ओढ तुझीच रे फक्त भाग 4

Odh Tujhich Re


भाग 4

ओढ तुझीच रे फक्त !!

इकडे सूरज मामाला जेवायला थांब म्हणाला होता ,पण जेवण तयार झाल्यावर त्याने मामाला हाक मारली ,"अरे मामा चल ये जेवायला ,आता खूप कडकडून भूक लागली आहे ,आणि मी तर म्हणतो की आरतीला ही बोलून घेतो मी ,तिला एकटीला तिथे घरी तुझ्याविना करमणार नाही "

सुरजला मामाचा काही रिप्लाय आला नाही ,मग आवाज गेला नसेल माझा मामा पर्यंत असे समजून तोच बाहेर अंगणात पळत आला, तिथे फक्त आई बसली होती.. आणि मामा तिथे ही नव्हता... तो आत ही हाक मारू लागला, त्याला वाटले की मामा आणि वडील गप्पा मारत बसले असतील ,पण तो तिथे ही नव्हता...


तो परत आई कडे आला , "अग बघ तर मामाला इतक्या हाका देत आहे मी ,तरी मामा काही ओ देईना ,त्याच्या पर्यंत माझा आवाज जात नाही असे समजून मी बाहेर आलो ,पण हा मामा इथे ही नाही ग, का असा हा अचानक निघून काय जातो न सांगता !!"


आई," गेला असेल घरी, ती आरती त्याची मुलगी एकटीच असेल बाबा, आणि नाहीतरी त्याला तुझा काय आणि माझा काय आवाज कधी पोहचलाच नाही ,म्हणून तर सगळे घडत आहे ,त्याला कळून ही न कळल्यासारखे वागतो तुझा मामा "


सूरज," आई तू कठीण आहेस ग ,किती पटकन तू दूर करतेस ग मामाला ,आणि तू म्हणतेस ना तुझा खूप जीव आहे त्याच्यावर आणि आरतीवर मग अशी कशी ग तू बोलू शकतेस, आणि म्हणूनच मामा निघून गेला असेल ,नको ग असं वागत जाऊस तू ,दुखतं होते ग मनाला माणसाच्या ."

आई, "नेमके कोणत्या माणसाच्या मनाला दुखते ,तू की त्या माणसाच्या मनाला दुखले "

आई आता बास कर ग, तू इतकी पण मनाने निष्ठुर नाही आहेस मग का करतेस तू अशी थांबू आपण हे ,मी मामाकडे जातोय ,तिकडेच जेवण घेऊन जाणार ,आणि बाबा पण येतील ,मामाचे मन मोकळे होईल ,किती प्रेमाने आला असेल तुझ्याकडे ,आणि तुझ्याशिवाय कोण आहे ग त्याचे तरी ,मग नको ग हा दुरावा ,आतून तुला ही त्याच्या बद्दल आणि आरती बद्दल किती ओढ आहे हे मला आणि आम्हाला सगळ्यांना माहीत आहे " सूरज आईला रागावून बोलत होता..


सुरुवातीला आई सूरज आणि आरतीच्या नात्याला नकार देत होती ,पण मनात कुठे तरी भावा बद्दल राग होता ,त्याला ह्या नात्याला नवीन ओळख द्यावी असे वाटत नव्हते, कारण ही कधी संध्या ताईने समजून घेतले नव्हते.. त्याला आपली ताई गमावण्याची भीती होती ,नवीन नाते हावी झाले तर मी ताईच्या प्रेमाला मायेला गमावून तर बसणार नाही ना ,ह्याची अनामिक भीती त्याला वाटत होती ,तो त्या मनातील भीती बद्दल ताई सोबत बोलला ही होता,

ताई म्हणाली ,"नाही रे आपले नाते जसे आहे तसेच राहील याची मी तुला खात्री देते, पण माझी आरती माझ्याच घरी सून म्हणून येऊ दे ,मी तिला लेकी इतकेच प्रेम देईल "


सूरज आई आणि मामाचे हे नाते होण्याबद्दल झालेले ऐकता ऐकता मोठा झाला होता,तेव्हा त्याला फार कळत नव्हते हो पण मैत्रीण म्हणून त्याला आरती आवडत असे, आणि आता तर त्याला ती आवडू लागली होती, तीच्या कडे तो भावी संगिनी म्हणून बघत, पण तिला हे नाते आवडेल का ,की मीच म्हणतो म्हणून तिने आपल्यासोबत लग्न करावे, जर असे जबरदस्तीने झाले तर ,आहे ती मैत्रीण ही गमावून बसेल ,आणि ते त्याला नको होते .त्याला त्याचे आणि आरतीचे बंध जुळायला तर हवेच होते पण तो ते, मामाच्या कला कलाने घेऊ पहात होता.. मामाचे मन वळवू पहात होता ,त्याला मामाचे मन जिंकायचे होते.. आणि मग आरतीचे मन जिंकून तिचा होकार मिळवायचा होता.. तो त्यासाठी ही धडपड करत असावा..त्याला आईची तगमग ही लक्षात येत होती, खरे तर आरती घरात सगळयांनाच पसंत होती आणि आहे, फक्त त्यात मामाची परवानगी हवी होती ,ती मिळवायची होती ,त्याचा नकार होकारात बदलावायचा होता,आणि आईला नेमके तेच जमत नव्हते.. मग तिथेच तर दोघांमध्ये दुरावा निर्माण होत होता...

इकडे मामासाठी जेवण घेऊन जायला सूरज तयार झाला होता ,सोबत बाबा ही येणार होते ,मग काय पूजा ही त्यांना सामील झाली होती, ते तिघे ही मामाकडे कार ने जाणार हे आईला ही माहीत झाले, तिला ही आग्रह केला खूप सगळ्यांनी पण ती येणार नाही असे सांगितले,राग नव्हता पण ती खूप थकली होती, पण जातांना तिने भावासाठी खास बनवलेली बेसन लाडू दिले होते... सगळे आता मामाच्या घरी पोहचले होते...


गाडी दारात हॉर्न वाजवत आली होती... अंगणात आरतीचे पाळलेला कुत्रा असल्याने सूरज जरा भीतच उतरला, तिकडून छान मोकळे केस बांधत आरती बाहेर आली, त्याला आरतीला पाहून काही सुचेना ,ती त्याला विचारत होती ,"अरे आज इकडे कसे तुम्ही सर्व, किती मस्त सरप्राईस दिले तुम्ही आम्हाला ,नेमकी कोणाची आयडिया आहे ही "
इतके बोलून ही सूरज चे लक्ष तिच्या वरून हटता हटत नव्हते.. जणू ह्या आरतीला पहिल्यांदाच बघत होता तो.. मग पूजा ने जोरात हॉर्न वाजवला तेव्हा कुठे तो भानावर आला होता...


आज आत्ता सगळ्यांना जे दिसले आणि जाणवले तेच मामाला ही दिसले होते... फक्त आरतीलाच सुरजची ओढ लागली नव्हती तर सुरजला ही आरतीची ओढ लागली आहे हे मामाला दिसले आणि जाणवले होते... मग उगाच तिला ह्या नात्यात अंतर ठेवायला का मी सांगत होतो ,का मीच हे नातं होऊ नये म्हणून अंतर ठेवत होतो ,जर हेच आरतीचे भाग्य असेल तर हे भाग्य आपण का हेरवून घ्यायचे ..पण आता मी जरी तयार असलो तरी ताई मात्र ह्या नात्याला तयार नाही हे मी अनुभवले आहे ,पण हे ना सूरज ला माहीत आहे ना हे आरतीला माहीत आहे... तिने माझ्या बद्दल असलेली ओढ कमी केली आहे ,तिला आरती आता सून म्हणून नको आहे..

ताईला आता ह्या नात्यासाठी तयार करणे खूप कठीण आहे, ती जर तयार झाली नाही तर ती उद्या येऊ घातलेल्या स्थळाला ही घाईघाईत आणि अंहकारा पायी हो म्हणून बसेल, आणि तेच जर व्हायला नको असेल तर मला ,सूरज आणि आरतीच्या नात्याला होकार द्यावाच लागेल, नाहीतर नको ते नाते जुळुन गेले तर हे घर घर रहाणार नाही, स्वार्थी लोकांचे मनसुबे पूर्ण होतील ..


सगळे खूप खुश होते ,पूजा ,सूरज ,प्रकाश राव ही किती तरी दिवसांनी असे मोकळे हसले असतील ,आज किती तरी दिवसांनी अशी एकत्र मैफिल जमली होती, किती तरी दिवसांनी हे सगळे मामाच्या घरी आले होते... पूजाने वाढायला सुरुवात केली...आरतीने सॅलड कापले होते.. सुरजने आईने दिलेले लाडू काढून मामाकडे दिले होते... ते लाडू बघताच मामाला खूप बरे वाटले..

इकडे सगळ्यांचे ताट पूजाने वाढले होते तर मामाचे ताट खास सुरजने वाढले होते ,त्याने आज मामाच्या बाजूला बसने पसंत केले होते.. पूजा आरती एकाच ताटात बसल्या होत्या, आज गप्पांची जणू मैफल जमली होती... मस्त थंड वारा आणि अंगणात बाज टाकून सगळे जेवणाचा आस्वाद घेत होते.. जुने गाणे लावण्यात आले होते.. तर कंदिलाच्या प्रकाशात जेवणाचा स्वाद घेत होते... जेवण झाल्यावर अवरा आवरी झाली आणि पूजा,आरती आणि सूरज पायी चालत कुल्फी खायला बाहेर पडले होते...

चंद्र ही आज खूप प्रकाशमान झाला होता, पूर्णिमा होती आणि अंधारात ही सुरजला आरती जणू एखाद्या चांदणी सम दिसत होती ,कधी लक्ष पुज्याच्या बोलण्याकडे होते तर कधी हळूच नजर चुकवून आरतीला बघत होता... हळूहळू पूजा मुद्दाम पुढे जात होती ,तर इकडे सुरजने हळूच आरतीच्या हात पकडून तिला मागे ओढले आणि तिच्या कानात " i love you" म्हणाला...

तोच ती ही थोडी स्तब्ध झाली, तो पुढे निघून गेला, तिला खऱ्या अर्थाने ह्या त्याच्या स्पर्शाने आणि ह्या शब्दाने शहारल्या सारखे झाले आज तिला जे हवे होते ते मिळाले होते, भास म्हणून असलेले त्याचे प्रेम सत्यात उतरले होते.. लांबुन बघितलेले तारे जणू जमिनीवर उतरले होते..

इकडे मामा ने ताईचा लाडू खायला घेतला आणि मनात विचार करू लागला ,ताईला आज माझ्या आवडीचे लाडू करावे वाटले, म्हणजे ती अगदीच काही नाराज नाही ,नव्हती पण तरी ती काहीच बोलली नाही आणि मला थांबवले ही नाही ,मग का ती अशी वागली असेन..तिने मनात काही राग धरून बसू नये हीच इच्छा आहे.. तिच्या आनंदासाठी मी ती जे नाते करू इच्छित आहे ते मी तयार आहे ,बाकी देवाची इच्छा ...उद्या मात्र मी माझ्या मुलीचे स्थळ सूरज साठी घेऊन जाईल, मी उद्या भाऊ नाही तर एका मुलीचा बाप म्हणून ताई कडे जाईल.. उद्या मी खऱ्या अर्थाने आरतीच्या पाठवणीची तयारी करेन..

मामाच्या मनाने तर तयारी दाखवली आहे ,इकडे सूरज ने ही आरतीला प्रेमाची कबुली दिली आहे, पण अजून त्याला आरतीकडून ही होकार ऐकायचा आहे...

क्रमशः.....

🎭 Series Post

View all