ओढ तुझीच रे फक्त भाग 8

Odh Tujhich Re
ओढ तुझीच रे फक्त !!!
भाग 8


एकीकडे आत्या सगळे काम स्वतः करत होती,हे पाहून किसनराव यांना आश्चर्य वाटत होते..

घर तर मोठ्या वाड्यासारखे होते.. श्रीमंतीला कमी नव्हती..

एखादा मोठा महाल होता जणू त्यांच्यासाठी...

किसनराव यांच्या मनात आनंदाच्या लहरी उमटत होत्या ,माझी लेक एकदम आनंदात राहील यात जरा ही शंका नाही.. तिला पाहिजे होते तसेच सगळे काही दिसत होते......

मग नजर मुलाकडे वळली ..नवरा मुलगा होणारा जावई झाला तर नशीब समजा आपले चमकले.. तो ही सुंदर होता ..नाके डोळे ,शरीर येष्टी छान पिळदार होती...वागणे ही एकदम नंबरी होते... जोडा छान दिसेल हे लक्षात येत होते..

मग लगेच नजर त्याच्याच बाजूला बसलेल्या आरतीकडे गेली...आणि जरा मनात कडू घोट गिळला..तोंड पडले जरा...लगेच शंका निर्माण झाली... ही मध्ये माझ्या सुखी स्वप्नात टपकेल का?? मामाची पोर म्हंटले की घोर ...ही तर सीमा पेक्षा ही सुंदर आहे दिसायला... शिकलेली आहे.. आणि पाहिले तर यांचा ही जोडा छानच दिसत आहे.. ह्या विचारातून बराच वेळ ते आरतीकडे नजर रोखून बघत होते... ते तर आरतीला आणि सुरजला ही दिसत होते आणि त्यांचे असे बघणे खटकत ही होते...

"कोण हा माणूस , तू ओळखते ना त्याला आणि ओळख असून हा अश्या नजरेने का बघत होता तुझ्याकडे सारखा ..ठीक आहे तो मुलीसाठी आला आहे त्याच्या पण त्याने तुझ्याकडे रागाने का बघायचे.. मला त्याचे वागणे खटकले आहे खूप..खरे तर हा आत्ताच इथून हाकलून लावला असता.....ह्याला मी डोळ्यासमोर बघूच शकत नाही हं !!! ...हा नाते जोडायला आला आहे फक्त ...पण जणू आजच फिक्स झाले नाते असा त्याचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वाटला ग मला आणि असे कोणी तुझ्याकडे पाहिले तर खूप राग येतो मला...तुला माहीतच आहे हे ,अगदी शाळेत असल्यापासून... मग तो तेव्हाच माझा नजरेतून उरलेला असतो..."

"हम्मम " आरती

"मी काय बोलत आहे येतंय का तुझ्या लक्षात ? "सूरज

" हम्मम " आरती

"अग येतंय ना लक्षात " सूरज जोऱ्यात ओरडून

" अरे हो रे बाबा तू पुढे बघ त्यांच्याकडे ,तुला पहायला आलेत ते ऑफर घेऊन लग्नाची " आरती

" ऑफर ,काय ऑफर ...मी काय वस्तू आहे का ,की डील आहे एखादी " सूरज

आत्या हळूच आरतीला आत बोलवते आणि त्यांना पाणी नेऊन द्यायला सांगते

आरती पाणी घेऊन येते आणि त्यांना देते..

" नको नको मी हे नळाचे पाणी घेत नाही ..मी बिस्लरी घेतो बाहेर " किसन

सगळे आवक होते, त्यांच्याकडे सगळे हसून बघतात...

आत्याला ही जरा नवल वाटते ,माणूस जरा तिरसट हेकेखोर वाटत होता... पण आलेला पाहुणा देव समजून त्याचे सगळे गुण दुर्गुण न लक्ष देता त्याचे स्वागत आनंदाने करावे आणि मग वाटे लावावे ते ही डोकं न लावता हेच आत्याला माहीत होते...

"मी आता मुद्याचे बोलतो ..सीमा माझी मुलगी आहे.. शिक्षण जेमतेम डिग्री पर्यंत झाले आहे ..गुणी सालस ,घरकाम करणारी ,स्वयंपाक जेमतेम करणारी... मुख्य म्हणजे सुंदर ,अगदी तुमच्या मुलाला शोभणारी ...एकदम कशी परफेक्ट बर का... तुमच्या कुळाला साजेशी... आजकाल च्या मुलीसारखी हुल्लड अजिबात नाही "किसन राव आरती कडे बघून बोलत होते.

आत्या " बरं बरं ,अजून काय काय करू शकते तुमची मुलगी ,तिला अजून काय आवडते करायला "

तिला साधी राहणी उच्च विचार सरनी ह्या मार्गावर चालणे खूप आवडते... कोणत्या ही परिस्थितीत ती निभावून नेऊ शकते... ती नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कुठेही काम करू शकते... गरिबी शिरीमंती असा भेद नाही... तिला तुमचे विचार, घर आणि घरातील व्यक्ती बद्दल कळले की किती समंजस ,समजदार आहे ..कसला गर्व नाही ,तेव्हा तिला मी म्हणलो तुला आवडेल का त्यांची सून व्हायला...ती पटकन लाजली हो ,ती म्हणाली फक्त माणुसकी असलेली माणसे हवीत बाबा ..बाकी तुम्ही कराल तसे मी मान्य करेन, ती गरीब माझ्या शब्दा बाहेर जरा ही नाही "

आत्या " बर सांगू मग आम्ही तुम्हाला कधी ,काय कसे पुढे ह्या बद्दल बोलायचे ते ..तुम्ही आमच्या निरोपाची वाट पहा, मला माझ्या घरच्यांचा सल्ला घ्यावा लागेल . आमच्या घरी मी किंवा सूरज चे वडील किंवा त्याचे मामा हे सगळे मिळून तर निर्णय घेतोच पण आमच्या मुलांना ही विचारत घेतो.. आम्हीही माणूस पाहून पुढे पाऊल टाकतो ,आता तुम्ही या ."

सूरज , "आई अग कसले लोक येतात ग स्थळ घेऊन ,मला मुलगी पसंत पडल्याशिवाय बोलणी करायची नाही आणि मुलगी अशीच हवी जिला मी आवडेल माझ्या वडिलांनी प्रॉपर्टी नाही किंवा माझा गलेलठ्ठ पगार नाही . ह्यांच्या बोलण्यातून दिसत होते की जणू हे आतून एक आणि बाहेरून एक आहेत ,हे इतरांचे मत ही गृहीत धरून आपले तेच मत खरे म्हणणारे आहेत ,मग मुलगी ही अशीच असणार आहे "

अरे हो हो ,तू ही नको इतका चिडू मी काय लगेच हो म्हंटले नाही किंवा लगेच तुझे लग्न मी लावायला ही निघालेले नाही.थोडी फार मी ही माणसे ओळखू शकते, लगेच का शितावरून स्वर्ग गाठायचं मी म्हणते... गावाकडची माणसे आहेत ती ,एकदम साधी असतात ..मनात काही पास₹प नसते त्यांच्या आणि मुलगी शिकलेली आहे आणि वडील असे असतील म्हणून मुलगी ही अशीच असेल हे कश्यावरून ..काय बरोबर ना आरती ? तुला काय वाटते , मुलगी गुणी आहे संस्कारी आहे ,मग काय हरकत आहे "

आरती आता आत्याकडे जरा उतरलेल्या चेहऱ्याने बघत तर कधी सूरज कडे बघत होती...आजच तिने ठरवले होते तिच्या मनातले सुरजला सगळे सांगून मोकळे व्हायचे... पण आता तर हे जमेल असे वाटत नव्हते, आत्याला कोण माझी बोलणी करणार माझ्यावतीने...बाबा पण अडून बसले आहेत...ह्यांच्या मध्ये मी सुरजला हरवून बसणार हे नक्की ..

"अग कुठे हरवलीस तू ? तू पण अशी का बावरल्या सारखी वागतेस तेच कळत नाही आरती .. जा घरी जातच आहेस तर तुझ्या बापाला सांग ये जरा विचार विमश करायला ,सांग त्याला माझा निरोप सूरजच्या स्थळा बाबत बोलायचे आहे आत्याला..तो तर कधी कसला ह्या बाबतीत पुढे पाऊल टाकणार नाही ,कोणते स्थळ सुचवणार नाही पण हे आता मलाच करणे भाग आहे... तो आणि आम्ही मिळून आता निर्णय घेऊ ,तू फक्त सुरजला समजावून सांग लग्नाबाबत..."

आरती , "हो कळवते "

"सांग जरा बोलनीच्या तयारीने ये ,सगळे सविस्तर ठरवू सुरजच्या लग्नाचे "आत्या

इकडे आरती अजूनच सुन्न झाली होती ,तिला काही कळत नव्हते ..आली होती तेव्हा ही हरवलेली होती आता जाताना ही हरवून चालली होती... जाताना मात्र सूरज च्या रूम च्या खिडकी कडे नजर ठेवून चालत होती...तो दिसतो का ते बघत होती.....

आत्या कोणाला तरी फोन वरून बोलत होती , " हॅलो ,हा ऐक उद्या ची उद्या बैठक बोलवू आणि काय असेल लग्नाचे ते मामा आणि आपण मिळवून ठरवू...तुम्ही घरी आल्यावर बोलू \""

आरतीने आत्याचे बोलणे ऐकले आणि तिला आता चिंता वाटू लागली होती ,आता आपल्याला हटवून वेळ पुढे निघून गेली आहे.. आता सूरज सोबत बोलण्यात काही अर्थ नाही उरला...

"आत्या येते ग " आरती

ती आता गेट च्या बाहेर रिक्षा साठी थांबली होती ..तिची आवस्था रडवेली झाली होती ..कशी बशी तिने रडवेल्या आवाज ने हाक मारली , पण मनातून एक आवाज येत होता जणू म्हणत होता थांब सूरज थांब मला काही सांगायचं रे ..तिला मनातला तो आवाज आणि डोळ्यातून ओघळणारे अश्रू काही केल्या सुचू देत नव्हते... किती मोठी चूक केली मी हे ती म्हणत होती..तेव्हाच वेळ न लावता मी मनातले सांगून मोकळी झाले असते तर सूरज ला कळले तरी असते की माझे ही प्रेम आहे त्याच्यावर आणि ते त्याने व्यक्त करण्याच्या आधी खूप वर्षापासून आहे, मीच कधी राहू शकत नाही जर तो आसपास दिसला नाही तर...कोणी तरी हवे होते हे सांगायला आत्याला की , आरती हीच सूरज साठी योग्य आहे..आज आई असती तर तिनेच पुढाकार घेतला असता माझ्या आनंदासाठी...तिचा अहंकार कधीच आडवा नसता आला ह्या नात्यात.. पण नाही आई नाही ना ...

आरतीला फोन येतो ,तो पुजाचा असतो .पुजाचा फोन पाहून तिला अजून रडू येते आणि ती फोन उचलून रडू लागते...पूजाला काहीच सुचत नाही आरतीला काय झाले ते...ती तिला विचारण्याचा प्रयत्न करते पण आरतीचे रडणे थांबत नाही..इकडे पूजाला काहीच कळत नाही ,ती तिला रडणे थांबवायला सांगत असते ,नेमके काय झाले सांग म्हणत असते...

"अग सगळे संपले ग ,आता मी तुमच्या घरी सूरज ची कोणी ही म्हणून ,कोणत्या हक्काच्या नात्याने येऊ शकणार नाही ..तु म्हणत होतीस की मला माझ्या मनातले सुरजला सगळे सांगून मोकळे व्हायला हवे होते ...पण ते सांगण्या आधीच त्याला ते स्थळ सांगून आले आहे ,ज्याला आत्याचा होकार आहे आणि ती उद्या सगळ्यांचे विचार घेऊन होकार देणार आहे...काय ग हे माझ्या नशिबात का .." आरती रडत त्या जागेवर उतरली जिथे सुरजने तिला प्रपोज केले होते .तिला तो सुखद धक्का दिला होता.. तिला इथे थांबून ते क्षण आठवायचे होते जे एकदम अचानक तिच्या नकळत आयुष्यात आले होते ,सूरज ने ते आणले होते... ती तेव्हाही इथेच स्तब्ध झाली होती...अशीच एक झुळूक तिला स्पर्श करून मोहरून गेली होती...ती जणू त्याच्या प्रेमाच्या त्या स्पर्शाने वाऱ्यासोबत वाहून उडत होती, तिला जग जणू ठेंगणे भासत होते.. त्या क्षणाच्या मोहात तिला काहीच सुचले नव्हते आणि म्हणून तिने त्यालाही असेच काही सरप्राईज द्यायचे ठरवले होते...जेणे करून त्याला ही ह्या क्षणाची अशीच आठवण राहिली असती...तो कालचा दिवस होता आनंदाला उधाण आले होते आणि हा आजचा दिवस आहे..ज्याने हे असीम दुःख द्यायचे जणू ठरवले होते... सगळे जणू क्षणात विरून हवेत उडून दूर जाताना दिसत आहे आणि मी काही करू शकत नाही ...काल तो ही इथे होता ,कित्येक स्वप्न उराशी बाळगून आणि मी ही त्याच्या सोबत हरवून गेले होते.....माझे असे प्रेमाचे हक्काचे कोणी नाही ..जो होता ,आला होता तोच इतर कोणाचा तरी होताना बघावा लागणार आहे... मी कोणाची नाही ना कोणी माझे.... आरती खूप रडत होती...एकटी ती त्या बाकड्यावर बसून रडत होती....तितक्यात परत पुजाचा फोन वाजला...

तिने डोळे पुसत ...हुंदके थांबवत फोन घेतला.. तरी हुंदक्यांचा आवाज दबत नव्हता... रडू आवरता आवरत नव्हते.....

तिकडून आवाज आला ," कुठेस तू ?घरी का गेली नाहीस ..मामाचा फोन आला होता मला ,विचारत होता तू पोहचली नाही ..कधी पोहचणार आहे.. निदान मला सांगून तरी जायचं ना...इतक्या संध्याकाळी एकटीच निघून गेलीस... तुला काही कळते का ,मी किती काळजीत आहे ते...मामा किती काळजीत आहे ते...बिनडोक मुलगी...तू काळजात धस्स करून ठेवले...आता सांग कुठे आहेस तू मी तुला घ्यायला येत आहे... जिथे असशील तिथेच थांब आणि ते रडणे बंद कर...त्याने मला त्रास होत आहे....
मी तुला रडतांना बघू शकत नाही...तुला कोणी रडवलेले मला तेही आवडणार नाही... अगदी तू ही माझ्या आरतीला रडवलेले मी आवडणार नाही..."

आरती ," सूरज मी खूप उशीर केला आहे, आता तू इकडे काय माझ्या आयुष्यात ही ये शक्य नाही दिसत ,तू नको येऊ मी स्वतःला सांभाळून घेत घरी जाईल ,मी काळजी घेईन "

सुरज "बस कर आता खूप ऐकून घेतले मी तुझे ..आता या पेक्षा जास्त मी ऐकून घेणार नाही ,जशी आहे तशीच रहा,तिथेच रहा मी निघत आहे घरातून.. 5 मिनिटं लागतील मला ,आपल्या दोघात फार अंतर नाही.माझ्या शिवाय तू पुढे जाणार नाही ,ना मी तुला पुढे एकटीला जाऊ देणार..म्हणूनच मी जे मनात होते ते बोललो ,मी त्यावर ठाम आहे "

( हा आवाज सूरज चा होता ..त्याला आरतीने दुःखी होने ,रडणे ,कधीच आवडले नव्हते ..तिची आई नाही हे जेव्हा त्याला मोठे झाल्यावर कळले ,तेव्हा त्याने ठरवले होते तिला कधी रडवायचे नाही ..तिला दुःख होईल आईची आठवण येईल असे वागायचे नाही...कोणी दुःख देईल तिला रडवेल हे त्याला कधी आवडले नाही... आरती मैत्रीण तर झालीच त्याची , पण ती मनात कायम वसली होती... ते प्रेम की काय त्याला माहित नव्हते... तो तर कधी तिच्या वाटणीला आलेले काम ही तोच करत असे... ती कधी दूर जाऊ नये असे वाटू लागले होते.... अश्यात मग ते दोघे मोठे होत असताना मामा आरतीला दूर घेऊन गेला तेव्हा कित्येक दिवस त्याला चैन पडली नव्हती.. तिच्या आठवणीत त्याने शांत रहाणे सुरू केले होते... हे दोघांचे नाते जणू वेगळे वळण घेत होते.. त्याच्या आईला हे कळत होते... तिला फक्त योग्य वेळेची संधी शोधायची होती... )


आरती, "हम्मम ,मी वाट बघतेय "

डोळ्यात येणारे अश्रू पुसत ती त्या जागेवर उभी होती.. मनात म्हणत होती ,काल चा तो क्षण पुन्हा यावा आणि तिथून सुरू व्हावा जिथे त्याने त्याच्या मनातले भाव माझ्या कानी बोलून दाखवले होते आणि मला विचारले होते.. माझ्या उत्तराची वाट तो पहात मला इशारा करत होता की, मी ही आता बोलून टाकावे... मग मी ही लगेच बोलून टाकेल.ते ही क्षणाचा ही विलंब ना लावता...त्याच्या मिठीत जाऊन त्याच्या कानात सांगेन..."हो तू ही मला खूप खूप आवडतोस, मग कोणी नकार जरी दिला तरी मी ,तुझीच रे "

तो घरातून तयारी न करताच आहे त्या अवतारात खाली येत होता .गाडीची चावी घेऊन झप झप पायऱ्या उतरत होता, पूजा तिकडून त्याची ही घाई बघून नेमके काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी अंगणात धावत आली "दादा कुठे निघालास " प्रश्नार्थक हात करून

सूरज," घाईत आहे ताई ..आल्यावर सांगतो ,खूप अर्जेन्ट आहे ,ती वाट बघत आहे ..आरती घरी पोहचली नाही अजून ,तिला घरी सोडून येतो..तुम्ही माझी वाट नका बघू,मी तिकडून जेवून येईल "

सूरज अगदी जोरात बाईक चालवून आरती कडे कमी वेळात पोहचतो ..त्याला ती बसलेली दिसते, तो तिच्या जवळ गाडी उभी करतो . हेल्मेट काढतो आणि तिला हात देऊन उठवतो ..तो तिचा हात हातात घेऊन ,आज पुन्हा तो कालचा क्षण तिच्यासाठी पुन्हा जागवत असतो ..तिचे रडणाऱ्या चेहऱ्यावर हात फिरवतो, तिचे त्याला पाहून न थांबणारे अश्रू पुसत म्हणतो " आज पुन्हा मी ह्याच ठिकाणी ,ह्याच वेळी ,ह्याच माझ्या प्रिय सखीला विचारतो ,की तू माझ्याशी लग्न करशील का ? माझी साथ देशील का ?हो म्हणशील का ? ती ओढ फक्त तुझ्याचसाठी लावशील का ? आज तरी ते तीन मंतरलेले शब्द माझ्या कानी सांगशील का ? की आज ही तू काल सारखे वागशील का ? "

आरती जवळ येऊन मिठी मारून त्याच्या कानात सांगून गेली ,थोडी तिची ओढ त्याच्यासाठी जास्तच रंगत जावी अशी झाली ..मिठीत ही अजब जादू अनुभवली जणू ,त्या वेळी हसू की रडू तिला कळत नव्हते, तिचे काही क्षणापूर्वी मनाला सांगितलेले स्वप्न पूर्ण होत होते ...तिला आता कसलीही काळजी वाटत नव्हती...सूरज सोबत असाच असेल तर काही ही अशक्य नसेल...आता सगळे स्वप्न प्रत्यक्षात येतील ही मनोमन खात्री होती....मनात किंतुपरन्तु नव्हता... सगळा आसमंत तिचाच होता... आभाळी जे काही क्षणापूर्वी अस्पष्ट होते ते मोकळे होऊन त्यातील चांदणे चमकले होते...हळूच ती मिठीतुन बाहेर येत होती ,उबदार ती मिठी त्याची सूट नव्हती तसेच सोडावी ही वाटत नव्हती ..तो असाच कायम जवळ रहावा हे आज खऱ्या अर्थाने वाटू लागले होते ,"

" आरती आता इकडे बघ माझ्याकडे " सूरज

"मला ही मिठी हा क्षण असाच घट्ट धरून ठेवावासा वाटतो ..अगदी तुला मी धरून ठेवले आहे तसेच,भरभरून जगू दे हा मोह प्रीतीचा
बस मग काही नकोय " आरती

" हो अग मला ही तसेच वाटते " सुरज

" मी आज सगळे जिंकल्यासारखे वाटते ,तू नव्हतास तर वेडीपीसी झाले होते ..वाटले तू निसटून जात आहेस दूर " आरती

" असा कसा जाईल आणि तुला सोडून कुठे ही जाणे आता शक्यच नाही ..मी फक्त तुझाच आहे ,असणार आहे " सुरज

" ए वेडा बाई, इकडे माझ्याकडे बघ तर " सूरज

सूरज तिची मान वर करत म्हणत होता

" हम्म बोल ,आज मी तुझे सगळे ऐकणार ..अगदी मनभरून ,प्राण एकवटून " आरती

" ऐक मी आज नाही पण उद्या आईकडे माझ्या मनातले बोलून मोकळा होणार ...मनावरचा हा भार हलका करणार हे नक्की आणि तू ही मामाला सांग " सूरज

" ते माझे बाबा आहेत सूरज त्यांना माझे भाव आणि मन खूप चांगलेच कळते ,आत्तापर्यंत त्यांना कळले असणार माझ्या मनातले ..माझे उदास होने, तुझ्यामध्ये माझे गुंतत जाणे, तुझ्या भेटीसाठी घरी बहाणे करून येणे, तुला पाहून आनंदी होने, खरे तर मी सांगण्याआधीच त्यांना कळले असणार हे नक्कीच " आरती

" हो ग मामा खरंच खूप हळवा आहे तुझ्यासाठी खूप, तो केव्हा ही तुझ्या आनंदासाठी होकार द्यायला तयार असेल आणि तो देईल ही " सूरज

" चल आता निघू ?..बाबा वाट बघत असेल घरी ..काळजी करत असेल आणि जेवायला ही थांबला असेल ,आता ही मिठी सैल करावीच लागेल ..हो पण ही ही सोडणार नाही कधीच " आरती

" तूच जशी सोडणार नाही तशी मी ही सुटू देणार नाही , तुझ्या मिठीची उब आणि भाव कायमस्वरूपी ह्या जीवाला अंतकरणापर्यंत स्पर्श करून गेले आहेत ,हे विसरणे आता शक्य नाही "
सूरज

सूरज आरतीला बाईकवर बसवून निघायच्या तयारीत असतो ,ती मागे बसते तेव्हा पुन्हा त्या मिठीच्या स्पर्शाने भारावून गेलेली आरती त्याला बिलगते ..गार वारा तिला अजूनच मोहरून टाकत असतो, घर जवळ येताच हळूच मागे होते... त्याच्या प्रीती सुगंधात नाहून निघालेली आरती घरी आल्यावर खुललेली आरती वेगळ्याच आनंदात असते, जणू पाय जमिनीवर नसतात...सूरज तिच्या बटांसोबत जणू धुंद होऊन जात घरी येतो... तिचा गंध त्याला ही धुंद करून टाकतो...

बाबा तिची वाट बघत उभे होते

" आरती खूप उशीर झाला होता तर आत्याकडे मुक्काम केला असता तरी चालले असते ग ते ही तुझेच घर आहे ना " बाबा

बाबांचे हे बोलणे आरती आणि सुरजला चकित करून गेले होते ..जणूदोघे ही एकमेकांकडे बघत होते ,जरा अवघडल्यासारखं वाटले होते दोघांना.. मामा असा का म्हणाला असेल, त्याला काही शंका तर आली नसेल ना ,की आम्ही दोघे लग्नाचा विचार करत आहोत ते... ते ही त्यांच्यापासून लपवून ...

आरती " बाबा अरे तू इथे माझी वाटत बघत आहेस हे मला माहित नाही का ,तू माझ्याशिवाय जेवत नाहीस हे मला माहित असून मी का तिकडे थांबू रे ? "

बाबा " आरती मला तुझ्या मनातले आता कुठे थोडे थोडे माहीत होत आहे, बाबा म्हणून आधी मी कधीच तुझ्या मनातले जाणून घेतले नाही ,कारण मला वाटायचे की सूरजकडे फक्त मित्र म्हणून बघत असशील ..पण तू त्याला त्या पलीकडे जाऊन काही खास मानते आहे हे खूप आधीच समजले होते, तेव्हाच ठरवले तू आत्याच्या घरी सून म्हणून जावं ..सूरज ची संगिनी म्हणून सुखाने संसार करावा ,एक वहिनी म्हणून आदर्श निर्माण करावा ,पण सीमा चे स्थळ आले ..ज्यावर ताईचा विचार होऊ लागला आणि परत माझ्या विचारांनी माघार घेतली ,पण तरी तुझ्या मनात सुरजची जागा अढळ असेल तर मी ताईकडे तुझ्या आनंदाचे मागणे मागेन, मी उद्याच त्यांच्या घरी जाईल "

" मामा ,अरे तू खरंच किती समजून घेतोस आमचे हे बंध ,हे आमच्यातील बदतले नाते..खरंच मी तुला वचन देतो की आई ही या लग्नाला तयार होईल आणि मी तुझ्या लाडक्या आरतीला आजन्म खुश ठेवेन ..फक्त तुझी अशीच साथ हवी ,तुझे आशिर्वाद आणि प्रेम सदोनीत हवे ..मग मी जग जिंकले असे समजेन " सूरज असे बोलून मामाला कडकडून मिठी मारतो... मामा त्याची पाठ थोपाटतो...आरतीचा हात धरून सुरजच्या हातात देतो...अश्रू अनावर होत असून सुखी राहण्याचे आशिर्वाद देतो...

आपल्या मोठ्या घरातील त्या लिहिलेल्या आरती नावाकडे अश्रू नयनांनी बघत रहातो.. आरती आता कायमची सासरी जाणार ह्या अनामिक पोकळीने मन उदास होते...सूरज मामाकडे येऊन म्हणतो " तुला कधीच एकटेपणा वाटणार नाही आरती गेल्यावर, ना तुला एकटे सोडणार आम्ही कधीच "

इकडे मामा आरती आणि सुरजला आपल्या मिठीत घेतो ,तो खुश ही असतो आणि थोडं विरहाच्या दुःखाने दुःखी ही...

सूरज जेवण करून घरी जातो ,आज मन आनंदाने भरून पावलेले असते... सगळे कसे तृप्त झाल्या सारखे वाटत होते...आरती ,मामा आणि सुरज या तिघांना ही...

आत्याच्या मनात नेहमी एकच एक की जर ह्यांच्या मनात आहेच तर मग पुढे येऊन हे दोघे आणि माझा भाऊ बोलून मोकळे का होत नाहीत.. मग तर ह्यासाठी मला किसन च्या स्थळाला होकार द्यावा लागेल...म्हणजे नाक दाबून बघावे लागले तरी चालेल...

..आत्याच्या मनातील हे विचार कितपत पूर्ण होईल ?होईल की नाही ? ...की नव्या वळणावर नव्या नात्याने कुठे जोडले जाईल ?..... कोण कुठे कसे निर्णय घेईल ...ही ओढ काय सांगून जाईल पाहू पुढील भागात...


क्रमशः

🎭 Series Post

View all