ऑड वाट (भाग-७)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-७)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
सकाळची सुरुवात तर छान झाली.... तुळशीपाशी लावलेल्या अगरबत्ती चा सुवास पूर्ण अंगणभर पसरला होता... सडा आणि रांगोळी मुळे एक प्रसन्नता वातावरणात जाणवत होती.... 

"Wow! What a peaceful life..." रिम्पल म्हणाली. 

"आत्ता कुठे सुरुवात आहे.... शेतात चला तिथे अजून छान वाटेल..." निशा म्हणाली. 

सगळ्यांचा चहा नाश्ता झाल्यावर सगळ्यांनी  बैलगाडीतून शेतात प्रस्थान केलं! तिथे गेल्यावर गाईचा गोठा, कालवे, पक्षी, झाडं सगळं अगदी जवळून पाहायला मिळाल्याने जेनी आणि जॅक विशेष खुश झाले... पायवाटेवर उमलेली फुलं, दुर्वा, काही औषधी वनस्पती यांची माहिती सुद्धा निशा आणि हेमाने त्यांना सांगितली. थोडं आत गेल्यावर निशा आणि हेमा ने तयार केलेल्या वडाच्या झाडाच्या झोपाळ्यावर चौघांनी एन्जॉय केलं! इतर शेतकऱ्यांचं बघून शेतात काम सुद्धा केलं! दुपारच्या सुमारास झाडाखाली बसून मस्त झुणका भाकरी खाल्ली! संध्याकाळी रानमेवा आणि फुलातला मध खाल्ला आणि सूर्यास्त पाहून सगळे घरी आले.... घरी आल्यावर हात पाय धुवून झाल्यावर देवाजवळ दिवा लावून जेनी आणि जॅक ला घेऊन हेमा आणि निशा ने त्यांना शुभंकरोती म्हणून दाखवलं आणि त्यांच्या मागून म्हणून घेतलं.... 

"Very nice! Today we are work too hard but we feels fresh!" रॉबिन म्हणाला.

"गावच्या पाण्यात असतेच ती ताकद! तुम्ही कितीही काम केलं तरी तुम्हाला थकवा जाणवणार नाही... शेवटी हे निसर्गाच्या सानिध्यातलं काम आहे ना..." हेमा म्हणाली. 

"चला चला आता जेवायला... दिवसभर शरीर थकलं असेल... भुका लागल्या असतील या लेकरांना..." हेमाची आई म्हणाली. 

सगळे जेवायला येऊन बसले.... निशाच्या आणि हेमाच्या आई ने मिळून पोळी, कोबीची भाजी, आमटी आणि भात असा साधासा बेत केला होता... पानं वाढून झाल्यावर या वेळी निशाने त्यांना आधी 'वदनी कवळ घेता...' म्हणून दाखवलं आणि त्याचा अर्थ समजावून सांगितला! मग जेवणाला सुरुवात झाली...

"Now we also like Indian tradition! Behind every tradition there is surely a scientific reason! Great!" रॉबिन म्हणाला.

"हो! या परंपराच खूप काही शिकवून जातात... आणि त्यामुळेच आज भारत जगावेगळा आणि संपन्न आहे... इकॉनॉमिकेली जरी मागे असला ना तरी माणुसकी आणि शांततेच्या बाबतीत भारताचा हात कोणीच धरू शकत नाही..." हेमा म्हणाली. 

"Ya right!" रिम्पल ने हेमाच्या बोलण्याला सहमती दर्शवली... 

चौघांनी व्यवस्थित जेवण करून घेतलं... जेनी आणि जॅक ने सुद्धा this is testy, this is yummy करत सगळं संपवलं... अंथरुण घालून झाल्यावर सगळे थोडावेळ गप्पा मारत बसले... 

"हे बघा... आज तुमचे काम करताना मी काही फोटो, व्हिडिओ काढले आहेत आणि तुम्हाला सुद्धा सेंड केले आहेत! आज कामाची दगदग झाली असेल म्हणून उद्याचा दिवस आपण फोटो शूट साठी ठेवला आहे... गावात काही जागा आहेत जिथे तुम्हाला फोटो काढायला आवडेल... उद्या आपण तिथेच जातोय..." हेमा त्यांना फोटो दाखवत म्हणाली. 

"Okey! But tomorrow also we want yoga!" रिम्पल म्हणाली. 

"हो! सकाळी आधी तेच आणि मगच दिवसाची सुरुवात होईल..." निशा म्हणाली. 

"Hmm! Tomorrow I'm try to wake up little early... I also want to cook with your mom.." रिम्पल हेमाला म्हणाली. 

"तो सुद्धा अनुभव मिळेल.. Don't worry..." हेमा डोळ्याने आश्वस्त करत म्हणाली.

"चला आत्ता तरी झोपा... नाहीतर सकाळी जाग नाही येणार... Good night..." निशा म्हणाली. 

चौघं गुड नाईट म्हणून पडल्या पडल्या झोपले... नाही म्हणलं तरी त्यांच्या शरीराला या गावातल्या कष्टाची सवय नव्हती... वरवर जरी फ्रेश वाटत असलं तरी आतून ते दमले होते... 

"हेमा! उद्या त्यांना काही काम नको हा... उगाच आजारी पडायचे..." हेमाची आई हेमाला ठाम पणे म्हणाली. 

"हो आई! उद्या आम्ही त्यांना फक्त फोटो शूट ला घेऊन जाणार आहोत! नको काळजी करुस!" हेमा आई ला समजावत म्हणाली. 

"मग ठीक आहे... चल आता माझ्या मदतीला.." हेमाची आई म्हणाली. 

"अहो नको! पोरींना बसुदे इथे... मी आहे ना मी करते तुम्हाला मदत..." निशा ची आई पदर खोचत म्हणाली. 

हेमा आणि निशा तिथेच बसल्या... सगळ्यात आधी कुठे जायचं, काय काय दाखवता येईल याची यादी तयार केली तोवर मागची सगळी कामं आवरली... निशा तिच्या घरी गेली... सगळे आता झोपले... दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं आवरून, योगासनं आणि सूर्यनमस्कार झाल्यावर चहा नाश्ता झाला... 

"चला आता आपण फोटो शूट ला जातोय..." निशा म्हणाली. 

"Ye! Didi please we want to click photos with birds, animals and flowers.." जॅक उड्या मारत म्हणाला. 

"Yes! Why not... Let's Go..." हेमा म्हणाली. 

हेमा,जॅक, जेनी, त्यांचे आई बाबा आणि शेवटी निशा अशी झुकझुक गाडी करून सगळे निघाले. हेमा इंजिन बनली होती.... ती मधेच रेल्वेच्या इंजिन सारखा आवाज काढत होती.... निशा मागून दोऱ्याच्या संपलेल्या रिळात फुंकर मारून जोरात शिट्टी चा आवाज करत होती... जॅक आणि जेनी ला सुद्धा या गोष्टीचं कौतुक वाटलं! त्या दोघांना सुद्धा निशा ने तशी शिट्टी वाजवायला शिकवली.... दोघं खूप खुश झाले... आनंदाने उड्या मारत टाळ्या वाजवत होते... अशीच मजा मजा करत ते गावाच्या मागच्या भागात आले.... तिथे भरपूर झाडं, फुलं आणि पक्षी होते.... एखादा पक्षी खाली येऊन बसला की कसलाच आवाज न करता हेमा पटकन फोटो काढायची... नंतर झाडावर चढून, गवतात बसून, फुलं हातात धरून खूप फोटो काढले... त्यानंतर गावात असणारी देवळं, वेगवेगळ्या शेतात जी पिकं आली होती तिथे आणि बागेत जाऊन सुद्धा फोटो शूट झालं!  दुपारी बाहेरच एका आजींच्या धाब्यावर जेवण झालं... जेवणं झाल्यावर गावाच्या इथून वाहणाऱ्या नदी च्या इथे सगळे गेले.... नदी किनारी थोडावेळ शांत बसून फार बरं वाटत होतं! एकदम स्वच्छ पाणी.. वरून पाहिलं तरी तळ दिसत होता...  सगळीकडे पसरलेली निरव शांतता, फक्त नदीचा खळखळणारा आवाज, मधेच पक्ष्यांच्या किलबिलाट आणि सोबतीला थंड वारा... 

"Mom please I want to swim..." जेनी तिच्या आई कडे हट्ट करत म्हणाली. 

"नाही! पोहणं वैगरे नाही... पाणी शांत जरी वाटत असलं तरी खूप जोर आहे पाण्यात... इथे तुम्ही पाय सोडून बसू शकता पण, प्लिज पोहणं नाही..." हेमा ने जेनी च्या आई ला सांगितलं. 

"Yes! Hema is right... This is not swimming pool.. we don't know the force of water..." रॉबिन ने सुद्धा हेमाच्या बोलण्याला सहमती दर्शवली आणि रिम्पल ला म्हणाला. 

रिम्पल ने कसंबसं जेनी ला समजावलं... सगळे आता नदीच्या पाण्यात पाय टाकून बसले होते... नदीत असलेले मासे त्यांच्या पायाजवळ आले की त्यांच्या तळव्याला गुदगुली होत होती... जेनी आता पोहण्याचं विसरून पुन्हा हसायला लागली होती... थोडावेळ असाच गेला.... जेव्हा त्यांनी पाय बाहेर काढले तेव्हा आधी पेक्षा ते स्वच्छ झाले होते.... 

"तुम्ही मॉल मध्ये पैसे देऊन पाण्यात पाय घालून बसता... पण, इथे बघा निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला काहीही पैसे न मोजता फक्त निखळ आनंद मिळतो..." निशा म्हणाली. 

रॉबिन आणि रिम्पल दोघांनी सहमती दर्शवली... एव्हाना आता संध्याकाळ व्हायला लागली... सगळ्यांनी आता गावात असणाऱ्या मोठ्या बागेत प्रस्थान केलं! जेनी आणि जॅक ला तिथे भरपूर खेळ खेळायला मिळाले... शिवाय त्यांच्या वयाची मुलं सुद्धा भेटली! दोघांनी खूप एन्जॉय केलं.... खेळून झाल्यावर दोघं भूक भूक करत आले... 

"चला.. तिथे गवतात बसूया... तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे..." हेमा म्हणाली.

सगळे तिथे गेल्यावर त्यांना तिथे हेमाची आई दिसली... त्यांनी घरून कडधान्यांची भेळ करून आणली होती... सगळे गोल करून बसले... कागदी डिश मध्ये मस्त पैकी भेळीचा फडशा उडाला.... भेळीसाठी कडधान्य वापरल्यामुळे ती पौष्टिक तर झालीच आणि पोट सुद्धा भरलं! त्यानंतर आईस्क्रिम खाल्लं... आज तर जॅक आणि जेनी खूपच खुश होते... एवढी छान छान मेजवानी मिळली होती शिवाय दिवसभर खेळायला सुद्धा मिळालं! सगळे आता घरी जायला निघाले... 

"Jack and Jenny everyday eat pizza or pasta... But they completely forgot that junk food! This is unbelievable!" रिम्पल म्हणाली. 

"त्यांना आठवण येणार पण नाही... भारतात अन्न हे पूर्णब्रम्ह मानतात आणि असं समजलं जातं अन्न बनवताना त्यात आपल्या भावना सुद्धा मिसळल्या जातात... स्वयंपाक बनवणारी स्त्री त्यात स्वतःचं घरच्यांप्रति असणारं प्रेम मिसळते... म्हणून ते अन्न रुचकर होतं आणि खाणारा सुद्धा तृप्त होतो." हेमा म्हणाली. 

एवढ्यात सगळे घरी पोहोचले... संध्याकाळची दिवे लागणीची वेळ झाली होती... कालच्या प्रमाणे आज सुद्धा देवाजवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणलं... 

"चला आता आपण जेनिका दिदी ला फोन करूया?" निशा म्हणाली.

"Yes! Why not..." रिम्पल म्हणाली. 

निशा ने जेनिका ला व्हिडिओ कॉल लावला... जेनिका आणि जॉन दोघं हि तिथे होते... हेमा आणि निशा च बोलणं झालं! त्यानंतर रिम्पल आणि जेनिका बोलत बसल्या... त्यांच्या बोलण्यावरून रिम्पल जेनिका ला हा रेफरन्स दिल्याबद्दल थँक्यू म्हणत होती हे समजत होतं! त्यांनतर जी मजा या दोन दिवसात केली ती सुद्धा रिम्पल ने जेनिका ला सांगितली! त्यांचं बोलणं झाल्यावर जेनिका ने हेमा ला बोलवायला सांगितलं... हेमा जॅक आणि जेनी शी खेळत होती! ती आली... 

"तुमी दोगी चान काम करता... Keep it up! And all the very best for your future..." जेनिका म्हणाली. 

"थँक्यू... तुमच्यामुळेच आम्हाला हा मार्ग सुचला! तुम्ही जर त्या दिवशी वाट चुकून गावात आला नसतात तर हे वेगळंच काम आम्हाला सुचलं नसतं! न कळत तुम्ही सुद्धा आमची मदत केली आहे... थँक्यू!" हेमा म्हणाली. 

"बस आता थँक्यू प्रोग्रॅम! तिते नाईट असेल ना.. we will talk later... Good night and take care... And listen, we have one surprise to you... तुमाला लवकर समजेल काय हाय... ओके बाय..." जेनिका ने हात हलवत बाय केला आणि हेमा, निशा ने काही विचारू नये म्हणून लगेच फोन कट केला!

त्यांचं बोलणं झालं तोवर आता जेवणाची वेळ झाली होती.. संध्याकाळी पोटभर नाश्ता झाला होता म्हणून कोणाला भूक नसणार पण उपाशी झोपायचं नाही म्हणून हेमाच्या आई ने गरम गरम भात केला होता... निशा च्या आई ने घरी केलेलं मेतकूट आणलं! सगळ्यांनी मस्तपैकी मेतकूट भात खाल्ला.... आणि झोपायची तयारी सुरु झाली... दिवसभर बाहेर फिरून सगळेच दमले होते.... पटकन सगळे चिडीचूप झाले....

क्रमशः...
***********************
विल्सन कुटुंबियांचे दोन दिवस पूर्ण झाले.... त्यांना आत्ता पर्यंत खूप मजा आली आहे... आता पुढे अजून काय काय होत, जेनिका आणि जॉन काय सरप्राईज देणार आहेत पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all