ओढ तुझीच रे फक्त भाग 3

Odh Tujhich Re


भाग 3
 


इकडे मामाच्या घरी किसन येऊन गेल्यानंतर मामा ,आणि आरती खूप बेचैन होते ,आरतीला ही तो किसन कसा आहे आणि त्याची मुलगी कशी आहे हे माहीत होते... तो आणि मुलगी पैश्यासाठी काही ही करायला तयार होते...


आरतीला मनातून वाटत होते की, सूरज इतर कोणासोबत ही लग्न करो पण त्याने एका अडाणी आणि स्वार्थी मुली सोबत लग्नाला होकार नाही देवो..त्याने जरी नकार दिला तरी आत्याने तरी ही गोड भासवणारी सीमा सूरज साठी पसंत ना करो ...


तिची सुरज साठी ची तळमळ ,अस्वस्थता आता मामाला ही दिसत होती ,का इतकी ही सूरज साठी काळजी करत आहे..

का ? तिला तर सूरज कधीच अवडतला नाही ,ना कधी तिने त्याला त्या नजरेने पाहिले...मग आज किसन आपल्या मुलींसाठी आला आणि आज आरती खूप बेचैन दिसत आहे.. तिला सूरज आवडत असेल का  ? की आता कोणी तरी त्याच्या जीवनात येते हे पाहून तिला त्याच्या बद्दल प्रेम तर निर्माण झाले नसेल ना.. आधी हे असे कधीच वागली नाही..आज अचानक तिला ही बेचैनी ??

आरतीला जर सूरज आवडत असेल आणि मीच माझ्या निर्णयामुळे तिला समजून घेत नसेल तर हे योग्य नाही..तसा ही सूरज गुणी मुलगा आहे ,समंजस आहे.. एक जावई म्हणून खरंच तो चांगला आहेच ...मला ही थोडा वेळ कुठे तरी असे वाटले की किसनच्या मुलीचे नाते सूरज सोबत व्हायला नको की काय, याचे कारण हे तर नसेल की मला ही सूरज... !!!

नाही नाही, मला तो कधी ही आरती साठी नकोच असे ठरवले होते आणि मी तेच करणे योग्य आहे.

मामा ही जरा विचारात पडला होता ,जर सीमा आली सूरज च्या आयुष्यात तर जे व्हायचे आहे तेच होणार आहे ,पण मला सगळे सत्य माहीत असून मी गप्प बसून राहू शकत नाही, ह्यासाठी मी काही करेन पण किसन सोबत नवीन नाते होऊ देणार नाही..मग मला माझा निर्णय बदलावा लागला तरी चालेल, तसे ही भाऊजी म्हणत ,अगदी आरती लहान होती तेव्हा पासून ,की आरती आणि सूरज ची जोडी खूप शोभून दिसेल ,आम्हाला आरती सून म्हणून द्याल ना ,तेव्हा मी म्हणायचो बघू पुढचं पुढे , ह्यावर ताईला खूप राग येत ..तिला वाटत की ती सांभाळू शकेल की नाही , आरतीला म्हणूनच माझ्या मनात आरती तिला सून म्हणून देणार नाही ,तिला आरती खूप आवडतं असे ..पण पुढे भविष्य कोणी पाहिले म्हणून मी हे टाळत असे.. गरिबी श्रीमंती कोणाची कधी टिकून रहात नाही ..दिवस कधी ही कोणाचे ही पालटू शकतात... पण असे नाते जुळले की बहिणी भावाचे प्रेम कमी होते ..उरते ते फक्त व्याही विहिन ,म्हणून मी हे नाते नको म्हणत होतो ,पण जर ताईच्या सुखासाठी जर मला हे नाते स्वीकारावे लागले ,आणि व्याही विहिन व्हावे लागले तरी हरकत नसेल... पण तरी तिच्या मनात नसेल तर मी ही गप्प बसेल... मामा स्वतःशी बोलत होता ..त्याला जणू समजत होते आरती कुठे तरी सूरज मध्ये गुंतत जात आहे..


"बाबा, कुठे हरवलात ,काय विचार करत आहात ,चला चहा ठेवते ,आपण जरा चहा घेऊ मग मार्ग काढू ,आपण अत्यासोबत बोलू आजच, म्हणजे तिला सत्य सांगा "आरती तिच्या वडिलांना लागलेल्या विचार तंद्रीतून काढत होती ..

"अग हो ग सहज विचार करत होतो ,खरंय आज काल मुली मिळणे जितके कठीण झाले आहे तितकेच कठीण चांगल्या मुली मिळणे कठीण झाले आहे ,आणि तितकेच कठीण चांगल्या संस्कारात वाढलेल्या मुली मिळणे कठीण झाले आहे, जो तो फक्त आपले सुख बघत आहे, मुलाला चांगली नौकरी आहे का, त्याला पैसा आहे का हे बघत असतो ,आणि काही ह्या किसन सारखे अडाणी मुलगा ही नौकरीला हवा,पगार ही हवा, घर दार ,आई बाबाचा पैसा हवा ह्या साठी फक्त नाते जोडता येईल यासाठी धडपड करत असतात, मग मुलगी स्वतःच्या पायावर उभी असो नसो, तिला काही स्वतःचा स्वाभिमान असो नसो ,ती दिसायला सुंदर असली म्हणजे ती एका बैठकीत पसंत झालीच समजा ,आणि मग काय येताच घरात कधी नव्हत पाहिलेली श्रीमंती बघून सैरवैर होते... मग नवऱ्याचा पगारावर तिचा हक्क असावा अशी वृत्तीने बळावत जाते... इकडे आई वडील चांगले असतील तर दोन चांगले संस्कार शिकवतील, तू कुठे चुकते ते सांगतील ,सासरी कसे वागायचे हे शिकवतील नसतील तसे तर तिच्या संसाराचा देव्हारा करतील...तसे काही होऊ नये ह्या आलेल्या स्थळासमुळे... कारण ह्या मुलीच्या बहिणीचे आधी एक लग्न त्यांच्या हावरट वागण्यामुळे तुटले आहे ,आता ते सूरज साठी आले आहे...भीती वाटते ग " बाबा आरतीला मनातले सगळे बोलून गेला

आरती लगेच बाबाला धरून उठवत होती ," आपण आजच जाणार आहोत आत्याकडे, मी तयार होऊन येते ,मग आपण लगेच निघू ,मला ही असे आतले मन सांगते ही सूरज साठी योग्य नाही रे बाबा ,ही ती मुलगी नाही जी सुरजला हवी आहे ,"

बाबा आरतीच्या ह्या अश्या बोलण्या कडे बघतच राहिला ,आरतीला आता थांबवायला हवं ,तिने सुरजच्या बाबतीत अति लक्ष देणे हे योग्य नाही, मी भले ही ताईला ह्या स्थळा बद्दल कल्पना देऊन येईल ,पण जर सुरजच्या मनात ही आरती बद्दल काहीच नसेल तर तिचे मन दुखावले जाईल ,आणि अपमान होईल तो वेगळाच ,आरती गुणी आहे,समजदार आहे ,सगळ्यांना सांभाळून ही घेईल ,पण जेव्हा पासून सूरज नौकरीला लागला तेव्हा फक्त एकदा ताई घरी आली होती ,पण तिने कधीच नाते व्हावे या बद्दल एक शब्द ही काढला नाही ..म्हणून जे मनात नाही ते प्रत्यक्षात ही नको..

बाबा,"आरती तू नको यात पडू ,मी जाऊन बोलून येतो ताईला ,तुझी कळकळ कळते मला पण आपण आपल्या मर्यादा ओळखुन राहिलेले योग्य राहील "

इकडे आरती हिरमुसुन जाते, तिच्या मनात कुठेतरी एक प्रेम अंकुर फुटण्याच्या अवस्थेत असतो जो सूरज च्या दिशेने वेगे वाढत असतो, हे तर तिचे तिला ही माहीत नसते,फक्त एकच भावना असते की त्याचे चांगले व्हावे, कोणी तरी त्याला साजेशी संगिनी त्याला मिळावी, पण सीमा ती नाही हे नक्की माहीत होते आरतीला.. पण तिने विचार केला ही नाही की मी हे ठरवणारी कोण लागते सूरज ची, त्याची पसंती कोण असावी हे ठरवणारी मी कोण ,आणि का माझे मन म्हणते की सीमा सूरज साठी योग्य नाही, मूळ तर हे प्रेम आहे जे ठरवत आहे की सूरज साठी कोण असावे...

इकडे मामा ,ताईच्या घरी निघून जातो ,तर इकडे आरती तिचा वाढवलेला पसारा आवरत असते ,तो पसारा मनाचा ही असतो आणि घरातला ही...

संध्या ताई नेटकीच बाहेर बसायला आलेली असते, थोडे उतरते ऊन तिच्या डोळ्यावर चमकत असते ,म्हणून तिला आलेला भाऊ दिसत नाही ,
मामा येताच ताईजवळ येतो ,आणि तिला ऊन लागू नाही म्हणून मुद्दाम सूर्याच्या प्रखर प्रकाशात येऊन आडवा उभा रहातो, तिला सावली होऊन स्वतः ऊन सहन करतो ,जणू तिला कसली झळ बसू नये हीच त्याची इच्छा असते आणि आहे व सदैव राहील ...ताईला त्याचा हेतू समजतो आणि ती आपल्या भावाचा हात धरून त्याला स्वतःजवळ बसवते... तो लहानपणापासून जणू तिने मुलाप्रमाणे वाढवला असल्यामुळे ती मायेने त्याच्या डोक्यावरून आईच्या मायेने ,आणि स्पर्शाने डोक्यावरून हाथ फिरवते..

संध्या ताई ," बोल रघु आज कसा इकडे आला,आज आठवण झाली होय तुला, कधीच नाही वाटले का, ताईच्या आनंदात थोडा तुझा ही वाटा असावा ते, "

रघु मामा, "अग तू नेहमीच विचारत असते ग,पण तुला तुझे व्याप असतात, मला माझे मग ह्यात येणं राहून गेले की गेले ग ताई "

ताई, "आज कसा आलास काही काम होते का "

मामा, "स्थळ आलंय सूरज साठी "

ताई, "तुझी आरती सोडून असेल ना कोणी तरी "

मामा, "हो ग ,किसन च्या मुलीचे स्थळ आहे "

ताई ,"मग तू मध्यस्थी आहेस का त्या साठी "

मामा, "अग तो आला होता ,मला म्हणत होता मी बोलू ह्या बद्दल त्याच्या मुलीसाठी"

ताई बराच वेळ शांत होती ,तिला काही बोलायचे नव्हते ,ना ती मामा सोबत परत काही बोलली

ताई ," तू आला आहेस तर काही खाऊन जा ,मी बघून घेईल मला काय करायचे आहे ते ,परत तू काही मध्ये पडू नकोस,जे मला हवे ते मी बघून घेईल "

मामाला ताईच्या बोलण्यात तुटक पणा जाणवला होता, जणू तिने त्याला परके केले होते.. पण ह्या अश्या तुटक वागण्यामुळे त्याने खरी परिस्थिती काही सांगितली नाही ,तो सांगू शकला नाही..त्याला त्याची खंत राहिलीच मनात ,आणि उद्या किसन येणार हे ही सांगू शकला नाही ,मनाला वाईट वाटत होते पण जसे योग्य अंतर आरतीला ठेवायला सांगून आला होता तसेच अंतर आपोआपच त्याला ठेवणे गरजेचे वाटले...तिथून विना काही बोलता तो आपल्या घरी निघून येणार होता, तोच समोरून भाऊजी आणि सूरज येताना दिसले होते... त्यांनी मामाचा पडलेला चेहरा पहिला... काही तरी लपवत आहे जणू मामा असे वाटले...

सूरज, "अरे मामा तू कधी आलास ,आणि तू आम्हाला दोघांना न भेटतास कसा चालला रे ,आता ओढ कमी झाली का आमची ,परकं समजतोस का चल जरा आत ,काही वेळ थांब आपण सगळेच मस्त जेवणाचा बेत करू, तुला आज मी माझ्या हातचे जेवण करून खाऊ घालतो, "

प्रकाशराव, "अरे सूरज मस्त जेवण तयार करतो ,अगदी एक्स्पर्ट झालाय तो जेवण करण्यात, बघा बायकोला अजिबात त्रास देणार नाही तो ,बघा अजून ही विचार करा तुमची मुलगी सुखी राहील आमच्या कडे "

मामाने सूरज कडे पाहिले अन सूरज जरा हसून आत गेला , मग ताई कडे वळून पाहत होता तोच ताई मात्र तोंड फिरवून बसली ,आता सूरज ने आग्रह करून ही मामाचे मन काही रहावेना, आपलीच बहीण रुसली असल्यावर थांबण्यात काय अर्थातच नाही ,तो भाऊजींची रजा घेऊन घरच्या वाटेने निघाला ..

घरी बाहेरचे दिवे लावून लेक अंगणात बाबांची वाट बघत बसली होती, तिला ही त्यांचा पडलेला चेहरा दिसला आणि ती समजून गेली काही तरी बिनसलय ,जे सांगायला गेले नेमके तेच सांगितले नाही.. पडलेला चेहरा सांगत होता आत्या जणू अंतर ठेवून वागली असेल...आणि मग बाबा काही सांगू शकले नसतील... त्यांना ताईचे काही वाईट व्हावे हे असे वाटत नाही पण अंतर निर्माण झाल्या मुळे ते काहीच बोलू सांगू शकले नाही..

तितक्यात ती आत गेली ,तिने थंड ग्लास भरून पाणी आणले ,त्यांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवत म्हणाली , "होईल बाबा तुमच्या मनासारखेच होईल ,आत्या थोडी रागावली आहे ,पण ती वाईट नाही हे नक्की ..तिला वेळ देऊ मग समजावून सांगू... तिने कोणाचे वाईट केले नाही तर तिचे ही वाईट होणार नाही हे नक्कीच.".

पुढच्या भागात नेमके काय होईल, आई सूरज साठी योग्य मुलगी निवडले की आरतीला निवडले ? की आरती बद्दल असलेली आत्याची ओढ कमी व्हावी का ... रक्ताचे नाते अबोल होऊन दुरावतील का...


क्रमशः.....

🎭 Series Post

View all