ओढ तुझी लागली भाग 3

वीर... किती गोड नाव अगदी राजकुमार जसा, नाव डॅशिंग आहे, वीर नाव आरतीच्या मनात घोळत होत, ती खूप खुश होती, वीर आरती, ती लाजली, लव यु,



ओढ तुझी लागली भाग 3

©️®️शिल्पा सुतार
.......

सागर ऑनलाइन आला होता, त्याला अनूने लिहिलेल्या कथा खूप आवडायच्या, काही लिहिलं की मला आधी दाखवत जा असं म्हणायचा, त्या दोघांचे मन खूप छान जुळले होते.

"चला पोस्ट करा पटकन,"

दोन-तीन पोस्ट आल्या होत्या. सगळे वाचत होते, खूप वाहवा करत होते,

"अनु तू काय लिहिल आहे ते पोस्ट कर,"

"आज मी थोडं वेगळं लिहिलं आहे, स्वतः साठी काय कराव, स्वतः वर प्रेम कराव अस थोडस,"

पोस्ट कर ना

अनुश्रीने पोस्ट केल.

आज ती नेहमीप्रमाणे अतिशय आनंदात होती... काय झालं होतं नक्की? ति आनंद असण्यामागच कारण काय नक्की? नाही काही झालं नव्हतं... तिने स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधला होता.... तिने स्वतःलाच आनंदी ठेवायच ठरवल होतं... असं कसं? असंच करायला पाहिजे... खरं... आपल्याला जे आवडतं ते करायला हवं... स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा... रोज एक तरी चांगलं काम करायला हवं आणि ते जर जमलं तर स्वतःला पार्टी द्यायला हवी... यात खूप आनंद आहे... एकदा करून बघा... हे जग खूप सुंदर आहे त्याचा आनंद घ्या... रडक्या गोष्टीत वेळ घालवू नका... बागेत फिरा... पावसात भिजा... बागकामाची आवड आहे ते करा... स्वतःला वेळ द्या...

बरच काही लिहिलं होतं तिने, तिच्या पोस्टला खूप कॉमेंट येत होत्या, खूप सुंदर लिहिते तू अनु, नेहमी पॉझिटिव्ह विचार असतात तुझे,

"तू लिहिलेलं मी शेअर करते आहे,"

खूपच लाईक येत होते.

सागरचा तोपर्यंत मेसेज आलाच, "मला इकडे पाठव तुझी पोस्ट मी शेअर करतो, खूप सुंदर लिहिल आहे,"

"तू लिहिली का कविता? "अनुश्री.

" हो मी लिहिली पण हवी तशी जमली नाही," सागर.

" पाठव ना ग्रुप वर,"

माझं असणं तुझ्याचसाठी
माझं हसणं फक्त तुझ्याचसाठी
तूच तू दिसतो सगळीकडे
माझा एक एक श्वास तुझ्यासाठी

" किती सुंदर लिहितोस तु सागर," तिने मेसेज टाकला,

आता ग्रुप चॅट झाला होता, दोघ बोलत होते,

" अनु जर आपल्या मना प्रमाणे होत नसेल तर काय कराव? "

" कुठलीही गोष्ट होण्यासाठी आधी धीर धरावा लागतो, का होत नाही मनाप्रमाणे याच कारण शोधायच शक्य असेल तर त्या गोष्टी नीट करायच्या, स्वतः वर विश्वास ठेवायचा,"

"कधी कधी मन खुप उदास होत, नको वाटत सगळं ," सागर.

" असे विचार टाळायचे शक्य असेल तर त्या वेळात जे आवडत ते करायच, "

" किती छान सांगतेस तू अनु, तुझ्या आजुबाजुला सगळे आनंदी असतिल नाही , "

" सगळ्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम असतात कोणी सांगत तर कोणी सांगत नाही, "

" ठीक आहे बोलू नंतर तो पर्यंत लिहीत रहा, "

बाय.

काय झाल असेल नक्की याच्या आयुष्यात? कोण आहे हा सागर? काय करत असेल? ती विचार करत होती.

राहुल दादा आला," मला पाठव आरती तुझी पोस्ट, "

तिने पाठवली.

" किती छान लिहितेस तू, "

ती खुश होती,

" कोण होत ऑनलाईन?"

सागर.

" त्याने काय लिहिल, "

" हे बघ."

"वाह रोमॅन्टिक अगदी,"

" हो ना,"

" त्याचा डीपी का असा देवाचा?"

"मला काय माहिती?"

"कसा दिसतो तो?"

"माहिती नाही दादा, कोणी कोणाला पर्सनल माहिती विचारायची नाही हा ग्रुपचा नियम आहे."

मस्त ग,

" मी जाते झोप तू,"

ती खाली आली,

" कुठे होतीस ग," आजी.

"दादाशी बोलत होती, "आरती.

"झोप आता, "

ती वरुणचा विचार करत होती, त्याला पगार मदत करतात म्हणजे तो मिलिंद पगार त्यांचा मुलगा वाटत, आजकाल नेहमी दिसतो तो आम्हाला कॉलेज होऊन जातांना येतांना, व्हाइट कलरच्या गाड्या आहेत त्यांच्या कडे सगळ्या, काय म्हणण असेल त्यांच?

वरूण आला आजी जवळ बसला, राहुल ही आला,

" झोपला नाही का अजून," आजी.

"झोपतो, आई बाबा झोपले का?"

हो.

आरती दोघांकडे बघत होती,

"आरती तू सांगितल का बाबांना मारामारी बद्दल?" वरुण.

"नाही दादा,"

"हे बघ कॉलेजच्या गोष्टी घरी सांगायच्या नाहीत,"

"हो दादा, मी नाही बोलली काही, तू आईला विचार, पण वरूण दादा तू काळजी घे प्लीज, काय झालं होत? " आरती.

" अग ते मूल मूर्ख नुसते, आमची सभा उधळली त्यांनी, मी विचारायला गेलो तर भांडायला लागले. "

" बापरे एवढ होत? "

"हो ना, विचारल गेल की चिडतात ते, बापाच्या जिवावर मजा करणारे, माजले ते, " वरुण शिव्या देत होता.

" वरूण पुरे, आरती आजी आहेत आजुबाजुला, अस बोलू नकोस, आणि हे लास्ट इलेक्शन या पुढे मला अस चालणार नाही, " राहुल.

" हो राहुल दादा, "

"आता ग्रॅज्युएट झाल्यावर लगेच पुढची अ‍ॅडमिशन घ्यायची, सिरियस व्हायच करीयरच्या बाबतीत, तू तसा आहे हुशार," राहुल.

" राहुल दादा पुढच्या सहा महिन्यात मी कव्हर करेन अभ्यास, " वरुण.

" हो करावा लागेल, आरती तुझा अभ्यास कसा चालू आहे?"

"ठीक सुरू आहे दादा,"

"तू वरुणला मदत कर अभ्यासात ,"

हो,

वरुण एवढा डॅशिंग तरी तो राहुल काय सांगायच ते नेहमी ऐकत होता,

आजी ऐकत होती सगळ,

" आजी डोक दुखत आहे," वरुण.

"तेल लावून देवू का डोक्याला, जा आरती तेल कोमट करुन आण, " आजी जागेवरून उठत होती.

"आजी राहू दे नको मला तेल, आरती आराम करते आहे ना करू दे, "वरुण.

आरती प्रेमाने वरूण कडे बघत होती, "दादा तू छान आहेस,"

" आरती तू माझा डबा नको आणत जावू रोज,"

"दादा तू हे आजीला सांगा ती मला फोर्स करते," आरती.

"आजी मला वेळ नसतो तिकडे जेवायला, मी खातो कॅन्टीन मध्ये, "वरुण.

" घरच जेवण ते घरच असत, "आजी.

" आजी नको त्रास देत जावू आरतीला, नको आणु डबा, "

" ठीक आहे दादा, "

" घे तुला," त्याने मोठ चॉकलेट दिल,

" दादा थॅक्यु कोणी दिल? "

" नंतर सांगतो, "

आजी बघत होती,

"आजी तुला घे," तिने आजीला थोड चॉकलेट दिल,

वरुण राहुल दोघ बोलत होते, राहुल त्याला समजावत होता.

दुसर्‍या दिवशी लवकर वरूण कॉलेजला निघून गेला, प्रकाश आला होता घ्यायला, तो बघत होता आरती कुठे आहे, ती दिसली नाही,

राही प्रिया आल्या होत्या, आरती आवरून बाहेर उभी होती, "आज मीनल का नाही आली अजून?"

आजी बाहेर येवून बघत होती,

मीनल आली तेवढ्यात, शिव्या देत होती ती, "अश्या या लोकांना सोडल नाही पाहिजे, मूर्ख नुसते, माझ्या हातात असत ना अस सरळ केल असत, बेअक्कल,"

"मीनल काय हे का चिडली इतकी? काय झालं?" आरती.

"अग ती कोपर्‍यावरची बाई रोज डोक लावते माझ्याशी, थोड तिच्या अंगणात माझी स्कूटर गेली की कटकट करते ती, एखाद दिवशी चांगलाच प्रसाद देणार आहे मी तिला, चला आता कोणाची वाट बघते आहेस, "मीनल.

आरती पटकन तिच्या मागे बसली," आजी येतो ग आम्ही,"

आजी आत आल्या, काय मुलगी आहे ही, काय ती पँट, काय ते बोलणं, आरतीला सांगू आपण हिच्या सोबत नको रहात जावू,

" आई काय झाल? "सरला ताई बघत होत्या मुली गेल्या का ते.

" अग ती मीनल काय मुलगी आहे, मला अजिबात आवडत नाही, ती आरती का रहाते तिच्या सोबत? "आजी समोर बसत बोलल्या.

" चांगली आहे ती मनाने, ती आणि तिची आई एकटी रहाते, वडील नाही, आई नौकरी करते, थोड्या पैशात करतात कस तरी त्या, बिनधास्त रहाव लागत, आधार नाही त्यांना कोणाचा, लोक टपलेले असतात नाव घ्यायला," सरला ताई.

" हो बरोबर आहे पण तरी खूपच आगावू आहे ती काहीही बोलते, "आजी.

" मनाने साधी आहे, "

आरती मीनल प्रिया राही कॉलेज मधे आल्या, रोज प्रमाणे आरती ब्लॅक बाईक कडे बघून खुश झाली, या मुलाची माहिती कशी मिळेल काय माहिती? गुड मॉर्निंग माय लव, तिने त्या बाईकला फ्लाईंग कीस दिला,

आज मीनलची पार्किंग खाली होती, "ये हुई ना बात बघ आपोआप मला माझी पार्किंग मिळाली," मीनल खुश होती.

आरतीला काळजी वाटत होती, "मीनल नको लावू इथे स्कूटर, कोणी तरी मुद्दाम तुला जागा ठेवली आहे, बहुतेक कालचा बाईक वाला,"

"सोड ग मी नाही घाबरत ही माझी जागा आहे, बघते काय करतो तो," मीनल.

"हे बघ भांडण नको, " आरती.

" आरती एवढी का घाबरते चील यार,"

त्या क्लास कडे निघाल्या , जाता जाता बघितल कॉलेज कॅम्पस मधे बर्‍याच मीटिंग सुरू होत्या, प्रचार जोरात सुरू होता, तो हायफाय ग्रुप खूप एक्टीव होता, ते लोक काहीतरी पत्रक वाटत होते, त्या मुलीनी आरतीच्या ग्रुपला थांबवल त्या माहिती देत होत्या, तेवढ्यात आरती बघत राहिली, तो समोरून येत होता त्यांच्या ग्रुप कडे, ओ एम जी... खर आहे का हे, गुड मॉर्निंग डियर.....

काय डॅशिंग पर्सनॅलिटी आहे याची, उंच छान खूप हॅन्डसम, हा माझा आहे, तो छान बोलत होता सगळ्यांशी, छान माहिती देत होता, त्याच लक्ष नव्हत आरतीकडे, ती त्याच्या कडे बघत होती, तीच ऋद्य खूप जोरात धडधड करत होती,

सगळ जग थांबल होत... गार वारा सुटला होता... आरती पुढे झाली... तिने त्याच्या ओठावर बोट ठेवल... चूप किती बोलणार आहेस तू? तो आश्चर्याने तिच्याकडे बघत होता... बर ठीक बोल, तू खूप गोड बोलतोस... तू मला ओळखतो का? तो नाही म्हटला... तू रोज माझ्या स्वप्नात येतोस... मला तुझ्या सोबत रहायचा आहे... आय लव यू... तुझ्या त्या ब्लॅक बाईकवरून दूर लॉग डॉइव्हला जायच आहे... तो छान हसला तिच्याशी... तिला जवळ ओढून घेतल... तू म्हणशील तस होईल माय प्रिन्सेस... ती त्याच्या बाहूपाशात खूप शांत खुश होती.

मीनलने तिला धक्का मारला, "आरती... आरती.... ती भानावर आली, चल काय करते आहेस?"

तिला तिच्या विचाराची लाज वाटली, मी पागल झाली आहे याच्यासाठी,

त्याच बोलून झाल होत तो निघून गेला, "आरती काय करतेस तू नेहमी? कुठे लक्ष असत तुझ? तू त्या मुलाकडे अस का बघत होती,"

आरती गडबडली, "नाही.. मी नव्हती बघत."

"चल क्लास मधे, "

आरतीच्या हातात पेपर होता, त्यात दोन तीन नाव होते, या मुलाच काय नाव असेल?

"मीनल तो मुलगा काय सांगत होता?"

"तू झोपली होती का? तो इलेक्शनला उभा आहे, काय काय काम करतील त्यांचा ग्रुप कॉलेज साठी ते सांगत होता,"

" काय नाव त्याच?"

"काय झालं आरती?"

" काही नाही वरूण दादाला सांगायला," आरतीला ही कसतरी वाटत होत पण कोण आहे हा ते जाणून घ्यायच होत.

"ओह वीर नाव त्याच, वीर इनामदार,"

वीर... किती गोड नाव अगदी राजकुमार जसा, नाव डॅशिंग आहे, वीर नाव आरतीच्या मनात घोळत होत, ती खूप खुश होती, वीर आरती, ती लाजली, लव यु, बापरे ती स्वतः दचकली, काय सुरू आहे माझ? मी खूप पुढे गेले याच्या प्रेमात, मला बोलायच आहे याच्याशी, सांगू का माझ्या भावना, त्याचा विचार मनातून जात नाही, त्याला काही माहिती नाही, वरूण दादाच्या अपोजीट उभा आहे तो इलेक्शन साठी त्याचा दुश्मन, पण किती क्यूट दुश्मन, तिने त्याच नाव असलेल्या पेपर कडे प्रेमाने बघितल, एकदम नाक गोळा केल, तो पेपर नीट बॅग मधे ठेवला.
मला एक गोष्ट अजिबात आवडली नाही ती एक मुलगी का सारखी सोबत असते त्याच्या ती कोण सोनिया. किती बोर मुलगी आहे ती.

लेक्चर सुरू झाल, आरती अभ्यासाला लागली, लंच टाइम झाला, "चल आरती वरूणला डबा द्यायला."

"नाही आणला आज त्याचा डबा, काल झाला सॉर्ट आउट तो प्रश्न," आरती.

"हुश्श... नाही तर ते खूप मोठ काम होत आपल्याला, आता प्रकाशला करमणार नाही, पण मग माझ्या जेवणाचा काय?" मीनल.

"दिला आहे आईने डबा सेपरेट,"

"कोणती भाजी आहे?"

गवारची.

" वाह वाह आण इकडे डबा, "

" मीनल हळू जरा हळू हळू खा,"आरती.

" चला चहा घेवू, "

त्या कॅन्टीन मधे आल्या, वरुण त्याच्या ग्रुप सोबत कोपर्‍यात बसला होता, ते लोक हळू हळू बोलत होते,

वरूण आरती बघ एकाने सांगितल,

प्रकाश आरती कडे बघत होता, खूप गोड दिसत होती ती लाल ड्रेस मधे, आरती आणि ग्रुप समोर बसले होते, कोणी तरी लीडर आला, सगळे भेटायला गेले, आरती बघत होती मिलिंद आहे हा, पण तो या कॉलेज मध्ये नाही, मोठा आहे तरी का येतो आत, तो वरुणच्या ग्रुप सोबत बोलत होता ते लोक बिझी होते,

प्रकाश आला बोलवायला, "आरती तुला वरूणने बोलवलं आहे,"

"प्रकाश मला क्लास मधे जायच आहे," आरती मिलिंदला बघून घाबरली होती. नको जायला तिकडे. तिला मनातून वाटत होत नक्की काहीतरी आहे.

" एक मिनिट ये आरती, मिलिंद साहेब बोलवत आहेत अस करता येणार नाही," प्रकाश.

"एवढ काय ते म्हणतील ते ऐकायच आपण, " आरती.

" वरुण मानतो त्यांना, ते मदत करतात आपल्याला, चल पटकन," प्रकाश.

आरती गेली,

"आरती ये इकडे, हे बघ हे मिलिंद साहेब, मला इलेक्शन मधे मदत करतात," वरुण.

मिलिंद उठून आरती समोर येवुन उभा राहिला.

हॅलो... त्यांनी हात पुढे केला, सगळे आरती कडे बघत होते, आरतीला समजत नव्हत काय कराव, तिने हात मिळवला ,

"छान वाटल तुला भेटून आरती, तुला माहिती का तू खूप सुंदर आहेस," ते हळूच बोलले.

ती काही म्हटली नाही, बघत होती ती मुलगा चांगला आहे, शिकलेला वाटतोय, पण वीर सारखा नाही,

"लास्ट इयरला आहेस का तू?" मिलिंद.

हो,

"पुढे काय करणार? "

"आता सहामाई परीक्षा आहे, हे वर्ष संपल की पुढे अ‍ॅडमिशन घेणार आहे मी लगेच पोस्ट ग्रॅज्युएशन साठी," आरती.

ठीक आहे दिवाळी नंतर उरकून टाकू, तो तोंडातल्या तोंडात बोलल.

"छान ग्रुप आहे तुझा, मी बघतो नेहमी तुला," तो एकटक तिच्या कडे बघत होता, ती एकदम अनकंर्फटेबल झाली, "मी जाते लेक्चर आहे थोड्या वेळाने,"

ठीक आहे, हे घे त्याने मोठ चॉकलेट दिल, काल वरूण दादाने दिलेल चॉकलेट अस होत ना, म्हणजे ते याने दिल होत माझ्यासाठी, दादाला हा पसंत आहे, पण मला नाही,

" दादा मी जाते," आरती.

हो,

प्रकाश तिथे उभा होता, त्याला समजल मिलिंद साहेब आरती कडे कसे बघत होते ते, त्याला आधी आवडल नाही ते, तो गप्प होता, आरती माझी आहे, जावू दे, आपण बाजूला निघून जावू, आरतीच मिलिंद साहेबां सोबत चांगल होईल, कुठे मी कुठे ते, श्रीमंत लोक ते, मोठा बिझनेस, शिकलेले , आरती सुखी राहील तिकडे .

🎭 Series Post

View all