा.

" उद्या आणतो. "

कॉलेज संपल, मीनलला वरुण दादाच काम होत, ती खूप छान प्रचार करत होती, जरा वेळ आरती पण त्यांना मदत करत होती, वीर दोन तीनदा दिसला, तिने त्याच्या कडे बघितल नाही,

काम झाल चला जावू घरी, त्या बाहेर येत होत्या, मिलिंद झाडा खाली कार घेवून उभे होते,

" आरती तुझा नवरा," मीनल.

"मीनल काही बोलू नको त्यांना, प्रिया तू सांग," आरती.

"मीनल... तरी ती पुढे गेली,"

"हॅलो गर्ल्स," मिलिंद बोलले,

हॅलो.

"तुम्ही काय करता आहात इकडे? " मीनल.

"ते मी तुम्हाला भेटायला आलो, आरती आणि माझ्या साल्यांना." मिलिंद.

हो का.

तो आरती कडे बघत होता, "चल आरती,"

"आम्ही पण येवू, तुम्ही आमच्या साठी पण आले ना," मीनल.

" हो चला."

मीनल कार मधे बसत होती, प्रिया तिला अडवत होती, "मीनल नको, चल इथून, जावू दे आरतीला,"

" आपल काय ठरलं होत, आरतीला नाही करायच लग्न याच्याशी, मला बोलू दे,"मीनल हळूच बोलली.

" तीला कराव लागेल," प्रिया.

नाही.

मिलिंद त्यांच्या कडे बघत होता, "काही प्रॉब्लेम आहे का मीनल? "

" हो ते आरतीला हे लग्न करायच नाही, तिला वेळ हवा आहे, तेव्हा तुम्ही इथून निघायच, तिला त्रास द्यायचा नाही," मीनल.

आरती घाबरलो ती पटकन पुढे आली , "मीनल चूप, जा इथून, सॉरी मिलिंद मी अस काही नाही म्हटली, प्रिया हिला ने ना,"

"चल मीनल," त्या मैत्रिणी तिला ओढून नेत होत्या.

" आरती बोल सरळ तुझ्या मनात आहे ते, घाबरू नको, " मीनल तिकडून ओरडली,

आता कार समोर मिलिंद आरती होते, मिलिंदच्या चेहर्‍यावर प्रश्न चिन्ह होत, आरती घाबरली होती, ते या बाजूने चालत आले, काही न बोलता त्यांनी कारचा दरवाजा उघडला आणि आरती कडे बघितल, ती कार मधे बसली, तिचे हात थरथरत होते, काय करू? मूर्ख मीनल, हे घरी सांगतील का? काही बोलतील का? बापरे,

मिलिंद आत येवून बसला, तो समोर बघत होता, ती गप्प होती, त्याने कार सुरू केली, कुठे जातो आहोत काय माहिती? हे बोलत नाही का माझ्याशी? नक्की राग आला असेल? काय करू मी बोलू का? मीनलला गम्मत समजत नाही, अजिबात ऐकत नाही ती कोणाच, काय होईल, मला ठीक कराव लागेल हे.

"सॉरी मिलिंद,"

तो काही म्हटला नाही.

ती दोन मिनिट गप्प बसली, "सॉरी माझ्या मनात अस काही नाही, मीनलला समजत नाही कुठे काय बोलाव."

तरी तो गप्प,

मी मीनलशी बोलणार नाही, मूर्ख नुसती, काहीही बोलते, काय करू आता, हे बोलत नाही, घरी समजल तर काय होईल.

" मिलिंद सॉरी ना, आपण अनोळखी आहोत म्हणून मी काल म्हटली होती मीनलला, सगळ्या मैत्रिणींना की मला लग्न करायच नाही अस, पण ते सहज, आता काही नाही तस, तुम्ही घरी सांगू नका, वरूण दादाला काही बोलू नका, प्लीज मी रिक्वेस्ट करते, ते लोक मला घरा बाहेर काढतील,"

आता ती पण गप्प बसली, नक्की राग आला आहे यांना काही खरं नाही. जावू दे आता जे होईल ते, घरचे ओरडतील, घरा बाहेर जायला सांगितल तर कुठे राहू मी, मीनल कडे, तिच्या मुळे झाल हे, पण तिकडे जागा आहे,

दोघ एका शेतात आले, गेट मधून गाडी आत आली, सिक्युरिटी बरीच होती, आत बंगला होता, तो उतरला, ती आजुबाजूला बघत होती, ती खाली उतरली, एक दोन पहिलवान टाइप मुल होते ते हसले तिच्याशी,

चल... तो म्हटला,

काय करू मला नाही जायच, आत कोणी आहे की नाही इथे, बापरे,

दोघ आत आले, तो सोफ्यावर बसला, ती उभी होती घर बघत होती,

बस.. "काका पाणी द्या,"

एक काका पाणी घेवून आले, तिने उठून त्यांच्या कडून पाणी घेतल, मिलिंदला दिल, तिने पिल.

ते काका बघत होते, "आरती मॅडम का?"

तिने हो म्हटलं, ते आत निघून गेले,

मिलिंद उठून तिच्या जवळ येवून बसले, तिला पक्क माहिती होत ओरडतील, ती खाली बघत होती, त्याने तिचा हात हातात घेतला, "मला माहीत आहे तुझी माझी ओळख नाही, अश्या वेळी हे लग्न करू नये, का मागणी घालतो मिलिंद अस वाटणारच, काही हरकत नाही, मला राग नाही आला, तू प्रामाणिक पणे सांगितल ते ठीक आहे, आता काय ठरलं मग?"

"लग्न करायच आहे," आरती.

"घाबरू नको, बळजबरी नाही, तुला काही विचारायच असेल तर विचार, मी बरेच दिवस झाले वरूणला तुझ्या साठी विचारल होत, मला वाटत त्याने सांगितल असेल तुला, "मिलिंद.

" नाही... घरी काही बोलण झाल नाही," आरती.

" फक्त एवढेच सांगतो माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे, आपण सुखात राहू, बाकी काळजी करू नकोस,"

वीर... तिच्या मनात एकदम चलबिचल झाली, अजूनही माझ मन तयार होत नाही, जावू दे तो एक स्वप्न होत, भविष्य मिलिंद आहे,

" मिलिंद मला रहायच आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही माझ्या मैत्रिणीं कडे लक्ष देवू नका त्या उगीच त्रास देतात, उगीच गैरसमज नको,"

" ठीक आहे तू पण काळजी करू नकोस, आरती तुला एक विचारू का? " मिलिंद.

हो,

"तुला कोणी आवडत का कॉलेज मध्ये?"

आरतीच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला, काय सांगू, काय करू, मी कधीच त्या वीर शी बोलली नाही, त्याला आवडेल का मी, तो नाही म्हणेल मला, उगीच स्वप्न बघण्यात काही अर्थ नाही, मिलिंद चांगले आहेत, " नाही अस काही नाही,"

" घाबरली का? मी पण तुझ्या फ्रेंड्स सारखा आहे, सहज विचारतो मी, मोकळ बोलत जा माझ्याशी," मिलिंद.

चल मी तुला फार्म हाऊस दाखवतो, ते दोघ फिरून आले, आरती थोड मोकळ बोलत होती, दोघ घरी यायला निघाले, घर आल,

" हे घे तुला," त्यांनी गिफ्ट दिल, तिने ते पर्स मधे ठेवल, " मिलिंद तुम्ही चांगले आहात, "

" काय झालं गिफ्ट दिल म्हणून का? " मिलिंद हसत होता.

"नाही मला समजून घेता म्हणून," आरतीने अस बोलल्याने मिलिंद खुश होता.

ती घरी आली, आई आजी तिच्या आजुबाजुला होत्या, "काय म्हटले जावई,"

"काही नाही, असच बोलत होते गिफ्ट दिल, "

" काय? "

"मी पण बघितल नाही ती रूम मध्ये आली आत ज्वेलरी बॉक्स होता, त्यात गोल्ड चैन मॅचिंग पेंडंट इयर रिंग सेट होता, चॉकलेट होत, "

तिने ग्रुप वर मेसेज केला... हाय

"केव्हा आलीस आरती, कुठे गेली होतीस?" प्रिया.

" ती मूर्ख मीनल कुठे? " आरती चिडली होती.

"हो ना काय गोंधळ घातला तिने, " प्रिया.

"हाय आरती," मीनल.

" मीनल डोक आहे का ठिकाणावर? काहीही बोलायच का? तुला थोड तरी समजत का? "आरती.

" काय झाल? आपल तेच ठरलं होत ना? "मीनल.

" अग ती गम्मत होती बाई," आरती.

"तुम्ही कोणी मीनलला काही सांगत जावू नका, "प्रिया

" हो तिला अजिबात काही समजत नाही," राही.

" हो ती सिरियसली घेते ती, आज माझ लग्न मोडल असत," आरती.

" सगळे काय मला बोलता आहात, " मीनल.

" मग काय करणार समजत नाही का तुला कस वागायच ते, किती कसतरी वाटत होत मला मिलिंद समोर, " आरती.

" तू होकार दिला का आज परत?" मीनल.

"हो मग होकार दिला आणि माफी पण मागितली ती पण दोन तीन वेळा, " आरती.

का?

" ते सांगतील ना घरी, आई बाबा वरुण दादा घराबाहेर काढतील मला अस वागल तर, त्यांनी दादाला मदत केली नाही तर, आणि तसेही ते चांगले आहेत, " आरती.

"अरे वाह, मिलिंद की तो निकल पडी," प्रिया.

" पण तुला तो हीरो सारखा मुलगा आवडतो ना? " मीनल.

" मीनल गप्प बस, " आरती.

कोण?

कोण?

" अग तो वीर," मीनल.

" गप्प बस मीनल, अस काही नाही, गम्मत म्हणून आवडत होता, आता नाही, " आरती घाबरली.

" ठीक आहे ना, एवढ काय? तू अति करतेस आरती, लग्न जमल म्हणून कोणी आवडत असही म्हणणार नाही का आता तू? "मीनल,

आरतीला थरथर वाटत होती, "गर्ल्स कोणाला बोलू नका हे, मी गम्मत म्हणून बोलली होती एकदा मीनलला,"

" तू कुठे बोलली होतीस, मीच ओळखल होत तू त्याच्या कडे बघायची म्हणून," मीनल.

" मीनल गप्प बस ना जरा, मी जाते, जेवण बाकी आहे," आरती.

हि मीनल गडबड करेल अस वाटत, काय करू मी मिलिंद आज विचारत होते तुला कोणी आवडत का कॉलेज मधल? तेव्हा तर मी नाही म्हटलं. तिने सरला ताईंना मदत केली किचन मधे, जेवण झाल,

ती फोन बघत होती, सागरचा रोज मेसेज येत होता, अनुश्री कुठे आहेस?

जावू दे, काय सांगणार त्याला, एक तर पर्सनल बोलायच नाही, तिने आजही दुर्लक्ष केल.

मिलिंदचा मेसेज आला होता, "आवडल का गिफ्ट? "

" हो महाग आहे रियल डायमंड, "

" हो.. ज्वेलरी घालून फोटो पाठव, " मिलिंद.

" आता नाही उद्या,"

"नाही आता म्हणजे आता,"

"ठीक आहे पाठवते पण तुम्ही मला रोज एवढी ज्वेलरी का गिफ्ट देत आहात," आरती.

"कारण तू खूप प्रेशीयस आणि स्पेशल आहेस माझ्या साठी," मिलिंद.

तिने केस नीट बांधले, तयारी केली, ज्वेलरी घातली, ती राहुल दादाच्या रूम मधे आली, "दादा फोटो काढ ना माझा, "

"ओये होय कुठून आणली ज्वेलरी? " राहुल.

"मिलिंदने दिली, त्यांना फोटो हवा आहे," आरती.

राहुलने तिचे एक दोन फोटो काढले, "हे बघ,"

"छान आले आहेत, थॅक्यु दादा,"

"आरती तू खुश आहेस ना? " राहुल.

" हो दादा मी आता विचार करण बंद केल आहे, ते जग स्वप्नांच होत, सत्य स्विकारायला हव मला, मिलिंद चांगले आहेत,"

"इकडे ये खूप हुशार झाली माझी बहिण, मी खुश आहे तुझ्यासाठी,"

तिने मिलिंदला फोटो पाठवले,

"किती सुंदर दिसतेस तू आरती," त्यांनी फोन केला लगेच, बराच वेळ ते दोघ बोलत होते.

" मी चार पाच दिवस नाही आता, बाहेर जातो आहे ऑफिस कामा निमित्त, आपण भेटू रविवारी," मिलिंद.

"ठीक आहे."

" मला रोज फोन करायचा, काही हव असेल तर सांग काळजी घे,"

"हो. हॅपी जर्नी. "

" थॅक्यु आरती, लव यु. "

आता आरती गप्प बसली

"उत्तर दे आरती, "

आरती गप्प.

" आरती बोल ना काहीतरी,"

" मला अभ्यास आहे ठेवते फोन, "

" ठीक आहे," मिलिंद हसत होता.

कठिण आहे, मिलिंद समोर काही बोलता येत नाही मला, आरती अभ्यासाला लागली.

🎭 Series Post

View all