माया जागी होते.. “आज सूर्य कुठे उगवला बघू जरा??” सुगंधा पडदे बाजूला करत बोलते.
“अं?? पूर्वेलाच ग काही तरी काय?”
“नाही आज माझ्या घशाला थोडा आराम मिळाला म्हणून..” “राजकुमार दिसला की काय?”
“कसला दिसतोय राजकुमार.. पाऊस आला माझ्या स्वप्नात सुद्धा.. हा पाऊस जिकडे तिकडे आहेच.. शी.. दिसणारच होता ग पण चिखल झाला सगळीकडे”
“आज तुझ्या बाबांशी बोलते लवकर लग्न लाऊन टाका हिचं म्हणजे तुझ स्वप्न बंद होईल आणि माझा त्रास.. आवर लवकर आता. नाश्ता करायला ये!”
माया आवरून खाली येते. सुरेश आणि सुगंधा नाश्ता करत असतात..
“या या तुमच्या आईसाहेब म्हणत होत्या लग्नाचा विचार करा पोरीचा. स्वप्नात म्हणे राजकुमार दिसतो.. आम्हाला सांग तरी कसा दिसतो तो..”
“काय ग आई लगेच सांगायची काय गरज होती. बाबा मला आत्ता लग्न करायचं नाही. स्वप्न पाहणं म्हणजे काय लगेच शुभमंगल सावधान होत नाही..”
“ कोणी पाहिला आहेस तर सांग हो.. आमच्या पासून लपवून ठेऊ नकोस.”
“ बाबा मी तुम्हाला सांगणार नाही असं होईल का?”
“ते ही खरंच आहे.. हिच्या अटीवर हो म्हणायला हवा ना?” बाबा हळूच आईला बोलतात.
काय बोललात?
काही नाही ग जा तू.. बेस्ट लक फॉर प्रेझेंटेशन…
माया ऑफिस ला पोहोचते.. आज एक महत्त्वाची मीटिंग सलील ग्रुप सोबत असते. तिला प्रेझेंटेशन द्यायचं असतं. मायाला बॉस सांगतात की क्लाएंट कडून त्यांचा प्रोजेक्ट हेड येईल त्याची सगळी व्यवस्था, खाणं पिणं आणि त्याला कंपनी देणं ही तुझंच काम आहे.. प्रोजेक्ट मोठं असल्यामुळे आज अख्खं ऑफिस कामात बुडालं होतं. प्रिया आणि राज शी बोलायलाही वेळ मिळाला नव्हता. त्या दोघांनी तिला फक्त बेस्ट लक दिलं आणि आपापल्या कामाला गेले.
थोड्याच वेळात क्लाएंट कडून माणूस आला.
सावळा, बोलके डोळे, छान हेअरकट, मस्त तब्येत, सावळ्या रंगावर उठून दिसणारा फॉर्मल सूट बास.. सगळ्यांची नजर त्याचाकडेच.. अर्थात आपल्या मायाच काही वेगळं झालं नव्हतं.. तो आत केबिन मध्ये गेला. माया तिथेच उभी त्याला खुर्चीवर बसताना पाहत होती. बराच वेळ झाला माया आली नाही म्हणून बॉस ने मायाला कॉल केला.
“माया व्हेअर आर यू? कम टू माय केबिन. ही इज वेटींग.”
गडबडीत ती केबिन मध्ये जाते.
ही माया. माया हे समीर. माया तुम्हाला प्रेझेंटेशन देणार आहे आणि आज तुम्हाला जे काही लागेल ते मायाला सांगा..
“हॅलो सर, बी कंफर्टेबल.. तर आपण प्रेझेंटेशन सुरू करूयात का? “
“ मिस माया नक्कीच पण एक कप कॉफी मिळेल का मला?”
माया अजूनही थोडी हरवलेली असते. “ओह सॉरी, मी विचारलंच नाही तुम्हाला”
“इट्स ओके माया, आर यू नर्व्हस?”
“नाही सर, मी एकदम ठीक आहे.” (पण तुम्ही कसले हँडसम आहात.. हे ती मनात म्हणते)
“तुम्ही काही बोललात का? नाही म्हणजे चेहरा वेगळं सांगतोय काहीतरी.” समीर मिश्कीलपणे बोलतो.
माया एकदम गडबडते आणि तशातच फोन करून दोन कॉफी ऑर्डर करते.
“मिस माया तुम्ही सुद्धा कॉफी घेता तर.. “
“हो सर, मला खूप आवडते कॉफी.. आय अम शूऊर तुम्हाला ही आवडत असणार.”
“हो. चला आपण प्रेझेंटेशन करूया की अश्याच गप्पा मारायच्या आहेत?”
लगेच सुरू करू..
माया च प्रेझेंटेशन चालू होत. एक एक मुद्दा ती खूप आत्मविश्वासाने सांगते. समीर तिचं प्रेझेंटेशन आणि तिलाच पहात असतो. अर्थात कोणीही समोर बोलत असेल तर त्याचाकडेच पाहतो ना आपण. मधेच बोलताना तिला ठसका लागतो तसं समीर पटकन उठून पाणी देतो. “ आर यू ओके?” माया पाणी पिते आणि एक कटाक्ष बाकी मेंबर्स कडे टाकते. आता काय प्रिया आणि राज टपलेलेच असतात. तिला अवघडल्यासारखं होत.
“सॉरी सर, आपण सुरू करु परत.”
पुढचं प्रेझेंटेशन खूप छान होतं आणि जेवायची वेळ होते. मायाला जबाबदारी दिल्या मुळे ती समीर सोबत जेवायला कॅन्टीन मध्ये जाते. अर्थात आज राज आणि प्रिया नसतात त्यामुळे तिला करमत नसतं पण समीर सोबत एकट असणं कुठेतरी तिला सुखावत होतं. समीर होताच तसा की कोणीही त्याचावर भाळेल अगदी पहिल्या नजरेत..
माया त्याला काय ऑर्डर करु असं विचारते.
“माया मला काहीही चालेल.. तुला हवं ते मागव.. सॉरी अरे तुरे केलेलं चालेल ना?”
“काहीच प्रॉब्लेम नाही सर.”
“सर नको समीर च म्हण. आपली फॉर्मल मीटिंग संपली आहे सो यू कॅन रिलॅक्स..”
“असं मी नाही करु शकत. तुम्ही आमच्या क्लाएंट कंपनी चे कर्मचारी आहात..”
“काय? मी कोण आहे??” समीर गोंधळून विचारतो.
“ तुम्ही सलील ग्रुप चे प्रोजेक्ट हेड.. मी दुसरं काही बोलले का? प्रोजेक्ट हेड हा कर्मचारी च असतो ना?”
“नाही बरोबर आहे म्हणा.. तू सर च म्हण मला..” माया ला कळत नव्हतं हा माणूस असं काय बोलतो आहे?? मनात विचार करते जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे आणि ती जेवण ऑर्डर करायला निघून जाते.
क्रमशः
( आपल्या कथेच्या हीरो ची एन्ट्री झाली आहे पण कामाच्या निमित्ताने.. पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा)
(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)
© स्वराली सौरभ कर्वे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा