समीर गडबडीत येऊन गाडीत बसतो. तो काय बोलून गेला हे त्याचं त्याला कळत नसतं..एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो.. घरी जायला उशीर होतो. जेवण करून तो खोलीत जातो. मनात मायाचा विचार चालू असतो. तिचं हसणं, मोकळे केस, गव्हाळी रंगावर गालावर तीळ, रेखीव भुवया..
मधेच तिने चिडून बोललेली वाक्य, कधी हलका फुलक्या गप्पा तर कधी समोर कामात मग्न असणारी, हलकेच केस एका बोटाने कानापाठी नेणारी माया.. सगळं त्याचा डोळ्यासमोरून तरळत होतं..
ऑफिस मध्ये, येता जाता अगदी कॉलेज मध्ये पण बऱ्याच मुली होत्या आणि आहेत.. काही तर अगदी माझ्या पाठी होत्या पण हे फिलिंग आलं नाही कधी.. मायाला पाहून पण आधी असं झालं नाही पण तिची मस्करी करायची काय सुचली, थोडेच दिवस झाले पण मी ओढला जातोय तिच्याकडे..
येस आय एम इन लव्ह!!
समीरला विचार करता करता झोप लागते..
……………………………………………………………………………………………
निता सकाळी समीरच्या खोलीत त्याला उठवायला जाते.
“गुड मॉर्निंग समीर”
“ गुड मॉर्निंग आई. कुठे चाललीस?”
“मी आश्रमात अजून कुठे? तुला काल बराच उशीर झाला. आत्ताही उशिरा उठला आहेस.. काल ऑफिसला ही नव्हतास असं”
“हो मी मायाच्या घरी गेलो होतो…”
“मग मायाचे बाबा कसे आहेत?”
“ एकदम छान आहेत. माया दोन दिवसांनी ऑफिस जॉईन करणार आहे.”
“पण मी नाही विचारलं तुला की माया कधी जॉईन होणार आहे.” असं म्हणून निता हळूच हसते.
“तू पण ना आई. जा आता मलाही उशीर होतोय आणि तुलाही”
“ बरं जातेच मी.”
निता दाराजवळ जाते तोच समीर तिला हाक मारतो.
“आई”
निता मागे वळून बघते
“तुझंच बरोबर आहे. मी प्रेमात पडलोय मायाच्या..”
निता फारच खुश होते.. टी जवळपास धावतच येऊन समीरला मिठी मारते.
“मग आता तरी माया आणि माझी भेट घडवून आण.. मला दाखव तरी कोण आहे, कशी दिसते..”
“ हो हो आई. मी तुला ऑफिसमधे घेऊन जाईन. तुझी भेट घडवेन तिच्याशी पण आत्ता नाही. तुला सुद्धा माझ्याविषयी काही फिलिंग असेल तर हे पुढे जाईल ना.. सो चिल.. आता मी आवरून ऑफिस ला जातोय. बाय”
असं म्हणून दोघेही आपल्या कामाला निघून जातात..
दोन दिवस समीर कामात भरपूर अडकतो. आऊटडोअर मीटिंग, कॉन्फरन्स असं सगळं होता होता त्याला वेळच मिळत नसतो.. माया ऑफिस ला जॉईन होते त्या दिवशीही तो आलेला नसतो.. माया आपलं काम परत जोमाने सुरू करते तिचं लक्षही नसतं..
तेवढ्यात प्रिया आणि राज तिला कॉल करतात.
“हॅलो मॅडम, काय म्हणताय?”
“काय म्हणू… काम चालू आहे. बऱ्याच दिवसांनी आले म आता जास्तीचं काम.”
“ मला नाही वाटत एवढं काम तुला करायला लागेल.. तुझा बॉस भारी आहे एकदम त्याला किती ती काळजी तुझी.” प्रिया मायाला चीडवते
“ हो ना. इथे येऊन माया माया जप चालला होता.. प्रेमात पडले आहेत की काय तुझ्या? बघ हो राजकुमार आयता मिळाला आहे अगदी तुझ्या स्वप्नात येतो तसा..”
“ तुम्हाला कसं कळलं तो माझ्या स्वप्नात येतो??”
राज आणि प्रिया एकमेकांकडे पाहतात आणि त्यांना जोरात हसू फुटतं.
“आम्ही कुठे बोललो समीर येतो स्वप्नात. मी तर म्हंटल की राजकुमार येतो स्वप्नात तसाच.. म्हणजे तो तुझ्या स्वप्नात येतो तर…..”
“तसं काही नाही त्याचा बद्दल माझ्या मनात राग होता थोडा आणि सतत तोच विचार म्हणून होत होतं असं. बाकी काही नाही. तुम्ही उगाच अर्थ काढू नका काही.”
“ओके.. ठेवतो आम्ही फोन आता पण आम्हाला आनंदाची बातमी दे.. बघ काही चान्स मिळतोय का. तुला इंटरेस्ट नसेल तर मला चालेल तो माझा राजकुमार म्हणून..”
“गप ग प्रिया. ठेवा आता फोन.”
मायाला हसूच येत आणि ती एक नजर समीरच्या केबिन कडे टाकते.. समीरची खुर्ची रिकामी असते ..
“शुभम….”
“हे माया आलीस तू? समीर सर विचारत होते तुझ्याबद्दल.. मी त्यांना कळवतो तू आली आहेस ऑफिसला..”
“नको. ते बिझी असतील. आले की भेटूच ना.”
“ अगं पण आज ते येणार नाहीत. त्यांना खूप मीटिंग आहेत. कदाचित उद्या पण येतील का नाही खात्री नाही.”
“ओके. आले की भेटूच. कामाला लागते आता. लंच टाईम ला मला हाक मार. सरांची ऑर्डर आहे ना लंच एकत्र करायचा.. खूप मिस केलं मी ऑफिस.”
“ अरे वा.. हो नक्की बोलवेन मी तुला. चल मलाही काम आहे भरपूर..”
मायाने कामाला सुरुवात केली होती खरी पण मनाचा एक कोपरा तिच्या नकळत समीरची वाट बघत होता..
तेवढ्यात समीर ऑफिस मध्ये येतो. आपल्या केबिन मध्ये जाऊन बसतो आणि कॉफी ऑर्डर करतो. जरा शांत होतो तर समोर माया दिसते. आज माया केशरी रंगाच्या ड्रेस मध्ये फारच उठून दिसत असते. समीर तिच्याकडे पहातच बसतो.. माया अगदी गुंग होऊन काम करत असते तिला समीर आल्याचं कळलं ही नसतं..
“मे आय कम इन सर?”
समीरच तरीही लक्ष नसतं..
“सर… मी आत येऊ का?”
अरे ये ये. (त्याचा एक एम्प्लॉइ आत येतो)
“सर आपली पुढची मीटिंग कॅन्सल झाली आहे. त्यांच्या घरी काहीतरी अडचण आली मग मी मीटिंग पुढच्या आठवड्यात फिक्स केली आहे.”
“ ओके. चालेल. बाकीच्या कामांचा रिपोर्ट मला दे आणि हो त्या मिस माया आहेत त्यांना सांग मी बोलावलं आहे केबिन मध्ये.”
मायाला निरोप मिळतो.. ती तिच्या कामाचा रिपोर्ट घेऊन केबिन मधे जाते.
“मी आत येऊ?”
“येस कम इन. हाय माया. कशी आहेस? तुझे बाबा?”
“ एकदम छान. हा माझा रिपोर्ट. घरून मी बरच काम केलं आहे.”
“ मी तुम्हाला त्याचासाठी बोलवल नाही.. तुमच्या बाबांची विचारपूस करायची होती. मला माहिती आहे तुम्ही कामात किती परफेक्ट आहात ते.”
“तरी माझं कर्तव्य आहे तुम्हाला काम दाखवणं.. सर माझी अजून एक रिक्वेस्ट होती तुम्हाला ते सुट्टी……..”
“ आता सुट्टी नाही मिळणार तुला.बाबा बरे आहेत ना? मग कशाला हवी सुट्टी”
“सर मी सुट्टी नाही मागायला आले.. सुट्टीत जे काम राहिलं आहे ते मी एक्स्ट्रा थांबून करेन..”
“त्याची गरज नाही तुम्ही कव्हर कराल ना.”
“नाही सर माझ्या कमिंटमेंट चा प्रश्न आहे..”
“ठीक आहे नो प्रॉब्लेम.”
माया असं म्हणून निघून जाते.. समीर तिच्याकडे बघतच राहतो. ऑफिस सुटतं तरी माया काम करत असते. समीरही काहीतरी कामाचं निमित्त करून थांबून असतो.. तिला असं ऑफिसमध्ये सोडून आपला हीरो कसा काय जाईल??
मायाला माहिती असतं की समीर थांबला आहे.. ही गोष्ट तिला फार सुखावून जाते.. थोड्या वेळाने समीर दोन कॉफी घेऊन स्वतः तिच्या डेस्क जवळ येतो..
“माया कॉफी..”
“ तुम्ही कशाला आणली? मी घेतली असती..”
“ प्लीज मला समीर म्हण.. सर,तुम्ही, अहो- जाहो नको.”
“ओके समीर.. मी घेतली असती कॉफी.”
“मी आणली आहे ना आता. पुढच्या वेळेस घे तू.. बरं मी इथे बसू का माझं पण काम आहे.. केबिन मध्ये मला भीती वाटते एकट्याने.. मी एवढ्या रात्री ऑफिस मध्ये काम नाही केलं ना.. प्लीज प्लीज..”
समीर अगदी हात जोडून नाटकं करून तिला बोलतो.
मायाला हा नक्की बॉस आहे ना असा प्रश्न पडतो आणि ती खळखळून हसते.. तिच्या हसण्याकडे पाहून समीर अजूनच प्रेमात पडतो.
“समीर बस तू इथे घाबरु नकोस. मी रक्षण करेन तुझं.”
“आलोच.. लॅपटॉप घेऊन..”
दोघंही आपलं काम करायला लागतात. समीर सुद्धा उद्याची काही कामे आजच करून घेतो पण तिला हळूच डोळ्यांच्या कोपऱ्यातून पहात असतो.. पण आपली हिरोईन हुशार आहे बरं का.. तिला समोर असलेल्या काचेतून समीर दिसत असतो आणि अर्थात समीरचे तिच्याकडे बघणं सुद्धा… तेवढ्यात पावसाला सुरुवात होते… समीर उत्साहाने खिडकीजवळ जातो आणि पाऊस बघत असतो.
“खूपच पाऊस पडतोय..”
“पडत नाही कोसळतोय.. आता माझी घरी जायची वेळ तरी पण हा कोसळतच राहील. काय वाकडं आहे माझ्याशी कळत नाही..”
“वाकडं? काहीही.”
“ हो.. मला अजिबात पाऊस आवडत नाही.. रागच येतो मला आणि माझ्या कामाच्या वेळेतच अगदी जोरात येतो.”
समीरला आश्चर्य वाटतं. ह्या मुलीला पाऊस आवडत नाही?? पण मला तर खूप आवडतो. किती रोमँटिक वाटतं पाऊस पडताना.. पण मी जिच्यावर प्रेम करतोय तिचं काहीतरी वेगळंच.. बाप्पा बरोबर जोड्या लावतोस तू अजिबात सोपी नको करुस माझी वाट…..
(आता कथेमध्ये काय घडेल? समीर आणि माया ची जोडी जमेल का नाही?? त्यासाठी पुढचे भाग वाचत रहा.)
(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)
© स्वराली सौरभ कर्वे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा