Login

ओढ तुझी लागली भाग 29

ज्याच्यावर खर प्रेम असत तो मिळतोच. आरती आणि वीर च्या नात्यात पुढे काय होईल

ओढ तुझी लागली भाग 29

©️®️शिल्पा सुतार
.......

दुपारनंतर मेहंदी काढणाऱ्या ताई येणार होत्या. खूप मजा येत होती. "चला जेवून घ्या पटापट. आरती आटोप. "

आरतीची मावशी सुद्धा आली होती. मावशीने सगळं काम हातात घेतलं होतं. ती या मैत्रिणींसोबत छान रमली होती.

"कुठे आहे ग आरती तुझा नवरा? ना फोन ना तुला भेटायला येत? फोटो तरी दाखव. " ती विचारत होती.

मीनल आणि आरती एकमेकींकडे बघत होत्या.

वीर भेटायला येत नाही तेच बर आहे .  किती डेंजर आहे तो यांना काय माहिती. काय होणार पुढे काय माहिती.  बाकीच्यांना तो किती चांगला वाटतो. खूप भांडकुदळ आहे. मी त्याच्याशी बोलत नव्हते तर लग्न मोडायची धमकी दिली होती . हे कोणाला माहिती नसेल. आरती विचार करत होती.

"मीनल खरच वीरने कधीचा फोन केला नाही . काय होणार आहे  माझ काय माहिती? "

" आरती हे तुझ्या मुळे झाल आहे. तूच नीट वागत नाही त्याच्याशी. त्याला रिप्लाय देत नाही. म्हणून आता तो कंटाळून फोन करत नाही. लक्ष्यात ठेव हे पुढे नीट वाग."

आरती विचार करत होती तरी पण वीर सोबत बोलायच म्हणजे नको वाटत होत. मी त्याला त्रास देणार.

मेहंदी वाल्या ताई आल्या. छोटी पूजा झाल्या नंतर
मेहंदी  काढायला सुरुवात झाली. सरला ताई, मावशी, प्रिया ,राही ,मीनल खूप एन्जॉय करत होत्या. कोणाला काही हव तर आजी देत होत्या. पूर्ण हात भरून नको मेहंदी कोपर्‍या पर्यंत काढा. चला एक एकीने मेहेंदी काढा.

राहुल एक दोनदा आत येवून बघून गेला. मीनल अजून मुलीं मध्ये होती. काय झाल आहे हिला?
.......

वीर कडे लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. आजी असल्या मुळे सगळ काम व्यवस्थित होत होते. नंदिनी मॅडम शनाया मेहंदी काढत होत्या. दुसर्‍या दिवशी हळद लगेच दुपारी लग्न होत.

"उद्या लग्न तरी वीर घरी नाही नंदिनी." आजी विचारत होत्या.

"महत्वाची मीटिंग आहे. येईल थोड्या वेळाने घरी."

वीर ऑफिस मध्ये बिझी होता. त्यांच ट्रेनिंग झाल होत.  कामावर छान पकड झाली होती. बर्‍याच मीटिंग तो घेत होता. प्रत्येक निर्णय घेतांना राहुल सर त्याच्याशी बोलत होते. घरी यायला ही उशीर होत होता. राहुल सर त्याच्यावर खुश होते. त्याच हर्षलच खूप पटत होत.

वीर घरी आला घरात छान वातावरण होत. आरतीने पण मेहेंदी काढली असेल का? ती काय करत असेल? आजकाल मी तिला त्रास देण बंद केल आहे. तिला नाही बोलायच माझ्याशी. जावू दे. लग्नानंतर काय करेल. सोबत राहील तर फरक पडेल. तिला माझी आठवण येत असेल का? त्याने फोन बघितला दुपार पासून आरती ऑनलाईन नव्हती.

आरतीची मेहेंदी काढून झाली. किती कठिण आहे हे अस हात धरून बसण. कश्याला हव एवढ? कोणाला दाखवायच आहे? नाही तर ही मेहेंदी मी वीरला मुळीच दाखवणार नाही. आरती तिची तिची चिडली होती.

सरला ताईंच्या फोन वर आजी, नंदिनी मॅडमने फोन केला होता. शनाया होती. वीर समोर बसलेला होता.

"आरती वहिनीची मेहंदी काढून झाली का?" ती विचारत होती.

वीर मुद्दामून कामात आहे असं दाखवत होता. तो ऐकत होता ते काय बोलत आहेत ते.

सरलाताई, नंदिनी मॅडम सोबत बोलत होत्या." तिकडे रिसॉर्टवरच हळद लावायची ना? "

" हो तुम्ही सकाळी सगळे लवकर या बाकीचे कार्यक्रम तिकडेच करू आपण. "आजी सूचना देत होत्या काय काय आणायचं.

"आरती वहिनी कुठे आहे?" शनाया विचारत होती.

"ती काय मेहंदी लावून बसली आहे, थांब तिच्याजवळ जाते मी." आरतीला आता शनाया दिसत होती  त्यांनी पण मेहंदी लावली होती. हाय शनाया, हॅलो ऑंटी, आजी.

" आंटी काय म्हणतेस ग हिला. आई म्हणत जा." आजी ओरडल्या.

"ठीक आहे."

आजी नंदिनी मॅडम बोलत होत्या. वीर ऐकत होता. घरच्यांशी व्यवस्थित बोलते ही प्रेमाने. हेच ठीक आहे माझ्या साठी. माझ काय करायच नंतर बघू.

" तुझी मेहंदी दाखव आरती."

ती हात दाखवत होती. पायावर मेहंदी काढणे सुरू होतं. आरती बघत होती कोणी दिसत आहे का? पण या तिघीच होत्या कॉल वर. वीर कुठे आहे काय माहिती? चिडका बसला असेल कुठे तरी जावून.

शनायाने फोन हातात घेतला. "वहिनी थांब अजून कोणालातरी तुला बघायचं आहे."

ती फोन घेऊन वीर जवळ गेली. तो मोबाईल वर बिझी आहे अस दाखवत होता. त्याने मान वरती केली. समोर आरती मेहंदीचे हात घेऊन बसली होती. खूपच छान दिसत होती. तिला वाटलं नव्हतं की विर येईल फोनवर. ती लाजली. खाली बघत होती. तिने हळूच वर बघितल वीर अजूनही तिच्या कडे बघत होता. ओह माय गॉड काय करू?

"अरे बोला ना काही तरी." दोघं काहीच म्हटले नाही. आरती लाजली होती हे स्पष्ट दिसत होतं. वीरला वेगळच वाटत होतं.

"तुम्ही अगदी जुन्या जमान्यातली कपल असल्यासारखं करता आहात दादा वहिनी."

मावशी आली तिने फोन घेतला. वीर आणि शनाया होते. मीनल मावशीच्या मदतीला आली. हे बघ मावशी हा विर आहे आणि ही शनाया दोघ हसले. मावशी सोबत थोडं बोलून त्यांनी फोन ठेवला.

"अहो जाहो नाही घालत का तुम्ही? जावई आहे ते. " मावशी रागावली.

" अग मावशी वीर आमच्या कॉलेजमध्ये होता." मीनल.

"होता ना. आता नाही. तुझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत ते . आहो जाहो बोलावं."

"हो गं मावशी किती बोर करते."

वीर खूपच खुश होता. हिरव्या ड्रेस मधे आरती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या नाजूक चेहर्‍यावर एक प्रकारची लाज होती. तिची मेहंदी खूप सुंदर होती. वेगळीच दिसत होती का ती? आरतीने छान तयारी केली होती वाटत. माझ्याशी का नाही बोलत ती.

"शनू इकडे ये. आपण आता व्हीडिओ कॉल वर होतो. तर तू स्क्रीन शॉट घेतला का?"

" हो दादा."

"मला पाठव फोटो."

का?

" अरे दे ना."

"दादा तू तर बोलत नाही वहिनी सोबत मग फोटो का हवा आहे?"

दे ना.

" आज आरती वहिनी किती सुंदर दिसत होती ना. "

हो.

" तुला आवडते का ती? "

" हो शनु."

"तुम्ही दोघ मोकळ का बोलत नाही."

"तुला माहिती नाही का काय झालं ते. होईल ठीक. आता मी कुठे जावू तिच्याशी बोलायला. मी ऑफिस मधे बिझी असतो. तिकडे तिच्या मैत्रिणी सारख्या सोबत असतात. त्यात तिचे भाऊ डेंजर आहेत. "

" तू घाबरतो का त्यांना? "

" नाही.. पण आता मला भांडण नको आहे. तुला तर माहिती आहे आपण दोघ कराटे चॅम्प आहोत. "

" हो दादा. जावु दे दादा. आजच्या दिवसाचा प्रश्न आहे. उद्या पासून वहिनी इकडे येईल रहायला. "

वीर वेगळाच खुश होता.
....

सरला ताई आरतीला जेवण भरवत होत्या. बाकीच्या मैत्रिणी घरी गेल्या होत्या. सकाळी लवकर यायच होत. वरुण, राहुल येवून बसले.

राहुल इमोशनल झाला होता. उद्या पासून आरती या घरात नसेल मला तर हा विचार ही सहन होत नाही. वीर सोबत तीच आयुष्य कस असेल. खूप सुखी राहू दे हिला देवा. आपण काही बोललो तर ती रडेल म्हणून तो गप्प होता.

" आरतीचे खूप लाड होत आहेत आमच काय? आमच्या कडे नुसत दुर्लक्ष होत आहे आई. नुसत आरतीला भरवते तू." वरुण मुद्दामून चिडवत होता.

"तुम्ही इथे आहात ना. माझ्या सारख थोडी सासरी जाणार आहात. मुलींना देतात पाठवून दुसर्‍यांच्या घरी. तुम्ही लकी आहात. नेहमी आई बाबां सोबत रहायला मिळेल. माझ काय होईल? नवीन घर नवीन लोक. त्यात तिकडे वीर." आरती रडायवर आली होती. सरला ताई, वरुण, राहुल एकमेकांकडे  बघत होते.

" काही सांगता येत नाही. काही वेळेस आम्हाला सासरी जाव लागेल. आज कालच्या मुली डेंजर असतात. एखादीने आम्हाला पसंत केल तर तीच ऐकाव लागेल. ती म्हणेल तिथे रहाव लागेल. हो ना राहुल दादा. " वरुण मुद्दाम गम्मत करत होता.

राहुल हसत होता. मीनल खरच डेंजर आहे. या वरुणला काही समजल की काय?

वरुण मुद्दामून आरतीला हसवत होता. आरती, सरला ताई, राहुल ,आजी सगळे हसत होते.

बाबा आत आले. "झाल का जेवण आरती? "

" हो बाबा."

" बॅग भरली ना?"

हो.

" हे बघ अजिबात काळजी करायची नाही. छान रहायच तिकडे. तुझ्या घरचे लोक चांगले आहेत. आणि काहीही झाल तरी लपवून ठेवायच नाही. मी आहे, राहुल आहे, वरुण आहे तू कधीच एकटी नाहीस. तशी वेळ येणार नाही. पण तरी सांगून ठेवल. साधे लोक आहेत ते. "

हो बाबा... ती बाबांना जावून भेटली. दोघांच्या डोळ्यात पाणी होत.

" पुरे आता रडू नका. " आजी.

आरती नेहमी प्रमाणे आजी जवळ झोपायला आली. तिच्या मागे वरुण, राहुल आले.

"एवढ्या लवकर झोपायच नाही आरती चल गप्पा मारू ." वरुण बोलला.

"अरे माझ्या हाताला मेहेंदी आहे. मला नीट चालता येत नाही."

"आरती लवकर ये झोपायला. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे आपल्याला."

हो आजी.

लग्नाचे सगळे कार्यक्रम रिसॉर्टवर होते. सकाळी तिथेच हळद लागणार होती.

राहुल, वरूण, आरती  तिघे टेरेसवर आले. प्रकाश, राकेश पण आलेले होते. ते तर सारखी मदत करत होते.

प्रकाशला आधी आरती आवडत होती. पण तिचं लग्न मोडल्यानंतर तो काहीच म्हटला नाही त्यामुळे आरतीने इंटरेस्ट घेतला नाही. नाहीतरी प्रकाश काहीच करत नाही. अजून शिकतो आहे. इतर वेळी ही तो सिरियस नसायचा. नुसत फिरत होता. किती तरी वेळा आरतीने सांगितल तरी ऐकत नव्हता . कॉलेज संपल की बघू काय करतो. आणि वरुण ही. त्याच्याशी बोलाव लागेल.

वरूण त्याच्या मित्रांसोबत बोलत होता.

"वीर चांगला वागतो ना आता? "

"हो अजून तरी व्यवस्थित आहे."

"तू बरीच डेरिंग केली वरूण. आरती लग्न त्याच्याबरोबर फिक्स केलं." राकेश.

"अरे चांगला आहे तो वागायला आपण बघितलं ना किती छान काम करतो. त्यांचा बिजनेस किती छान आहे आणि मी आहे ना आरतीच्या मागे. पुढे जर काही झालं तर. पण मला नाही वाटत आता काही होईल. वीर शांत वाटतो आहे आणि त्यांने समोरून आरतीसाठी मागणी घातली आहे. आई बाबा राहुल यांना पटलं ते. आरतीने सुद्धा होकार दिला. मी तोच विषय धरून ठेवू शकत नाही. "

" बरोबर आहे."

या सगळ्यात प्रकाश गप्प बसलेला होता.

"तुला माहिती आहे का मिलिंदच लग्न जमलं आहे." प्रकाश सांगत होता.

"कोणाशी?

" त्याच्याच मामाच्या मुलीशी. लगेच पुढच्या महिन्यात लग्न आहे."

"जाऊ दे आरतीला कळू देऊ नको. उगाच परत तिला त्रास होईल."

"राहुल दादा मला तुझ्या सोबत एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." आरती त्याच्या जवळ उभी होती.

"काय झालं आहे आरती? काही प्रॉब्लेम आहे का? "

" हो खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. "

तो टेन्शनमध्ये होता.

" मला तुझी गोष्ट समजली आहे.  माहिती नाही ते खरं आहे का? तुला मीनल आवडते का?"

राहुल काहीच म्हटलं नाही.

" सांग ना दादा मोकळे बोल ना. हे बघ मोकळ बोलल्याने बरेचश्या गोष्टी समजतात आणि गैरसमजही होत नाहीत. "

" कसले गैरसमज? "

" हे बघ तुला जर मीनल विषयी काही वाटत असेल तर तू तिच्याशी मोकळं बोलून घे. हेच तुमच्या दोघांसाठी चांगल असेल. एवढेच मी सांगते."

"आरती तुला का असं का वाटतं आहे?  काही झाल का? " राहुल काळजीत होता. तो बघत होता  मीनल दोन दिवस झाले रुसलेली होती. काही बोलत नव्हती.

काय करू याला सांगू का की मीनल माझ्याशी बोलली. नको त्या दोघांनाच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे. एकमेकाशी बोलायला पाहिजे. आत्ता मी त्यांच्यामध्ये मध्यस्थी केली तर मलाच कायम त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतील. दादा दरवेळी गप्पच बसेल आणि मीनल माझ्याकडे रडत येईल. त्यापेक्षा ते दोघे एकमेकांशी बोलले तर खूपच चांगलं होईल.

वरूण, राकेश, प्रकाश आरतीशी बोलायला आले. राहुल विचार करत होता. सगळे गोल बसले होते. छान गप्पा मारत होते. अगदी लहानपणापासून ते सगळे सोबत होते. यात प्रकाशची बहिण पण होती. पण आता तिचं लग्न झालं होत. त्यामुळे ती आलेली नव्हती.

सगळ्या जुन्या आठवणी निघत होत्या.  हसून गप्पा होत होत्या. सगळ्यांनी ठरवलं होतं की अजिबात आरतीला रडू द्यायचं नाही.

"चला झोपा आता सकाळी लवकर जायच आहे मंगल कार्यालयात." आजी आवाज देत होती.

"आजी मंगल कार्यालय नाही लग्न रिसॉर्ट वर आहे." वरुण सांगत होता.

"ते काही का असेना रिसॉर्ट फिसाॅर्ट. झोपा आता. चल आरती."

आरती खाली गेली. राहुल विचार करत होता. मीनलशी बोलाव लागेल. त्याची हिम्मत होत नव्हती.

0

🎭 Series Post

View all