ओढ भेटीची....

फ्लाइट लॅन्ड झाली, माया मेहूल 2 वर्षांनी मुंबईत उतरले होते, टॅक्सी रेडी होती, गावाकडे प्रवास सुरू झाला, जस जस मुंबई शहर मागे पडत होत तसे मायाचे डोळे भरून येत होते,

फ्लाइट लॅन्ड झाली, माया मेहूल 2 वर्षांनी मुंबईत उतरले होते, टॅक्सी रेडी होती, गावाकडे प्रवास सुरू झाला,

जस जस मुंबई शहर मागे पडत होत तसे मायाचे डोळे भरून येत होते,

तिच्या आईबाबांना न भेटताच ते सरळ सासरी कोंकणात निघाले होते ते, विशेष म्हणजे मेहुल ही काही बोलला नाही की तुला भेटायच का तुझ्या आईबाबांना,

कोकणात गावी जन्म झाला मेहूलचा, नंतर त्याचे आईबाबा मुंबईला शिफ्ट झाले, मेहुलच शिक्षण मुंबईतच झालं, तो परदेशात गेल्यावर ऑफिसहून रिटायर झाल्यानंतर आईबाबा परत गावी शिफ्ट झाले,

सगळे जमणार होते, मेहूल येणार होता म्हणुन गेट टुगेदर ठरवल होत घरच्यांनी ... त्या निमित्ताने सगळे भेटतील एकमेकांना

मोठा वाडा होता त्यांचा गावात , त्या काळी मोठ प्रस्थ म्हणुन ओळखले जायचे त्याचे आजोबा,

वाड्याच्या मागे पुढे भरपूर जागा होती, विहीर होती, नारळाच्या सुपारीच्या बागा होत्या, आंब्याचे भरपूर झाड होते, स्वैपाकापुरती भाजी लावलेली होती, मोगरा फुलला होता, मागच्या बाजूला गाईचा गोठा होता, शेणाने सारवलेली अंगण होत, कसली कमी नव्हती ,

आजी आजोबा बरेच वर्ष झाले देवाघरी गेले होते , पूर्वी सगळे एकत्र रहायचे पण आता ऑफिस इतर व्यवसाय, मुलांचे शिक्षण म्हणुन सगळे शहरात शिफ्ट झाले होते

काका काकू ही येणार होते पुण्याहून, वाटणी नुसार अर्धा भाग काकांचा होता, तिथे एक भाडेकरू राहत होता,

टॅक्सी वेगाने गावाकडे निघाली होती, मायाला समजत नव्हत की आपल्या आई बाबांना बोलवल की नाही, एवढ्यात त्यांची आपली भेट होणार नाही असं वाटतय, किती स्वप्नं पाहिले होते आई बाबांना भेटण्याचे, बोलून बघु का मेहुलशी, पण एक मन म्हणत होत की नको हे गेट टुगेदर होवुन जाऊ दे मग बघू

गाडी गावात शिरली, मेहुलला आठवणीच्या खुणा सगळीकडे दिसत होत्या, मी या ग्राउंड वर यायचो खेळायला, हे माझ्या मित्राचे घर, ही गावची शाळा, या बागेत आम्ही यायचो संध्याकाळी खेळायला, हा वाडी कडे जाणार रस्ता, असा सुरू होता त्याच,

घरी आले, आई बाबा काका काकू भाऊ सगळे भेटले , खूप आनंद झाला सगळ्यांना ,

माया मात्रा गप्प होती, तिला आई बाबांच्या भेटीची ओढ लागली होती, ती ही दोन वर्षा पासुन भेटली नव्हती त्यांना , काही बोलली नाही ती, जे दिसेल ते काम करत होती, सारखे डोळे भरून येत होते तिचे, तिकडे परदेशात असती तर ठीक होत पण मुंबईला येवून आई बाबांना न भेटता सरळ इकडे आले ते वाईट वाटत होत तिला,

रात्रीच जेवण झाले, सगळे बाहेर बसुन गप्पा मारत होते.... तेवढ्यात घरा समोर एक गाडी थांबली,

मायाचे आई बाबा उतरले गाडी तून , सगळे हसायला लागले,,..... surprise........

मायाला समजल नाही काय करावे ते, पळत जावून ती आईला भेटली, एकदम रडायला लागली,

अग मेहूलने केला हा प्लॅन, आम्हाला बोलवून घेतला..... आई सांगत होती

पण मी आता एक तास आधी फोन केला होता तेव्हा घरी होता ना तुम्ही,.... माया विचारात होती

नाही ग रस्त्यात होतो आम्ही, मुद्दाम सांगितल नाही तुला.... आई

माया खूप आनंदात होती,

अग आईबाबांची ओढ काय असते हे माहिती आहे आम्हाला , परदेशात राहणारी मुल कधी घरी येतात याकडे लक्ष लागून असत आमच, त्यात तुझे आई बाबा ही आलेच की, मी कशी अशी ताटातूट करेन तुमची,.... सासुबाई सांगत होत्या

दोन तीन दिवस रहा मग आता इथे, नंतर आईबाबांन सोबत जा मुंबईला, मस्त माहेरपणाचा आनंद घे,

love you आई माया बोलली..... तिने सासुबाईंना मिठी मारली,

रात्री मेहुल भेटला तेव्हा मायाच्या डोळ्यात खूप आदर आणि प्रेम होता त्याच्यासाठी,

मला माझे आईवडील हवे तर तुला नको का? , तू ही भेटली नव्हती तुझ्या आईबाबांना दोन वर्ष झाले म्हणून हा प्लॅन केला,.... सॉरी तुझ दुःख दिसत होत मला दिवस भर.... मेहुल बोलला

मायाच्या डोळ्यात आसू होते, पुढे बोलायची गरज नव्हती, एवढा चांगला प्लॅन केला म्हणून मनोमन मेहुलचे आभार मानले.

बोलत काय बसलोय आपण, चल उद्याच्या पिकनिक चि तयारी करूया .... मेहुल माया उत्साहात तयारीला लागले