ओ मेरे राजकुमार (भाग १३)

Love story

पाऊस जोरात पडत असताना समीर हातात गुलाब घेऊन मायाच्या उत्तराची वाट पहात असतो.. माया त्याचा चेहऱ्याकडे बघत असते. दोनच मिनिटात ती त्याला हो म्हणते आणि गुलाबाचे फुल हातात घेते.. बास!!! अख्खा आश्रम आज पावसामुळे नाही तर दोघांच्या प्रेमाचा साक्षीदार म्हणून बहरून जातो.. समीर आणि माया आता परत निघतात.. दोघेही ओलेचिंब असतात.. मायाला थंडी वाजत असते.. समीर गाडीत हीटर ऑन करतो तेव्हा तिला बरं वाटतं
“मग पाऊस आवडला की नाही?? का अजून राग रागच आहे पावसाचा??”
“नाही रे.. असा पाऊस मी कधीच एन्जॉय नाही केला.. लहानपणापासून कायम वेगळाच पाऊस पहिला मी.. का माहीत नाही पण आज माझा स्वप्नातला राजकुमार माझ्यासोबत होता त्यामुळे मला पाऊस आवडला..”
“स्वप्नातला राजकुमार?? कोण??”
“तू विसरलास का मगाशी प्रेमाची कबुली दिलीस.. म माझ्या स्वप्नातला राजकुमार कोण?”
“अरे हो.. मीच.. पण काहीही काय? मी हा प्रत्यक्षात आहे.. स्वप्नात नाही.”
“अरे खरंच.. मला खूप दिवस असं स्वप्न पडत होतं.. म्हणजे मी पहायचे अर्थात.. पण तुझी भेट झाल्यापासून तूच दिसायला लागलास.. नियती ने संकेत दिले होते बहुतेक मला..”
समीर तिच्याकडे एकटक पाहतो आणि दोनच सेकंदात जोरात हसायला लागतो..
“काहीही माया.. तू स्वप्नं पाहतेस? म मी दिसत होतो तर सांगितलं का नाहीस मला? एवढा खटाटोप मी केला नसता ना..”
समीर प्रेमाने तिच्याकडे बघतो.. माया लाजते..
“चला.. मला उशीर झाला आहे आणि आई बाबा वाट पाहत असतील.”
“ओके.. पण घरी काय सांगणार आहेस माया? तुझ्या घरचे मला स्वीकारतील का?”
“हो.. का नाही?? थोडं समजावून सांगावं लागेल पण मला खात्री आहे ते नाही म्हणणार नाहीत.. तुझ्या घरी काय?”
समीरला आठवतं की निता आणि माया ची भेट घडवून आणायच प्रॉमिस त्याने नीताला केलं होतं.. पण मायाला अजूनही तो नक्की कोण हे माहीत नव्हतं..
“अगं काही प्रॉब्लेम नाही.. अजून वेळ जाऊ दे.. आपण थोडा एकमेकांना वेळ देऊ मग सांगू की..”
“ चालेल .. हे बरं होईल.”
समीर गाडी वळवतो.. आधी मायाला सोडतो आणि मग घरी जातो.. आज निता आणि सलील पण नसतात त्यामुळे त्याला करमत नसतं. फ्रेश होऊन तो नीताला फोन लावतो पण लागत नाही म्हणून एक मेसेज करून ठेवतो , ' शी सेड येस. '
…………………………………………………………………......
इकडे माया घरी फ्रेश होऊन खोलीत बसते.. सुरेश खोलीत येतात..
“काय माया? हल्ली माझ्याशी बोलायला वेळच नसतो तुला..”
“बाबा.. असं कसं होईल? मी येतच होते तुमच्याकडे..”
“ मग आज काय स्पेशल? सुगंधाने सांगितलं की तू त्या समीर सोबत आश्रमात गेली होतीस.. कसा गेला मग आजचा दिवस?”
“ खूप छान.. समीर खूप चांगलं काम करतो.. म्हणजे तो नाही त्याची आई बघते तो आश्रम पण हा कधीतरी भेट देतो.. किती जीव लावतो सगळ्यांवर..” बडबड चालूच असते तिची.. सुरेश शांतपणे ऐकत असतात.. थोड्या वेळाने तिला कळतं की आपण जरा जास्तच कौतुक करत आहोत आणि बाबा काहीच बोलत नाहीत..
“बाबा काय झालं? मी खूप बडबड करत आहे का?”
सुरेश काही न बोलता तिथून निघून जातात.. मायाला कळतच नाही काय झालं.. ती विचार करते आपण काही जास्त बोलून तर गेलो नाही ना? 
ती पाठोपाठ सुरेश कडे जाते.. सुगंधा ही तिथेच असते..
“बाबा काय झालं? तुम्ही असे काही न बोलता निघून आलात?”
“काही नाही.. माझी लेक माझ्यापासून खूप काही लपवत असते हल्ली.. ते जाणून घेतलं..”
“मी काय लपवलं? असं काय बोलताय?”
“समीर आवडतो ना तुला?? त्याचं मला येऊन भेटणं, तुला घेऊन आश्रमात जाणं, घरातही तू त्याचाच उल्लेख जास्त करतेस आणि वर म्हणजे आश्रमात आज काय घडलं ते मला माहित आहे..”
माया एकदम चमकुन पाहते..
“काय घडलं??”
“आता हे तूच सांगितलं तर बरं नाही का?”
मायाला सुचतच नसतं काही.. सुरेश आणि सुगंधा जेवढे नव्या विचारांचे असतात तेवढच जुनं जपणारे असतात .
“बाबा समीरने त्याचा प्रेमाची कबुली माझ्याजवळ दिली आणि माझंही त्याचावर प्रेम आहे.. दोघांचा मनात होतं पण आजच ते आम्ही एकमेकांना सांगितलं.. काही कारणांमुळे त्याची इमेज माझ्या मनात चांगली नव्हती पण गेल्या काही दिवसात त्याचं वागणं, बोलणं , त्याचा भावना सगळं मला आवडत गेलं.. कोणी काही सांगायचा आधीच मी तुम्हाला सांगणार होते पण समीर म्हणाला थोडा वेळ जाऊ दे मग सांगू..”
माया सगळं घडाघडा बोलून टाकते.. सुरेश- सुगंधा एकमेकांकडे पाहतात आणि हसायला लागतात.. 
“बरं बरं ठीक आहे.. तू आम्हाला सांगितलस एवढंच पुरेसं आहे.. पण त्याचा घरचं काय? कोण कोण असतं घरी? कुठे राहतो? हे माहिती आहे का फक्त कंपनी मध्ये चांगली पोस्ट एवढंच??”
“नाही बाबा.. त्याचा घरी तो आणि त्याचे आई बाबा असतात.. आडनाव देशमुख.. घर कुठे माहीत नाही पण खूप चांगला आहे हे महत्त्वाचं आहे..”
“बाळा तू सज्ञान आहेस. तू वेळ घेऊन ठरव असं मला वाटतं. आधी त्याची नीट माहिती करून घे. घरं पण जुलाली पाहिजेत ना? आम्ही काही तुझ्या कुठल्याही निर्णयाच्या विरोधात नाही पण विचार करून निर्णय घे इतकंच सांगणं आमचं कर्तव्य आहे. बाकी मुलगा मला दोनदा भेटला आहे त्यामुळे चांगला आहे हे मी सुद्धा पाहिलं.”
“म्हणून मला तुम्ही दोघं खूप आवडता.. मी नक्की सांगते पण माझी निवड योग्यच ठरेल…”
“तसच होऊ दे बाळा… चल जेवायला..”
“हो जाऊया.. पण बाबा तुम्हाला कसं कळलं आश्रमात काय घडलं??”
“ बाप आहे मी तुझा.. तुझ्या बॅग मध्ये गुलाब पाहिलं.. अंदाजानेच तुला विचारलं बाकी मला आश्रमातल्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या तूच सांगितल्या..”
“धन्य आहात तुम्ही” असं म्हणून ती सुरेशला हात जोडते.. 
……………………………………………………………………………….
समीरचा फोन वाजतो…
“समीर.. अरे तू किती छान बातमी दिलीस.. आता मी आले की तिला भेटणार.. मला काही माहीत नाही.. आता सस्पेन्स नको..”
“अगं हो.. पण मी सांगितलं आहे ना तुझी आणि तिची भेट होईल.. थांब ग जरासं..”
“बरं ठीक आहे.. अजून किती वाट पहायची आम्ही कळत नाही..”
“थोडीच ग.. बरं तुम्ही कधी येताय इकडे? मी खूप मिस करतोय तुम्हाला.. आपण सेलिब्रेट करू आल्यावर..”
“माहीत नाही. सलील च काम झालं की लगेच.. चल मी ठेवते मला एक फोन करायचा आहे..”
“ओके बाय.. लवकर ये..”
असं बोलून दोघंही फोन ठेऊन देतात.. समीर आणि मायाला झोप लागतच नसते कारण आज त्यांचा दिवस खास झालेला असतो.. शेवटी माया समीरला फोन करते.. दोघंही खूप गप्पा मारतात. मायाच्या स्वप्नातला राजकुमार आता तिच्याशी प्रत्यक्षात बोलत असतो.. 
 क्रमशः
(वाचकहो. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. पण एक ब्लॉग लिहायला दोन दिवस लागतात किंवा कधी एका दिवसात लिहून होतो.. घर,काम सांभाळून हे लिखाण करत असल्यामुळे वेळ लागतो तरी समजून घ्या.. तुम्ही माझ्या कथेवर इतकं प्रेम करता त्याबद्दल तुमची ऋणी आहे..)
(पुढील काही भागात खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत.. आपल्या जोडीची प्रेम कहाणी अशी कशी सरळ सोप्पी असेल . त्यासाठी कथेला वेबसाईट वर फॉलो करा..)
© स्वराली सौरभ कर्वे.

​​​​

🎭 Series Post

View all