ओढ तुझी लागली भाग 6

ज्याच्यावर प्रेम असत तो मिळतोच


ओढ तुझी लागली भाग 6

©️®️शिल्पा सुतार
.......

आरती मीनल कॉलेज मधे आल्या. आज पासून मीनल वरुणच काम करणार होती, लंच ब्रेक नंतर त्या कॅन्टीन जवळ आल्या, आज दुपारनंतर लेक्चर नव्हते, वरुण मीनलला सांगत होता काय काय काम आहे, प्रिया, राही, आरती, बाजूला बसुन ऐकत होत्या, मिलिंद आला, येवून आरती जवळ बसला, खूप खुश होता तो, "अरे वाह आज मी लकी आहे , तू इथे भेटलीस, कशी आहेस आरती,?

"मी ठीक आहे," आरती गडबडली.

" खूप छान दिसते आहेस तू आज, तशी तू रोजच छान दिसते म्हणा, इथे काय करते आहेस, भावा साठी प्रचार का? "मिलिंद.

" हो मी वरुण दादाला मदत करायला आली आहे, "आरती हळूच बोलली.

" छान म्हणजे आता जिंकेल वरुण, " मिलिंद हसत म्हणाला.

का?

" तू आली ना मदतीला, लकी आहेस तू,"

आरतीने त्याच्या कडे बघितल.

" खर विश्वास ठेव, तू आहेच एवढी छान आरती, "

तिने खाली बघितल, तीला वाटत होत कुठे पळून जावू, सगळे ते दोघ बोलत होते तिकडे बघत होते,

" चहा घ्यायचा का? चल, "

" नको थोड काम आहे," आरती.

"काय काम? "

" अभ्यास, " काय बोलाव ते आरतीला समजत नव्हत, "मला घरी जायच आहे फ्रेंड्स बिझी आहेत, म्हणून थांबली इथे,"

"मी सोडून देवू का घरी, चल, " मिलिंद उठत म्हणाला.

"नको मला दादाला मदत करायची,"

"वरुण आरतीला काही काम आहे का?"

नाही.

" मी तिला घरी सोडून देतो, चल आरती, "

ती राही प्रिया कडे बघत होती,

" प्रिया राही इकडे या थोड काम आहे, " वरुणने त्यांना बोलवून घेतल.

आरतीचा नाईलाज झाला, ती आधी पासून काही बोलत नव्हती कोणाला, चूप चाप ती मिलिंद सोबत निघाली.

त्याने कारचा दरवाजा उघडला, आरती आत बसली, तो त्या बाजूने ड्रायवर सीट वर बसला, दे त्याने बॅग मागितली मागे ठेवली, आरतीला समजत नव्हत काय कराव, सीट बेल्ट, तिने सीट बेल्ट लावला,

ती मिलिंद कडे बघत होती, "तुमच काय काम होत दादा कडे?"

"काही नाही,"

"मग का आला होता कॉलेज मधे?" आरती.

"इलेक्शनच काम असत, आणी तु ही दिसते, म्हणून येतो मी रोज," तो बिनधास्त पणे बोलला.

आरती एकदम गडबडून गेली, ती गप्प बसली, नको बोलायला काही, ते कॅफे मध्ये आले, चल,

"नको मला घरी जायच,"

तो तिकडून उतरून आला, कारच दार उघडल, आरती उतरली, दोघ आत आले,

त्याने तिला बसायला खुर्ची ओढली, आरती बसली, तो तिच्या जवळ बसला," चहा की कॉफी?"

चहा,

"काही खाणार का?"

"नाही आता डबा खाल्ला,"

त्याने एक चहा एक कॉफी सांगितली.

"डबा कोण बनवत रोज?" मिलिंदने विचारल.

आई,

"तुला येत का स्वयंपाक,"

"हो थोडा," याला काय करायच आहे नुसत्या चौकश्या. आरतीला राग आला होता,

तो थोडासा हसला, "तू मोकळ का बोलत नाही?"

"नाही अस नाही, आपली ओळख नाही,"

" मी इंजिनिअर आहे, एमबीए केल आहे, माझा बिझनेस आहे, घरी आई, बाबा, मी, बहीण आहे, बहिणीच लग्न झाल आहे, आता माझा नंबर आहे, अजून काही प्रश्न असतिल तर विचार,"

आरतीला कसतरी वाटल, "नाही अस नाही,"

"तुझ्या बद्दल सांग आरती, "

काय?

"तुला काय आवडत? "

" गाणे ऐकायला आवडतात, ड्रॉइंग पेंटिंग आवडत,"

अजून?

"अजून काही नाही, "

"आरती वरुण बोलला का तुझ्याशी माझ्या बद्दल?"

"हो तुम्ही इलेक्शन साठी मदत करता आहात ते ना,"

नाही.

मग?

"आहे एक गोष्ट, "

काय?

" काही नाही, आज तुझे बाबा सांगतील तुला, ऐकायच त्यांच," मिलिंद.

आरती हो म्हटली.. काय म्हणताय हे काय माहिती, कधी जावू इथून अस झाल होत तिला,

चहा कॉफी पिऊन झाली," निघायच का? "

हो, घर आल, मी जाते

" हो उद्या भेटू,"

" उद्या सुट्टी आहे कॉलेजला,"

"ठीक आहे मी येतो मग उद्या घरी, " मिलिंद.

" कोणाच्या? "

"तुझ्या,"

हे असे का म्हणता आहेत, जावू दे आपल्याला काय, असेल वरुण दादा कडे काम,

ती घरात आली, उद्या सुट्टी आहे. चला बर आहे.

आवरून मस्त टीव्ही बघत होती. आज बाबा लवकर घरी आले होते, आई बाबा आजी काहीतरी बोलत होते,

" आरती बाबा बोलवता आहेत," खालून आई आवाज देत होती.

"आरती इकडे ये, तुझ्याशी थोड बोलायच आहे," बाबा.

"काय झालं बाबा?" तिला वाटल ते स्कूटर प्रकरण समजल का बाबांना? "बाबा मी नाही मीनल भांडते सगळ्यांशी, मी बोलली तिला काय फरक पडतो कुठे ही लाव स्कूटर, मी काही नाही केल, " ती पटापट बोलत होती.

" काय? कसली स्कूटर काय झाल? ते जावु दे, तुझ्या साठी एक आनंदाची बातमी आहे, तुला एक स्थळ सांगून आल आहे, ते लोक उद्या येत आहेत आपल्याकडे तुला बघायला," बाबा आनंदात होते.

" म्हणजे? "

" लग्नासाठी तुला पसंत केल त्या लोकांनी," बाबा.

" कोण आहेत ते बाबा? मला एवढ्यात लग्न करायचं नाही." आरती आई कडे बघत होती.

" वरूणला मदत करताय ते मिलिंद पगार, "

आरतीला जस काही ऐकु येतच नव्हतं काय म्हणताहेत बाबा, तरी आज ते अस म्हणत होते का उद्या येतो घरी, काय करू, मी नाही ऐकणार कोणाच, मी माझ्या स्वप्नाचा असा चुराडा होऊ देणार नाही, वीर... काय करू, मी अजून त्याच्याशी बोलली सुद्धा नाही, मला त्याच्यासोबत रहायचं आहे, लग्न आणि त्या मिलिंद सोबत मुळीच नाही.

" आरती काय म्हणतो आहे मी, " बाबा.

" बाबा मी आत्ताशी कॉलेज मधे आहे, मला अजून पुढे शिकायचं आहे, आता नको ना लग्न, आई तू सांग, आजी," आरती रडवेली झाली होती.

"बरोबर आहे तुझ वय, चांगले श्रीमंत लोक आहेत, आपल्या जातीतले आहेत, त्यात त्यांनी विचारल लग्नासाठी नाही म्हणता येणार नाही, मी चौकशी केली, पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे तरी चांगले आहेत ते लोक, विचार कर तुला त्या घरात कुठल्याही गोष्टीची अडकाठी होणार नाही, पुढे शिकायचं असेल तर शिकता येईल चांगली लोकं आहे, जवळ रहातात, तू खूप सुखी राहशील बेटा, " बाबा.

पण मला जे वाटतं त्याचं काय? मला नाही आवडत मिलिंद, मला विर हवा आहे, काय करू, कोणाशी बोलू, कशी काय चौकशी करू त्याची, घाई नाही होत आहे का.

" बाबा मला वेळ हवा आहे, "

" कशा साठी? "

" मी अजून दोन वर्ष लग्न करणार नाही, "

" आरती बेटा अस करता का? चांगल स्थळ आहे हे, म्हणून माझी पण इच्छा आहे आता हे लग्न व्हाव, माझ ऐकणार का एवढ, हे बघ आपल्या मुलीच चांगल व्हाव हे प्रत्येक आई वडलांना वाटत, भेटून बघ बोलून बघ, तुला नक्की आवडतील ते, आणि आपल्या कडे असे लग्न जमतात, जास्त विचार करू नकोस, " बाबा.

आरतीला रडू येत होत, ती सरला ताईंना मिठी मारून उभी होती,

" आरती माझ ऐकणार ना तू बेटा, बाबा बरोबर बोलता आहेत, चांगले आहेत लोक, आमच्या वर विश्वास ठेव, "

" आई तू पण? "

" ह्या आरतीला चांगल सांगून समजत नाही, देव देत कर्म नेत अस वागण आहे हीच, चुपचाप उद्या तयार व्हायच," आजी ओरडत होती.

"आजी हो मी बोलते आहे तिच्याशी, अस नका बोलू तिला, " सरला ताई.

आरती रूम मधे आली, ती नुसती बसून होती, काय करू? काय एक एक, मी माझ्या आयुष्याचा निर्णय नाही घेवू शकत का? आई बाबा सगळ्यांचेच म्हणणं आहे की मी मिलिंदशी लग्न करावं, तिने वरूणला फोन केला,

" काय झाल आरती? "

" मला बोलायचं आहे दादा,"

" आलोच दहा मिनिटात,"

वरुण दादा आला की बोलू त्याच्याशी, राहुल दादा कुठे आहे, वरूण आला, तो आरतीच्या रूम मध्ये आला,

"दादा मला बोलायच आहे,"

बोल,

"नाही इथे आजी येईल ती काही बोलू देत नाही ओरडते"

"काय झालं?"

आरतीच तोंड उतरल होत," ठीक आहे चल टेरेस वर ," राहुल आला घरी,

"राहुल दादा तू पण ये ना,"

"दादा ते तुला समजल असेल माझ्या लग्नाच," आरती.

" हो मीच बोललो आई बाबांशी या बाबत, "वरुण

"राहुल दादा तुला माहिती होत या बाबतीत? " आरती.

" हो मला वरुण बोलला होता, चांगले आहेत लोक," राहुल.

" तुम्हाला सगळ्यांना माहिती होत तरी मला बोलले नाही तुम्ही, मला नाही करायच इतक्यात लग्न," आरती रडत होती.

"आरती पुरे शांत हो," राहुल.

"दादा तू ही अस केल?" ती राहुल कडे बघत होती.

"काय झालं आरती काय प्रॉब्लेम आहे? तुला माहिती आहे का किती लकी आहेस तू, मिलिंद साहेबांनी तुला मागणी घातली आहे, " वरुण

"दादा मी ओळखत नाही त्यांना, मोठे वाटतात वयाने," आरती.

"सव्विस, ठीक आहे पाच वर्षाचा गॅप आहे," वरुण.

" दादा मला पुढे शिकायच आहे,"

" शिक ना मग त्या लोकांचे विचार जूने नाहीत, काय झाल आरती तुला कोणी दुसरा मुलगा पसंत आहे का? "वरुण.

" नाही दादा पण लगेच लग्न मन तयार होत नाही," आरती.

" हे बघ आरती त्या लोकांचे खूप उपकार आहेत माझ्या वर, खूप मदत करतात ते आम्हाला, कधीच काही मागत नाही, आता त्यांची इच्छा आहे तुझ्याशी लग्न करायची ती पूर्ण कर, आई बाबांना पसंत आहे स्थळ, आपण शोधून सापडणार नाही इतक छान स्थळ आहे, तू नंतर सांगशील मला बर झाल लग्न केल ते, इतका श्रीमंत मुलगा आहे मिलिंद, अजिबात वाईट सवयी नाहीत मस्त बिझनेस सांभाळतात ते, छान रहातात,"वरुण आनंदाने बोलत होता.

" दादा पण मला जे वाटत त्याच काय? "

"काय वाटतय तुला ते तरी सांग काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ आरती उगीच हट्टी पणा करू नकोस तू अश्याने नुकसान करून घेशील तुझ, मोठे काय सांगताय ते ऐक," वरुण.

"ठीक आहे तू म्हणशील तस," आरती तिथे उभी होती, तिला रडू येत होत, काय हे अस, जावू दे चांगले असतिल मिलिंद, वरूणला फोन आला तो खाली निघून गेला.

राहुल अजूनही आरतीकडे बघत होता," काय झालं आहे आरती? तुला कोणी मुलगा पसंत आहे ना कॉलेजमध्ये?"

"नाही दादा, "

" मला माहिती आहे तुला कोणीतरी दुसरा पसंत आहे, तुला वाटलं तर मला सांगू शकते, मला जमलं तर मी मदत करेल." राहुलने तिला जवळ घेतल, रडू नकोस, गप्प हो.

"म्हणजे दादा तसं आवडीचा वगैरे नाही, पण एक मुलगा आहे जो ज्याच्याकडे बघून मला छान वाटतं, वाटतं की असाच हवा जीवन साथी." आरती.

" कोण आहे तो लकी मुलगा? "राहुल.

" वीर इनामदार. "

" तो वरूणच्या विरुद्ध इलेक्शनला उभा आहे तो? "

हो.

" तुला माहिती आहे ना तो वरूणचा दुश्मन आहे, "

" माहिती आहे,"

" तुझ्या पेक्षा मोठा आहे तो दोन वर्षानी, खूप श्रीमंत घरातला आहे आम्ही कॉलेज असताना त्याच्या बऱ्याच गर्लफ्रेंड होत्या, तुला खरच आवडतो का तो, तू बोलली का त्याच्याशी, तो काय म्हटला? " राहुल.

" नाही दादा कधीच बोलली नाही मी त्याच्याशी, तो पण माझ्याकडे कधीच बघत नाही, त्याला माहिती नाही मला तो आवडतो, "आरती.

" हे बघ आरती तो वीर मला नाही वाटत तुझ्याशी बोलेल, आपण मिडल क्लास लोक, त्याच्या सगळ्या गर्लफ्रेंड खूप श्रीमंत आणि हाय फाय होत्या, उगीच त्या लोकांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही, पण मला असं वाटतं की तू आई बाबा म्हणता आहे ते स्थळ एकदा बघून घे, "राहुल.

" ठीक आहे दादा," तिला परत रडू आलं, राहुलने तिला जवळ घेतलं, "आरती रडू नको, वीर फक्त एक स्वप्न आहे, जे कॉलेजला जाणारी प्रत्येक मुलगी बघत असते, पण प्रत्यक्षात असं होत नसतं, खर आयुष्य वेगळ असत, "

तो तिला बरच वेळ समजावत होता, आरती रडत होती, " "संपल सगळ, अस का असत प्रॅक्टिकल जग दादा?"

" काळजी करायची नाही तुझ्या नशिबात असेल ते होईल बघ , जा आराम कर," राहुल.

" तू माझ्या सोबत राहशील ना उद्या, मला काही सुचत नाही " आरती.

"हो, अजिबात काळजी करू नकोस, "राहुल.

"खरच मिलिंद चांगला आहे का? "

"हो. चांगला असेल, तू चांगली आहेस तुझ चांगल होईल आरती, "

" नंतर तो भांडकुदळ निघाला तर? "

" तर मग आपण दोघ मिळून बघु त्याच्या कडे,"

राहुल आरतीला हसवायचा प्रयत्न करत होता,

" दादा तू म्हणतो म्हणून मी भेटेल उद्या त्यांना, पण मला आवडत नाही असा प्रोग्राम, वरुण दादा समजून घेत नाही, म्हणतो त्या लोकांचे उपकार आहे, त्यांना लग्न करायच म्हणून होकार दे, मी काय उपकाराची परत फेड करायला आहे का," आरती.

"अस बोलायच नाही आरती, होईल नीट सगळं, तुला खूप प्रेम करणारा नवरा मिळेल, "राहुल.

दोघ बराच वेळ शांत वरती उभे होते, काय बोलाव दोघांना समजत नव्हत,

" जेवायला चला आरती राहुल, " सरला ताई आवाज देत होत्या,

" चल डोळे पुस, " राहुल.

दोघ आत आले, सगळे बसलेले होते, आरती अगदी गप्प होती, खूप रडलेली दिसत होती ती, आई बाबा काळजीत होते, ते राहुल कडे बघत होते,

"आरती जा पाणी आण," आजी,

वरुण पाणी घेवून आला, ताट वाढले, सगळे आरती जेवते का ते बघत होते, तिने थोडस खाल्लं, ती आत निघून गेली,

"काय म्हणते ती," बाबा काळजीत होते,

"काही नाही धक्का बसला, पण तयार आहे लग्नाला," राहुल.

"चांगल आहे स्थळ, ती उगीच काळजी करते," बाबा.

" उद्या किती वाजता येतील ते लोक, काही सामान आणायच का? " वरुण विचारात होता, यावेळी मिलिंदच्या घरून, बाबांना फोन आला होता,

हो... सरला ताई सांगत होत्या काय काय करायच," ठीक आहे का आजी? "

हो.. त्यांनी समाधानाने मान हलवली.
.....

वीर केव्हाचा फोन मध्ये बघत होता, आज का नाही अनुश्री ऑनलाईन, त्याने चार पाच मेसेज टाकून ठेवल होते तिला, अजून रिप्लाय नाही, मला बोलायच तिच्याशी, माझ्या साठी लकी आहे, ती तिच्याशी बोलून खूप छान वाटत, काय करत असेल ती, तो अस्वस्थ्य होत होता,

वीर... अखिल आवाज देत होता, वीर परत बिझी झाला, थोड्या वेळाने तो घरी गेला.




🎭 Series Post

View all