ओढ तुझी लागली भाग 1

पांढर्‍या शुभ्र घोड्यावरून एक अतिशय देखणा उंच पुरा राजकुमार डोंगराच्या उतारावरून वेगाने खाली येत होता, त्याचे मानेवर रुळणारे केस वार्‍याने थोडे उडत होते


ओढ तुझी लागली भाग 1

©️®️शिल्पा सुतार


ही कथा फक्त मनोरंजन करण्यासाठी लिहिली आहे. याचा कोणाशी काही संबंध नाही. कथेतील पात्र काल्पनिक आहेत. कथा हळू हळू पुढे जाईल. वाचकांचे आभार.
.......

पांढर्‍या शुभ्र घोड्यावरून एक अतिशय देखणा उंच पुरा राजकुमार डोंगराच्या उतारावरून वेगाने खाली येत होता, त्याचे मानेवर रुळणारे केस वार्‍याने थोडे उडत होते , त्याच्या डोळ्यात वेगळी चमक होती, ती हवी मला, आज काहीही झाल तरी मी आज तिला माझ्या सोबत नेणार, तो हट्टाला पेटलेला होता , कोणालाही न जुमानता तो बागेत शिरला, बरेच जण त्याला अडवायचा प्रयत्न करत होते, तो त्यांना पुरून उरत होता. शेवटी तो जिंकला. तो आत आला.

ती सुंदर यौवना बागेत फुल तोडत होती , त्याला बघून ती एकदम लाजली, त्याने अलगद तिला उचलून घेतल, स्वतः सोबत घोड्यावर पुढे बसवल, तिचे सुंदर सुगंधी केस वार्‍यावर उडत होते, दोघ खूप खुश होते , मी कधी पासून या क्षणाची वाट बघत होतो, तो हळूच तिच्या कानात म्हंटला, तशी ती शहारली, मी पण तुझी खूप वाट बघत होते त्याने तिला जवळ घेतल, कुठे जातो आहोत आपण
, दूर सुंदर अश्या आपल्या जगात, ती खुश होती, खूप खुश होती,

"आरती आरती उठ, कॉलेज आहे ना, आटोप," आजी आवाज देत होती.

" हो पाच मिनिट,"

"मुलीच्या जातीने लवकर उठाव, आईला मदत करावी,"

"आजी प्लीज, नको ना सकाळी सकाळी, आईला सांग मी पोळ्या करेन," आरती.

"ये आवरुन बाहेर,"

आरती सावंत कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली गोड मुलगी, अगदी साधी सुंदर, घरच्यांच्या शब्दा बाहेर नव्हती ती, कॉलेज घर एवढंच तिचं जग होतं त्यासोबत ती छान लिखाण करायची आणि उरलेल्या वेळात स्वप्न बघायची, तिच स्वतःच अस छान जग होत. त्यात ती खूप खुश होती.

आरती किचन मधे आली, सरला ताई भाजी करत होत्या, आरतीने पोळ्या करायला घेतल्या,

"तुझ्या डब्या पुरत्या कर पोळ्या बाकी मी करून घेईन,"

"ठीक आहे आई ,"

आरतीच कुटुंब मोठ होत, ती आई बाबा भाऊ वरूण राहुल आणि आजी, दोघ नातू आजीचे खूप लाडके होते, आरती एकुलती एक होती, सगळ्यात लहान, राहुल जॉब करत होता, वरूण आरती सोबत कॉलेजला होता शेवटच्या वर्षाला, तो दोनदा नापास झाला होता, होता हुशार पण अभ्यासात लक्ष नव्हत,

"आरती आवरल का?" प्रिती राही मीनल सगळ्या बाहेर आल्या होत्या, जोराजोरात हाक मारत होत्या त्या.

"आल्या या पोरी, किती गोंधळ घालता ग, जरा शांततेत घेत नाहीत, वळण नाही अजिबात," आजी चिडल्या होत्या.

प्रिती राही एका स्कूटरवर जाणार होत्या, मीनल सोबत आरती जाणार होती,

"आई मी निघते,"

"हो लवकर ये घरी," आई बाहेर पर्यंत आली, काकू खूप छान दिसता आहात तुम्ही, काकू आज डब्यात काय आहे? मुली नुसत्या गोंधळ घालत होत्या, सरला ताई खुश असायच्या या मुली आल्या की.

"डबा घेतला का आरती ,"आजी पण बाहेर आली.

"हो आजी,"

"वरूणचा डबा नेते का सोबत? "

"नाही आजी मी मुळीच नेणार नाही दादाचा डबा, तो का नेत नाही, मी काय सारख त्याची काळजी घ्यायची," आरती चिडली.

"अग तो लवकर जातो ना कॉलेजला,"

" सगळे लेक्चर आठ वाजेनंतर सुरू होतात, वरूण दादा का जातो इतका लवकर?"

"ने ना त्याचा डबा, एवढा जड आहे का डबा? उपाशी राहील पोरगा," आजी.

"आजी एवढा साधा आहे का तो उपाशी रहायला, आई आजीला काही सांग, मी कुठे शोधणार दादाला, त्यात तो बिझी असतो मुलांनी घेरलेला." आरती.

" ठीक आहे राहू दे," सरला ताई.

"दे तो दिसला तर देईन, मी त्याला शोधणार नाही, नुसत लाडावून ठेवल आहे त्याला," आरती मीनलच्या सोबत निघाली,

" काय असत ग तुमच रोज कॉलेजला निघतांना," मीनल.

" अग दादासाठी आजी अस करते,"

त्या सगळ्या एकदम बेस्ट फ्रेंड्स होत्या , लहानपणी पासून सोबत होत्या, त्या कॉलेजला पोहोचल्या, पार्किंग मधे आल्या, आरतीने एक नजर टाकली नेहमीच्या जागेवर, ब्लॅक बाईक उभी होती, आला आहे तो माझ्या स्वप्नातला राजकुमार कॉलेजला, तिला एकदम प्रसन्न वाटल, छान हसत होती ती, नाव काय असेल त्याच काय माहिती? खूप डॅशिंग, श्रीमंत असेल का तो? माहिती नाही, लव यु. तिने त्या बाईक कडे फ्लाईंग किस दिला.

"आरती.... आरती झोपली का? तू उतर खाली," मीनल.

"हो ग किती ओरडते अजिबात शांततेत घेत नाही तू मीनल,"

"तिकडे बघ आधी काय झाल ते ,"

ती नेहमीच्या जागेवर स्कूटर लावायची होती तिथे एक बाईक उभी होती,

"कोणाची हि बाईक कोणाची हिम्मत झाली इथे बाईक लावायची , माझी जागा आहे ही मी सोडणार नाही त्याला, "मीनल आजुबाजुला बघत होती,

आरती विचार त्या शगुनला, तो वॉचमन पार्किंग कडे लक्ष द्यायला होता, "शगुन भैय्या आमच्या जागेवर कोणी बाईक लावली?"

"जागा फिक्स नाही ना मॅडम, तुम्ही दुसरीकडे पार्क करा," शगुन हसुन मुलींकडे बघत होता.

" नाही ही माझी जागा आहे, "मीनल उतरून आली,

"मीनल मॅडम तिकडे चांगली जागा आहे," शगुन.

"नाही हीच जागा हवी, तिकडे त्या बाजूला ऊन असत दिवस भर, स्कूटर गरम होईल माझी, "

" मीनल प्लीज हट्ट सोड, "तो पर्यंत प्रीती राही पण आल्या होत्या. चला उशीर होतो,

मीनलने बाजूला स्कूटर पार्क केली, शगुन गेला, तिने इकडे येवून बाईकच्या टायर मधे पिन घुसवली, पूर्ण हवा बाहेर येत होती,

" मीनल नको ना मीनल पागल, "आरती.

" चूप ग हिम्मत कशी होते माझी पार्किंग घ्यायची, " मीनलने त्या बाईकला लात मारली.

त्या क्लास मधे आल्या, रवी बाहेरून प्रीतीला हात देत होता,

"प्रिती कॅन्टीन मधे जाशील तर मला चिप्स आण," मीनल.

"हो तुझ्या साठी जाते मी तिकडे,"

"आण ना काय फरक पडतो,"

"ठीक आहे,"

" तुला काय हव आरती? "प्रीती.

"नाही काही तू जा, लवकर ये, "

" ठीक आहे तू मला नंतर सांग काय शिकवलं ते," प्रिती कॅन्टीन मधे गेली,

क्लासेस सुरू झाले, आरती मनापासून अभ्यास करायची रोज, सिन्सियर विद्यार्थीनी म्हणून ओळख होती तिची, तिच्या मैत्रिणी फायदा घ्यायच्या, सांग ना आरती शिकव मला अस करायच्या , ती पण प्रेमाने शिकवायची, दुसर्‍या लेक्चरला प्रीती आली, मीनल तिच्याकडे आशेने बघत होती,

"आणले आहेत चिप्स,"

"मीनल प्लीज आता नको खाऊ," आरती.

"खूप घाबरट ही आरती, गप्प बस मी खाणार ," ती हळू हळू चिप्स खात होती, आरती घाबरलेली होती.

लंच ब्रेक झाला, "प्रिती चल ना वरुण दादा कुठे आहे बघु? "

"काय यार रोज रोज तेच, नाही तरी तो घेत नाही डबा, तुलाच बोलतो, त्या पेक्षा मीनलला दे तो डबा, ती नेहमी भुकेली असते," प्रीती.

" हो बरोबर आण इकडे तो डबा, " मीनल.

"थांब मीनल आजी ओरडेल दादाने डबा नाही खाल्ला तर," आरती.

" अति करते तुझी आजी आणि तू ही, चल, "मीनल.

त्या कॅन्टीन कडे गेल्या, रस्त्यात आरती बघत होती तो हीरो दिसतो का? कॅन्टीन मध्ये जातांना कट्ट्यावर दिसला त्याचा हाय फाय ग्रुप, एकदम पॉश मुल मुली होते त्याच्या सोबत, बहुतेक ब्लॅक कपड्यात, मुली ही स्टायलिस्ट केस मोकळे सोडलेल्या, एक से एक, ती स्वतः कडे बघत होत्या, मी फार साधी वाटते का, केस मोकळे सोडू का मी,

तो मध्य भागी बसलेला होता, काही तरी बोलत होता मुलांशी, त्याच्या कडे बघता बघता आरती एकदम पुढे जावून प्रीतीवर आदळली,

"आरती प्लीज यार लक्ष कुठे असत तुझ, लागल ना मला," प्रीती.

"ती नेहमी स्वप्नातल्या दुनियेत रममाण असते, माफ कर तिला, तिकडे काय बघत होती आरती? " मीनल.

काही नाही.

वरुण कॅन्टीन मध्ये होता, नेहमी प्रमाणे मुल मुलीं मधे घेरलेला होता, तो लीडर होता, स्टुडंट असोसिएशनच्या इलेक्शनला उभा होता, बरेच मुल मुली त्याच्या कडे प्रॉब्लेम घेवून येत होते,

" दादा दादा आरती हाक मारत होती," सगळे बघत होते, प्रकाश वरुणचा मित्र एकदम पुढे आला,

"आरती आला बघ तुझा आशीक," मीनल हळूच बोलली.

"गप्प बस मीनल काहीही काय, चांगला आहे प्रकाश, नीट वागतो तो मुलींशी इतकंच,"

बाकीचा ग्रुप हसत होता

"प्लीज हसू नका कोणी." आरती.

"एवढा चांगला आहे तो तर मग उरकून टाक त्याच्या सोबत लग्न, तो एका पायावर तयार आहे," मीनल.

" अस काही नाही माझ्या मनात," आरती.

"तुला समजत नाही का त्याच्या वागण्या बोलण्या वरून,"

" तो दादाचा मित्र आहे इतकच,"

" बघ तो करेल तुला प्रपोज," मीनल.

" चूप ग. तो माझ्या टाइपचा नाही,"

" मग कोण आहे तुझ्या टाइपचा, "

आरतीने वळून मागे बघितल तो त्याचा ग्रुप अजूनही तिथे बसलेला होता, तो हॅन्डसम मुलगा ही तिथे होता, तिला खूप छान वाटल, ती खुश होती,

" हॅलो आरती, "प्रकाश छान हसला, तश्या सगळ्या मुली त्याच्याशी हसल्या,

" आम्ही पण आहोत इथे प्रकाश,"

तरी तो आरती कडे बघत होता,

"प्रकाश वरूण दादा बिझी आहे का?"

" हो मीटिंग सुरू आहे, काय काम आहे मला सांग मी करतो," प्रकाश.

"हो तो तयार आहे मदतीला, हो ना प्रकाश,"

मीनल?

" डबा द्यायचा आहे दादाला,"

"त्याने खाल्ल कॅन्टीन मधे,"

" बर झाल आण तो डबा इकडे आरती मी खाते," मीनल.

"मीनल आईने दिली तुझ्या साठी पोळी भाजी, थांब ना वरूण जेवला नाही तर आजी ओरडेल,"

अति होतय.

" जा बोलून घे आरती, पण वरूण ओरडला तर मला सांगू नकोस, "प्रकाश.

आरती पुढे गेली वरूण तिच्या कडे लांबून बघत होता, दादा... ती डबा दाखवत होती,

तो उठून पुढे आला, " झाल माझ, तुला किती वेळा सांगितल माझा डबा आणत जावू नको, "

" तू आजीला सांग ना मग तस, काय कटकट आहे , ठीक आहे," ती वापस आली,

" काय झालं आरती? "प्रकाश.

" दादा नाही म्हटला डबा घ्यायला,"

"आरती तुला वाईट वाटत असेल तर मी खावू का डबा," प्रकाश हात पुढे करत होता.

"काही गरज नाही प्रकाश मी आहे ना तिची मैत्रीण, मी करते तिला मदत,"मीनल.

ठीक आहे,

" आम्ही जातो, "

" आरती ते चहा घ्यायचा का कॅन्टीन मधे?" प्रकाश.

"आमचा अजून डबा खावून व्हायचा आहे प्रकाश," आरती.

" हो प्रकाश पण ही माझी मैत्रिण लीना तिचा खावून झाला आहे डबा, तुला घ्यायचा का चहा लीना प्रकाश सोबत? "

चालेल.

" मला नाही वेळ मी जातो, "प्रकाश निघून गेला.

मुली हसत होत्या मजनु बिचारा, आरती चहाला जा ग एकदा तरी त्याच्या सोबत.

" चला काहीही सुरू असत तुमच," आरती हसत होती.

🎭 Series Post

View all