मायाला बेड वर पडल्या वर लगेच झोप लागते.. आता तिच्या स्वप्नात तीच बाग. छान फुलं, सगळीकडे रंगांची उधळण, आणि तो येतोय तिच्या जवळ.. तिच्या हृदयाची धडधड वाढते.. एक एक पाऊल पुढे येतोय. ती थोडी लाजून खाली बघते..आज तिचा राजकुमार कधी नव्हे तो जवळ आला होता..तो तिची हनुवटी आपल्या दोन बोटात पकडुन किंचित वर करतो. तिचे डोळे गच्च मिटलेले असतात.. हळू हळू ती डोळे उघडून बघते तर काय???? समीर असतो तिच्या समोर..
“नाहीsssssss” जोरात ओरडत उठते.. इकडे तिकडे पाहते तर ती तिच्या खोलीतच असते. घड्याळात पाहते तर ६ वाजलेले असतात.
“ हे काय पाहिलं मी? समीर ला? काय संबंध.. उगाच काहीही येत स्वप्नात.” ती परत झोपायचा प्रयत्न करते पण झोप लागत नाही. शेवटी उठून आवरून घेते आणि कॉफी घ्यायला स्वयंपाक घरात जाते. सुगंधाला आज फक्त छक्कर यायची बाकी असते.. ६ म्हणजे फारच झालं.
“काय ग राजकुमार पडला वाटतं घोड्यावरून?”
मायाला ऐकू जात नाही कारण तिची तन्द्री लागलेली असते. तिच्या डोक्यात समीर चा विचार चालू असतो.
“काय ग माया..” आईच्या हाकेने ती भानावर येते..
“नाही ग असं काही नाही” बाकी काही न बोलताच निघून जाते.. आवरून नाश्ता करून ऑफिस ला निघते पण डोक्यात समीर चा विचार चालू असतो..
ऑफिस मध्ये पोचल्यावर प्रिया आणि राज तिला भेटतात..
“हाय माया.. कसा होता कालचा दिवस? फारच चार्मिंग आहे ग तो..काय काय बोललात तुम्ही लंच मध्ये? अग सांग ना..”
“प्रिया आम्ही फक्त कामाचं बोललो. बाकी काही नाही.. तुला कशाला एवढ्या चौकश्या? कामाला चला आता.”
प्रिया आणि राज तिच्या कडे बघतच राहतात आणि ती तिथून निघून आपल्या खुर्चीवर येऊन बसते. तेवढ्यात समोरचा फोन वाजतो.
“माया, कम टू माय केबिन.” तिच्या बॉस चा फोन होता. तसं ती पटकन केबिन मध्ये जाते.
“माया, कालच तुझं प्रेझेंटेशन समीर सर ना खूप आवडलं आहे.. आणि ते आपल्या सोबत काम करायला तयार आहेत. इट्स अ बिग अचिवमेंट फॉर यू अँड यूर कंपनी.”
“ वाव. दॅट्स ग्रेट न्यूज सर.. पुढे कसं काम करायचं हे आपण प्लॅन करूया लवकरच.”
“ हो माया पण तुला ते इथे करता येणार नाही. समीर सरांची अट आहे की त आपला कर्मचारी त्यांचा ऑफिस मधून काम हॅण्डल करेल. तुला तिकडे जावं लागेल कारण हे प्रोजेक्ट पहिल्यापासून तूच करत आहेस.”
“पण सर बाकी प्रोजेक्ट ही आहेत हातात त्याचं काय?”
“डोन्ट वरी अबाऊट इट. तुझ्या बाकी प्रोजेक्ट्स च सगळं काम आणि ओव्हरव्ह्यू तू एक टीम बनवून त्यांना देऊन जा. पण मला सलील ग्रुप चा प्रोजेक्ट कुठल्याही तक्रारी शिवाय पूर्ण करून हवा आहे. आपल्या कंपनी साठी जॅकपॉट आहे हा.. आता मला कुठलही कारण नको आहे. तू परवा पासून सलील ग्रुप मध्ये जायचं आहेस. लक्षात ठेव. ह्या दोन दिवसात तुझी टीम तयार कर बाकी प्रोजेक्ट साठी.”
माया ला अजिबात पटलेलं नसतं. तिला वाटतं समीर ने मुद्दाम आपल्याला तिथे बोलावून घेतलं. पण तिच्या बॉस समोर तिचं काही चालत नाही.
“एक नंबर फ्रॉड आहे हा.. काहीतरी प्लॅन असणार ह्याचा नक्कीच. नाहीतर मला कशाला तिकडे बोलावलं असतं..” ती बडबड करत खुर्चीत बसते. राज तिला असं पाहून तिच्याकडे येतो
“ काय ग.. बॉस सोबत वाजलं की काय?”
“ नाही रे. तो समीर, सलील ग्रुप मधून आलेला.. त्याने प्रोजेक्ट फायनल केला आहे आणि अट म्हणून मला आता त्याचा ऑफिस ला जावं लागणार आहे.. हा माणूस माझी पाठ काही सोडत नाही.. स्वप्नात पण आला आणि आता तर काय रोज त्याचच तोंड पहायचं..”
“वेट.. व्हॉट?? तो तुझ्या स्वप्नात? राजकुमाराच्या वेशात?? हाहाहाहा सही है. तू तर फास्ट निघालीस एकदम..”
“गप रे राज. माझं डोकं आधीच गरम झालं आहे त्यात तू अजून नको त्रास देऊस.. नशीब ती प्रिया बिझी आहे. ते सोड मला तुझी मदत लागेल. एक टीम बनवून आपल्याला माझे प्रोजेक्ट त्यांना द्यायचे आहेत. तूच हेड हो ह्या टीम चा. प्लीज हे कर माझ्यासाठी. आय नीड अ कॉफी”
“ ओके बॉस”
असं म्हणून राज कामाला निघून जातो आणि माया कॉफी घ्यायला जाते.. कॅन्टीन मध्ये बसून ती परवा पासून काय होईल ह्याचा विचार करते. कसं असेल तिथे काम करणं, वेगळं ऑफिस, वेगळी जागा शी अजिबात चांगलं वाटत नाही आहे. कोणी ओळखीचं पण नसेल.. तरी मला जावच लागेल.. अशात तिची कॉफी संपते आणि ती परत कामाला लागते.
आज जरा पाऊस शांत शांत असतो. त्यामुळे ती घरी येई पर्यंत अगदीच वाईट मूड मध्ये नसते. पण तीच लक्ष ही नसतं. कसं बसं जेवून ती झोपायला जाते. सुगंधा आणि सुरेश ला कळतच नाही असं काय झालंय आज की माया चा मूड चांगला नाही. ऑफिस मध्ये काहीतरी झालं असेल म्हणून ते सोडून देतात.. इकडे माया रात्री काम आटपून खूप उशिरा झोपते..
(माया सलील ग्रुप मध्ये गेल्यावर काय होईल? तिला समीर सोबत जुळवून घेता येईल का? त्यासाठी पुढचे भाग वाचत रहा.)
(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)
© स्वराली सौरभ कर्वे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा