ओ मेरी जान ! पार्ट 7 ( अंतिम भाग )

.
आरजूने रागात मूठ आवळली आणि दुसऱ्या हाताने मिलिंदची अंगठी त्याच्यावरच फेकली.

" तुम्ही सगळे मुले सारखेच असतात. थोडे फ्रेंडली झाले नाही की लगेच चिपकायला लागतात.  " आरजू

" यार इतकी हायपर का होतीय ? जर तुला प्रेम नाही तर कोई ना. किमान मैत्री ठेवू. " मिलिंद

" मैत्रीच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रेमाचा व्हायरस घुसला की पूर्ण सिस्टीम खराब होते. आता काहीच पूर्ववत राहिले नाही. अस पण तू स्वतः जॉबलेस आहेस. माझ्या कास्टचा नाहीस. आपल्यात काहीच कॉमन नाही. माझ्या घरचे तुझे आडनाव पाहूनच नकार देतील. " आरजू

" पण माझे प्रेम खर आहे आरजू. आपल्या प्रेमात धर्म जात कधीच नाही येणार. " मिलिंद आरजूच्या हातावर हात ठेवून म्हणतो.

आरजू तो हात झटकून तिथून काढता पाय घेते.

मिलिंदचे डोळे पाणावतात आणि तो फेकलेली अंगठी खिश्यात टाकतो. आरजू हॉटेलच्या बाहेर पडते आणि मिलिंद तिच्या मागे मागे जातो. आरजू त्याचे काहीच ऐकत नाही आणि ऑटो पकडून घरी येते. या प्रसंगानंतर दोघात अबोला निर्माण होतो. घरी येऊन आरजूने बेडरूममध्ये स्वतःला कोंडवले असते.

"यार आरजू इट्स ओके ना. इतकं का रिऍक्ट करतीय. " मिलिंद

" तू माझा विश्वास तोडला. " आरजू

" यार मला उशी आणि ब्लॅंकेट दे. "
आरजू दार काढून उशी आणि ब्लॅंकेट फेकते.

" तुला याचीच काळजी ना माकडा. घे मग. आणि उद्यापासून काम नसेल तर बोलत पण जाऊ नको. " आरजू

" नाही बोलत. माझ्याकडे पण मुलींची कमी नाही हडळला गर्लफ्रेंड बनवायला. " मिलिंद पण ओरडतो.

मिलिंद हॉलमध्ये आणि आरजू बेडरूममध्ये झोपते.

सकाळीपण दोघांत अबोला असतो. आरजूने मुद्दाम फक्त स्वतःसाठी पोहे आणि चहा बनवला असतो. आरजूच्या नादात मिलिंदने पण थोडा स्वयंपाक शिकला असतो. तो पण कसाबसा चहा बनवतो.

दुपारी अनारकली येते. टिफिन बनवून आरजू दमलेली असते. मिलिंद टिफिन डिलिव्हर करायला गेला असतो.

"अनारकली. तू कधी कुणावर प्रेम केलंय ?" आरजू कॉफी पीत फरशी पुसत असलेल्या अनारकलीला विचारते.

अनारकली क्षणभर हसते.

" इश्क हमारे नसीब में नहीं था
भाईबहन छोटे, अब्बा शराबी था
अम्मी बजपन में ही गुजर गयी
जिम्मेदारी हाथमें छोड़ के चली गयी
लोगों के घर की सफाई करते करते
कब नजाने बदन से बदबू लगी आने
भाईबहन को बड़ा करते करते उमर भी बढ़ गयी
मोहब्बत है क्या चीज किस्मत ने कभी न बक्षी
शायरी सुनाके लोगो का मन बहलाते है
लोगो को प्यार करते देख खुश होते है
दुआ करते है हर किसी को प्यार मिले
शायरी सुनाती कोई तन्हा अनारकली ना बने...!!"
अनारकली हसत म्हणते.

आरजूचे डोळे पाणावतात.

रात्री आरजूची तब्येत अचानक बिघडते. तिला सर्दी-ताप असतो. मिलिंदच्या हे लक्षात येते.

"डॉक्टरांकडे चल. " मिलिंद

" तू नको सांगू मला. माझ्या जवळ पण नको. " आरजू

" बर तुझ्या मामाला फोन करून सांगतो. मी चोरून त्यांचा नंबर सेव्ह केला होता. " मिलिंद

शेवटी मिलिंद आरजूला बळजबरीने डॉक्टरांकडे घेऊन जातो. आरजू कोविड पॉझिटिव्ह निघते. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. मिलिंदपण होम क्वारनटाईन होतो. सुदैवाने मिलिंदची टेस्ट निगेटिव्ह येते. मिलिंद आरजूची पूर्णपणे काळजी घेतो. तिला व्हिडीओ कॉल करून बोलत बसतो. सुरुवातीला आरजू विचित्र वागत असते म्हणजे वर्तमान काळातील वाक्ये भूतकाळात बोलणे आणि इतर सामान्य गोष्टी करताना गोंधळ उडणे. पण नंतर ती रिकव्हर होते. आरजूचा रागही हळूहळू निवळून जातो. बारा दिवसातच आरजू ठीक होते आणि तिला डिस्चार्ज भेटतो.

" मिस हडळ. चला आता घरी. " मिलिंद ऑटो पकडून म्हणतो.

" तुझी बुलेट नाही आणली ?" आरजू

" अग फ्रेंडला दिलीय. " मिलिंद

" खानाबदोषचे काय झाले ? कोण टिफिन बनवले इतके दिवस ?" आरजू

" यार तू टेन्शन नको घेऊ. मी आहे ना. " मिलिंद

मग दोघे घरी येतात. मिलिंदने घर सजवले असते.
आरजू घरी येताच तिच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो.

" अरे यार याची काय गरज होती ?" आरजू आनंदाने म्हणते.

" घराची हडळ परत आलीय मग गरज कशी नाही." मिलिंद

मग मागून अनारकली येते.

" सल्तनत की मलिका वापस आ गयी
इश्कमहल का नूर अपने साथ वो लायी
चांद तारे इस पल के लिए बेकरार थे
इसी खुशी में वो भी शायरी सुना रहे थे..!"

" अनारकली तर कपिल शर्माची सिद्धू पाजी आहे. ठोको ताली. " मिलिंद

" खरच. " आरजू हसते.

" तू आराम कर. पोहे चहा बनवले आहेत. खाऊन ये मी टिफिन डिलिव्हरी करून येतो. " मिलिंद म्हणतो.

" वाह. पोहे पण शिकला. क्या बात है " आरजू

" हो. तुमचे आशीर्वाद. बाय. " मिलिंद

मिलिंद निघून जातो.

" अनारकली मी गेल्यावरही हा टिफिन कस डिलिव्हर करतोय ?" आरजू

" खाना बनाने का हुनर उनमे भी छुपा था
कभी कुछ ना आए तो हमसे मदद लेता था
पर ये सबकुछ उन्होंने आपके लिए किया
अपनी जानसे भी प्यारी चीज को बेच डाला" अनारकली

"त्याने बुलेट विकली ? गळ्यात लॉकेट पण दिसले नाही. मी तेच म्हणले की हॉस्पिटलची फी कशी भरली याने ?" आरजूच्या डोळ्यात पाणी आले.

" खानाबदोष को आपके लिए जिंदा रखा
   पर आपको उनका प्यार धोखा लगा
गलती उनसे हुई कि जज्बात बता दिए
क्या करे जनाब उनको पसंद नहीं मुखौटे
ऊपर वाले ने प्यार दिया तो कबूल करो
इंसानो की तराजू मे जज्बातको ना तोलो
नसीबो से ऐसे प्यार करने वाले मिलते है
हमे देखो बस तन्हाही शायरी लिखते है" अनारकली

आरजूच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने अनारकलीला मिठी मारली.

रात्री मिलिंद थकून घरी येतो. घर पूर्ण सजवलेले असते. भिंतीवर " इशकमहल" लिहिलेले असते. मिलिंद परत बाहेर जातो आणि फ्लॅट नंबर चेक करतो.

" फ्लॅट तर आपलाच आहे. " मिलिंद स्वतःशीच म्हणतो.

" माकडा. दार लाव. " आरजू बाहेर येऊन ओरडते.

तिने गुलाबी साडी घातलेली असते आणि त्यात ती खूप सुंदर दिसत असते. मिलिंद लगेच दार लावतो.

" छान दिसत आहेस. " मिलिंद

" हो चल बस. तुझ्यासाठी लस्सी बनवली आहे. " आरजू

" वाह. पंजाबी माणूस मंगळावर गेला तरी लस्सी विसरणार नाही. थँक्स. "

मिलिंद आणि आरजू लस्सी पितात. आरजू गालातल्या गालात हसत असते.

" अजून एक " मिलिंद

" तुला अंगठी नाही सापडली ?" आरजू

" कसली अंगठी ?" मिलिंद

" माकडा. लस्सीत अंगठी होती. " आरजू

" यार लस्सीत अंगठी कोण टाकते ? तुला रेसिपी माहिती नव्हती तर मला विचारायचे ना. " मिलिंद

" माकडा तुला प्रोपोज करायचा होता ना. " आरजू

" तुम्ही मुली सरळ सरळ प्रोपोज नाही करू शकत ? इगो हर्ट होतो का ?" मिलिंद

" मला काय माहीत इतकं गटगट पिऊन टाकशील. बकासुर कुठला. आता वाक. पुणेरी उपाय करावे लागतील. " आरजू साडी कमरेला बांधते आणि मिलिंदला मानेवर मारायला जाते.

मिलिंद जिभेखालून अंगठी काढतो आणि हसायला लागतो.

" तू कधी सुधारणार नाहीस ना " आरजू मिलिंदला मारायला लागते.

मिलिंद तिचा हात पकडून तिला जवळ खेचतो आणि तिच्या गालावर हात ठेवतो. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बुडून जातात आणि काही क्षणातच त्यांचे ओठ एकमेकांवर टेकवतात. मिलिंद आरजूच्या ओठांचे रसपान करतो. नंतर तो आरजूच्या कपाळाला किस करतो. आरजू त्याच्या घट्ट मिठीत सामावते.

" यार मी तुझ्याशी एवढी वाईट वाटले तरी तू माझी इतकी काळजी घेतली. खरतर तुला नकार द्यावा अस काहीच नव्हते तुझ्यात. तुला माहिती आहे की माझ्या आईवडिलांनी मला सोडले. मला मामाने पाळले. जर मी लव्हमॅरेज केले तर मामांना वाईट वाटले असते . असेही ते लोक असेच समजतात की ज्या मुलीला तिच्या आईवडिलांनी त्यागले तिचा काय भरवसा ? त्यात तू आमच्या कास्टचा नाहीस. मी वाईट वागूनही तू माझ्यासाठी बुलेट विकलीस. थँक्स यार. " आरजू

" बुलेट काय मी तुझ्यासाठी प्राण पण देऊ शकतो. तू माझी जान आहेस बाबा. मी नसेल तुझ्या कास्टचा. नसेल माझी इतकी कमाई. पण आरजू तू सोबत असशील तर मी जग जिंकेल. तू जेव्हापासून जीवनात आलीय मी जीवन जगायला लागलोय. मला स्वतःची किंमत कळली. मला एक चान्स दे मी तुझ्या डोळ्यातून कसलेच अश्रू येऊ देणार नाही. आय लव्ह यु. " मिलिंद

" म्हणूनच मी या घराला "इशकमहल" नाव दिलेय. मी कोरोनाला मात देऊन आलीय. मला कळले आहे की जीवन किती क्षणभंगुर आहे ते. मला माझ्या इच्छा दाबून नाही जगायचे. मला आता भरभरून प्रेम करायचे आहे. " आरजू

मग मिलिंद आरजूला उचलतो आणि हॉलच्या सर्व लाईट ऑफ करून बेडरूममध्ये जातो. तिथे तिला कॉटवर टेकवतो. मग तिच्या तळपायाला स्पर्श करतो आणि पायावरून हात घासतो. आरजूला गुदगुल्या होत असतात. मिलिंद तिचे दोन्ही पाय पकडून पायाला किस करतो. तिच्या पायाची बोटे मोडतो आणि तिथे जीभ फिरवतो. मग हळूच तो तिच्या अंगावर चढतो आणि तिच्या दोन्ही हातांवर स्वतःचे हात टेकवतो. मग आरजूच्या कपाळावर किस करतो. आरजूच्या मानेला किस करतो. आरजू तिचे डोळे झाकते. मिलिंदचा उबदार श्वास आरजूला जाणवत असतो. मिलिंद तिच्या कानापाशी येऊन अजून गरम हवा सोडतो आणि कान तोंडात घेतो. आरजू तिचे हात मिलिंदच्या पाठीवरून फिरवते. तिच्या मऊ गालाला मिलिंदची दाढी टोचते. आरजू मिलिंदच्या मानेला चावते. मग मिलिंद आरजूच्या पोटावर किस करतो. कमरेचा चिमटा काढतो. हळूहळू वस्त्रांची बंधने गळून पडतात. मिलिंद शर्टलेस होतो आणि आरजूही त्याला घट्ट मिठी मारते. दोघेही एकमेकांत विरघळून जातात. मिलिंदच्या भारदस्त छातीवर आरजू डोके टेकवून झोपी जाते. अचानक तिला जाग येते आणि ती उठून स्वतःला आरशात पाहते. आरश्यात तिला ती नग्न दिसते. मिलिंदची पण झोप मोडते आणि तो उठून आरजूला मागून मिठी मारतो.

" काय विचार करत आहेस ?" मिलिंद तिच्या खांद्यावर स्वतःची हनुवटी ठेवत म्हणतो.

" आपण काही चुकीचे केले आहे का ? लग्नाआधी हे सर्व ?" आरजू

" यार. सेक्स इज एक्सप्रेशन ऑफ लव्ह. प्रत्येकाला त्याच्या देहासोबत काय करायचे याचा अधिकार असतो. आपण दोघे एकमेकांवर प्रेम करतो मग जवळीक साधली यात वाईट काय. उलट याने आपण अजून जवळ येऊ. प्रेम वाढेल आणि नाते बळकट होईल. तू माझी जान आहेस ग. मी तुला कधीच धोका नाही देणार. आपले प्रेमाला त्याची पवित्रता सिध्द करण्यासाठी लग्नाची गरज नाही. जस आपण सेटल होऊ आपण घरी लग्नाचा निर्णय कळवू. आणि आयुष्यात जास्त विचार नाही करायचा. नैतिकता व्यक्ती आणि परिस्थितीनुसार बदलते. ज्याचा त्याचा दृष्टिकोन. पण मी तुला कधीच सोडणार नाही इतके खरे. तू माझी जान आहेस. लग्न तर फक्त फॉर्मालिटी आहे. समाजाची मान्यता मिळावी म्हणून पण माझे जग आता तूच आहेस. आय लव्ह यु मिस हडळ." मिलिंद

" आय लव्ह यु मिस्टर माकड. " आरजू

दोघे पुन्हा एकमेकांच्या मिठीत विरघळतात.

समाप्त🎭 Series Post

View all