ओ मेरे राजकुमार (भाग १४)

Love story

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गडबड चालू असते. माया नेहमीप्रमाणे ऑफिसला येते. आज मॅडम छान ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस घालून आल्या असतात. तिच्या डेस्क वर जाऊन ती समीरची वाट बघत एक एक काम करायला लागते.. तेवढ्यात समीर येतो आणि दोघांची नजरानजर होते.. समीर आज जास्त आनंदी होता. त्यानेही पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. दोघंही हसरे चेहरे बघून कामाला लागले.. दिवसभर काम झाल्यावर संध्याकाळी दोघं कॉफी शॉप मध्ये एकत्र वेळ घालवतात..
“समीर तुझ्या आई बाबांबद्दल सांग ना.. ते के करतात?? म्हणजे आई तर आश्रम सांभाळते हे मला कळलं पण मी भेटले नाही अजून त्यांना..”
आता मात्र समीरला कळत नाही की मायाला खरं सांगू का नको.. खरं कळलं तर ती कशी रिअॅक्ट करेल? पण नाही सांगितलं तरी एक ना एक दिवस सांगावं तर लागेल ना.. अश्या विचारात असताना माया टिचकी वाजवते. 
“समीर कुठल्या विचारात बुडला आहेस??”
“काही नाही..”
“मग सांग ना आई बाबा काय करतात..”
“बाबांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि आई फक्त आश्रम बघते. बाबांना कधी कधी मदत करते.” 
“अच्छा.. पण काय व्यवसाय नक्की?”
“अगं फार मोठा नाही काही पार्टस बनवतात इंजिन चे.. बास.. मला काही कळत नाही त्यातलं..” असं म्हणून तो वेळ मारून नेतो. “चल कॉफी झाली असेल तर निघू..”
“अरे नको. मी जाईन. उगाच तुला इतकं लांब यायला लागतं.”
“का? मी सोडायला आलो तर आवडणार नाही का?”
“आवडेल पण नको आज.. बरं आई बाबांना आपल्या बद्दल कळलं आहे.. म्हणजे ते इतके स्मार्ट आहेत की त्यांना फक्त गुलाबाच्या फुलावरून अंदाज आला.. मग काय मी सांगितलच.. पण प्रामाणिकपणे सांगते.. तुझ्या बद्दल मी काही सांगू नाही शकले घरी.. कारण मला डिटेल माहिती नव्हती ना.. एकदा वेळ काढून आपण दोन्ही फॅमिली भेटू ना किंवा माझी भेट घालून दे तुझ्या आई बाबांशी..”
समीर जरा विचारात पडतो.. “हो चालेल ना.. आत्ता ते कामानिमित्त बाहेगावी गेले आहेत. आले की लगेच भेटू.. बरं तुझी कॅब बुक कर मग तू निघालीस की मी निघेन..”
“ओके..” असं म्हणून माया कॅब बुक करते आणि थोड्या वेळातच कॅब येते.. 
“माया, आय लव यू सो मच.. मला सोडून नाही ना जाणार कधी??”
“समीर इतका का इमोशनल झाला आहेस? अचानक हे काय? आत्ता तर ठीक होतास आणि आता हे काय? काही सांगायचं आहे का?? मी थांबू का?”
“नाही ग असच.. तू जा.. पोचलीस की फोन कर..”
“हाहाहा अरे मी आधीही रोज एकटीच जायचे..”
“पण आधी तू एकटीच होतीस आता तू माझी आहेस ना.. म्हणून काळजी वाटते..”
“बास इमोशनल नको होऊ आता. बाय..” असं म्हणून माया निघून जाते. आता हीची भेट आपल्या आई बाबांशी कशी घालून द्यायची हा विचार समीरच्या मनात चालू होतो..
…...........................................................
दोन चार दिवस असेच जातात ऑफिसचा कामात.. समीरला एका मीटिंग साठी चेन्नईला आठवडाभर जायला लागणार असतं.. तो मायाला सांगतो की तिथल्या कंपनी बरोबर एक प्रोजेक्ट आहे म्हणून त्याला जावं लागणार आहे म्हणून आज तो मायाला सोडायला तिच्या घरी जाणार असतो.. ऑफिस मध्ये समीर खूप बिझी असतो कारण त्याला सगळी सोय करून मग जायचं असतं. माया घरी फोन करून सांगते की तिला उशीर होणार आहे आणि समीर सोडणार आहे.. काम झाल्यावर ते दोघंही निघतात.
“माया, आय विल मिस यू.. आठवडाभर खूप आठवण येईल तुझी..”
“समीर कामासाठी चालला आहेस ना? आणि एक आठवडा असा जाईल पटकन. आपण फोनवर बोलूच की..”
“हो ग पण फोन वर बोलणं आणि रोज भेटणं, बोलणं ह्यात फरक आहे ना.. आता रोज तुझी सवय झाली आहे.. कामात असलो तरी एकदा तुला समोर पाहिलं की बरं वाटतं.”
“इट्स ओके समीर.. एकच आठवडा.. कामात तुला कळणार पण नाही..”
“हो.. काय करणार..” बाकी गप्पा मारत मारत कधी मायाच घर येतं कळतच नाही .. खूप जड मनाने आणि नाखुशिने समीर मायाला बाय करतो आणि निघतो..
माया घरी येते तेव्हा आई बाबा तिला समीर आत आला नाही म्हणून विचारतात.. तेव्हा तो उद्या चेन्नई ला जातोय हे ती त्यांना सांगते.. रात्री सगळं आवरून झाल्यावर दोघांचा कॉल होतो. 
“माया उद्या पाच ची फ्लाईट आहे. मी आता निघेन थोड्या वेळात.. खूप आठवण येईल ग तुझी.. तुला पण घेऊन जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं..”
“हम्म्म्म.. काय करणार आता.. चल हॅपी जर्नी पोहोचलास की फोन कर..”
“हो.. कामाच्या वेळेत बोलणं जमणार नाही पण माझ्यासाठी वेळ ठेव.”
“ऑफ कोर्स डिअर. बाय.”
“बाय.” दोघंही फोन ठेवतात पण त्यांना दुरावा सहन होणार नसतो..
एक दोन दिवस असेच कामात जातात.. फोन वर बोलणं होतं पण आठवण खूप येत असते. 
……………………………………………………………………….
आज ऑफिस मध्ये सगळे लवकर आले असतात. माया आल्यावर पाहते तर सगळं ऑफिस गजबजून गेलेलं असतं. सगळीकडे धावपळ सुरू असते. माया शुभम ला बोलावते..
“शुभम, काय आहे आज ऑफिस मध्ये? इतकी गडबड आणि आज सगळे जास्त लवकर आलेत.”
“अगं सलील सर आणि मॅडम म्हणजे त्यांचा मिसेस येणार आहेत. आज त्यांना काही जाहीर करायचं आहे म्हणे. ते आले की सगळ्या कामांचा आढावा घेतात त्यामुळे सगळे रिपोर्ट करण्यात बिझी आहेत. .”
“हो का.. मला सुद्धा समजेल आपले टॉप बॉस कोण आहेत.. चल मी माझं काम करते.”
“हो.. मी सुद्धा फाईल रेडी करतो.”
थोड्या वेळाने सलील आणि निता ऑफिस मध्ये येतात. सगळे जण उभे राहतात पण माया तिच्या कामात गुंतलेली असते.. तिला कळतच नाही सगळे उभे राहिले आहेत.. इकडे निताची नजर माया म्हणजे कोण असेल ह्या शोधत असते. सलील जाताना त्याचं लक्ष मायाकडे जातं. तिच्याकडे पाहून ते थांबतात,दोन सेकंद पाहतात पण मॅडमची तंद्री लागलेली असते. तिचं लक्ष नाही हे पाहून केबिन मधे निघून जातात..
केबिन मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मीटिंग चालू करतात. 
“माया, अगं मगाशी सर आले तेव्हा तू उभी राहिली नाहीस त्यांना वेलकम करायला..”
“काय?? आले सुद्धा ते? मी इतकी गढले होते ना कामात.. अरे पण आमच्या ऑफिस मध्ये नाही असं काही उभे राहण्याची पद्धत.. तसं म्हणशील तर मग आपले टीम हेड म्हणजे बॉस च ना.. त्यांचा साठी पण रोज उठायचं का?”
“अगं तसं नाही पण हे मालक आहेत साधे सुधे नाहीत आणि समीर सर आहेत ना त्यांच्यासाठी उभ रहायला लागलं तरी काय नवल..”
“म्हणजे? समीर फक्त एक हेड तर आहेत एका टीम चे.. इतकी फॉर्मलिटी कशाला..”
“अगं तुला माहित नाही का?? समीर सर आहेत ना…….”
दैव योगाने तिथे पिऊन म्हणजे रवी येतो.
“माया मॅडम तुम्हाला आत बोलावलं आहे मोठ्या साहेबांनी..”
“मला?? का?”
“ते तुम्ही मगाशी बसून राहिला ना.. म्हणून…. जा तुम्ही लवकर ते वाट पाहत आहेत.”
“ओके. शुभम आलेच मी.” असं म्हणून ती केबिन जवळ जाते. मनात धाकधूक असते पण आपली कंपनी नाही ही तर मग असं काही गरजेचं असतं का ह्याचा विचार ती करत असते.
“ मे आय कम इन सर?”
“या आत..”
माया आत जाते..
“हॅलो गुड मॉर्निंग सर, मॅडम..”
“गुड मॉर्निंग.. बसा..”
“नको.. मी ओक आहे.”
“तुम्ही ओके च आहात हो.. बसा.. मगाशी आम्ही आलो तेव्हा फारच गढलेल्या होता तुम्ही कामात.. मला खूप आवडलं ते. हे उभे राहून रिस्पेक्ट देणं मला नाही आवडत.. किती वेळ जातो चक्क दोन मिनिटे पण ती सुद्धा महत्त्वाची असतात.. स्टाफ ला हजार वेळा सांगून ऐकत नाहीत तुम्ही वेगळ्या निघालात.. गुड..”
मायाला थोडं बरं वाटतं की चला आपण चुकलो नाही..
“थँक्यू फॉर सर मला वाटलं तुम्हाला वाईट वाटलं असेल..”
“ नाही. डोन्ट वरी.. तुमचं नाव काय? नवीन जॉईन झालात का?”
“मी माया.. आमच्या कंपनी सोबत ह्या कंपनी च प्रोजेक्ट चालू आहे म्हणून मी इथे तात्पुरती आले आहे..”
माया म्हंटल्यावर निता चमकते..
“तूच माया?? म्हणजे तूच समीर सोबत काम करतेस का?”
“हो मीच..” निता लगेच तिच्या जवळ येते आणि तिला एकटक उत्सुकतेने पाहते.. तिचं असं बघणा मायला जरा आवडत नाही.. 
“सलील हीच माया.. आपल्या समीरची माया..” निता उत्साहाने बोलून जाते.
“आपला समीर?? म्हणजे?” मायाला बोलण्याचा अर्थ कळत नाही.. तेवढ्यात सलील बाजू सांभाळून घेतो. “अगं निता जरा ती फाईल देतेस प्लीज.. माया तू जा.. छान काम करतेस बेटा.. असच चालू ठेव..” नीताला कळतं आपण अती उत्साहात काय बोललो ते.. माया गोंधळून बाहेर येते.. विचारात असतानाच शुभम तिला हाक मारतो..
“माया.. काय झालं? अशी गोंधळलेली का दिसतेस??
“आ.. काही नाही.. शुभम अरे आत मला काही नाही बोलले ते.. पण त्या मॅडम नी आपला समीर असं म्हंटल.. म्हणजे?”
“अगं तेच तर.. आपले समीर सर आहेत ना.. ते नुसते प्रोजेक्ट हेड नाहीत ह्या कंपनी चे भावी मालक आहेत . समीर सलील देशमुख..”
माया हे ऐकून स्तब्ध होते. तिला काय बोलायचं सुचत नाही.. ती तडक आपल्या डेस्क जवळ जाऊन सगळं सामान घेऊन ऑफिस मधून बाहेर पडते…..

 क्रमशः

© स्वराली सौरभ कर्वे

🎭 Series Post

View all