ओ मेरे राजकुमार (भाग ७)

Love story

समीर गाडी बस स्टँड च्या दिशेने घेतो. गाडीत मस्त गाणी लावली होती.. माया ला थोडी अवघडून बसली होती. समीर माया कडे हळूच बघत असतो.
“माया तुझ्या घरी तुम्ही तिघेच असता का?”
“हो.”
“छान आहे तुझी फॅमिली.. फोटो पण एकदम मस्त आहे ग. तू माझ्यावर कायम चिडलेली का असतेस? मी काही वेगळं केलं आहे का?”
“नाही मला पटकन असं कोणाशी बोलता येत नाही इतकं जास्त फ्रेंडली.”
“शुभम शी तर बोलतेस.. बाकी स्टाफ बरोबर पण ओके होतीस एका दिवसात..”
“हा माझा प्रश्न आहे. तुम्ही माझे तात्पुरते बॉस असला तरी कायम नाही.. बाहेर तर अजिबात नाही.”
“ओके सॉरी मी जास्त बोलतो जरा..”
तेवढ्यात बस स्टँड येतो. माया खाली उतरून थेट निघून जाते. बस समोर उभीच असते.. ती एकदाही समीरकडे पाहत नाही का त्याला धन्यवाद म्हणते.
इकडे समीरला खूप वाईट वाटत. पण तो तिची बस निघेपर्यंत थांबतो..
माया घरी पोहोचते. सुगंधा तिला विचारते उशीर झाल्याबद्दल..
“आई अगं आज संप आहे. त्यामुळे मला बस ने यावं लागलं.. समीर ने सोडलं मला. मला जायचं नव्हत पण पर्याय नव्हता माझ्यापुढे.”
“बघ तो चांगला आहे. तुला उगाच वेगळं वाटतं”
माया आईच्या बोलण्याचा विचार करते. तिला आठवतं की आपण साधं वळून त्याला थॅंक्स नाही म्हंटल. तो आला नसता सोडायला तर चालतच यावं लागलं असतं मला. मी खरंच त्याचा बद्दल गैरसमज करून घेतला आहे का?  इतकाही वाईट वागला नाही तो. एकाच दिवसात मी त्याला जज करते.. बाकी त्याचा स्टाफ किती चांगलं बोलतो त्याचाविषयी.
“ माया चल जेवायला ये.. बाबांचा फोन येईल थोड्या वेळात.”
माया जेवायला जाते. इकडे समीर ही घरी पोहोचतो.
थोडा नाराज असतो त्यामुळे आल्यावर सरळ त्याचा खोलीत जातो. निता आणि सलील ला आश्चर्य वाटतं. थोड्या वेळात तो खाली येतो.
“आई कॉफी दे ना प्लीज.”
“ही काय केली आहे. आज मूड ठीक नाही का?”
“अग तसं नाही. पण ऑफिस मध्ये एक मुलगी आली आहे. माया नाव आहे तिचं. अर्णव इन्फोटेक बरोबर डील झालं ना त्याचा प्रोजेक्ट ची त्यांची हेड. आज तिचा पहिला दिवस होता. तिला बहुतेक माहिती नाही की मी कोण आहे. मला ती एक एम्प्लॉइ च समजत आहे. त्यामुळे मी सुद्धा तिची जरा मस्करी करतो आहे. माहित नाही पण ती जरा वेगळं वागते माझाशी.. नीट बोलत नाही. बाकी सगळ्यांशी छान गप्पा मारत होती. ओळख करून घेत होती..”
निता म्हणते, “ समीर, मुली असं पटकन नाही बोलत अरे. काही जणी पटकन मोकळ्या होतात काही नाही होत. ती बोलत नाही म्हणून तू का इतका डिस्टर्ब आहेस? आज काम करते उद्या निघून जाईल ना..”
“ह्म्म्म्म”
तिघही छान कॉफी घेतात.. समीर विचार करतो उद्या पाहू काय ते.. पण आपण तिला आवडत नसेल तर जास्त बोलायचं नाही..
इकडे माया जेवून झोपायला जाते. पहाट होत नाही तर तिला स स्वप्नात राजकुमार भेटायला येतो.. अगदी तसाच येत असतो हळुवार.. सगळीकडे फुलं आणि काय समीर असतो समोर.. 
ती परत दचकून उठते.. हे काय होतंय मला. समीर का दिसतोय सारखा. हा माझा राजकुमार नाही तरी दिसतो…आणि बराच वेळ विचार करत बसते.
……………………………………………………….
ऑफिस १० वाजता सुरू होतं.. माया आज ठरवून आलेली असते की समीरला थॅंक्स म्हणणार. समीर आपल्या केबिन मध्ये असतो. कोणी नाही हे बघून ती केबिन जवळ जाते.
टक टक
“मे आय कम इन?”
“माया ये. काही काम?” असं विचारून फाईल लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून बसतो. 
“हो काम म्हणजे……… (थोडा वेळ घेऊन) थॅंक्स. काल मदत केल्या बद्दल. मी तशीच पुढे गेले.”
समीर हळूच वर बघतो. माया जरा नॉर्मल वाटत होती.
“नो प्रोब्लेम. माझं कर्तव्य होतं ते. आमच्या ऑफिस मधे काम करणारे आमची जबाबदारी असतात.”
मायाला बरं वाटतं. ती गोड हसते.
“ ओके. मी कामाला लागते.”
“हो जा पण कालच्या मदतीबद्दल मला काय देणार?”
माया त्याचाकडे बघते. मदत केली म्हणतो आणि त्याला काहीतरी हवच आहे.. असच सगळं घेतलं असेल ह्याने मागून.
“ माया, जास्त विचार करू नकोस फक्त मला आठवड्याच प्लॅनिंग कसं करतात ते शिकव..”
माया ह्या वाक्यावर खळखळून हसते आणि डोक्याला हात लावते. तिला वाटत असतं हा काय मागणार आहे.. थोड का होईना पण मायाचे समीरबद्दल विचार बदलत असतात..
आता रोज माया त्याला ऑफिस मध्ये बघत असते. त्याचं बोलणं वागणं.. सगळं काही छान असतं. कामत एकदम परफेक्ट, वेळेत हजर, कोणाशी बाॅसिंग नाही पण चुकलं तर माफी नाही.. कोणाचं काही चुकलं तर समजावून सांगून शिक्षा म्हणून फील्ड वर्क.. माया ही इंप्रेस झाली होती. दोघंही आता वरचेवर बोलायला लागली होती..
क्रमशः

( माया समीरशी नीट बोलायला लागली आहे पण तिला समीर नक्की कोण हे कळल्यावर काय होईल? )
(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)

© स्वराली सौरभ कर्वे

🎭 Series Post

View all