ओ मेरी जान ! पार्ट 1

.
मी आरजू पाटील. आता लंडनला जॉब लागलाय. म्हणून दिल्लीहून लंडनला जात आहे. दिल्ली "दिलवाल्यांचे" शहर असले तरी माझ्या सुरुवातीच्या आठवणी फार चांगल्या नव्हत्या. पहिलीवाली ओनर एकदम माहेरच्या साडीमधली "सासूबाई" होती. फक्त मला विहिरीत ढकलणेच बाकी होते. सुदैवाने एका महिन्यात ती रुम सोडली आणि दुसरीकडे आले. तरी माझे अर्धे सेक्युरिटी डिपॉझिट त्या म्हातारीने दिलेच नाही. असो. नंतर जो ओनर भेटला त्याने मात्र मला मुलीसारखे जपले. आज दिल्लीत माझा शेवटचा दिवस आणि मग मी माझ्या लंडनमध्ये. ह्या घरमालकाने फार त्रास नाही दिला. म्हणून एक वर्ष कस गेला समजलेच नाही.

"अंकल. येते. " मी अंकलच्या पाया पडले.

अंकल आणि आंटी दोघांनी आशीर्वाद दिले. त्यांच्या नातवाला म्हणजे गोरापान सश्यासारख्या क्युट रौनकला मी कॅडबरी दिली. तो खुप खुश झाला. एव्हाना ओला टॅक्सी आलीच होती. मी एअरपोर्टकडे निघाले. माझ्या रूमवर राहायला येणारी नवीन मुलगीही खाली आली होती. मी जाताना "कुलहड चायवाले" कडे गाडी थांबवून एक रिकामे मटके आठवण म्हणून घेतले. दिल्लीत काही गोष्टी मी कधीच आयुष्यात विसरणार नाही. जस की मोमोज , चांदणी चौक , रेड फोर्ट , परेड , कॅनॉट प्लेस , चिकन बिर्याणी , करीमस आणि लास्ट बट नॉट लिस्ट कुलहड की चाय..! मी दर रात्री जेवण झाल्यावर चहा प्यायचे. चहा जास्त पिते म्हणून ओनर रागवायचा. पण कुलहड पिऊन माझा दिवसभराचा ताण जायचा. खरच कोणतेच शहर पूर्णपणे वाईट नसते. चांगले-वाईट लोक प्रत्येक शहरात असतात. दिल्लीनेही माझ्या आठवणींची ओंजळी भरली.

असो. आता स्पाइसजेटमध्ये बसून सरळ लंडन. काही खाऊ का एअरपोर्टवर ? नको खूप महाग असते. पण प्लेनमध्ये बसल्यावर ती कॉफी आणि बिस्कीट घेईल. मला स्पाइसजेटचे बिस्कीट इतके आवडतात काय सांगू ? असो. चला तीन तास वाट बघा.

"लंडन स्पाईसजेट पॅसेंजरस.." घोषणा झाली.

मी धावत तिकडे गेले. आणि मला धक्का बसला.

"मॅडम. उद्यापासून देशभरात लॉकडाउन आहे म्हणून फ्लाईट कॅन्सल झाली. " त्या मॅडम म्हणाल्या.

कोरोना नावाचा रोग वाढतोय ठाऊक होते पण चक्क लॉकडाऊन होईल माहीत नव्हते. आता काय करू ? मी एअरपोर्टवर डोक्यावर हात ठेवून बसले. अंकलला फोन लावू का ? नाही. त्यांनी ती रुम दुसऱ्याला दिली पण असेल. ब्रोकरला फोन करते. आमचा ब्रोकर म्हणजे घोसला अंकल. इंग्रजांनी सर्व ठगसला संपवले पण काही ठग उरले ते म्हणजे "दिल्लीचे ब्रोकर" !! जिभेवर साखर ठेवतात आणि मतलब साधतात. असो. आता या ब्रोकरचीच मदत घ्यावी लागणार. मी परत त्या भागाकडे गेले. एक हॉटेल बुक करून तिथे सामान ठेवले. ब्रोकर स्कुटी घेऊन आलाच होता.

"मॅडम एक फ्लॅट आहे. मी फोटो दाखवतो. " ब्रोकर

"पण मला बघायचा आहे. " आरजू

"मॅडम उद्यापासून लॉकडाउन आहे. मलाही इतर कामे आहेत. तुम्ही मुलगी आहात म्हणून आलो तुमच्यासाठी. " ब्रोकर

फ्लॅट छान होता. मी लगेच पेमेंट करून चावी घेतली. सामान वगैरे घेऊन दार उघडले. लाईट ऑन केल्या. खूप सुंदर फ्लॅट होता. बाथरूमकडे गेले. तिथे "त्याला" पाहून मी जोरात ओरडले आणि "तो" पण ओरडला.

क्रमश...


🎭 Series Post

View all