Nov 29, 2022
// rablogging.com_GGINT //
प्रेम

OBSESSED WITH YOU.. भाग ३४

Read Later
OBSESSED WITH YOU.. भाग ३४

            हसत हसतच नकुलच्या मॉमने व्हिलामध्ये प्रवेश केला. हातातली पर्स सोफ्यावर टाकत त्या आरामात रेलून बसल्या. इतक्यात हॅरी त्यांच्यासमोर आला. 


“बाईसाहेब..”


“काय रे ? मी जरा शांत बसलेलं बघवत नाही का तुला ? आला लगेच हाक मारायला.”


“माझं काही काम नाही तुमच्याकडे. साहेब केव्हाचे मोठ्या साहेबांच्या रूममध्ये जाऊन बसले आहेत. तुमच्याबद्दल विचारत होते. मी सांगितलं तुम्ही बाहेर गेला आहात म्हणून. त्यांना बोलायचं होतं तुमच्याशी. बोलवू काय ?”


तशी मॉम सावरून बसली. ह्याला काही संशय तर आला नसेल या विचाराने ती थोडी धास्तावली होती. तिला विचारल्यासारखं करून हॅरी नकुलला बोलवायला आत निघून गेला होता. काहीच वेळात नकुल बाहेर आला. मॉम तिथेच बसल्या होत्या. 


“मिसेस. सरपोतदार..”


“काय झालं नकुल ? आजकाल तुम्ही मॉम म्हणणं सोडून दिलंय.”


“माझ्या तुम्हांला मॉम म्हणण्याने किंवा न म्हणण्याने तुम्हांला कितीसा फरक पडतो ?”


नकुल त्यांच्या बरोबर समोर बसत म्हणाला. त्या काहीच बोलल्या नाहीत. यावर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतंच म्हणा. त्यांना फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं की नकुलने त्यांच्याबद्दल का विचारलं असेल ? त्याला त्यांच्याशी काय बोलायचं होतं ? 


“अं.. नकुल, मला हॅरी म्हणाला की तुम्हांला मला भेटायचं होतं. काही महत्वाचं बोलायचं होतं का ?”


“हो. मला फार महत्वाचं बोलायचं होतं मिसेस सरपोतदार.”


नकुलने पुन्हा असंच नाव उच्चारलेलं पाहून मॉमच्या लक्षात आलं की त्याचं काहीतरी बिनसलं आहे. नकुल पुढे काही बोलणार तोच लक्ष आत आला. आपली बॅग टिपॉयवर ठेवत तो ही निवांत सोफ्यावर बसला.


“मला असं कळलं तुम्ही आज खूप वेळ बाहेर होतात.”


नकुलने शांतपणे बोलायला सुरुवात केली होती.


“हो. मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. मी लक्षला पण कळवलं होतं. हो ना लक्ष ?”


पण लक्षने ना होकार दर्शवला ना ही नकार. तो फक्त तिथे शांतपणे बसून त्यांचं बोलणं ऐकत होता.


“मिसेस सरपोतदार, ही माझी पहिली वेळ नाही आहे तुम्हांला हे सांगण्याची की माझ्या आणि माझ्या ओवीच्या आयुष्यापासून कोसो दूर रहा. आम्हांला हानी पोहोचवण्याचा जो निरर्थक प्रयत्न तुम्ही करत आहात ना, तो तुम्हांला फार महागात पडेल.”


नकुलचा आवाज फार गंभीर झाला होता. 


“म..मी..”


नकुलने आपल्या मोबाईलमध्ये तो फोटो ओपन करून त्यांच्यासमोर धरला. ते पाहून त्यांचे डोळे पांढरे होत आले होते. लक्षही शांतपणे सगळं पाहत होता.


“ही तुमची सो कॉल्ड मैत्रीण तर वाटत नाही आहे मिसेस सरपोतदार.”


नकुलचा रागीट आवाज मॉमच्या शरीरावर भीतीची लहर उमटवून गेला.


“सृष्टी..”


नकुलने मारलेल्या हाकेने बाहेरून सृष्टी नावाची त्याची बॉडीगार्ड धावत आत आली. 


“येस बॉस. ”


“ह्या बाईला हिच्या रूममधून बाहेर पडू द्यायचं नाही. तुझ्यासोबत अजून चारजणी मिळून हिच्यावर लक्ष ठेवायचं.”


“नकुल, तुम्ही तुमच्या लिमिट्स क्रॉस करताय. माझ्याच घरात मला असं वागवायचे काहीही अधिकार नाहीत तुम्हांला. तुम्ही विसरताय मी तुमच्या डॅडची बायको आहे.”


नकुल ताडकन उठून उभा राहिला.


“लिमिट्स तर तुम्ही क्रॉस करताय मिसेस सरपोतदार. मी तुमच्या आयुष्यात याआधी कधीही दखल घेतली नव्हती. तुम्ही कुठे जाताय, किती पैसा खर्च करताय, कोणाला भेटताय याकडे मी कधीच पाहिलं नाही. पण तोपर्यंतच जोपर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यात इंटरफेअर केलं नाहीत. तुम्ही कोणाला भेटलात.. का भेटलात हे मला माहित नाही असं समजू नका. त्या मिराजला जसं आत केलं, तसं तुम्हांलाही आत पाठवायला मला जास्त वेळ लागणार नाही. तेव्हा शांतपणे ऐशोआरामात राहू देतोय तर रहा.”


त्याच्या नजरेत अंगार उसळलेला दिसत होता. तो जितका त्यांच्यापासून आपलं आयुष्य वेगळं ठेवायचा प्रयत्न करत होता, तितक्याच त्या मुद्दाम त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करत होत्या.


“लक्ष, तुझं काय तोंड धरलंय का ? ऐकलं नाहीस तो काय बोलला ?”


मॉम आता लक्षवर चिडल्या. कारण तो मगाचपासून तिथेच बसूनही शांत होता. लक्ष काही न बोलता उठून उभा राहिला. त्याने टिपॉयवरील आपली बॅग उचलली आणि तो आत निघून गेला. मॉम आणि त्याहीपेक्षा जास्त नकुल अवाक झाला होता. हा तोच लक्ष होता का जो काही दिवसांपूर्वी आईच्या एका शब्दाखातर रिधिमाशी लग्न मोडून आला होता ? सृष्टीने मॉमचा हात घट्ट पकडला.


“हेय.. सोड मला. कोण समजतेस तू.. ”


“सृष्टी, मला ह्या माणसाचं नाव हवं आहे. काहीही कर.”


नकुल आपल्या मोबाईलवरचा फोटो दाखवत म्हणाला.


“डोन्ट वरी बॉस. मी पूर्ण प्रयत्न करेन.”


सृष्टी रागीट नजरेने मॉमकडे पाहून म्हणाली. ती बळेच मॉमला खेचत रूममध्ये घेऊन गेली. दुरून हॅरी आणि इतर नोकर हे पाहत होते. नकुल आजपर्यंत एवढा रुडपणे कधीच वागला नव्हता मॉमशी. तो धडाधड जिना चढत आपल्या रूममध्ये निघून गेला. इतरांना दिसत होतं की त्याच्या मॉमने नकळत त्याच्यातला सुप्त डेव्हिल खरंच जागवला होता. 


____________________________________


            तो बाल्कनीत उभा होता. ही हवा, हे वातावरण त्याच्या चांगलंच परिचयाचं होतं. मंद वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर तो पसरत जाणाऱ्या काळोखाला निरखत होता. असाच काळोख बनून यायचं होतं त्याला तिच्या आयुष्यात.. त्याने बॅगेत ठेवलेला आपला सेलफोन काढला आणि पहिल्यांदाच तिचा कॉन्टॅक्ट नंबर तो स्वतः डायल करत होता. 


“हॅलो !”


तिकडून एक अतिशय गोड आवाज ऐकू आला. 

‘ह्या आवाजाच्या प्रेमात पडण्यासाठी मी तुला दोषी नाही मानणार नकुल.’ तो स्वतःशीच विचार करत असताना तिकडून चार वेळा हॅलो म्हणून झालं होतं.


“हॅलो, मिस ओवी.”


“काय झालं ? तुम्ही कॉल केलाय पण उत्तर देत नाही.”


“माफ करा. मला थोडा रेंजचा प्रॉब्लेम होता.”


“बरं. बोला, कॉल कशाला केला होता ?”


“अं.. मी मिराजच्या नात्यातला आहे. तो जेलमध्ये जाण्याचं कारण तुम्ही आहात असं समजलं.”


“हं.. ?”


ओवीने चमकून मोबाईलकडे पाहिलं. काय ऐकलं होतं तिने ? 


“मिराज, तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय ना राणी ?”


“ए.. कोण आहेस तू ? काय बोलतोयस कळतंय का तुला ?”


ओवीचा स्वर चिडका झालेला त्याला जाणवला होता.


“हं. मला चांगलंच माहित आहे मी काय बोलतोय. मिराज तसं तर माझ्यासाठी फक्त एक पाळीव प्राणी आहे. ज्याने त्याचं काम व्यवस्थित बजावलं. पण मला माझ्या कोणत्याही माणसाला हर्ट केलेलं आवडत नाही.”


“हे बघ.. जसा मिराज आत गेला आहे ना, तसाच तू ही आत जाशील. मी आता ही सगळी माहिती पोलिसांना देऊ शकते.”


“मी मूर्ख नाही आहे राणी. या फोनचं लोकेशन सापडणार नाही तुला. राहता राहिला प्रश्न मी तुला कॉल का केला ह्याचा.. मला तुझ्यामुळे खूप त्रास झाला आहे ओवी शर्मा. जे काम सहज झालं असतं ते तुझ्यामुळे अजून गुंतत गेलं. मिराजला जेलमध्ये टाकून तू चांगलं नाही केलंस. पुढच्या काहीच दिवसांत तुझ्या फार प्राणप्रिय व्यक्तीला धोका आहे. शक्य असेल तर वाचवून दाखव.”


ती छद्मी हसत म्हणाला. ओवी मात्र चांगलीक शहारली होती. तो आवाज तिच्या ओळखीचा नव्हता. त्या व्यक्तीला ती ओळखत नव्हती. पण त्याच्या आवाजात मिराजच्या आवाजापेक्षा अधिक हुकूमत होती.


“त...त..तू कोण आ..”


तिचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच पलीकडून भेसूर, मग्रूर असा आवाज आला.


“डेव्हिल स्पीकिंग !”


कॉल कट झाला होता. तो खदाखदा हसत होता. पण ओवी चांगलीच थरारली होती. जवळची व्यक्ती म्हणजे कोण ? नकुलवर तर हल्ला होऊच शकतो. त्याला सावध रहायला सांगणं गरजेचं होतं. रिधिमासोबत आधी एकदा झाल्याने ती सावधच असणार होती. मग कोण.. अचानक तिच्या डोक्यात आलं, अगदी कोणीही असू शकतं म्हणजे त्यात तिचं कुटुंबही येत नाही ना ? हे नकुलला आज सांगावं की उद्या सकाळी हा विचार करता करताच ती पलंगावर पहुडली. तिच्या मनात सतत त्याचा आवाज निनादत राहिला होता. 


‘डेव्हिल स्पीकिंग !’


____________________________________________

To be continued..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now