Login

ओ मेरे राजकुमार (भाग ६)

Love story

समीर - माया ची नजरानजर होते आणि पाऊस सुरू होतो.. माया शुभम ला शोधते आणि त्याला तिची बसण्याची जागा विचारते. शुभम तिला जागा दाखवतो आणि सांगतो
“तुम्हाला जे काही लागेल ते सांगा. आमचे सर किंवा आम्ही कोणीही मदत करू.. आणि रवी आहे ऑफिस मधला पिऊन तो आणून देईल त्याला कॉल करा फक्त. कॉल साठी नंबर लिस्ट ही बघा समोर लावली आहे..”
“थॅंक यू शुभम. तुम्ही खरंच खूप मदत केली.. (कुजबुजत)नाहीतर इथे काहीजण फारच शहाणे समजतात स्वतःला..”
“काय? काही म्हणालात का?”
“नाही. एवढंच. मी कामाला सुरुवात करते.”
माया डेस्क वर लॅपटॉप,तिची आणि आई बाबांची फोटो फ्रेम,आणि एक छोटीशी गणपतीची मूर्ती ठेवते, हात जोडून नमस्कार करते. सगळ्यात पहिले ती तिच्या कामाचा एक आराखडा तयार करून एका नोटपॅड वर लिहून घेते आणि मग कामाला सुरुवात करते.
इकडे समीर तिच्या कडे बघत असतो. ती डेस्क वर सगळं मांडताना, बाप्पाला नमस्कार करताना आणि मग नोटपॅड मध्ये बरंच काही लिहिताना.. त्याचा मनात एक उत्सुकता निर्माण होते की ही काय लिहत असेल? कारण मायाचं मन लावून लिखाण सुरू होतं.
अखेर तो केबिन च्या बाहेर येतो. तिच्या डेस्क जवळ जातो..
“हॅलो, सगळं काही मिळालं का?” आणि हळूच तिच्या नोटपॅड कडे बघायचा प्रयत्न करतो.
माया नोटपॅड बंद करून “ हो..(रागावून) तुम्हाला काही प्रोब्लेम?? (मग थोड सौम्य) नाही म्हणजे कामाचा काही प्रोब्लेम आहे का?”
“नाही नक्की काम करते आहेस का टाइमपास ते पहायला आलो. बॉस ला मला उत्तर द्यावी लागतात दुसरं काय? माझं कामच आहे ना ते”
“बघितलं ना मग.. आता सांगा तुमच्या बॉस ला जाऊन..”
“ओके.. कर तुझं काम मी जातो.”
आता सगळे आपापल्या कामाला लागले असतात. माया ची कोणाशी ओळख झालेली नसते आणि तसही एकदा ठरवलेलं काम हातात असलं की ते पूर्ण करूनच ती उठायची. तेवढ्यात शुभम तिला हाक मारतो.
“हे माया, लंच टाईम आहे. तुला जेवायचं असेल ना? कॅन्टीन इथे खालच्या मजल्यावर आहे. चल मी तुला ओळख करून देतो सगळ्यांशी.”
“ हो आलेच मी. दोनच मिनट माझं काम होतंच आलं आहे.”
“बरं मी पुढे होतो पण नक्की ये नाहीतर सर ओरडतील.”
“ इथे पण ओरडणार का? हेड आहे प्रोजेक्ट चा आपल्या लंच टाइम चा नाही.. बॉसींग कंपनी च्या कामात ठीक आहे जेवणाच्या वेळेत कशाला करतोय.”
“काहीही काय बोलतेस. ते उलट अजिबात असं करत नाहीत. ठरवलं तर ते काहीही करू शकतात.. तुला माहिती आहे ना………….”
 एवढ्यात समीर हाक मारतो, “अरे शुभम चल.. जेवायला सगळे वाट पाहत आहेत. कशाला मस्का मारायचा कोणाला. पण तुला माहिती आहे ना आपल्या टीम चा रुल.. आपण सगळे एकत्र जेवतो. काम काय होईल. चल जाऊ आपण. कोणाला जॉईन व्हायची इच्छा असेल तर त्यांचं स्वागत आहे..” अस मुद्दाम जोरात ओरडून सांगून दोघं निघून जातात. माया त्याचाकडे पाहते आणि काम पूर्ण करते. सगळे कॅन्टीन मध्ये एकत्र जेवायला बसले असतात. समीर चा नियम असतो की कितीही काही झालं तरी लंच एकत्र…
माया तिचा डब्बा घेऊन येते आणि सगळ्यांना एकत्र बसलेलं पाहते. सगळे गप्पा मारत असतात. ती येताना दिसल्यावर शुभम तिला हाक मारतो..
“माया, ये आम्ही तुझी वाट पाहतोय.”
माया येऊन एका खुर्चीत बसते. सगळे आपली ओळख करून देतात. आता शेवटी समीर ची ओळख राहते पण तो गप्प असतो मग शुभम पुढे बोलतो. 
“माया हे आमचे समीर सर. तुला नाव तर माहिती आहे. हे प्रोजेक्ट हेड म्हणून काम पाहतात. पण मगाशी मी तुला ह्यांची अस्सल ओळख सांगणार होतो ते राहिलंच. ते नुसते प्रोजेक्ट हेड नाहीत. सर…..”
समीर तिकडून डोळे मोठे करून शुभम ला गप्प बसायला सांगतो आणि जोरात बोलतो “तर मी समीर आहे.. मी नुसता प्रोजेक्ट हेड नाही तर ह्यांचा मित्र आहे. हो की नाही?”
सगळे एका सुरात हो म्हणतात..
“चला जेवा आता.. काम संपलं नाही..”
माया सगळ्यांकडे पाहत राहते. हा माणूस आणि मित्र!! साधी मदत नाही केली मला.. पण थोडा वेगळा आहे नक्की. मला वाटलं तसं नक्की आहे का? आई म्हणते तसं मी पटकन मत बनवते का ह्याचा बद्दल? जाऊ दे मला काय करायचं आहे? माझं काम ६ महिने मग मी जाणार. माझा आणि ह्याचा संबंध कुठे येणार नंतर?
“माया जेव की डब्बा आणला आहेस ना?” शुभम विचारतो..
“हो हे काय..”
समीर लवकर जेवून मला काम आहे असं सांगून ऑफिस मध्ये जायला निघतो. केबिनमध्ये जायचा आधी त्याला मायाचा डेस्क दिसतो. सहज तो तिथे जातो. मायाच्या सगळया वस्तू नीट मांडलेल्या असतात. डेस्क स्वच्छ असतो. तेवढ्यात त्याची नजर नोटपॅड वर जाते.. उघडून पाहतो तर मायाने संपूर्ण आठवड्याचे कामाचे प्लॅनिंग त्यात लिहून ठेवलेले असते. अगदी कुठल्या तासाला काय करायचं ते सुद्धा..
समीर खूपच इंप्रेस होतो. तिच्या फ्रेम कडे लक्ष जातं. तो फ्रेम हातात घेतो आणि विचार करत असतो की हे मायाचे आई बाबा असतील .. तेवढ्यात पाठून माया आवाज देते..
“हॅलो, काय करताय तुम्ही इकडे? काम होतं ना तुम्हाला? हे काय आहे हातात? माझी फ्रेम? असं कोणाच्याही डेस्क वर जाऊन त्याची वस्तू उचलणं शोभत का? मला वाटलच होतं तुझ्यात काहीतरी  गडबड आहे.”
“ माया असं काही नाही. गैरसमज करु नकोस. तुला मी सकाळी बघत होतो तेव्हा तू ह्या नोटपॅड मध्ये बरच काही लिहत होतीस. मला तू काय लिहिलंस त्याची उत्सुकता होती कारण तुझं काम कॉम्प्युटर वर मग हे काय असेल. पण तू चांगलं प्लॅन करतेस तुझा आठवडा. मला खूपच आवडली ही कॉन्सेप्ट.. मी सुद्धा असं करायचा प्रयत्न करेन. हो ही तुझी फ्रेम.. तुम्ही तिघे छान दिसता ह्या फोटो मध्ये.”
असं म्हणून तो मायाला बोलायची संधी न देता निघून जातो.. माया समीरकडे बघतच राहते.. तिच्या अश्या प्लॅनिंग च कौतुक करणारा (ऑफिसमधला) तो पहिला असतो. 
संध्याकाळी ऑफिस सुटतं आणि माया कॅब साठी उभी असते.. समीर आज स्वतः गाडी चालवत असतो. गेट मधून बाहेर पडताना तो मायाला बघतो.
“हॅलो माया, कॅब आली नाही का अजून? मी मदत करू का काही?”
“ नको.. येईल कॅब..”
“अगं तुझी कॅब येणार नाही कारण आज संप आहे कॅब आणि रिक्षा चा.. मग तू काय करशील?”
“पण कॅब बुक झाली आहे म्हणजे येईलच.”
“ ओके. बघुया.. “असं म्हणून तो गाडी बाजूला घेऊन थांबतो.
“सर माझ्यासाठी तुम्ही थांबायची गरज नाही. मी बघून घेऊन काय ते”
असं म्हणून ती कॅब च्या ड्रायव्हर ला फोन लावते आणि विचारते की कुठे आहात? तर समोरून उत्तर येतं की आज दुपारपासून संप आहे कोणीच येणार नाही.. 
आता माया समीरकडे बघते..
“झालं समाधान? एक काम करू मी बस स्टँड पर्यंत सोडतो.. बास? पुढचं तू तुझं बघ.”
आता मायाकडे काही पर्याय उरत नाही.. कारण खूप उशीर झालेला असतो. ती गुपचूप गाडीत जाऊन बसते.. 

(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)

© स्वराली सौरभ कर्वे

🎭 Series Post

View all