ओढ तुझीच रे फक्त भाग 9

Odh Tujhich Re Phkt
भाग 9

आरतीची आई आरती लहान असतांना देवा घरी गेली. तेव्हा आत्याची नेमकीच हार्ट ची सर्जरी होणार होती, त्यासाठी हार्ट ट्रान्सप्लांट करणार होते.
आत्याला वाचवणे खूप गरजेचे होते त्यांना कोणाचे तरी हृदय देणे गरजेचे होते. तिकडे आरती साठी आई वाचवण्याची प्रार्थना सगळे करत होते, जेमतेम पाच वर्षाची होती आरती तेव्हा.

"आई नसलेल्या आरतीला मायेची उब कोण देईल ,आता माझ्या आरतीला कोण आईची माया देईल ह्याची मला खूप काळजी वाटत आहे.. आईविना ती कधीच कुठे क्षणभर ही राहिली नाही आता जर तिने विचारले की,बाबा आई कुठे ? मला आई कडे घेऊन चल ..मला आई हवी आहे तर तिला काय सांगू " मामा प्रकाश राव यांच्या कडे रडत होता...

प्रकाशराव,"आरती आता माझी ..म्हणजे आमची . आपली सगळ्यांची जबाबदारी समजा... ती काय आणि पूजा काय मला किंवा पूजाच्या आईला कधी वेगळी नसणार . तुम्ही निश्चिन्त होऊन तिच्या आईसोबत उरलेले क्षण घालावा. "

इकडे आरतीच्या आईला काहीच दिवस शिल्लक राहिले होते. तिच्या आईच्या निधनानंतर ठरले की तिचे हृदय आत्याला देऊ ,जेणे करून आरतीची आई हृदय रुपात सतत तिच्या जवळच राहील.


आत्याने ही ते मनासपासून मान्य केले होते. आत्याने मनोमन ठरवले होते की, आरती इथून कुठे जाणार नाही. आज ती लेक आहे ह्या घराची उद्या ती पुजाची वहिनी म्हणून येईल हे नक्की.

आत्याला आरतीच्या आईकडून जीवन दान मिळाले ह्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली आत्या म्हणाल्या," मी आरतीची आई होऊन तिचे चांगले झालेले पाहिल तेव्हाच मी ह्या ओझ्यातून मुक्त होईल ".

हे नाते आई मुलीचे न रहाता त्याला नवीन ओळख द्यावी . जेणे करून ती कायमस्वरूपी माझ्या सोबत राहील आणि तिच्या आईच्या हृदया जवळ ही असेल. असे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा आरतीच ह्या घराची सून होऊ शकते.

तीच ह्या घरी भाग्य घेऊन येऊ शकते.


तीच पुन्हा तो दुवा होऊ शकते जो मला दादाला माझ्याशी जोडून ठेऊ शकते. नात्यात ओलावा टिकवून ठेवू शकते. माझ्या भावाची काळजी मग कमी होईल जेव्हा ती त्याच्या नजरे समोर असेल.

कोणी दुसरा असला जरी तरी कुठे तो असेल ,मग कुठून येऊन तो माझ्या भावाची काळजी घेईल. मग पुन्हा माझे नाते दुरावणार. दादा वय झाल्यावर आरती कडे रहायला जाणार हा विचार आत्याला त्रास देत. यावर उपाय फक्त एकच. आरतीला माझ्या सुरजची संगिनी म्हणून घरी आणणे.

प्रकाशराव, "अग इतकी घाई बरी नाही ,तू खूप लवकर निर्णय घेत आहेस. तू कधी काळी म्हणाली होतीस आरतीचे सूरज सोबत लग्न लावून देणार ते,मग आता काय विसर पडला का तुला त्या दिलेल्या वचनाचा. "

आई , "नाही पण अजून किती दिवस हे भिजत घोंगड ठेवायचं मी म्हणते, काळजी काय फक्त मलाच असावी का...ज्यांना लग्न करायचे आहे , ज्यांचे एकमेकांवर प्रेम आहे त्यांना नको का कसली काळजी, बात इथपर्यंत येऊन ठेपली आहे तरी दोघे काहीच बोलत नाहीत. म्हणूनच मला हा निर्णय घेणे भाग आहे. "

प्रकाशराव, "अग ते दोघे आपला मान ठेवत आहेत .ते कसे येऊन म्हणतील आमचं प्रेम आहे आणि आमचे लग्न लावून द्या ,त्यांना हा पोरकटपणा वाटत असेल ,म्हणून आपणच समजून घेऊ. "

आई,"कळतंय मला सगळं."

प्रकाश राव , "मग नको ह्या स्थळाला घरी बोलवू "

सुरजची आई , " मला कुठे ह्या स्थळासाठी धडपड करायची आहे हो .मी तर सुरजचे भले कशात आहे तेच बघणार ना ,ते तुम्हाला नाही कळणार."

प्रकाश राव, " जर त्यांना आपल्या कडून कळत नकळत होकार वाटला तर सगळे होत्याचे नव्हते होईल "

आई, "तसे काही होणार नाही ..मी सांभाळून घेईल हो सगळे, निदान तेव्हा तरी त्यांचे कशात भले आहे हे उमजेल ते बघायचे आहे,"

आत्याने आज सुरजच्या स्थळासाठी घरातील सगळयांना एकत्रित बोलावून काही निर्णय घ्यायचा ठरवला होता.

त्यासाठी मामाला ही बोलावले होते .आज तो काय निर्णय सांगेल ,त्याला काय सुचवायचे आहे का,काही ठरवले आहे का आरती बद्दल की, ह्या व्यतिरिक्त ही बोलेले. निदान ह्या वेळी तरी मनातले सांगेल.

त्यात सूरज चे व्ययक्तिक काय बाजू आहे हे बोलण्याची संधी असेलच. इथे पूजा आणि आहो यांचे काही मत आहे का हे ऐकल्याशिवाय पुढच पाऊल उचलायचे नाही किंवा सगळ्यांना सीमा ह्या घरची सून व्हावी असे जर वाटत असेल तर ,बोलणी पुढे जाईल आणि वाटत नसेल तरी बोलणी पुढे केली जाईल..

पुज्याचे हे पहिलेच स्थळ चालून आले होते.. तसे ही लग्न वय उलटून गेल्यावर काय अर्थ आहे... निर्णय झटपट नक्कीच घेण्यात ही अर्थ नाही. पुढे चालून काही मतभेद नको ,त्यातून वेगळे होने हा उपाय नको.

सूरज, " आई घाई नको करू, मी माझे निर्णय तुला कळवले. मी अपेक्षा करतो की, जो माझा निर्णय असेल तोच तुला ही मान्य असेल आणि जशी तू म्हणतेस की, सगळ्यांना मान्य असेल तरच तू पुढे बोलणी करणार आहेस आणि नसेल तरी तू बोलणी करणार आहेस ,तसेच मी ही सांगतो की ,तुला माझा निर्णय मान्य असो वा नसो मी त्यावरच ठाम राहणार आहे "

आत्या, "मी रीत आहे म्हणून आलेले स्थळ एकदम नाकारून टाकू शकत नाही ,मला सगळी खात्री करावी लागेल, तोडून मोकळे होने सहज नाही ,ठोस कारण हवे असते. तुम्ही मुलं खेळ समजणार असाल लग्नाला तरी मी तसे करणार नाही ,सीमाला मी बघणार ,परखणार आणि मला हवे तेच करणार ,थोडा आमच्यावर विश्वास ठेवा"

सूरज जरा टेन्शन मध्ये होता आज आत्ता मी खरे काय ते नाही सांगितले तर आईला कसे कळणार की, मला आता आरती सोडून कोणीही माझ्या आयुष्यात नको आहे, मलाच काही तरी करावे लागणार आहे. तिकडे मामा आणि आरती, यांचा माझ्या पसंतीला होकार मिळाला आहे .आता आईने सहमती दर्शवावी ,ताई ला ही आरती आवडते आणि बाबा तर खूप आधीपासूनच तयार होते...

----------------------------------------------------------

काही दिवसांनी किसनला आत्या, सीमाला घेऊन घरी बोलवते...

इकडे सुरजच्या घरी बोलावणे आले आहे म्हणून किसनच्या घरी जोरदार तयारी सुरू होते, होणाऱ्या सासूबाई मुलीला बघणार आहेत म्हंटल्यावर, तिच्यासाठी खास साडी ,खोटे दागिने ,मेकअप सामान ह्या तयारी ला घरचे जुंपले होते. जेणे करून सीमा सुंदर दिसावी आणि बघताच आत्याला आवडावी. मुलाला ही पसंत पडावी. मग त्यात तिच्या शिक्षणाचा विषयच समोर येऊ नये. दुसरे म्हणजे सीमाला नेहमी समोरच्या माणसाचे मन ओळखून बोलण्याची सवय होती. ह्या गुणांमुळे सीमा त्या लोकांच्या नजरेत भरेल आणि लगोलग होकार मिळेल.

मुलगी आवडली की मग, बाकी पुढच्या पुढे बघता येईल , मुख्य हेतू म्हणजे सीमाचे ह्या घरात सून होऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दे .

क्रमश:..

🎭 Series Post

View all