https://irablogging.com/blog/o-mere-rajkumar-part1
https://irablogging.com/blog/o-mere-rajkumar-part2
https://irablogging.com/blog/o-mere-rajkumar-part3
https://irablogging.com/blog/o-mere-rajkumar-part4
https://irablogging.com/blog/o-mere-rajkumar-part5
https://irablogging.com/blog/o-mere-rajkumar-part6
https://irablogging.com/blog/o-mere-rajkumar-part7
(वाचकांच्या आग्रहास्तव पहिल्या भागाच्या लिंक देत आहे.)
माया आणि समीर एकमेकांशी कामाबद्दल वरचेवर बोलायला लागतात. मायाचं त्याचा बद्दल मत थोडं चांगलं झालं असतं.. समीरला सुद्धा प्रत्येक दिवशी नवीन माया कळत असते. तिचं आत्मविश्वासाने बोलणं, आपला मुद्दा पटवून देणं, प्लॅनिंग ने काम करणं सगळं त्याला आवडत होतं..
आज ऑफिस नेहमीप्रमाणे सुरू झालं. समीर सकाळीच एका मीटिंगए ला जाऊन ऑफिस मध्ये आला होता.. ऑफिस मध्ये काही काम झाल्यावर कॉफी घेत त्याचा केबिन मध्ये बसला. त्याचं लक्ष माया च्या डेस्क कडे गेलं. आज माया आली नव्हती. त्याने एचआर ला फोन करून विचारलं तर तिने आठवड्या ची सुट्टी टाकली होती.. ती का आली नसेल, कारण पण दिलं नाही सुट्टीच, असं का असे असंख्य प्रश्न यायला लागले.. दिवसभर त्याचं लक्ष कशातच लागलं नाही. सारखं मायाच्या डेस्क कडे बघत होता तो. ती नेहमीच समोर दिसत असल्यामुळे आज समीरला वेगळं वाटत होतं.
तो फोन करून शुभम ला आत बोलवतो.
“शुभम, माया नाही आली आज. काही बोलली का काल तुला?”
“नाही सर..”
“ओके जा तू.”
समीर माया च्या डेस्क जवळ जातो आणि नोटपॅड बघतो. नोटपॅड वर सगळ्या आठवड्याचे काम लिहिले होते. काम लिहून सुद्धा माया आली नाही म्हणजे काहीतरी प्रोब्लेम असेल..
समीर ला खरं तर चैन पडत नव्हतं.. पुढे दोन दिवस असेच जातात शेवटी समीर माया च्या घरी जायचा निर्णय घेतो. पण मायाचा पत्ता कसा मिळणार? तो तिच्या ऑफिस मध्ये फोन करतो आणि पत्ता विचारतो.. पण ऑफिस मधल्या लोकांची पर्सनल माहिती आम्ही देऊ शकत नाही असे त्याला सांगितले जाते. मग समीर स्वतः तिच्या ऑफिस मध्ये जातो.
समीरला आलेलं पाहून मायाचे बॉस येतात.
“हॅलो समीर सर. तुम्ही इथे? एनी प्रोब्लेम? माया आली नाही का?”
“मी तुम्हाला तेच विचारायला आलो माया आली नाही ऑफिस मध्ये.. तशी तिने आठवडा भराची सुट्टी टाकली आहे. तिच्या घरचा पत्ता हवा आहे मला.”
“ माया असं करत नाही. थांबा मी तिला कारण विचारतो. अशी सुट्टी ती कशी घेऊ शकते? तेही न सांगता. तुम्हाला उगाच त्रास. कामाच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा”
“अहो थांबा. मी काही तक्रार केली का? आमच्या ऑफिस ने तिची सुट्टी मंजूर केली आहे. तिचे काम ती वेळेच्या आधीच करते. मला तिचा पत्ता हवा आहे म्हणून मी इथे आलो. तुमच्या ऑफिस मधून सांगितलं की पर्सनल इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला भेटायला आलो.”
“सॉरी सर, ऑफिस चा नियम आहे हा तो माझ्यासाठीही मोडला जात नाही. मी नाही देऊ शकत तुम्हाला.”
“ओके. मी येतो. बाय द वे.. तुमच्या पॉलिसी च कौतुक केलं पाहिजे. गुड…”
समीर तिथून निघतो गाडीजवळ जातो त्येवढ्यात पाठून समीर सर अशी हाक येते.. तो पाठी वळतो तर एक मुलगी त्याचाकडे येत असते.
“ हाय, मी प्रिया.. मायाची मैत्रीण.”
“हाय, प्रिया. काही काम आहे का?”
“सर मला तिचा पत्ता माहीत आहे. ती खारघर ला राहते.”
प्रिया समीरला तिचा पत्ता देते.
“पण तुम्हाला का हवा होता पत्ता? म्हणजे काम आहे का काही?”
“हो माया तीन दिवस झाले ऑफिस ला आली नाही. तिने एका आठवड्याची सुट्टी टाकली आहे खरी पण काहीतरी प्रोब्लेम आहे बहुतेक. तुला माहिती आहे का?”
“ हो सर, तिच्या बाबांना अपघात झाला म्हणून तिने सुट्टी घेतली. त्यांना हॉस्पिटल ला ठेवायला लागलं होतं.”
“ अरे देवा.. बरं झालं तु मला सांगितलस मी जाऊन येतो तिच्या घरी..”
“सर तुम्ही नेहमीच असे सगळ्यांना मिस करता आणि प्रोब्लेम समजून घेता का?”
प्रियाच्या ह्या प्रश्नावर समीर ला काय बोलायचं सुचत नाही. एकदम क्लीन बोल्ड झाला असतो तो.
तिला काहीच उत्तर न देता तो गाडीत बसतो आणि विचार करतो की खरंच आपण एवढा विचार का करतोय मायाचा? ह्या आधी आपल्या ऑफिस मध्ये कोणी सुट्टी नाही का घेतली? मग तिच्यासाठी असं का होतंय?
तो सरळ घरी जातो. निता त्याला खायला आणि कॉफी घेऊन येते.
“समीर आज लवकर? चांगलं आहे माझ्याशी जरा गप्पा मारशील. अरे आज आश्रमात मजाच झाली. परी ला आता समजायला लागले आहे त्यामुळे तिला खेळवण्यात कसा वेळ जातो कळत नाही. लाघवी आहे पोर.”
समीर आपल्याच विचारात गुंग असतो. त्याचं लक्षच नसतं सुगंधा काय बोलते त्याचाकडे.
“अरे समीर लक्ष कुठे आहे? कसला विचार चालला आहे?”
समीर आपल्या आईशी फार जवळचा असतो. तिच्यापासून काहीही गोष्ट तो लपवून ठेवत नसे.
“आई अगं ती माया. तिच्या बाबांचा अपघात झाला त्यामुळे ती येत नाही. तिचा पत्ता मिळवायला तिच्या ऑफिस मध्ये गेलो होतो. मी ह्या आधी असं कुणाच्या बाबतीत केलं नाही पण तिने का सुट्टी घेतली हे जाणून घेतल्याशिवाय मला चैन पडत नव्हतं.. सारखं मी खूप काहीतरी मिस करतोय असं वाटत होतं. तिचं हसणं, बोलणं, कॉन्फिडन्स, रोज केबिन मधून ती दिसते. माझ्या कामाची सुरुवात करताना माझ्या नजरेसमोर तीच असते. आधी ती थोडी विचित्र वागायची पण आम्ही नीट बोलत होतो आता. मला काही कळत नाही.”
निता हळूच हसते आणि त्याला म्हणते, “ समीर तू प्रेमात तर पडला नाहीस ना? चला माझी चिंता मिटली.. बाप्पा पावला.. कुठे राहते ती? सांग ना.. आपण भेटून येऊ चल..”
“आई अगं तू बरी आहेस ना? असं काही नाही आहे.. आमची रोज भेट होत असते. सवय झाली आहे आता म्हणून वाटतंय असं.. बाकी काही विचार तू करू नकोस..” समीर असं बोलून निघून जातो.
निता मात्र मनातून खूप खुश असते.. समीर विचार करतो आई हे काय बोलली? खरंच असं काही झालय का मला?? मी प्रेमात पडलोय?? नाही काहीतरीच काय.. मी तिला इतकाही ओळखत नाही आणि प्रेम वगैरे काय..
…………………………………………………………………………………………..
ऑफिस मध्ये नेहमीसारखी कामे सुरू झाली असतात.. समीर नेहमीप्रमाणे उत्साही आणि फ्रेश आपल्या केबिन मध्ये शिरतो. आज तो ठरवून आला असतो की माया बद्दल विचार करायचा नाही, तिच्या डेस्क कडे बघायचं नाही.. स्वतःला कामात गुंतवून घेतो आणि दोन चार मीटिंग ठरवून टाकतो.. ठरल्याप्रमाणे त्याचा दिवस जातो पण लक्ष मात्र अजिबात नसतं. शेवटी तो खारघर ला मायाच्या घरी जायचं ठरवतो.
खारघर ला पोहोचल्यावर रस्त्यात एक बुके आणि फळं घेऊन मायाच्या घराजवळ येतो. बेल वाजवतो तर सुगंधा दार उघडते.
“कोण?”
“मिस माया इथेच राहतात का? मी तिच्या ऑफिस मधून आलो आहे समीर..”
“हो या ना आत.. माया…. समीर आले आहेत तुझ्या ऑफिस मधून..”
माया खोलीतून बाहेर येते..
“तुम्ही?? इथे? तुम्हाला माझा पत्ता कसा मिळाला?”
“हो मला प् तुमची ती मैत्रीण.. नाव काय बरं… हो प्रिया तिने पत्ता दिला..”
मूर्ख कुठची (मनात म्हणून) “या बसा.. आई हे माझे बॉस मिस्टर समीर.”
“बसा मी चहा आणते तुमच्यासाठी..”
“अहो नको.. माया तुझे बाबा कुठे आहेत? बरे आहेत का आता? मी ही फळं आणि बुके आणला आहे त्यांच्यासाठी.. तू ऑफिस मध्ये आली नाहीस.मला कळलं की तिच्या बाबांचा अपघात झाला आहे आणि मलाही करमत नव्हत तू आलो म्हणून मी लगेच आलो..”
“काय तुम्हाला करमत नाही?”
“आय मीन तुझ्या बाबांचं ऐकून करमत नव्हतं”(थोडासा गोंधळतो)
“हे पण तुम्हाला प्रियानेच सांगितले असेल हो ना?”
“हो म्हणजे मीच तुझ्या ऑफिस मध्ये गेलो होतो विचारायला तेव्हा तिने सांगितलं.”
“ओके.. आहेत बाबा आत पण झोपले आहेत आत्ताच. जास्त लागलं नाही. हात फ्रॅक्चर झाला आहे..”
“ओके काळजी घ्या..”
“हो घेतोय.”
“ठीक आहे मी निघतो. तू ऑफिस कधी जॉईन करते आहेस??”
“ २-३ दिवसात करेन..”
“लवकर ये मी वाट पाहतोय..”
मायाला त्याचं हे वाक्य अनपेक्षित असतं आणि समीर वळून निघतो.. माया पाठमोऱ्या समीरकडे बघतच बसते..
क्रमशः
(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)
© स्वराली सौरभ कर्वे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा